Wheat Beer

गव्हाची बियर

https://drive.google.com/open?id=1Q8be-Hkntdc86OQ6QN6bQwEZlcdvShCXZw

लिंक वरील प्रमाणे
???

अनेक अपयशा नंतर Wheat Beer यशस्वी केली . ५ लिटर ...
फोटो टाकायचा प्रयत्न केला आहे.

अर्थात, ही काही फोटो पाहून जोखायची वस्तू नाही.

आदिती देवींच्या धमकी मुळे.........

wheat Beer करताना सगळ्यात बे भरवश्या चा भाग हा माल्ट व्यवस्थित होणे हाच असावा. कारण नंतर सगळे wine च्या पा कृ प्रमाणेच आहे. air lock नीट जमले आणि इन्फ़ेक्षन टाळण्या साठीची काळजी घेतली की wine मध्ये काहीच चुकत नाही.
अर्धा किलो गहू रात्रभर भिजत घालावेत.
निथळून मोड आणायला ठेवावेत.
amaylese kick start व्हायला हवामानातील उष्णता आणि आर्द्रते नुसार कमी अधिक वेळ लागू शकतो.
जाला वर मोडाच्या लांबी वरून आडाखे सुचवलेले आहेत. पण ते मलातरी लाभले नाहीत. त्यापेक्षा रोज सकाळ संध्याकाळ चिमुटभर गहू चावून खावे. साधारण तीन दिवसांनी गोड लागतात. ही वेळ पकडून ते झटपट वाळवावे लागतात आणि ते हि अंघोळीच्या पाण्याच्या तापमानाला. oven मध्ये एवढा काटेकोर कंट्रोल जमत नाही. आरसा काढून टाकलेल्या सोलर कुकर मध्ये पूर्ण दिवस उन्हाचा मिळाला तर ठीक. नाही तर बुरशी येण्यास सुरुवात होते. आणि माल्ट वाया.
गव्हाचा माल्ट बार्ली पेक्षा अवघड जातो आणि बराच अ-गोड राहतो. कारण सगळा स्टार्च साखरेत बदलत नाही.
व्यवस्थित झाला तर गव्हाचा माल्ट नुसता खायला अतिशय स्वादिष्ट लागतो. पण ferment होऊन पुरेसे इथेनॉल होत नाही. नुसत्याच किडन्या धुवायच्या नसतील आणि high होणे महत्वाचे असेल तर साखर वापरावी लागतेच. पण गोडी अजिबात शिल्लक राहू नये तर लिटर मागे दीडशे ग्रम पेक्षा जास्त नको.
इथेनॉल स्वतः कडू असणारच. पण ते पुरेसे नसेल तर मी वापरलेले काही पर्याय. से मात्र air lock बसवण्य आधी घालायचे.
मेथी च्या बियांबद्दल वर लिहिले आहेच. त्या अगदी कॉफी बिन्स एवढ्या भाजून दळून ५ लिटर ला २०० ग्रा. पुरतात. तपकिरी रंग मात्र येतो.
काष्ठ औषधा च्या दुकानात कुड्याचे पाळ मिळते. उगाळून चार चमचे ५ लिटर ला.
hops चा तुरट पणा मात्र येत नाही.
तर माल्ट, पाणी, साखर, कडू पावडर, मिनिट भर उकळून झाकणाखाली गार करून बरणीत भरून १५ ग्रा. यीस्ट मिसळून air lock (हे प्लास्टिक च्या नळ्या आणि hot glue वापरून कुठल्याही आकाराच्या बरणीला बसवता येईल) लावून ठेवायचे. wine सारखी सगळी काळजी घ्यायचीच.
air lock मधील बुडबुडे थांबले की तीन चार दिवसांनी पहिले decant. आणि मग सवडीने दुसरे. जरा आधीच घट्ट बुच लावले असेल तर Co2 चा छान फेस ग्लासात दिसू शकतो. नाही तर वाटल्यास carbonate करू शकता.
मिथेनोल होण्याची काळजी मलातरी अजिबात वाटत नाही. पण बाक्टेरिया पूर्ण मारला नाही तर विनेगर - सिरका होण्याची शक्यता wine पेक्षा जास्त.
गोडी शिल्लक राहण्याचा धोका पत्करून साखर २०० ग्रा पर्यंत वाढवली तर ७५ किलो चा माणूस पाव लिटर मध्ये चांगला high होण्या एवढी strong होऊ शकते पण मग ती wine च्या जवळ जाईल.
टिकवायची असेल तर पाव चमचा potassium meta bi sulphite मिसळून ठेवावी नाही तर शिल्लक यीस्ट मुले अल्डिहाईड तयार होत राहतील. चव आणि आरोग्य दोन्हीसाठी वाईट. potassium meta bi sulphite जास्त झाल्यास गंधकाचा वास राहू शकतो.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फोटो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिअरचा फोटो-

तुमचा फोटो डाउनलोड करून पुन्हा फेसबुकवर टाकून त्याची लिंक वापरली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा !!! अभिनंदन . आधी पाककृती सांगा . काय चुका झाल्या आणि कशा सुधारल्या ते सांगा ,ते जास्त इंटरेस्टिंग असेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

moved

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बियर आणि वाईन न पिता हिमांशु यांना धमकी विनंती करण्यात येत आहे की हा महत्त्वाचा मजकूर धाग्याच्या मजकुरातही डकवावा. पुढच्या वेळेस वाचताना, शोधताना त्याचा बराच फायदा होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रामाणिक प्रयत्न.
*गहू चावून खावेत* ---
साके बनवणाय्रा एक्सपर्टचे दात तांदुळाची चव घेऊन पार कण्या झालेले तो दाखवतो एका कुठल्या व्हिडिओत आहे.
*कुडाचे पाळ* ची शक्कल नामी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार म्हणजे फार ( चांगला ) रिसर्च आणि प्रयत्न दिसतोय तुमचा .
वाईन बनवणे या पेक्षा सोपे वाटते. बिअर चे हि तसेच वाटत होते . पण तुमच्या एवढा 'विचार 'त्यात घातला तर थोडे अवघड पण बरेच इंटरेस्टिंग वाटत आहे .
( बाकी इंडस्ट्रीयली स्पिरिट्स / वाईन / बिअर बनवणे त्यामानाने सरळ सोट असते . )

तुम्ही जगाच्या कुठल्या भागात राहाता ? मायक्रो ब्रेवरी वाल्या कोणाला भेटला आहात का ? त्यांच्याशी विचारविनिमय केला आहात का ?
( काही शंका असल्यास व अशांना विचारायच्या असल्यास कळवणे . पुढल्या दोन तीन आठवड्यात एकाशी गाठ होणार आहे . त्याला विचारू शकतो . )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्याच गावात असतो.
त्यामुळे असल्या छंदा मध्ये आव्हाने जरा जास्त असतात. साधे खात्रीचे brewer यीस्ट मिळण्यासाठी सुद्धा खटपट करावी लागते किंवा baker यीस्ट वर भागवावे लागते.
तक्रार काही नाही. कारण जुगाड सुचण्यातील kick बहुतेकदा. एंड product च्या kick पेक्षा मजा देऊन जाते.
hydrometer ऐवजी घोट घेऊन अल्कोहोल चा अंदाज घ्यावा लागणे. तापमापका ऐवजी हात लाऊन तापमानाचा अंदाज घेणे. या तर माझ्या मते सकारात्मक गोष्टी आहेत. असे म्हटले तर मायक्रो ब्रेवरी वाला कानाखाली देईल.
perfection साठीचे कष्ट कधी कधी अनाठायी वाटतात. उंची मद्य आणि स्वस्त मद्य यातील फरक बराच hyped आहे असे प्रामाणिक मत आहे. hangover सोडला तर single malt इतकीच फेणी आवडू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+++तुमच्याच गावात असतो.+++
अरे वाह , आपली ओळख वगैरे तर नाही ना ? ( म्हणजे तुमच्या आयडी वरून काही लक्षात येत नाहीये म्हणून विचारले )

++hydrometer ऐवजी घोट घेऊन अल्कोहोल चा अंदाज घ्यावा लागणे. तापमापका ऐवजी हात लाऊन तापमानाचा अंदाज घेणे.+++
हौस म्हणून ठीक आहे , पण घोट घेऊन अल्कोहोल चा अंदाज कसा मिळतो ? इथेनॉल च्या चवी बद्दल मी साशंक आहे म्हणून विचारले . डॉमिनंट चव /वास इत्यादी बिअर/वाईन च्या संदर्भात रॉ मटेरियल किंवा स्पिरिट्स च्या बाबतीत त्या बरोबरच बाहेरून घातलेले रंग चव वास युक्त पदार्थ यामुळे येते असा माझा समज आहे . निदान तो IMFL बद्दल तरी नक्कीच खरा आहे हे मला माहित आहे . हां साधारण स्ट्रॉंग /वीक आहे का हे कळू शकेल . याहून जास्त काय कळते ते तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल .

++hangover सोडला तर single malt इतकीच फेणी आवडू शकते.++
फेणी कधी प्यायली नसल्याने माहित नाही . पण हे मान्य कि उंची मद्य जे डबल किंवा कधी कधी ट्रिपल डिस्टिलेशन मुळे ( इतर इम्प्युरीटीज , लाईक अल्डीहाईडस निघून गेल्यामुळे ) *हँगओव्हर कमी देते .इतर काही संबंध नाही याच्याशी सहमत .
( आणि हँगओव्हर नसणे महत्त्वाचेच कि हो , उद्या सकाळी कामाला जायचे असेल तर Wink Wink

तथाकथित उंची वाईन व काही स्पिरिट्स च्या बाबतीत यांचा उच्च पणा हा ओव्हर हाइप्ड आहे या बद्दल संपूर्ण सहमत .

++साधे खात्रीचे brewer यीस्ट मिळण्यासाठी सुद्धा खटपट ++
NCL च्या कल्चर कलेक्शन मध्ये हे चेक केले आहेत का ? निदान पूर्वी तरी तिथे( एका शास्त्रज्ञाच्या वैयक्तिक इंटरेस्ट मुळे बहुधा ) वाईन करिताची उत्तम यीस्ट कल्चर्स होती . आम्ही तिथूनच आणली होती .
गेली काही वर्षे तर ते कल्चर्स विकतात सुध्दा . चौकशी करून बघा .

* हे केमिस्ट्री उच्चशिक्षित तिरसिंगरावांनी कन्फर्म करावे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतर इम्प्युरीटीज , लाईक अल्डीहाईडस निघून गेल्यामुळे ) *हँगओव्हर कमी देते

या अल्डिहाईडस मुळेच दुसऱ्या दिवशी डोके दुखते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ तिरसिंगराव आणि इतर , ज्या कोणाला माहिती असेल ते :
हँगओव्हर अल्डिहाईडस मुळे येतो हे जरी ज्ञात असले , तरीही या व्यतिरिक्त हँगओव्हर कशामुळे येतो या अनुभवात इंडिविज्युअल व्हेरिएशन खूप आहे . उदाहरणार्थ : फारसे उच्च नसलेल्या , डबल डिस्टिलेशन न केलेल्या "ओल्ड मॉंक " * चा हँगओव्हर मला कुठल्याही सिंगल माल्ट स्कॉच पेक्षा खूप कमी येतो . असाच अनुभव ( म्हणजे व्हेरिएशन ) ओळखीच्या काही जणांना आहे .
याचे कारण काय असावे ? कोण ज्ञानी पुरुष हे सांगू शकेल ? जंतू ,न बा , अभ्या , अदिती , घासुगुरुजी , कोल्हटकर , अमुक , मिहीर , आबा, हिमांशू , मालक बापट , अनुताईंचे गुरुजी किंवा सर्वज्ञानी मनोबा कि अजून कोण ?
* तुम्ही समतावादी ओल्ड मॉंक च्याच लायकीचे असल्याने वगैरे , हे खरे असले तरीही .......तांत्रिक उत्तर अपेक्षित

