‘व्हॉय वी ट्रीट एनीमल्स लाइक एनीमल्स’-रैक्स हैरिसन

गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...

अविस्मरणीय हाॅलीवुड-

आपण जनावरांसोबत जनावरां सारखं कां वागतो...! खरं म्हणजे वेळ पडल्यावर ही जनावरं आपल्या साठी जीव सुद्धा देतात...?

हा प्रश्न विचारला होता रैक्स हैरिसन नी, चित्रपट होता ‘डाॅक्टर डूलिटिल.’ नंतर या नावाने बरेच चित्रपट आले...त्यातील दोन चित्रपटांमधे एडी मरफी हा नायक होता.

1967 सालचा ‘डाॅक्टर डूलिटिल’ प्रसिद्ध लेखक ह्यू लॉफ्टिंगच्या फंतासी वर बेतलेला होता. त्या प्रमाणे डाॅक्टर डूलिटिल साेळाव्या शतकातला एक नावाजलेला पशु चिकित्सक (ढोर डॉक्टर) होता. त्याचा जवळ असलेला बोलणारा पोपट पॉलिनेशिया म्हणे तीनशे भाषा बोलायचा. डॉक्टर खूप मेहनती असल्यामुळे त्याच्या मनांत विचार आला की पॉलिनेशिया कडून जनावरांची भाषा शिकून घेतली तर जनावरांची राखण नीट करता येईल. मग काय विचारतां...जनावरांची भाषा शिकून तो त्यांची सेवा करु लागला. त्याची कीर्ति पसरली तर एका नेपाली मित्राने त्याला एक नजराणा पाठवला-नेपाल मधे अाढळणारा दोन शीर (डोकं) असलेला प्राणी. आता डॉक्टर या अजब प्राण्यासोबत एका सर्कस मधे सामील झाला.

त्या सर्कस मधे एक सील (मासा) होती-सोफी. निराश असलेली सोफी डॉक्टर ला सांगते मी समुद्रांत राहायची, हे सर्कस वाले मला पकडून घेऊन आले. मला घरच्यांची आठवण येते. तिची कहाणी ऐकून डॉक्टर तिची मदत करण्याचं ठरवतो...तो एका घोडागाडीत सोफीला बसवून तिला साडी अश्या काही रीति ने घालतो जणू एक बाई बसलेली असून तिने डोक्यावरून पदर घेतला आहे...नंतर त्या घोडागाडीला समुद्र तीरावर नेऊन तो सोफीला समुद्रात फेकून देतो.

पण...असं करतांना एक कोस्ट गार्ड त्याला बघतो...मग एका महिलेचा खून करण्याच्या आरोपा खाली जज त्याला पागलखान्यां (Lunatic Asylum) मधे टाकण्याचा आदेश देतो.

डाॅक्टर एका मोठया सीपच्या (the legendary Great Pink Sea Snail) शोधांत आहे...तो दूर दक्षिणी अफ्रीकेतच सापडतो...त्या सफरीवर जायची त्याने तयारी करुन ठेवलीय. आता तो कोठडीत...मग तो जेलमधून निसटतो अाणि सफरीवर निघतो...साइक्लोन मधे फसून ते सगळेजण एका टापूवर पोचतात...तिथल्या कबीले वाल्यांची जनावरे एका रोगाने ग्रसित आहेत. डॉक्टर त्यांचा देखील इलाज करतो आणि तिथे आपली सृष्टि उभारतो-

‘दिस इज दी वर्ल्ड आॅफ डॉक्टर डूलिटिल...’

तिथे त्याला ती सीप भेटते. डॉक्टर आपल्या सहकारयांना त्यासोबत परत पाठवून देतो आणि स्वत: त्या टापूवरच राहतो...एके दिवशी त्याला समुद्रात सोफी दिसते. तिचा नवरा देखील सोबत आहे...ती सांगते तुला दोषी ठरवण्याच्या विरोधात इंग्लैंड मधील सगळे जनावर स्ट्राइक वर गेल्यामुळे चहुकडे हाहाकार माजलेला आहे...जज ने तुझ्यावर चा आरोप मागे घेतलाय. हे एेकून डॉक्टर परत येतो...

चित्रपटातील एक दृश्यांत डूलिटिलला महिलेची हत्या करण्याचा आरोप लावून जज समोर आणतात.

तो जज ला सांगतो-‘मला जनावरांची भाषा कळते...मी कुणाचाहि खून केलेला नाही...मी तर त्या सोफी ची मदत करीत होतो तिला आपल्या घरच्या मंडळीना भेटायची इच्छा होती...

हे ऐकून सगळे हसतात.

तेव्हां तो जज लाच विचारतो-‘तुमच्या कडे एखादे जनावर आहे कां...’

जज सांगतो-‘हो, एक कुत्रा आहे...़!’

त्या कुत्र्याला कोर्ट मधे आणतांत...डॉक्टर त्याच्याशी बोलताे. नंतर जज ला सांगतो-

‘मी तर जेल मधे होतो...पण तुम्हाला सांगतो की काल रात्री डिनर मधे तुम्ही काय खाल्लं होतं...तुम्ही काल रात्री पाव चे चार तुकडे खाल्ले होते...

यावर जज लगेच उत्तर देतो-‘चूक आहे... मी तर तीनच तुकडे खाल्ले होते, पाव चा चौथा तुकडा तर एक घास तोडून या कुत्र्याला....!’ एकाएकी जज चुप होतो...

तेव्हां डॉक्टर म्हणतो-‘खरंय, म्हणूनच हा तुमच्यावर रागावलांय...हा म्हणतोय की मी इतक्या वर्षांपासून जज साहेबांची इमाने इतबारे खिदमत, सेवा करतोय...आणि हे जज साहेब आहेत की मला आपला उष्टा पाव खाऊ घालतात...’

तेव्हां डॉक्टर डूलिटिल कोर्ट मधे उपस्थित लोकांना प्रश्न विचारतो-

‘व्हॉय वी ट्रीट एनीमल लाइक एनीमल्स...!

आपण जनावरांशी जनावरांसारखा व्यवहार कां करतो...प्रसंगी ते बिच्चारे आपल्यासाठी आपला जीव सुद्धा देतांत...!’

पुढे तो निरनिराळी उदाहरणे देऊन विचारतो की आपण माणसांच्या स्वभावाची तुलना जनावरांशीच कां करतो...म्हणजे बघा आपण कसं म्हणतो-

तो पुरता बैल आहे...,

हत्ती सारखं खातो नुसतां...,

एकदम उल्लू आहे...,

गाढवासारखं काम करतोय बघां...,

वह लोमड़ी जैसी चालाक है,

वह बुद्धि से पूरा बैल है,

वह तो हाथी की तरह खाता है,

उल्लू है,

गधे की तरह काम करता है।’

डॉक्टर डूलिटिल नी विचारलेले हे प्रश्न आज देखील अनुत्तरित आहेत...

एडी मर्फी असलेल्या ‘डॉक्टर डूलिटिल’ सीरिजच्या पहिल्या चित्रपटांत डॉक्टर डूलिटिल ला वेडयांच्या इस्पिताळांत पाठवून देतात... तो तिथल्या डॉक्टरला समजावण्याचा प्रयत्न करतो...तो दाद देत नाही...तेव्हां डॉक्टर डूलिटिल त्याला म्हणतो-

‘तू मला साेडलं नाहीस तर मी सगळयांना सांगून टाकेन की तू अंथरुणावर नागवा झाेपतोस...मांजरीची तुला खूप भीती वाटते...’

हे ऐकून तो डॉक्टर चाटच पडतो आणि डूलिटिल ला नि:शर्त सोडून देतो...

‘शालीमार’ चा खलनायक होता रैक्स हैरिसन

रैक्स हैरिसन ने बॉलीवुड च्या ‘शालीमार’ या चित्रपटांत खलनायकाचं काम केलं होतं. 1977 साली या चित्रपटाच्या शूटिंगसाठी रैक्स भारतात आला होता. तेव्हां अभिनया ऐवजी त्याच्या व्यवहाराची चर्चा जास्त होती...ब्रिटेन मधे शांत स्वभाव असलेला रैक्स भारतात असा वागत होता जणूं इथे इंग्रजांचं राज्य होतं... इथे उतरतांच मुंबईच्या कस्टम अधिकारयांनी त्यांचं आणि मित्रांचं स्वागत रेड कारपेट नी केलं नाही म्हणून रागावला होता. त्याने लंडनला परतण्याची धमकी देखील दिली होती म्हणे...नंतर शैंपेन ढोसल्यावर त्याचा राग शांत झाला होता. ‘शालीमार’ ची शूटिंग बैंगलोर मधे झाली. या हिंदी चित्रपटांत अभिनय रैक्स हैरिसन ने केला पण त्याला आवाज मात्र कादर खान चा होता...
------------------------

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुम्ही डॉ. डुलिटल सांगितला, तुम्ही तुमच्या जागेवर एकदम बरोबर आहात. मी कजो (cujo) बद्दल सांगु इच्छितो. जुनाच थरारपट आहे. हा पाळलेला कुत्रा काहितरी चावल्यानं पिसाळतो अन् त्याच्या मालकाकडे आलेल्या एका महिलेवर आणि तिच्या मुलावर हल्ला करतो. ते त्यांच्या बचावासाठी कारमध्ये जाउन बसतात. वरुन कडक उन, मुलाला आणि तिला होणारा त्रास आणि बाहेरुन पिसाळलेला कुत्रा. त्या कुत्र्याची आक्रमकता आणि त्या महिलेची आगतिकता पाहताना पाहणाराच तणावात येतो.
अर्थातच मला डुलिटलच आवडतो पण दुसरी बाजूही पहायला काय हरकत आहे???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं