गाडीवरुन पडताना...

सहकुटूंब गाडीवरुन पडल्यानंतर आलेल्या उद्वीग्नतेतून प्रसवलेलं थोडं.
दिवाळीसाठीचे कपडे खरेदी करुन घरी येताना एक दिव्यपुरुष विनागियरची मोपेड घेउन दुभाजक नसलेल्या रस्त्यावर युटर्न मारताना अगदी जवळून चुकीच्या बाजून हूल देउन पळाले. त्यांच्या अचानक केलेल्या लिळेमुळे गाडीवरचा ताबा सुटला अन...
आधी एकट्यानं रपकायचा अनुभव होता. तेव्हा मी अन् प्रतिवादी दोघांपुरतंच ते मर्यादित होतं, पण...असो, पण माझा वेग कमी असल्याने थोडक्यात निभावलं.
या सगळ्या वेळेस काही गोष्टी डिट्टो सारख्या होत्या.
१. पडल्यानंतर सांगणाऱ्याची चुक नेहमीच नसते, समोरच्याचीच असते हे आवर्जून सांगू इच्छीतो (निदान मला तरी वाटतं). ते फक्त प्रत्यक्षदर्शीच सांगू शकतात.
२. गाडीवरुन पडायच्या आधी काही क्षण म्हणजे तुम्ही पडणार असे वाटते त्या क्षणी तुम्ही एका वेगळ्याच स्थितीत जाता, जी निव्वळ ब्लंँक असते.
३. ब्लंँक स्टेट मधून बाहेर पडता तेंव्हा तुम्ही खाली पडलेले असता.
४. पडल्यावर किंवा पडताना गाडीचा क्लच दाबला जाउन ऍक्सेलीरेटर वाढलेला असतो.
५. पहिल्यांदा गाडीवरुन पडल्यानंतर उभे राहिल्यावर खाली गुढगे भजन करत असतात. अन् घशाला कोरड पडलेली असते.
६. गाडीवरुन पडल्यानंतर दोन-चार दिवस तरी गाडी चालवायचा आत्मविश्वास येत नाही.
७. दोन-चार दिवस तरी वेगाने गाडी चालवताना दिसल्यावर त्याची किव येते.
८. गाडीवरुन पडल्यावर दवाखाण्यात न जाता थेट घरी आल्यानंतर एक तरी जखम लपवून कमीच लागलय हे सिद्ध करावं लागतं.
९. खूप दिवसांपासनं आपण पडलो नाही असा विचार मनात आला किंवा गप्पा मारताना विषय निघाला की काहीच दिवसांमध्ये हा पडायचा अनुभव येतो.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बेभरवशाची सोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय तर. लै irritating काम है हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं