शौचालय - एक भीषण कथा!

शीर्षकावरून स्पष्ट झालेलं नसेल, तर आधीच नमूद करू इच्छितो की हा महाराष्ट्रातील (कारण आपली पोहोच तिथपर्यंतच) शौचालयांचा एक दर्जावार चिकीत्सा करणारा लेख आहे. वित्त-ज्ञान अर्जन किंवा मनोरंजनानिमित्ताने बऱ्याच ठिकाणी फेरफटका झाल्यामुळे शौचालये ह्या विषयावर भन्नाट माहिती उपलब्ध आहे. तीच जरा मजेशीर आणि जमलंच तर जरा विचारप्रवर्तक वगैरे पद्धतीत सादर करण्याचा प्रयत्न.

शौचालये सार्वजनिक असतात, एखाद्या घरातील असतात. मुंबई ही वेगवेगळ्या आर्थिक स्तरांच्या दृष्टीने एक भन्नाट भेळ आहे. लोकांची, त्यांच्या राहणीमानाची आणि अर्थातच मग त्यांच्या स्वच्छतांच्या सवयींची. एखाद्या व्यक्ती/कुटुंब/व्यवसायाचा आर्थिक स्तर खरोखर जोखायचा असल्यास त्यांच्या गाड्या, त्यांचं मुंबईतलं स्थळ आदी गोष्टी न पाहता शौचालयास भेट द्यावी.
एक म्हणजे, शौचालय आणि स्नानगृह वेगळं असेल तर नक्कीच डोक्यानं काम चालवणाऱ्या व्यक्तींशी गाठ पडली आहे असं समजायला हरकत नाही. शौचालय स्नानगृहात असण्यापेक्षा मोठी दुसरी गैरसोय नाही. शौचालयात देशी आणि विदेशी हे दोन प्रकार. देशी सगळ्यात भारी. एकदा गेलं की काम फत्ते. ह्यात फारसे प्रकार नाहीत. फ्लश भन्नाट होतो. 'बाकी' कधीच राहत नाही.
विदेशी बाकी आरामाचा मामला. पेपर, पुस्तके, मोबाईल इ. चीजा घेऊन आरामात जाण्यासारखे. लोक चांगले अर्धा अर्धा तास विदेशी शौचालयांत बसून राहतात. काही लोक म्हणे शौचालयात पुस्तककपाट, संगीतव्यवस्था इत्यादी ठेवतात. काही लोक विदेशी शौचालयांवर देशी बैठक मारतात. असते आवड एकेकाची.
विदेशी शौचालयांमध्ये गड फत्ते झाला तरी त्याचं 'समाधान' क्वचितच मिळतं. महारथी विनोदवीर श्री. रसेल पीटर्स ह्यांच्या शब्दांत- "तुम्ही आयुष्यात फार फार तर पाचवेळा एकदम 'भारीतलं' हगता. तुम्हाला कधीकधी एकदम भारी हगण्याचं समाधान मिळतंही, पण 'एकदम लक्षात राहील असं' फक्त पाचवेळाच होतं. ह्या 'अशा' वेळी तुम्हाला कॅन्सर झाला असेल तर तोही तुम्ही हगून टाकला काय, असंही वाटून जाऊ शकतं, इतकं समाधान मिळतं."
फ्लश केल्यावर बरेचदा बाकी उरते. मग आपल्या कलाकृतीसमोर ३-४दा फ्लश करा, टमरेलातलं पाणी धाऽस्सकन् ओता इत्यादी चाळे करत उभं रहावं लागतं. बरेचदा नंतर हस्तप्रक्षालनादि विधी उरकल्यावरही थोडी बाकी परत आलेली दिसते. मग परत हे चाळे. अनुभवी मंडळी हे करत नाहीत. बाकी परत आलेली दिसल्यासही ते सगळे इतर विधी उरकतात. तोपर्यंत फ्लशची टाकी भरलेली असते. मग परत जोरदार फ्लश. ह्यावेळी बाकी उरत नाही.
फ्लश मध्येही प्रकार आहेत. शहरांमध्ये ऑटो फ्लश असतात. म्हणजे एकदा दाबून मोकळं व्हा. (श्लेष जाणीवपूर्वक.) काही ठिकाणी मी नळांसारखे फ्लश पाहिलेले आहेत. धो धो पाणी वाहत राहते. बाकी वगैरेंचा प्रश्न नाही. फॅन्सी फ्लश असतात. यिन-यँगच्या स्वरुपात बटणे असलेले. मोठं बटण, मोठा झोत, लहान बटण, लहान झोत. ह्यावरूनही आर्थिक स्तर वगैरे जोखता येतो. कमोडही भिंतीत बसवलेला असेल तर नवश्रीमंत आणि जमिनीतला असेल तर अनुमान नाही, अशी निरीक्षणे आहेत. कमोड बाकी जितका छोटा तितका आर्थिक स्तर उच्चीचा हे अनुमान मी काढलेलं आहे.
ह्याशिवाय स्प्रे आणि जेट हे जरासे नवीन प्रकार आहेत. हात धुण्याचा कंटाळा करणाऱ्या पब्लिकच्या ह्या उचापती आहेत. खरोखर स्वच्छतेची आस असल्यास लोक टमरेलच वापरतात. रेल्वेगाड्यांत ह्या टमरेलांना साखळ्या असतात. रेल्वेगाड्यांचे रूळ हेच बऱ्याच लोकांचे शौचालय असते. काही रुळ फक्त ह्याच कामासाठी बांधलेले असावेत असंही कधीकधी वाटून जातं. बाकी आर्थिक स्तर कसाही असला तरी लोकांना टमरेलसम- कापलेला कॅन, बाटली, रंगांचा डबा इ. परवडतं हेही नोंदवतो. म्हणून त्या साखळीमागचं प्रयोजन लक्षात येत नाही. पण 'तेजस' मधला प्रकार वाचल्यानंतर मात्र आपली लायकी हीच हे खेदाने नमूद करावेसे वाटते. बाकी आजकाल रेल्वेगाड्यांतही हे जेट आलेले आहेत. आतल्या बेसिनवरच्या साबणभांड्यात छान मुलायम गुलाबी शॅम्पूसम साबण असतो. त्याला चक्क सुवासही असतो आणि फेसही येतो. अच्छे दिन आहेत कुठे, आहेत कुठे म्हणणाऱ्यांनी ह्याची नोंद घ्यावी.
ह्यावरून आठवलं, रेल्वे/एसटी स्थानकांवरची शौचालये कटाक्षाने टाळावीत. एकतर ती फक्त देशी असतात. विदेशीच्च पाहिजे असणाऱ्या लोकांचे प्रश्न इथे संपत नाहीत. ह्यांच्या दाराची कडी जनतेच्या अच्छे दिनांवरच्या विश्वासाइतकीच मजबूत असते. म्हणून शुद्ध थरार इथे अनुभवता येतो. म्हणूनच गड सहज फत्ते होतो. टमरेलात पाणी सोडणारा तो 'दुष्काळी फोटो फेम लाल नळ' असतो, ज्याची एखादी चुकार धार कुठे उडेल सांगता येत नाही. शिवाय 'मूत्रालया'च्या बाजूलाच असल्याने नाकातले केस पेटत असल्याची भावना होत असते. ह्या सगळ्या दिव्यांतून बाहेर पडल्यावर हात धुवायला साबण नसतो. असलाच तर साधारण सातशे व्यक्तींनी स्नानादी कार्यांमध्ये वापरून ठेवलेला केविलवाणा तुकडा असतो. त्याचा फेस येत नाही. ह्यामध्ये साधारण मागील सात पिढ्यांची जनुके मिळण्याचा संभव असतो. शिवाय विदेशी शौचालये असल्यास त्यात आधी गेलेल्या इसमाची 'बाकी' दिसण्याची संभाव्यता ९९ टक्के असते. देशी मध्ये हे दिसत नाही. अभ्यासूंनी कृपया कारण सांगावे.
कमअस्सल हीच कहाणी सार्वजनिक शौचालयांची असते. एकतर तिथे पाणी नसेल, पण बाजूला झोपडपट्टी नक्कीच असेल ह्याची खात्री बाळगावी. एक 'जनतेचे कलादालन' म्हणून सार्वजनिक मुताऱ्यांचा निर्देश व्हायला हवा. एकतर नाकातले केस पेटवून मिळतील असा गंध असतो. एक भिंत अध्याहृत द्रव्याने, आणि समोरची भिंत तंबाखूने रंगलेली असते. शिवाय प्रबोधक जाहिराती, भ्रमणध्वनी क्रमांक, उद्बोधक चित्रे, वचने, काव्ये ह्यांनी भिंतीवरची उरलेली जागा सजलेली असते. जसे सादरीकरणापूर्वी एक नमस्कार ठोकणारे कलाकार असतात तसे थुंकणारे कलाकारही इथे येतात. हे थुंकण्यामागचं रहस्य शेवटी इथे उलगडलं. चित्रपटगृहातल्या मुताऱ्या बाकी भलत्याच मोकळ्याढाकळ्या असतात. दोन लगतच्या व्यक्तींमध्ये भिंत नसते. शिवाय खाली बघून हसणाऱ्या ललनांची छायाचित्रेही वर असतात. ह्या सगळ्या परिस्थितीवर व्यथित होऊन ह्या इसमांचे थुंकणे साहजिक असावे. च्युईंगगम ह्या पदार्थामुळे बरेचदा ह्या मुताऱ्या तुंबतात. तुमच्या अगतिकता आणि अनुभवावर तुमची अब्रू अवलंबून असते. अनुभवी व्यक्ती हेही दिव्य यशस्वीरीत्या पार पाडतात. ह्या व्यक्तींच्या परिसरात स्वच्छ, बिना दुर्गंधीचं, झोपडपट्टीविरहीत सार्वजनिक शौचालय शोधून पहा. सापडण्याचा संभव आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हा विषयच इतका गहन आहे की तुम्हाला आणखी भागही लिहावे लागतील. एकदा चिवडायलाच बसलोय तर व्यवस्थित चिवडुया.
आम्ही लहानपणी चाळीत रहात होतो त्यामुळे त्यावेळच्या अनेक हॉरर संडास कथा आहेत. मालाडच्या संडासात खालनं डुकरं डोकावायची, त्यावरुन चतुर वाचकांनी तो पाटीचा संडास होता हे ओळखले असेलच. (पुढे अनेक वर्षांनी, केमिकल लॅब मधे काम करताना एका इंटरमिजिएटचा वास नक्की कशासारखा येतोय, यावर आमचे चर्चा झाली होती आणि शेवटी त्या केमिकलला पाटीच्या संडासाचाच वास येतोय, याबाबत सर्व एक्स-चाळकरी केमिस्टांचं एकमत झालं होतं.)
पुढे, डोंबिवलीला आमच्या संडासांचे पण अपग्रेडेशन झाले होते. म्हणजे भारतीय पद्धतीचा पण चाळीपासून लांब ! त्यामुळे डालडाचे मोठ्ठे टमरेल घेऊन कसरत करत संडासात जायचे. कडी हा प्रकार इतिहासजमा होता. वर कौलं होती. आम्हा लहान भावंडांचा एक अलिखित नियम होता. चुकूनही वर बघायचे नाही. कारण वर, अर्थातच गलेलठ्ठ पालींची फौज ! त्याचा उपयोग, कमीतकमी वेळांत सर्व कसे उरकायचे, हे शिकण्यांत झाला.
पुढे, साधे फ्लशचे संडास, कमोड वगैरे प्रगती झाली. कमोड हे नांव पहिल्यांदा ऐकले तेंव्हा, मोडक आंडनांवाच्या व्यक्तीनेच याचा शोध लावला की काय, अशी बालसुलभ शंका आली होती.
रेल्वेतल्या संडासावर नेहमी पाखाना असे लिहिलेले असायचे. ते आम्ही पार वाना असे वाचायचो. ते इतके हलायचे की नेम क्वचितच लागायचा.
तर अशा अनेक कथा आठवतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा विषयच इतका गहन आहे