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओल्ड मंक ही बहुधा प्युअर मोलॅसेस (उसाची मळी) बेस्ड दारू असते. त्यात अल्डिहाइड्स असण्याची शक्यता मुळातच नसेल कदाचित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्ते , हे कारण नसावे . कारण अजूनही भारतातील बहुतांश IMFL या केन मोलासेस ( मळी) पासूनच बनतात ( भले नाव व्हिस्की , रम,जीन काहीही असो . वोह नाम सिर्फ ब्लेंडर का कमाल . केन मोलासेस पासून तयार केलेल्या एक्स्ट्रा न्यूट्रल पोटेबल अल्कोहोल या मूळ पुरुषापासून सकाळी व्हिस्की , दुपारी रम आणि संध्याकाळी जीन काढू शकतात हे महात्मे ) ग्रेन बेस्ड अल्कोहोल ची सुरुवात त्यामानाने नवी , 15 -20 वर्षातली . शिवाय अल्डिहाईडस ही फरमेन्टेशन बाय प्रॉडक्टस असावीत . रॉ मटेरियल संबंधित नसावीत .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अल्डिहाइड्स बनणे हे रॉ मटेरिअलमध्ये काय पदार्थ आहेत यावर ठरेल ना? मोलॅसेसमधील साखर (सी१२ एच २२ ओ ११) बऱ्यापैकी शुद्ध स्वरूपात मिळत असेल आणि त्यामुळे ईएनए मध्ये अल्डिहाइड्सचे प्रमाण कमी असेल.

परंतु त्यात फ्लेवरिंग आणि कलरिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांत अल्डिहाइड्स असू शकतील. काही प्रमाणात हे ब्लेंडिंगसाठी वापरलेले पदार्थ म्हणजे ग्रेन स्पिरिटपासून बनवलेला इथेनॉल असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्ते ,
+ अल्डिहाइड्स बनणे हे रॉ मटेरिअलमध्ये काय पदार्थ आहेत यावर ठरेल ना ? मोलॅसेसमधील साखर* (सी१२ एच २२ ओ ११) बऱ्यापैकी शुद्ध स्वरूपात मिळत असेल+
म्हणजे काय ? असे नक्की आहे का ? कुठे वाचले नाही असे काही . काही संदर्भ ?
+फ्लेवरिंग आणि कलरिंग करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांत अल्डिहाइड्स+
माझ्या माहितीनुसार नाही व फ्लेवरिंग व कॅलरींग एजन्ट्स अत्यंत कमी प्रमाणात घातले जातात . त्यामुळे अल्डीहाईड ची 'टक्केवारी ' यायची शक्यता वाटत नाही .
जरा जास्त माहिती सांगाल का ?

+ ब्लेंडिंगसाठी वापरलेले पदार्थ म्हणजे ग्रेन स्पिरिटपासून बनवलेला इथेनॉल असतो+
हेही कळाले नाही . जरा काही संदर्भ द्याल काय ?
* जरा कन्फर्म करतो कि आपण एकाच वस्तू बद्दल बोलतोय ना ते ...
भारतात केन मोलासेस म्हणजे रिकव्हरेबल सुक्रोज काढून घेतल्यानंतर ( एक्सट्रॅक्ट केल्यानंतर ) उरलेली मळी . त्यातही शुगर कन्टेन्ट प्रचंड असतेच . आणि पूर्वी सर्व आणि अजूनही बऱ्याच डिस्टीलऱ्या IMFL तसेच इंडस्ट्रियल अल्कोहोल बनवायला रॉ मटेरियल म्हणून वापरतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हिस्कीचे उदाहरण घेतले तर भारतात रेग्युलर व्हिस्की आणि प्रिमियम व्हिस्की असे दोन प्रकार बनतात. रेग्युलर व्हिस्की ही मोस्टली उसाच्या मळीपासून बनवलेल्या अल्कोहोलपासून बनवतात आणि त्यात फ्लेवरिंग केलेले असते. प्रिमियम व्हिस्कीमध्ये धान्यापासून बनवलेल्या अल्कोहोलचा वापर असतो. त्याचबरोबर काही प्रमाणात स्कॉच व्हिस्की आयात करून मिसळलेली असते. मला असे वाटते की धान्यापासूनच्या अल्कोहोलमध्ये सुक्रोज ऐवजी इतर काही शुगर्स/स्टार्चेस असतील ज्याचे फर्मेंटेशन झाल्यावर त्यातून काही प्रमाणात अल्डिहाइड्स निर्माण होत असतील.

पण मला यातली केमिस्ट्री नीटशी माहिती नाही.

(अलिकडेच डिस्टिलरीत सप्लायचेनचे प्रोजेक्ट केलेला) नितिन थत्ते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्ते ,
मूळ प्रश्न अल्डीहाईड व्यतिरिक्त( सुद्धा) इतर कशामुळे हँगओव्हर येण्यातील इंडिविज्युअल व्हेरिएशन येत हा होता .
( म्हणजे केन मोलॅसिस पासून च /सुद्धा तयार केलेल्या व्हिस्की आणि रम या मुळे काही लोकांना येणार वेगवेगळा हँगओव्हर . )
शिवाय ग्रेन /स्टार्च पासून फर्मेंटेशन केल्यास अल्डीहाईडस जास्त तयार होतात का याचा काही संदर्भ ? ( म्हणजे असेलही तसे , वाचण्यात आले नाही म्हणून विचारले )
( १९८९ ते २००४ पर्यंत डिस्टिलरी वेस्टवॉटर ट्रीट करण्याचा खेळ खेळलेला *) बापट . Wink Wink
(* आणि त्यामुळे त्या काळात डिस्टिलरी वाल्यांशी सतत संपर्क आलेला )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> १९८९ ते २००४ पर्यंत डिस्टिलरी वेस्टवॉटर ट्रीट करण्याचा खेळ खेळलेला

मग तर तुमचे ज्ञान जास्त ऑथेंटिक आहे. माझे ज्ञान सप्लाय चेन प्लॅनिंग करताना साइड बाय साइड मिळालेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अहो थत्ते
+ तुमचे ज्ञान जास्त ऑथेंटिक+
असं काही नस्तय हो !! म्हणून संदर्भ विचारतो .. राग मानू नये ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राग नाही.
मी खरंच त्या प्रोसेसमध्ये भाग घेतलेला नाही. आम्ही प्रोजेक्ट करण्यापूर्वी "ॲज इज" प्रोसेसचा अभ्यास करतो त्यातून जेवढे ज्ञान मिळाले तितकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

यासंबंधात, फक्त बेसिक केमिस्ट्रीवर तारे तोडण्यापेक्षा, पुण्यातल्या 'प्राज' या कंपनीतल्या कोणी टेक्निकल माणसाशी ओळख असेल, तर इत्यंभूत माहिती मिळेल. कारण ते या क्षेत्रातले अनुभवी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

moved

কোথায়?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी फोटो का दिसत नाही ते तर कळूदे. कारण पाककृतीसाठी बरीच साहित्य दाखवावी लागतील. नुस्ते वर्णन अवघड जाईल.
तेंव्हा लिंक देताना काय चूक झाली आणि ती कशी सुधारायची ते आधी कळूदे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमची पद्धत-

फोटो टाकण्यासाठी कृतीसाठी माझ्या खरडवहीत ( लिंक:http://aisiakshare.com/user/791/guestbook ) 30/07/2017 ची माझीच पोस्ट पाहा .

क्र १) तुम्हाला ओळख गुप्त ठेवायची असेल आणि इथे देण्याचे फोटो तुमच्या फेसबुकवरच्या इतर फ्रेंडसना दिसू नयेत असे वाटले तर एक फेसबुक( closed) ग्रुप बनवा आणि त्यात कमितकमी एक फ्रेंड जोडा की ग्रुप बनेल. ग्रुप privacy closed group ठेवा. या ग्रुपमध्ये फोटो अपलोड करा.
तो फोटो आला की >>full story>>view full size >>करून अड्रेसबारमधली .... scontent..iad...fbcdn.....jpg अशा पद्धतीची दिसणारी लिंक कॅापी करून घ्या. पुढे कृतीप्रमाणे टेम्प्लेटात टाकून इथे डिरेक्ट पोस्ट करा .

( एखादे html tester app वापरून तिथे अगोदर टेस्ट करणे फार उपयोगाचे ठरते.)
*****
बिअरविषयी चर्चा आहे समजून धागा उघडला नव्हता परंतू हा बिअर बनवण्याविषयी आहे आणि खूप मजेदार आहे.
जपानमध्ये तांदुळाची बिअर ( sake ) बनवतात त्याचे व्हिडिओ युट्युबवर आहेत. ( search : nhk world - sake making )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुकवर चढवलेले फोटो फक्त आपल्यालाच दिसावे अशी इच्छा असल्यास, समूह बनवण्याची आवश्यकता नाही. फोटोचं प्रायव्हसी सेटिंग only me असं ठेवावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमच्या फोटोंचा अॅक्सेस मला मिळत नाहीये, त्यामुळे लिंका सुधारणंही शक्य नाहीये. गूगल आल्बमची पब्लिक लिंक दिल्यास फोटो डकवणं शक्य होईल.

---

तुम्ही जी लिंक दिली आहे, त्यावर राईट क्लिक केलं, "व्ह्यू इमेज" असा पर्याय निवडला. तेव्हा जी यूआरेल आली ती इथे HTML code सकट डकवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Wheat Beer हा एक अत्यंत झक्कास प्रकार आहे. hefeweizen हा एक प्रकार. २००५ पासून चाखत आलेलो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

hefeweizen बाबत सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिअर चा रंग असा फॅन्टा सारखा का दिसतोय ? फोटोचा प्रॉब्लेम का काही रंगद्रव्ये टाकली आहेत ?
( आणि हि तर फार तर फार दोन अडीच लिटरच दिसतीय , ५ लिटर नाही . संपवलीत कि काय ? तेही ठीकच म्हणा . )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

hops चा source काही सापडेना. आणि पुरेशी कडू चव आणायला केलेल्या प्रयोगातून अखेर मेथीच्या बिया char करून वापरल्या. त्याने जरा coffee सदृश रंग चढला खरा. एरवी नको तितका फिक्कट रंग असतो ना. कारण गव्हाचा malt फार roast केलेला नव्हता. त्याची गोडी आणि पर्यायाने साखर कमी होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

++मेथीच्या बिया char करून वापरल्या++
हि आयडिया इंटरेस्टिंग आहे . चवीचं काय ? हॉप्स चा बिटरनेस आणि मेथी चा बिटरनेस यात किती फरक वाटला
आयडिया पेटंट करा हो , चवीत फार फरक नसेल तर . हॉप्स फार नखरेल आहे उगवायचा बाबतीत , म्हणूनच महाग .
एकंदरीत चव काय म्हणते ?
जरा डिट्टेलवार काय काय केलं ते लिहा कि ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग बसूयातच. मग तुम्हीच ठरवा. मी काही चवीतला दर्दी नाही. % जरा strong होतय एवढे सांगू शकतो. त्यामुळे इथेनॉल चा बिटरनेस सुद्धा प्रभाव पाडतोच आहे.
तेंव्हा एक स्वतंत्र पेय म्हणूनही मूल्यमापन करायला हरकत नाही.
बेसिक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नंबर! डित्तेल पाकृ लिहा राव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

चित्रां शिवाय जमणार नाही. त्यामुळे आधी फोटो लिंक करायला जमवतो. दोन दिवस प्रवासात आहे. मग सवडीने लिहीन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहज सुचलेली एक शंका. अशा 'ग्रामोद्योगा'तून आणि चुकतमाकत शिकणे ह्या पद्धतीने जे काय रसायन तयार होईल ते पिणाऱ्याला आंधळे तर बनविणार नाही ना? (पूर्वीचा 'खोपडी'अध्याय आठवा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यस्य कस्य तरोर्मूलं वगैरे वगैरे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा प्रश्न मी एका केमिस्ट्री डॉक्टरेटना विचारला होता. की हे धान्य, ते धान्य, ते फळ आंबवल्यावर इथेनॉल ऐवजी मिथेनॉल बनला तर काय होईल?
तेव्हा त्यांनी मिथेनॉल हा नैसर्गिक साखरेपासून बनू शकत नाही असं सांगितलं होतं.

खोपडी वगैरे प्रकारात काय काय भलतंच घालत असतात. नवसागर (ब्याटरीचे सेल) वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गावठी दारू बनवणारे त्यात जास्त किक येण्याकरिता मिथेनॉल , फ्रेंच पॉलिश बाहेरून नंतर घालतात . त्याचंही एक अलावेबल लिमिट आहे . त्याहून जास्त पडले की ती बॅच घेतलेलं बरेचसे मरतात . नवसागराचे वेगळे . तो फेरमेन्टेशन मध्ये यीस्टला नायट्रोजन सोर्स म्हणून टाकला जातो . त्याने लोकं मरत नाहीत . फेरमेन्टेशन जास्त चांगले होते त्याने . बॅटरी / चपला वगैरे या विशीष्ट चव येण्याकरिता टाकतात म्हणे ( आणि हा चवीचा इन्ग्रेडीयंट ची रेसिपी कोक /पेप्सी प्रमाणे भट्टी टू भट्टी गुप्त ठेवली जाते .. असे ऐकले )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... - अँड समवन करेक्ट मी इफ आय अॅम राँग - पण (फळांच्या वगैरे) फर्मेंटेशनमध्ये नैसर्गिकत: एथॅनॉलबरोबरच अत्यंत मिनिस्क्यूल प्रमाणात मेथॅनॉलसुद्धा बनत असतोच, परंतु ओव्हरऑल एथॅनॉलचा प्रादुर्भाव खूपच अधिक असल्याने मिश्रणातला तो अतिसूक्ष्म प्रमाणातला मेथॅनॉल काही इजा पोहोचवू शकत नाही. (यामागची थियरी अशी आहे, की When methanol is in the presence of ethanol, ethanol competes with methanol for metabolism and wins. त्यामुळे उपस्थित एथॅनॉलचे प्रमाण मेथॅनॉलच्या तुलनेत जर खूपच जास्त असेल, तर मेथॅनॉलला चयापचयासाठी संधी लवकर मिळणार नाही, किंवा तशी संधी मिळण्याअगोदर उत्सर्जनाच्या नैसर्गिक प्रक्रियेने तो शरीराबाहेर फेकला जाईल. आणि म्हणूनच, मेथॅनॉल पॉयझनिंगवर उतारा - अँटिडोट - म्हणून - बोले तो, व्हायचे ते डॅमेज अगोदरच झाले नसेल तर - शुद्ध एथॅनॉल देतात. अर्थात, यालाही (बापट म्हणतात त्याप्रमाणे) मर्यादा आहेतच, आणि मिश्रणातले मेथॅनॉलचे प्रमाण एका मर्यादेबाहेर गेले, तर एथॅनॉलचा उताराही फारसा लागू पडत नाही. परंतु, शुद्ध मेथॅनॉल पिण्यापेक्षा भरपूर एथॅनॉलमिश्रित मेथॅनॉलमध्ये रिस्क तुलनेने कमी, इतकेच.)

फर्मेंटेड पेयांत नैसर्गिकत: एथॅनॉलच्या तुलनेत जे मेथॅनॉलचे प्रमाण असते, ते धोक्याच्या पातळीच्या तुलनेत नगण्य असते. आणि म्हणूनच घरगुती फर्मेंटेड मद्यार्कयुक्त पेये (बियर, वाइन वगैरे) निसर्गत: धोकाविरहित असावीत.

अडचण तेव्हा येते, जेव्हा (१) कोणी किकसाठी त्यात बाहेरून इतर द्रव्यांची (खास करून मेथॅनॉलयुक्त द्रव्यांची) भेसळ करतो, किंवा (२) एथॅनॉलचे प्रमाण (कॉन्सेण्ट्रेशन) वाढवण्यासाठी प्रकरणास डिस्टिल करतो (भट्टी लावतो).

पहिल्या प्रकारातील धोके उघड आहेत. दुसरा प्रकार (कोणतीही भेसळ न करता) हा रम, व्हिस्की आदि डिस्टिल्ड पेयांच्या उत्पादनाचा सामान्य मार्ग असला, तरी अनभिज्ञ व्यक्तीने अयोग्य प्रकारे हाताळल्यास त्यातही (अ) आग लागण्याचे आणि (ब) (मेथॅनॉलमुळे) विषबाधेचे धोके संभवतात.

(स्वत:च्या घरगुती वापरासाठी वर्षाकाठी एका विशिष्ट आकारमानापर्यंत बियर किंवा वाइनसारखी फर्मेंटेड पेये घरी विनापरवाना बनवणे हे अमेरिकेच्या बहुतांश राज्यांत कायदेशीर आहे. (आकारमानाची मर्यादा कमीअधिक असू शकते. आमच्या जॉर्जिया राज्यात हे प्रमाण वाइनसाठी वर्षाकाठी दोनशे यूएस ग्यालन (= ७५० मिलीच्या जवळजवळ हजारएक बाटल्या) आणि बियरसाठीही तितकेच आहे. एवढी कोण बनवणार नि पिणार?) अनेक जण हा छंद म्हणून जोपासतात, आणि त्याकरिता आवश्यक ती उपकरणे बाजारात सहज मिळतात. कॅनडा, यूके आणि बहुतांश पाश्चिमात्य जगतात थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती असावी. भारतात याबद्दल नक्की काय रेग्युलेशने आहेत, कल्पना नाही.

मात्र, घरगुती वापरासाठी घरी विनापरवाना डिस्टिल्ड पेये बनवणे / घरी भट्टी लावणे / कमर्शियल उत्पादनपरवान्याविना मद्यार्कयुक्त पेये अगदी लहान प्रमाणातसुद्धा डिस्टिल करणे हे (ऐकीव माहितीनुसार न्यूझीलंडचा अपवाद वगळल्यास) जगात कोठेही कायदेशीर नाही.)
..........

डिस्टिलेशनचे धोके असे: सर्वप्रथम, भट्टी दीर्घकाळासाठी लावून ठेवावी लागते. जेवढा वेळ लागतो, तेवढा वेळ जातीने त्याकडे लक्ष देता येणे शक्य नसेल, आणि म्हणून भट्टीस आपल्या डिव्हाइसेसवर सोपवून आपण आपापल्या उद्योगांस चालले गेले, तर अर्थात स्फोट होण्याचा वा आग लागण्याचा धोका वाढतो. पण त्याहीपेक्षा मोठा धोका म्हणजे चुकीच्या / हलगर्जीपूर्ण हाताळणीतून विषबाधेची शक्यता.

आधी म्हटल्याप्रमाणे, फर्मेंटेड मिश्रणांत नैसर्गिकत: एथॅनॉलबरोबरच सूक्ष्म प्रमाणात मेथॅनॉल आणि इतरही दुय्यम अल्कोहोल असतात. मात्र, मुळातच फर्मेंटेड पेयांत एथॅनॉलचेसुद्धा प्रमाण तुलनेने खूपच कमी (बियर किंवा वाइनमध्ये साधारणत: ५%पासून ते २०%पर्यंत कोठेही) आणि मेथॅनॉल आणि इतर अल्कोहोलांचे प्रमाण त्यापेक्षा खूपच कमी. बाकी सारे पाणी आणि इतर द्रव्ये. भट्टी लावण्याचा मुख्य उद्देश डिस्टिलेशनने यातला बहुतांश अल्कोहोल वेगळा काढून डिस्टिलेटमधील एथॅनॉलचे प्रमाण हे ४०% ते ५०%पर्यंत वर आणणे.

आता भट्टी लावल्यावर एक गोची होते. मिश्रणात हे जे एथॅनॉल, मेथॅनॉल आणि इतर अल्कोहोल असतात, त्यांचे प्रत्येकाचे उत्कलनबिंदू हे वेगवेगळे असतात. त्यामुळे डिस्टिलेशनच्या प्रक्रियेत हे वेगवेगळ्या वेळेस बाहेर येतात. सर्वप्रथम मेथॅनॉल, मग एथॅनॉल आणि त्यानंतर मग इतर संकीर्ण अल्कोहोल या क्रमाने ते बाहेर पडतात. त्यामुळे भट्टीतून सुरुवातीस बाहेर पडणारे द्रव्य हे जवळपास शुद्ध/कॉन्सेण्ट्रेटेड मेथॅनॉल असते, तर शेवटाकडे बाहेर पडणाऱ्या द्रव्यात प्रामुख्याने इतर दुय्यम अल्कोहोल असतात, तर या दोहोंच्या मध्यंतरी आपले ईप्सितद्रव्य अर्थात प्रामुख्याने एथॅनॉल. त्यामुळे भट्टीतून येणाऱ्या ऐवजापैकी सुरुवातीचा आणि शेवटचा ऐवज फेकून द्यावा लागतो. हे माहीत नसेल वा केले नाही, अथवा किती फेकून द्यायचे याचा अंदाज चुकला, तर जिवाशी खेळ.

(अर्थात, घरगुती भट्टी लावणे (डिस्टिलेशन) हे तसेही बेकायदेशीर असल्याने वरील विवेचन हे केवळ अॅकॅडेमिक आहे.)

..........

डिस्क्लेमर: वरील माहिती मला जशी वाचायला मिळाली आणि त्यातूनही ती मला जशी समजली, त्यानुसार आहे. काही चुका असल्यास जाणकारांनी त्या जरूर दुरुस्त कराव्यात, किंवा काही भर टाकण्यासारखी असल्यास जरूर टाकावी. धन्यवाद.

..........

(हा प्रतिसाद थत्तेचाचांच्या प्रतिसादास उपप्रतिसाद म्हणून आहे. समहाउ थ्रेडेड दिसत नाहीये/स्वतंत्रपणे दिसतोय. संपादनमंडळ कृपया योग्य त्या ठिकाणी हलविण्याची तसदी घेईल काय? धन्यवाद.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग पहिल्या धारेची म०म०व० जनांत प्रसिद्ध का असावी?

---

तिरपे तिरपे प्रतिसाद येण्याबद्दल सांगितलंत ते बरं केलंत. पूर्ण पाककृती विभागातलेच प्रतिसाद एकाखाली एक येत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

...या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मला माहीत नाही, सबब मी ते देऊ शकणार नाही, आणि तरीही माझ्या डोक्याची शंभर शकले होणार नाहीत आणि ती माझ्याच पायांशी लोळू लागणार नाहीत.

- (प्रेतातला वेताळ आणि विक्रमादित्य (की नुसताच विक्रम? चूभूद्याघ्या.) रोल्ड इण्टू वन) 'न'वी बाजू.

..........

(जाणकारांनी अवश्य शंकासमाधान करावे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला हे एक बरं सापडलं .तुम्हाला समाधानकारक काहीतरी माहीत नाहीये ही माहिती अनमोल आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला सहसा कशातच काहीच समाधानकारकरीत्या माहीत नसते. त्यात काय विशेष?
..........

आता एक उपशंका:

शिवाय काळा गूळ+नवसागर +चवीनुसार चप्पल/ बॅटरी सेल ते तुमच्या स्कॉच चे रॉ मटेरियल या सर्व रेंज मध्ये यीस्ट व्यवस्थित असेल तर इथेनॉलच जास्त बनते . मेथनॉल + अल्डिहाईड नगण्य बनतात .

झाले तरी, त्यातसुद्धा तुमच्या फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमध्ये सुरुवातीसुरुवातीस येणारे द्रव्य ('हेड्स'? चूभूद्याघ्या.) हे प्रादुर्भावाने मेथॅनॉलयुक्तच असणार ना?

की माझ्याच समजुतीत काही घोळ होतो आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी मिथेनॉल येणार हे खरे . पण मिथेनॉल टक्का नगण्य त्यामुळे फरक पडत नाही . ( च्यायला हातभट्टीच्या शंका मी का सोडवतोय ?. पण एक खरे , आम्ही लॅब मध्ये केलेल्या फरमेन्टेशन पेक्षा तिथूनच जवळ नदीकाठी होत असलेले फरमेन्टेशन फार जास्त एफीशीयंट असे .)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्राचीन भारतातील मद्ये.

कौटिलीय अर्थशास्त्र अधिकरण दुसरे, अध्याय पंचविसावा - सुराध्यक्ष.

मेदकप्रसन्नासवारिष्टमैरेयमधूनाम् ॥१६॥ उदकद्रोणं तण्डुलानामर्धाढकं त्रय: प्रस्था: किण्वस्येति मेदकयोग: ॥१७॥ द्वादशाढकं पिष्टस्य पञ्च प्रस्था: किण्वस्य क्रमुककत्वक्फलयुक्तो वा जातिसंभार: प्रसन्नायोग: ॥१८॥

मेदक, प्रसन्न, अरिष्ट, मैरेय आणि मधु (ह्या मद्यांविषयी.) १६. एक द्रोण पाणी, अर्धा आढक तांदूळ, तीन प्रस्थ किण्व ह्यातून मेदक बनते. १७. बारा आढक पीठ, पाच प्रस्थ किण्व अथवा सुपारीची साल आणि फळ ह्यांतून केलेला मसाला हे प्रसन्नासाठी. १८
(किण्व म्हणजे Fermenting agent.)

कोणत्याहि पिठापासून आंबवून केलेल्या मद्याला ’पैष्टी’ असे सार्वत्रिक नाव होते. अन्य अनेक फलांच्या रसापासून, तसेच गूळ, मोहाची फुले, उसाचा रस, खजूर इत्यादींपासून निर्माण होणार्‍या सुमारे ४० मद्यप्रकारांची नावे आणि कृति आयुर्वेदाच्या आणि पाकशास्त्राच्या पुस्तकांमधून मिळतात.

वरच्या उतार्‍यातील द्रोण, आढक आणि प्रस्थ ह्या तीन मापांचा खुलासा ’लीलावती’मध्ये असा आहे:

धान्यादिके यद्घनहस्तमानं शास्त्रोदिता मागधखारिका सा ॥
द्रोणस्तु खार्या: खलु षोडशांश: स्यादाढको द्रोणचतुर्थभाग:।
प्रस्थश्चतुर्थांश इहाढकस्य... ॥ परिभाषा ८. ॥

धान्य इत्यादींच्या विषयात हाताच्या लांबीचा घन हे मगधातील खारिका (नावाचे माप आहे.) खारिकेचा सोळावा भाग म्हणजे द्रोण, द्रोणाचा चौथा भाग आढक आणि आढकाचा वौथा भाग प्रस्थ.

प्राचीन ईजिप्तमध्ये बीअर कशी बनविली जात असे ते येथे पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ़ारच बुवा तुम्ही तांत्रिक .१. पहिल्या धारेची हा शब्दप्रयोग ताजी /आत्ताच डिस्टील करून काढलेली असा असावा . २. त्याचा मिथेनॉल आणि इथेनॉल च्या 64 आणि 78 उत्कलं बिंदू शी संबंध नसावा ३. शिवाय काळा गूळ+नवसागर +चवीनुसार चप्पल/ बॅटरी सेल ते तुमच्या स्कॉच चे रॉ मटेरियल या सर्व रेंज मध्ये यीस्ट व्यवस्थित असेल तर इथेनॉलच जास्त बनते . मेथनॉल + अल्डिहाईड नगण्य बनतात . तात्पर्य : पहिल्या धारेतही इथेनॉल वगैरे .
म म व ची बदनामी थांबवा .
शिवाय न घेणारेच या विषयी जास्त लिहितात . माझंच बघा ना , अजून एक तास काही घेणार नाहीये मी .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप बरोबर आहे!

पहिल्या धारेची जर डिस्टिल करून येत असेल तर त्याचा बियर/वारुणीशी संबंध नाही. कारण या दोन्ही फर्मेंटेड प्रकारच्या, बाकी सगळ्या डिस्टिल केलेल्या.

मीही हा प्रतिसाद सकाळी लोळतच लिहिल्यामुळे दारू न घेताच लिहिला. त्याबद्दल समस्त म०म०व० लोकांनी मला माफ करावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हौशीखातर घरगुती वाइन बनवणाऱ्यांत या सद्गृहस्थांचे हे संकेतस्थळ गुरुगृहासमान मानले जाते.

हौशीखातर घरगुती बियर बनविणाऱ्यांकरिता असेच एखादे संकेतस्थळ अस्तित्वात असल्यास कल्पना नाही.

..........

अगोदर 'मक्का' म्हणणार होतो, परंतु वाइनच्या संंदर्भात मक्केचा नामोल्लेख बोले तो ब्लास्फेमी अॅक्टान्वये आमच्याविरुद्ध एखादा फतवाबितवा निघायचा. त्यापेक्षा नकोच ते; 'गुरुगृह' आपले सेफ१अ.

१अ हल्लीच्या 'अच्छ्या दिनां'त त्याचाही भरवसा देता येत नाही म्हणा. एकंदरीत दिवस कठीण आलेत. असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फरमेंटेशन करताना ते जर हवेला एक्सपोज होऊ दिले नाही तर मग मिथॅनॉल बनण्याची शक्यता नाहीशी होते. मिनिस्क्यूल प्रमाणात मिथॅनॉल बनण्याचे कारण म्हणजे हवेतल्या ऑक्सिजनने थोडे ऑक्सिडेशन होते. आम्ही जेंव्हा वाईन बनवायचो तेंव्हा एका मोठ्ठ्या काचेच्या जार मधे फर्मेंटेशनचे मिक्सचर ठेवून त्यावर एक कांचनळीचा वॉटर ट्रॅप लावायचो, जेणेकरुन, आंतले गॅसेस बाहेर पडू शकतात पण ऑक्सिजनची आंत एन्ट्री होत नाही. असे २१ दिवस फर्मेंटेशन केले की ती प्रक्रिया पूर्ण होते. यीस्टही चांगल्या प्रतीचे वापरावे लागते. अनाबेशाही द्राक्षांची सुंदर लालसर ब्राऊन वाईन तयार होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फरमेंटेशन करताना ते जर हवेला एक्सपोज होऊ दिले नाही तर मग मिथॅनॉल बनण्याची शक्यता नाहीशी होते.

माझ्या वाचनानुसार हवेस एक्सपोज़ झाल्यास (ऑक्सिडेशनने) त्यातून अॅसेटिक अॅसिड (व्हिनेगर) निर्माण होण्याची शक्यता वाढावी, मेथॅनॉल नव्हे. जेणेकरून वाइनची चव बिघडेल निश्चित, परंतु ती (पिऊ शकलात तर) अपायकारक ठरू नये.

नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, एकदम मान्य. पण नक्की कशाने होते ते माहीत नाही, पण नगण्य प्रमाणात मेथॅनॉल बनते हे खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही जेंव्हा वाईन बनवायचो तेंव्हा एका मोठ्ठ्या काचेच्या जार मधे फर्मेंटेशनचे मिक्सचर ठेवून त्यावर एक कांचनळीचा वॉटर ट्रॅप लावायचो, जेणेकरुन, आंतले गॅसेस बाहेर पडू शकतात पण ऑक्सिजनची आंत एन्ट्री होत नाही.

घरगुती वाइन बनविण्याची ही तर स्टँडर्ड पद्धत. (किंवा, स्टँडर्ड पद्धतीतील दुसरी पायरी - सेकंडरी फर्मेंटेशन, खरे तर.)

याअगोदरची पहिली पायरी म्हणजे जितके मिश्रण आहे त्याच्या दुप्पट कपॅसिटीची फूडग्रेड प्लास्टिकची झाकणयुक्त बादली घेऊन त्यात मिश्रण टाकायचे, त्यात कँपडेन टॅब्लेटचा (सोडियम किंवा पोटॅशियम मेटाबायसल्फाइट) भुगा करून टाकायचा नि यीस्ट न घालता झाकण लावून नि झाकणाला वॉटरट्रॅप लावून एक दिवस ते तसेच ठेवून द्यायचे (जेणेकरून हवेतून मिश्रणात आलेले भटके जंतू मरून जातात, नि नंतर आपण जे यीस्ट टाकणार तेवढेच फक्त मिश्रणावर काम करेल याची खात्री राहते). एका दिवसानंतर मग त्यात यीस्ट घालून बादलीतच ठेवायचे नि बादलीला झाकण नि वॉटरट्रॅप लावून पाच दिवसांपर्यंत ते फर्मेंट होऊ द्यायचे. (यीस्ट घालण्यापूर्वी आख्खा एक दिवस थांबण्याचे कारण म्हणजे कँपडेन टॅब्लेटचा जंतुनाशक प्रभाव एका दिवसापर्यंत राहतो, तो संपण्याअगोदर टाकल्यास यीस्ट मरू शकते.) बादलीत अर्धी हवा असते हे खरे आहे, परंतु पहिल्या पाच दिवसांतले फर्मेंटेशन हे इतके व्हिगरस असते आणि बनणारा कार्बन डायॉक्साइड हा इतका जास्त असतो, की फारसे ऑक्सिडेशन संभवत नाही; उलट मिश्रण उतू न जाता या जास्तीच्या सीओटूला सटकायला वाव मिळतो. या पाच दिवसात अधूनमधून मिश्रण ढवळायचे, आणि पाच दिवसांनंतर फर्मेंटेशनचा वेग मंदावला, की मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे काचेच्या जारमध्ये - याला अमेरिकेत कारबॉय आणि यूकेत डेमिजॉन म्हणतात - सेकंडरी फर्मेंटेशनसाठी ट्रान्स्फर करायचे, कारबॉय काठोकाठ भरला आहे, त्यात हवा नाही याची खात्री करायची आणि मग वरून वॉटरट्रॅप लावून किमान तीन आठवडे - किंवा अधिक - फर्मेंटवत ठेवायचे.

यीस्टही चांगल्या प्रतीचे वापरावे लागते.

याचे कारण असे, की वाइनमेकिंगप्रतीचे उत्तम यीस्ट न वापरता सामान्यप्रतीचे बेकर्स यीस्ट वगैरे वापरल्यास त्यातूनसुद्धा फर्मेंटेशन होऊन एथॅनॉल बनेल, नाही असे नाही, परंतु तो त्यामानाने खूपच कमी प्रमाणात बनेल. यामागची सविस्तर कारणमीमांसा पुन्हा कधीतरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मागे रुचीनं लिहिलेला माधवीचा धागा - ‘मीड’ अर्थात ‘माधवी’

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मागे रुचीनं लिहिलेला माधवीचा धागा - ‘मीड’ अर्थात ‘माधवी’

त्यावरूनच तर प्रेरणा घेतली होती...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबऱ्या प्रकार केलेला दिसतोय, बाकी धड दर्जाची दारू स्वत: बनवणं म्हणजे प्यायचं काम नव्हे त्याबद्दल दंडवत स्वीकारा. _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाकी धड दर्जाची दारू स्वत: बनवणं म्हणजे प्यायचं काम नव्हे त्याबद्दल दंडवत स्वीकारा

और ये लगा सिक्सर !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाग्यावर चर्चा बरीच वाचली. कंपनीत काम करणाय्रांकडून माहिती मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. सिक्रेटवरच प्रॅाडक्ट चालते. उदा० क्याडबरी,कोका अथवा केळकरांची अत्तरं/पर्फ्युम्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका पेपरमधे हे सापडलं.
Methanol is produced quite naturally in wine by the
action of endogenous pectinase enzymes on the grape
pectins. The possible use of exogenous pectinase enzymes
in the winery, as well as the possible treatment of the
wine with dimethyldicarbonate just prior to bottling, will
have the effect of increasing the methanol content of
the wine to varying but small degrees. Many competent
authorities around the world have chosen to establish
limits for the methanol content of wine, and many have
chosen to establish different limits for red wines compared
with white and ros´e. Yet in each case, when compared
with toxicological data, it is clear that the limits do not
really serve to protect public health, because the methanol
content in wine does not become sufficiently high to even
approach a safety concern.
स्त्रोत:
Methanol in wine
Greg Hodson 1 , Eric Wilkes 2 , Sara Azevedo 1 , and Tony Battaglene 1
1 FIVS, 18 rue d’Aguesseau, 75008 Paris, France
2 Australian Wine Research Institute, Hartley Grove, Urrbrae SA 5064, Australia

पूर्ण पेपर पाहिजे असल्यास व्यनि मधे इ-मेल पाठवावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

DIY BEER

https://www.mail.com/int/entertainment/lifestyle/5534930-move-over-bud-c...

mail dot com/int/entertainment/lifestyle/5534930-move-over-bud-czech-firm-diy-backyard-breweries.html#.1258-stage-mostviewed1-5

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0