Making of foto and status : १. गंप्या आणि झंप्या

प्रस्तावना :
तीन वर्षांपूर्वी आमच्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर पूर्ण शंभर दिवस मी एक मालिका चालवली होती. मी रोज माझ्या प्रोफाइल फोटोमध्ये एक फोटो डकवत असे, आणि स्टेटसमध्ये त्या फोटोसंबंधी काही चविष्ट लिहीत असे.

प्रोफाइल फोटो मी कुठूनही मिळेल तिथून घेत असे. काही फोटो आंतरजालावरून घेई, तर काही मी स्वतः काढलेले असत. तसेच काही स्वतःचे, कुटुंबाचे आणि मित्रांचे असत. फोटोबाबत असा काही विधिनिषेध नव्हता. बस! फोटो मनात कुठेतरी क्लिक व्हायला हवा. मग मी तो माझ्या संग्रहात ठेवायचो आणि रोज एक फोटो घेऊन पाऊण तासाच्या माझ्या लोकल प्रवासात त्यावर स्टेटस लिहायचो.

स्टेटस लिहिण्याकरिता फक्त एकशेचाळीस इंग्रजी अक्षरांची मर्यादा होती. अर्थात मराठी करिता त्याहून कमी. कारण इंग्रजीतील दोन ते तीन अक्षरांची जागा फक्त एक मराठी अक्षर घेते हे आपणांस माहीतच आहे. मी स्टेटस लिहिताना १४० अक्षरं बसतील एवढाच गाळा दिसायचा, पुढे लिहिताच येत नव्हते. त्यामुळे स्टेटस कधी फार मोठं व्हायचं, तेव्हा काही शब्द गाळावे लागायचे. त्याने वाक्याचा अर्थ बदलून जायचा. मनासारखं व्हायचं नाही. मग पुन्हा लिहिणे आले. तसेच, इतर वेळी लेख वगैरे लिहिताना आपण कॉमा आणि प्रश्न चिन्ह वगैरेंचा मुक्तहस्ते वापर करत असतो. पण १४० अक्षरांच्या जागेमध्ये स्टेटस बसवताना कधी कधी अक्षरशः एखादा कॉमा किंवा प्रश्नचिन्ह टाकण्याची गरज असायची. पण जागाच शिल्लक उरलेली नसायची. आणि नाही टाकला तर स्टेटसच्या अर्थाचा अनर्थ व्हायची शक्यता निर्माण व्हायची.

प्रोफाइल फोटो आणि स्टेटस टाकण्याकरिता वर्तमानपत्रवाले पाळतात तशी मी डेडलाईन पाळायचो. रोज बरोबर सकाळी सात वाजता मी ते प्रसिद्ध करायचो. वेळ पाळण्याकरिता मी दोन चार फोटो आणि स्टेटस ऍडव्हान्समध्ये तयार करून ठेवत असे. अशा पद्धतीने मी विनाखंड शंभर दिवस ती मालिका चालवली होती. लोकांनाही ते फोटो पहायची आणि स्टेटस वाचायची एव्हढी सवय झाली होती, की ते माझी फोटो आणि स्टेटस टाकण्याची वाट पहात असत.

नमनाला घडाभर तेल वाहून झालेय. आता मूळ मुद्द्यावर येतो. हिंदी सिनेमावाले आपला सिनेमा प्रदर्शित करताना एक छोटीशी फिल्मही बनवतात. ते त्यात तो मूळ सिनेमा बनवतानाची संपूर्ण प्रक्रिया दाखवतात. उदा. Making of chennai express किंवा Making of bahubali वगैरे. काही दिवसांपूर्वी माझे फोटो आणि स्टेटस मी पुन्हा पहात असताना माझ्या मनात विचार आला, की त्याच धर्तीवर माझ्या काही निवडक २० फोटो आणि स्टेटसवर Making of foto and status लिहून पाहिलं तर कसं वाटेल!!? अर्थातच मराठीतून. आणि एक नवीन प्रयोगही केल्यासारखे होईल.

तर त्याला अनुसरून मी आजपासून ह्या मालिकेला सुरवात करत आहे. या प्रयोगाला मात्र वेळेचे बंधन नसेल. जसजसे माझे लिखाण पूर्ण होईल तसतसे मी ते प्रसिद्ध करेन. तसेच आपल्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरूनसुद्धा २० Making of foto and status ची मालिका पूर्ण करायची की नाही हे अवलंबून असेल. काही चुकभुल झाल्यास आपण सांभाळून घ्यालच याची खात्री आहेच. तरी कुठल्याही क्षणी आपणांस कंटाळा आला तर मला फक्त एक hint द्या. मी ते प्रसिद्ध करायचं थांबवेन.

तर ह्या मालिकेतलं पहिलं पुष्प मी खाली देत आहे. आपणांस आवडल्यास नक्की सांगा. आणि न आवडल्यास तेही कळवा हं!!!!