भलताच! तरीही जितकं मनात होतं ते एकाच लेखात कोंबायचा बर्राच प्रयत्न केला. खरंतर प्रत्येक वर्गाच्या शौचालयांबद्दल एक एक लेख आरामात लिहीता येईल. पण काय सारखं सारखं शौचालय शौचालय म्हणून मोह आवरला.
तीर्थरुप बऱ्याच गोष्टी सांगतात चाळीच्या संडासांबद्दल. एकेकाळी दुराई, जैन, संझगिरी, कणेकरादी लेखक चाळसंडास ह्या विषयावर इतकं लिहायचे- दुसरा विषय नसल्यासारखे.

पाखाना असे लिहिलेले असायचे. ते आम्ही पार वाना असे वाचायचो.

अग्गदी अग्गदी! त्या जुन्या रव ने माझ्याही मनात भलतेच घोळ घातलेले आहेत. आता आठवत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

सरकार सिनेमात एक वाक्य आहे की आदमी की सोच पहले मारनी चाहिए।
तर काय इथे उघड्या जागेवरच बसायचं ही सोच. मग लोकसंख्या वाढली आणि जागा कमी झाल्या. बेशरमिची झाडं तरी किती आडोसा करणार? आणि उघड्यावरचं वाळायला तेवढा वेळ जावा लागतो अथवा दोन भरती ओहोटी लागतात. थंड प्रदेशात कुजतही नाही लवकर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भरती ओहोटी ... सही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

की पुरातनकाळी त्या त्या वेळी पुढारलेल्या संस्कृतींमध्ये शौचालये कशी असायची? खालील दुव्यातील लेखाने हे कुतूहल थोडंफार शमलं :

https://www.mapistry.com/hubfs/Historical%20Sewers%20of%20the%20World-1.pdf

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१४ व्यांमध्येहि टॉयलेन्ट असल्याची दाट शंका आहे, त्यांनीच उकल करावी.
बाकी संडासात झुरळे अन ओलसर जागेत असल्यास गोम, पाली, झुरळ हि निघण्याची शक्यता असते (अनुभव).
एकदा ऐन भरात असताना एक गोम दाराच्या फटीतून बाहेर आली. पायावर येते कि काय???
आधी धुवावे कि तसच उठून पाळावे, काही कळेना. त्यात ती अदृश्य झाल्यावर तर काळजाचा ठोकाच चुकला, १८० कोनातून मागे वळून बघितलं आणि गोम दिसल्यावर कोण आनंद झाला.
१. संडास लहान असल्यावर ते उठता बसता पार्श्वभागाला आणि/किंवा डोक्याला घासतात तेंव्हा बसताना पेक्षा उठताना खूप राग येतो, कारण एव्हाना काम झालेले असते.
२. खूप जोराची एक नंबर किंवा दोन नंबर (हे कोड वर्ड्स आहेत. दोन नंबर ला शेजारी देशाचे नाव हा हि एक कोड वर्ड असल्याचे ऐकण्यात आहे.) लागलेली असताना ती करायला भेटणे या सारखे सुख जगात दुसरे कोणतेच नसावे.
३. खूप जास्त सर्दी झालेली असने आणि संडास पण लागणे हे एखाद्या शत्रू बरोबर हि घडू नये असा प्रकार आहे. काय बाहेर टाकावे अन काय आत ओढावे ह्या ताळमेळात खूप वेळ जातो.
४. संडास लागलेली असताना शक्यतोवर औषधे खाऊ नै असे माझे मत आहे कारण औषधे खाण्याच्या आधी खूप येते म्हणून अडचण असते तर औषधे घेतल्यानंतर दोन दोन दिवस येताच नाही म्हणून अडचण येते.
५. गावाकडे परसाकडे जाणे आणि पावसाळ्यात असेल तर महा प्रचंड कठीण काम. आधीच्या कामामुळे भिनभिनणाऱ्या माश्या तर त्रास देतातच, पण पहिल्या इंस्टॉलमेंट नंतर दुसऱ्या इंस्टॉलमेंट साठी शिफ्ट होणे हि एक कलाच आहे.
६. पाइल्स चा त्रास असणाऱ्यांसाठी संडासला जाणे म्हणजे एक मोट्ठीच शिक्षा असते.

