कॉफी

आता दुसऱ्या धाग्यावर चाय पे चर्चा घडवून आणलीच आहे तर एक कॉफीवर पण धागा झालाच पाहीजे.
चहा आम जनतेचा आणि कॉफी म्हणजे हायक्लास हायफंडू लोकांचा असं एकूणच काहीतरी असावं. मला अजूनही कॉफी म्हणजे काहीतरी स्टाईलबाज पेय असल्यासारखं नेहमी वाटत आलंय. इंग्रजी पिच्चर, मालिका इत्यादि मध्ये सतत कॉफीचा जप असतोच. त्यात त्या लोकांचे मॅकिआटो, मोचा, कॅपेचिनो, इत्यादी मंत्र. मला आजपर्यंत यातला फरक लक्षात राहीला नाही. त्यात आणि स्टारबक्स इत्यादी मंडळीमध्ये बसून किंवा त्याचा तो कप हातात घेऊन फिरण्याशी आपला काही संबन्ध नाही. कॉफी प्यायला छान वेळ हवा, गप्पा हव्यात किंवा गाणी हवीत.
सी सी डी वगैरे ब्रांडांशी ओळख होण्यापूर्वी घरात अतिमहत्वाचे पाहुणे आले तरच कॉफी व्हायची. नंतर जसजशी कॉफीशी ओळख होत गेली तसतसं चव आवडू लागली. ब्रु, नेसकॅफे, टाटा (सध्या घरात टाटा कॉफी ग्रँडवर जरा जास्त प्रेम आहे), जायफळ घातलेली कॉफी, मंगळूरी दुकानातून आणलेली कॉफी, तामीळ मित्राच्या घरी त्याच्या आईने केलेली फिल्टर कॉफी यांच्याशी ओळख होता होता ताज्या दळलेल्या कॉफी बियांवर गरम पाणी ओतून त्याचा वास नाक भरून घेण्यावर जिव जडला. नुस्त्या भाजलेल्या कॉफी बिया कुडूम कुडूम खायला पण भारी लागतात.
सध्यातरी रोज सकाळी ऑफिस मधल्या अण्णाच्या कडे डबल फिल्टर कॉफी , कम दुध, और नो शक्कर मोठ्ठा मग भर घेऊन तो संपे पर्यंत खिडकीजवळ बसून पवई तलाव पाहत मैत्रिणिशी गप्पा , कुचाळक्या करेपर्यंत आमचा दिवस सुरु होत नाही.

field_vote: 
0
No votes yet

१. कॉफी ही अस्सल ममव पद्धतीची जायफळ वगैरे घालून केलेली मस्त लागते.
२. बाकी स्टारबक्स, बरिस्ता, कॉफीडे वगैरे तद्दन रद्दड कॉफी बनवतात असे अनेक अनुभवांती मत झालेलं आहे. त्यापेक्षा उडप्याच्या हाटेलातली सो कॉल्ड एक्स्प्रेसो मशीनमधे बनलेली पाण्याच्या जगात ओतून सर्व्ह केली जाणारी कॉफी बरी.
३. मद्रासी पद्धतीची फिल्टर कॉफीसुद्धा झकास लागते.
४. उत्त्तम कॉफी मला श्रीलंकेतही प्यायला मिळालेली आहे. थोडी चव वेगळी होती, कदाचित बनवण्याची पद्धत वेगळी असेल.
५. हेझलनट फ्लेवर घातलेली कॉफीपण छान लागते.
६. नेस्कॅफे क्लासिक दूध न घालताही उत्तम लागते.
७. एक मात्र खरं, की चांगला चहा जितका सहज कुठेही मिळू शकतो तसं कॉफीच्या बाबतीत होते नाही. त्यादृष्टीने कॉफी हे बाहेर पिण्यासाठी हाय रिस्क पेय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रु

यही तो है वोह .... यही तो है !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(४) ????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जपानी ग्योझा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

...'सासरचे धोतर' यायलाच हवे, नाही का? Wink

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही हो, चौथा महत्त्वाचा विषय एखादे पेय नसून दाढी/मिशा ठेवणे,राखणे,निगा, बेटर हाफने दाढी ठेवावी का? केवळ नौय्राच्या मैत्रिणी छान म्हणतात म्हणून त्याने ठेवावी का हा आहे.