गंप्या : हे सर्व आपल्याकडे एवढे घुरून घुरून का बघतायत रे ?
झंप्या : अरे, आपल्या चेहर्यात ते त्यांचा पुर्वज शोधतायत. खी:, खी:, खी:, खी:,

Making of foto and status :
हा फोटो मला आंतरजालावर मिळाला. ह्या फोटोने माझे लक्ष वेधून घेण्याचे कारण म्हणजे कलाकाराने त्यात साधलेली भडक रंगसंगती! लालजर्द माकडं, हिरवंगार झाड आणि पार्श्वभूमीला असलेला गडद पिवळा रंग! बरं ही दोन माकडं इतर सर्वजण सर्वसाधारणपणे रेखाटतात त्यापेक्षा फारच वेगळी आणि cute दिसताहेत. पहा ना! त्यांच्या शरीराचा दिसणारा एकंदर गोल गरगरीतपणा, त्यांच्या डोक्यावरचे उभे राहीलेले छोटुकले केस, त्यांचं चमकणारं डोकं, त्यांची उघडी तोंडे आणि त्यातून दिसणारे त्यांचे शुभ्र दात, त्यांची छोटी छोटी आणि गोल गोल पोटं! तसंच त्यांची छोटुकली उंची पहा, जशी लहान बाळंच जणू!! ह्या फोटोने मला स्टेटस लिहिण्याकरीता लगेच मोहात पाडलं.

मी विचार करू लागलो की काय लिहिता येईल बरं!! आणि तेव्हढ्यात मला त्या दोन माकडांच्या चेहऱ्यावरचे मिश्किल भाव दिसले. मला असं जाणवलं की उजवीकडचा माकड समोर पाहून टिंगल केल्यासारखं काही तरी सांगतोय आणि ते ऐकून डावीकडील माकड खदाखदा हसतोय.

बस्! मी त्यांच्या बोलण्यावरच स्टेटस लिहायचं ठरवलं. माकडांच्या जीवनाशी, त्यांच्या आयुष्याशी संबंधित बरेच लिहिता आले असते. पण मला असे लिहायचे होते, की त्यात मानव आणि माकड या दोघांचा संदर्भ यायला हवा होता. आणि मला पट्कन आठवलं. आपण पूर्वीपासूनच शाळेत शिकत आलोय की माकड हे मानवाचे पूर्वज होते. मग मी कल्पना केली की काही माणसं अभयारण्यात प्राण्यांचे निरीक्षण करायला आलेत. आणि फिरताना त्यांना झाडावर नेमकी हीच दोन माकडं दिसतात. त्याचवेळी ती माकडंही त्या माणसांकडे पहात असतात. त्या दोन माकडांची नांवेही मी काय ठेवलीयत पहा! गंप्या आणि झंप्या!! तर, त्यातले एक माकड मानवांना पाहून दुसऱ्या माकडाला विचारते, गंप्या : हे सर्व आपल्याकडे एवढे घुरून घुरून का बघतायत रे ! झंप्या : अरे, आपल्या चेहर्यात ते त्यांचा पुर्वज शोधतायत. खी:, खी:, खी:, खी:,
हा! हा!! हा!!!

--- सचिन काळे.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ट्विटर स्टेटस म्हणायचे का? वाटसपवरही सुरुवातीला १४० अक्षरे मर्यादा होती का? पण हे माध्यम वेगळे आहे॥ शंभर स्टेटसचा एक सारांशवजा लेख दिलात तर आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला व्हाट्सअप्प स्टेटसच म्हणायचंय. आपला प्रोफाइल फोटो दिसतो त्याखाली स्टेटस लिहून येते ते! जे by default 'Hey there! I am using Whatsapp!' असे असते.

शंभर स्टेटसचा एक सारांशवजा लेख दिलात तर आवडेल. >>> माफ करा. आपले म्हणणे समजले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरेच्या हो, पण ते १४० आहे का कधी बघितले नव्हते!
शंभरातल्या काही स्टेटसची एक झलक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो! मी निवडक २० फोटो, त्याचे स्टेटस आणि त्यांचे Making of photo and status असं टाकणार आहे. फक्त स्टेट्स एकत्र टाकले तर फोटो नसल्याने त्याचा संदर्भ मिळणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घुरुन घुरुन - असा शब्द मराठीत नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ शुचि, मला कल्पना आहे. मुंबईतली आजकालची पिढी हिंदी मिश्रित मराठी बोलते. मराठी बोलताना हा शब्द माझ्या मुलीच्या तोंडुनही मी बऱ्याचवेळा ऐकलाय. आणि मला तो भयंकर आवडला. मलाही तो वापरायचा मोह आवरला नाही. टक लावून पाहताहेत किंवा रोखून पाहताहेत याऐवजी घुरून घुरून पाहताहेत हे मला जरा जास्त ठोस आणि ऑफबिट वाटलं. आपणांस आवडले नाही वाटते. क्षमा असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो शब्द मला अजिबात आवडला नाही परंतु आपल्या विकल्पाचा आदर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय! मी माय मराठीशी प्रतारणा केल्याची मला जाणीव आहे. पुन्हा असे होणे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येउद्या...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

प्रोत्साहित करण्याकरिता धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिलाच फोटो आणि कमेंट आवडली. लिहित रहा असेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिरशिंगराव, धन्यवाद!!

कार्ड-ए-आधार>>> शेर आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढील भाग उद्या रविवारी सकाळी ९ वाजता टाकतोय. आपणां सर्वांस आग्रहाचे निमंत्रण आहे. पाहण्या आणि वाचण्यासाठी नक्की या. आणि आपली प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका बरं का!!! :स्मित:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0