तिरशिंगराव बघा अजून चिवडता येईल का???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

शौचालय ज्याच्या घरी।
लक्ष्मी तेथे वास करी ।।

अशी घोषवाक्ये अलिबाग रायगड परिसरांत भिंतिंवर लिहूनही काही फरक पडला नाही. नागाव ते रेवदंडा किनाय्रावर एक भाग राखीव असतो. पुरी ,कोणार्क,ममलापुरम वगैरे भागातही असेच आहे वगैरे वार्निंग लोनलिप्लॅनिट पुस्तकात दिलेली आहेच- walking in this part of the beach could be exercise in side stepping turds.-

foriegners take everything in their stride.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

walking in this part of the beach could be exercise in side stepping turds.-
नोकरीनिमित्त मुंबईहून बोईसरला अप-डाऊन करताना बऱ्याच वेळा, परत येताना,गाडी विरारच्या थोडी आधीच उभी रहायची. मग पुढची लोकल मिळवण्यासाठी, तिन्हीसांजेला आम्ही सर्व ट्रॅक मधून विरारपर्यंत चालत जायचो. तो मात्र, लिटरली 'केकवॉक' असायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसंच काहीसं माहिम आणि वांद्र्याच्या मध्ये हार्बर आणि वेस्टर्न जिथे दुभागल्या जातात तिथे काय्यम लोक बसलेले असतात. पहाटेपासून भरदुपारीही. कधीनाकधी एकतरी प्राणी असणारच.
शिवाय एकदम पूर्वेचे हार्बरचे रुळ अगदीच अतिक्रमण झालेले, गलिच्छ इत्यादी आहेत. ह्या लोकांना पाहून मनात जे विचार येतात ते लिहीले तर मॉण्डळाकडून डोस मिळायचा. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

रोमच्या दौर्‍यामध्ये एक दिवस रोमचे टायबर नदीवरच्या जुन्या बंदराला (Austia Antica) भेट दिली होती. रोमन शहरांतील मुख्य जागा म्हणजे Forum नगरचौक. तेथील Forum जवळ हे सार्वजनिक शौचालय होते.

चीनच्या दौर्‍यात बीजिंगच्या उत्तरेस असलेल्या चिनी सम्राटांच्या Summer Palace ला भेट दिली होती. चीनमध्ये भारतातल्या जुन्या उकिडवे बसायच्या शौचालयांसारखी शौचालयेच जुन्या गावांमधून आणि घरांमधून असतात. परदेशी प्रवाशांना ती नीट वापरता येत नाहीत म्हणून प्रवासी जेथे भेट देतात त्या जागी पाश्चात्य शौचालये बांधलेली असतात. शौचालय जुन्या का नव्या पद्धतीचे आहे हे बाहेरूनच कळावे म्हणून अशी खूण शौचालयाबाहेर लावलेली असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण ज्याला इंडियन टॉयलेट म्हणतो त्याला पाश्चात्य लोक एशियन स्क्वॅट टॉयलेट म्हणतात.

१९९६ मध्ये सिंगापूरला एका फॅक्टरीत टॉयलेटमध्ये आपल्यासारखी २० आणि पाश्चात्य पद्धतीची वीस टॉयलेट पाहिली होती.
आपल्याकडील टॉयलेटमध्ये पाणी फक्त मागील भोकात असते त्याऐवजी ते पूर्ण पॉटमध्ये होते. त्यामुळे आपली विष्ठा सुक्या पृष्ठभागावर न पडता (कमोडमधल्याप्रमाणे) पाण्यात पडत असे. आणि फ्लश केल्यावर निघून जात असे. आपल्याकडे जशी सुक्या पृष्ठभागावरील विष्ठा घालवायला कष्ट घ्यावे लागतात तसे होत नव्हते. पण आपण बसलेले असताना आपली विष्ठा त्या पाण्यात तरंगत इतस्तत: फिरताना दिसते ते विचित्र वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पॅाटमधले पाण्याची लेवल व मागचे यु ट्युब वॅाटर सीलला किती कोनात जोडलेले काहिंचे इतके चांगले असते की थोड्या पाण्यात ते पलिकडे खेचले जाते. पण काहिंचे ते पॅाटमध्येच फिरत राहाते हा अनुभव हॅाटेलच्या निरनिराळ्या ठिकाणी लगेच कळतो. तिथे आपल्याला पाणी वाया गेल्याचे दु:ख नसते पण ते वाया जाते ते केवळ चुकीच्या रचनेमुळे हे कळते.
निर्जंतुकिकरण करणारे केमिकल हे सेप्टिक टाकितले मैला कुजवणारे बॅक्टिअरियाही मारतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक वर्षांपूर्वी, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, यांनी संडासात गेल्यापासूनचे २० मिनिटांचे डिट्टेलवार वर्णन लिहिले होते. ते वाचल्याचे आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी मावशी जिथे राहते, ते अगदी खेडं आहे. त्यांच घर अगदी शेताडीत गावकुसाबाहेर आहे. गावकुसाबाहे शेताच्या कडेला लोक बसलेले असायचे गाव हागणदारी मुक्त होण्या आधी.. एकदा सकाळी फिरायला जाऊन आलो तर दादा मोर बघून आलात का म्हणून हसत होता...
दुसरे काका आणि दोन्ही मावश्या फिरायला गेलेल्या तेव्हा काकानी नवीन आईसक्रिम आणि जुनं आईसक्रिम कसं ओळखायचा हे डिट्टेलवार दोघींना समजावलं होतं जसं की, कडेला दिसतयं त्याला टोक असेल तर ते नवीन, टोक मोडून पडलं असेल तर जुना माल आहे. नवीन थोडंस ओलं दिसतं ...वगैरे वगैरे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