आता कॅाफीबद्दल-
फिल्टर कॅाफी म्हटली की मोठ्या मिशिवाला { अशोक नायगावकर माप करा} कॅाफी पितोय हे चित्र समोर दिसते.
ओफिसातल्या एका अण्णाने एकदा मला ( घराजवळच्या) दुकानातून दळलेली कॅाफी आणायला सांगितल्यावर सायन स्टेशनजवळच्या कॅाफीबोर्डच्या दुकानाची ओळाख झाली. त्याअगोदर ब्रु आणली जात असे. आम्हीही आणू लागलो. शंभर ग्राम बरणीतली देत असे पण अण्णाची ओर्डर अर्धा किलोची असायची तेव्हा समोर नवीन दळून देत असे.
बाकी या सुवासिक कापीचं आमच्याकडे हळदिकुंकवाचीगोडमिट्टवेलदोडेयुक्त कोफी नावाचं पेय बनवणाय्रा सुवासिनींचं कौतुक करावं तेवढं थोडंच. नशिबाने तो प्रकार फक्त चैत्रात एकदाच घडतो आणि पृथ्वी वसंतसंपातबिंदूकडे सरकते.
विंध्य पर्वताच्या उत्तरेकडे कॅाफिचे लोण पसरले नाही हे विशेष. त्याची जागा लस्सीने घेतली असं म्हणता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओफिसातल्या एका अण्णाने एकदा मला ( घराजवळच्या) दुकानातून दळलेली कॅाफी आणायला सांगितल्यावर सायन स्टेशनजवळच्या कॅाफीबोर्डच्या दुकानाची ओळाख झाली.

हे कुठे आलं नेमकं? म्हणजे स्थानकातून पुलावर आल्यावर चेंबूरच्या दिशेने की गुरुकृपा/सिंधी कॉलनी की वांद्र्याकडे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुलावरून रस्त्यावर डावीकडे अवरलेडी शाळेच्या आवारातच होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काॅफीत जायफळ-वेलची घालण्याची पद्धत कुठून आली ह्याविषयी कुतुहल आहे, कारण परदेशात काही वेळा मी जायफळ-वेलची घातलेली दाट काळी आणि स्ट्राँग काॅफी अरबी पद्धतीची म्हणून प्यालेली आहे. खरंखोटं माहीत नाही, कारण करून देणारा माणूस अरब नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कारण परदेशात काही वेळा मी जायफळ-वेलची घातलेली दाट काळी आणि स्ट्राँग काॅफी अरबी पद्धतीची म्हणून प्यालेली आहे. खरंखोटं माहीत नाही, कारण करून देणारा माणूस अरब नव्हता.

अरबी/तुर्की?

म्हणजे कसे आहे ना, की हुम्मुस, पीटा वगैरे प्रकार मी ग्रीक या नावाखालीही खाल्ले आहेत, नि लेबनीज़ही. (उद्या कोणी इस्राएली या नावाखाली जरी खाऊ घातले, तरी तितक्याच प्रेमाने खाईन. आणि कोण जाणे, कदाचित कोणी घालेलसुद्धा.)

आणि हो, 'अथेन्स' नावाने सुरु होणाऱ्या तथाकथित ग्रीक खाणावळी तुर्की लोकांनी चालविलेल्याही पाहिल्या आहेत. (अतिअवांतर: फार कशाला, आमच्या अटलांटाच्या एका उपनगरात 'पूना' नावाची पुण्याशी काहीही संबंध नसलेली बांग्लादेशी लोकांनी चालविलेली आत्यंतिक भिकार दर्जाची एक देशी खाणावळसुद्धा आहे. तिची अन्यत्र फक्त एकच शाखा आहे म्हणे - लंडनात. आता बोला!)

मला वाटते ग्रीक काय किंवा तुर्की काय किंवा लेबनीज़ काय किंवा पॅलेस्टीनी काय किंवा एकंदरीतच अरबी काय (किंवा काही अंशी अगदी इस्राएलीसुद्धा काय), परंतु पूर्वाश्रमीच्या अॉटोमन साम्राज्याखाली नांदलेल्या अनेक विभिन्न संस्कृतींत काही समाईक खाद्यपरंपरा विखुरल्या असाव्यात काय?

कदाचित नंदन यावर अधिक प्रकाश टाकू शकेल. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इसी बात पे एक डॉकुमेंट्री याद आती है.

मेक हुम्मुस नॉट वॉर.

अवश्य पाहणे. मस्त प्रकार आहे.

https://www.youtube.com/watch?v=7lWauhmh-dw

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझ्या मर्यादित/परिचितांच्या सांगोवांगीच्या माहितीनुसार - बिनसाखरेची पण वेलचीयुक्त कॉफी ही मूळ अरबांची पद्धत आहे. प्रसंगी त्यात केशर/जायफळ/लवंगा/अन्य मसाल्यांची भर पडते. तुलनेने तुर्की/लेबनीज कॉफी अधिक गोड आणि जामानिम्याची असते, असं द्वीपकल्पवासीयांचं एकंदरीत मत दिसलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम वैसे कोईभी गर्म लिक्विड बडे चाव से पीते हैं. पण चहा हवा की कॉफी असा प्रश्न विचारला तर चहा हाच चॉईस असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आम्ही मूळचे चहावाले, पण साऊथ इंडिया ला गेलो की पार्टी बदलतो. फक्त कॉफीच पितो. तिकडच्या फिल्टर कॉफीला तोड नाही. आणि त्यांना चांगला चहा करताच येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाडिस !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसकी साडी मेरी साडीसे सफेद कैसे ??? अं अं ???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

कॉफी

चांगली माकियातो प्यायल्याला काळ लोटला. पुढच्या वेळेस चांगल्या कॅफेत गेल्यावर माकियातोच पिणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माकियातो ही इतालियन भाषेतली शिवी असावी असा मला बरेच दिवस संशय होता. बरं स्पेलिंगही "माच्छियाटो" असं असल्याने हेच ते माकियातो हेही कळंना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मा. मा. अमुकदादा यांच्याशी मैत्री असूनही तुला माकियातो या शब्दाचा अर्थ माहीत नसल्यास, मी तुझ्याकडे अतिशय तुच्छ कटाक्ष टाकून उच्चभ्रू हसते आहे, अशी कल्पना कर. अर्थातच त्याचा अर्थ काय ते मी लिहिणार नाही, कारण हा स्नॉबिश प्रतिसाद आहे.

मनातली खंत - काल मी स्टारबक्सात गेले होते. काय करणार, एका डॅमसेल इन डिस्ट्रेसनं विचारल्यावर तिला नाही म्हणवलं नाही. ऐसी ही हूं मै।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उच्चारी 'मक्क्यातो'.
'कापुचिनो'ला कापुसिनो म्हणण्याचं सिन तुम्ही करत नसाल अशी आशा.
कापुचिनोतही हलका च्चि आहे. पण शिव्यांत भर नको म्हणून जोर दिला नाही. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> माकियातो ही इतालियन भाषेतली शिवी असावी असा मला बरेच दिवस संशय होता. 

हे थोडंफार खरं आहे. त्यातला मूळ लॅटिन शब्द macula - अर्थ ‘लांछन’ किंवा ‘डाग’. (वर्जिन मेरीला im-maculate म्हणण्याचं कारण ती ‘अलांछित’ होती.) तेव्हा मक्यातो म्हणजे डागाळलेली किंवा पावित्र्यभंग झालेली कॉफी. म्हणून ती कधी पिऊ नये. एस्प्रेसो प्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

तुम्ही एवढे प्रूड असाल अशी अपेक्षा नव्हती हो प्रोफेश्वर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॅाफीचं झाड गुणी बाळ इतर झाडांच्या सावलीत वाढतं. उदमांजरं त्याची फळं खातात आणि बिया तुमच्या महागड्या कॅाफीसाठी मागे टाकतात.
चहाचं अस्स मुळीच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उकळून केलेली मद्रसी कॉफी मला आवडते

फार फार पूर्वी रत्नागिरीला आम्ही गेलो होतो - तिथल्या टपरीवजा हॉटेल मधे स्टील च्या ग्लास मधली कॉफी अजून आठवते

आमच्या इथल्या "कॉफी बीन" मधे वेगवेगळ्या प्रकारच्या गरम', गार (काही वेळा त्यावर डिज्जाईन केलेल्या ) कॉफ्या , उंच आणि निमुळत्या काचपात्रात मिळतात छान असतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

नेसकॅफे आवडते. ब्रु फार स्ट्रॉन्ग वाटते, इथे ब्लाँड रोस्ट आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरब वाळवंटामध्ये जुन्या बेदू काळापासून पाहुण्यांना कॉफी (आणि भातावर बकऱ्याचे-उंटाचे मांस) पाहुणचार म्हणून देण्याची पद्धत आहे/होती. (पहा 'Seven Pillars of Wisdom' by Col TE Lawrence alias Lawrence of Arabia). ही कॉफी उकळलेली काळी आणि जायफळ घातलेली असायची. छोट्या बिन-कानाच्या कपामध्ये साधारण दोन चमचे इतकी ही कॉफी असे. पहिले दोन कप न पिणे हा यजमानाचा अपमान मानला जाई. तिसऱ्या कपापासून तो नाकारण्याची मुभा असे. 'तिसरा कप नको' हे दाखविण्याची पद्धत म्हणजे कप १८० अंशांमध्ये हलवून दाखविणे. ही प्रथा अजून चालू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉफी हा "नव्या जगातला" पदार्थ आहे असे मला पूर्वी वाटत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.