'जंगल में मोर नाचा किसी ने ना देखा', झालेच तर 'नाच रे मोरा आंब्याच्या बनात' या गाण्यांना असाही काही आयाम असू शकेल याची कल्पना नव्हती.

आमची मोराची कल्पना बोले तो 'पॉइंट ब्लँक रेंजेत कर्कश केकाटतो' (म्हणूनच 'केकावली') इतकीच होती. कारण शेवटी आम्ही पडलो शहरीच, त्याला काय करणार?

आणि 'मोरी' हा शब्दसुद्धा 'मोरा'वरूनच आला असावा, असे आता वाटू लागले आहे. (कदाचित 'चोरावर मोर'सुद्धा?)

(Peacockचे मूळ स्पेलिंगसुद्धा कदाचित 'Pee-cock' असे असावे काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<आणि 'मोरी' हा शब्दसुद्धा 'मोरा'वरूनच आला असावा, असे आता वाटू लागले आहे.>

मोरी हा शब्द हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातून घेतला आहे हे स्पष्ट आहे. उदा. 'मोरी गगर ना भरन दे.' ह्यावरूनच पुलंनी कोठेतरी 'खांसाहेबानी मोरीत तोंड घातलं' असा विनोद केला होता.

आमच्या लहानपणी बायका 'मोरीवर' जात असत तेहि आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं तर मोरीचा अर्थ 'पाण्याचं आऊटलेट' एवढाच आहे. उदा० धरणाची मोरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बगा , अजितदादानला हे आधीच ठाऊक होतं !!! उगा तुमि त्यान्ला त्यावेळी वगैरे !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोळलो अक्षरश:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

होच. त्या हिंदी मोरी {गगर}- मेरी{गगर}, माझी घागर'शी काही संबंध नाही.
शत्रुचे शिर कापून ते मोरीवर बांधत पुर्वी. ( # यादव, औरंगाबाद)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मोर बघून आलात का म्हणून>>

हे माहात नव्हतं. रतनगडाच्या पायथ्याला एका गावात अगदी सकाळी चाललेलो तर मोर मागे मागे जवळ येत होते. गावात विचारले मोर धीट आहेत इथले का. " ते खातात **त काही मिळालं तर."
- राष्ट्रिय पक्षीच तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता इथे विषयच हा चालू असल्याने बोलून घेतो. मनुष्याचा स्वभाव असा आहे की दुसऱ्याचा घरी गेलो आणि संडास वापरायची वेळ आली तर बाहेर यायच्या आधी अगदी सगळे साफ झाले आहे ना (पोट नव्हे, संडासचे भांडे) हे पाहून, दोन-दोनदा फ्लश करुन/पाणी ओतून बाहेर येतो. स्वत:च्या घरात जो मोकळे पणा आहे तो दुसऱ्याकडे नसतो Smile

यावर एक अत्यंत ॲप्ट कोकणी म्हण आहे (कोकणी म्हण अत्यंत ॲप्ट असणे म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्यासारखेच झाले. असो)

दुसऱ्याची मोरी मुतायची चोरी
आपलं घर गुवानं भर

-- म्हण सौजन्य बायकोची कोकणी आजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा विषय चिवडला जात असताना एक नांव सुचले.
मोरेश्वर पीतांबर हगवणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा गलास किती पिवळा
हा गाव नदिकाठी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

मोरी, संडास या गोष्टींनी म्हणी,वांगमयात स्थान मिळवलं पण समाजशास्त्र, नगररचना ,नागरिकशास्त्रातून बाहेरच बसलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोरी, संडास या गोष्टींनी म्हणी,वांगमयात स्थान मिळवलं पण समाजशास्त्र, नगररचना ,नागरिकशास्त्रातून बाहेरच बसलं.

गोमय माहीत होते. हे वांगमय काय असते?

आणि, ते वाक्य उलटे नको काय? बोले तो, वांगमयाने संडासात (मोरीत नव्हे!!!) स्थान मिळवले, असे?

बाकी, वाङ्मयाने (सार्वजनिक) संडासांत स्थान मिळवलेलेच आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाङ्मय टंकता येईना मग वांगमयावर उरकलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वामी कादंबरीत एक डायलॉग आहे. थोरले माधवराव आणि राघोबादादा एकमेकांवर चाल करून येतात. माधवरावांचा पराजय होतो. त्यानंतर राघोबांच्या गोटात एक इन्फॉर्मल बैठक टाईप चाललेली असते. तिथे सगळे लोक लढाईच्या कथा सांगत असतात. अचानक एकजण डायलॉग मारतो, "अहो आहात कुठे! शुभ्र धोतरांची पितांबरे झाली!" मी तेव्हा सातवीत असेन बहुधा. किंवा आठवीत. जे हसू आलेलं ते वाचून, सांगता सोय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गोनीदांच्या "कादंबरीमय शिवकाल" या कादंबरीसंग्रहातील सिंधुदुर्गनिर्माणवाली कादंबरी- बहुधा 'हरहर महादेव' ही असावी. त्यात हा प्रसंग फार भारी आहे.

सिंधुदुर्गाची तटबंदी बांधून पुरी होते. आता हळू हळू आतल्या इमारती बांधायचे काम निघते. मग अख्ख्या मालवणात एकच चर्चा-

"करायचा काय तो स्वच्चकुप? एवढो मोठो दर्यो असा तो?"

मग हीरोजीनं समजावलं, "आरं, पर तटातली हजारभर मानसं भाएर जात्याल कशी? तटावरून उड्या टाकीत?"

लोकांनी पाहिलं, तर प्रत्येक संडासातून समुद्राकडे एक मोरी काढून दिलेली होती. वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मलाही रायगडाची कीव येते. शिवजयंतीला ( दोनदा) हजारभर भक्त गडावर येतात तेव्हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...'एक संडास असतो. त्यासमोर खूप मोठ्ठी लाइन असते.' ही लघुविनोदीकथा या निमित्ताने आठवली.

(या कथेत हास्यप्रवर्तक असे नेमके काय आहे, यावर मागे एकदा विचार करत बसलो होतो. (संडासात नव्हे.) पुष्कळ आयाम सापडले. त्यांबद्दल सवडीने पुन्हा कधीतरी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कथा आहे अवरंगजेब दख्खनमध्ये आला तेव्हाची.

एकदा शहनशाह बसले हगायला. तेव्हाच मुघल तळावर हूल उठली, "मराठे आले मराठे आले" म्हणून. झालं, सगळे आवराआवर करायला पळू लागले. खासा अवरंगजेबही पळू लागला. तेव्हा त्याचा पाय एका दगडाला लागला. त्या माराने पुढे तो कायम लंगडत राहिला. ही घटना मोगली बखरकारांनी "शहनशहांना त्यांच्या पूज्य पूर्वजांप्रमाणे होण्याचे भाग्य लाभले" अशा प्रकारे वर्णन केली.

पूज्य पूर्वज म्हणजे तैमूरलंग, तो लंगडा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं