Making of photo and status : ६. च्यामारी !!!

प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.

http://www.aisiakshare.com/node/6241

च्यामारी !!! आहे कसलं हे चित्र ? मला तर फक्त एक डोळा तेवढा ओळखीचा वाटतोय. तिकीटाला एवढे पैसे दिलेत ते काय असलं वाकडंतिकडं चित्र बघायला ?

Disclaimer : सदर लेखामध्ये 'मॉर्डनआर्ट' कलेला कोणत्याही तऱ्हेनं कमी लेखण्याचे लेखकाचे प्रयोजन नाही.

Making of photo and status :
हा! हा!! हा!! ! नेटवर सर्फिंग करत असताना अचानक माझ्या नजरेस हे चित्र पडले. आणि मला खुद्कन हसू आले. आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मनात येणारे विचार, आपली होणारी प्रतिक्रिया किती सुंदर तऱ्हेने ह्या चित्रात रेखाटलेय. जरा बारकाईने चित्रातल्या व्यक्तीकडे पहा बरं!, त्याने कसा हनुवटीवर हात ठेवलाय. त्या हाताला आधार द्यायला दुसरा हात पोटावर कसा आडवा ठेवलाय. त्याचे डोळे कसे गरगरल्यासारखे दिसताहेत. भुवया उंचावल्याहेत. आणि चित्र बघता बघता कसा तो उभ्याने मागच्या बाजूला इतका झुकलाय की आत्ता मागे पडेल की काय असं वाटतंय.

पण कशाने झालीय त्याची ही दारुण अवस्था? तर समोरच्या भिंतीवरील चित्र पाहून झालीय. कल्पना अशी आहे की ती व्यक्ती आर्ट गॅलरीत एक चित्र प्रदर्शन पहायला आलीय, आणि फिरता फिरता ती व्यक्ती अशा एका चित्रापुढे येऊन उभी रहाते, की ज्या चित्रामध्ये फक्त गोल गोल रेषा, वाकडे तिकडे आकार, रंग आणि मधोमध एक मोठ्ठा टपोरा डोळा चित्तारलेला आहे. बरं, चित्रामध्ये कशाचा कशाशी संबंधसुद्धा वाटत नाहीए. चित्रामध्ये फक्त एक डोळा सोडला तर तिच्या ओळखीचं असं काहीही दिसत नाहीए. आणि असं चित्र पाहून ती व्यक्ती पुरती हबकून गेलीय, निराश झालीय.

मॉर्डनआर्टसारखी काही चित्रे अशी असतात, जी समजणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची असतात. ती समजायला दर्दी रसिक आणि त्यातील जाणकारच हवा. सामान्य व्यक्तीला असल्या चित्रात फक्त उभ्या आडव्या रेषा आणि रंग दिसतील. पण दर्दी आणि जाणकार व्यक्तीला त्यामध्ये जीवनाचे सार सापडेल. तर कधी त्यात त्याला विश्वरूपाचे दर्शनसुध्दा घडेल.

हे चित्र पाहिल्याबरोबर मलाही असं वाटलं होतं, की त्या चित्रातली व्यक्ती मीच आहे. आणि समोरील भिंतीवरील समजण्यापलीकडचं असे चित्र पाहून माझीसुद्धा त्या व्यक्तीसारखीच अवस्था झाली होती. ह्या चित्रावर काहीतरी स्टेटस लिहिण्याची उर्मी माझ्या मनात उसळून आली. आणि मग मी लिहिले "च्यामारी !!! आहे कसलं हे चित्र ? मला तर फक्त एक डोळा तेवढा ओळखीचा वाटतोय. तिकीटाला एवढे पैसे दिलेत ते काय असलं वाकडंतिकडं चित्र बघायला!?"

--- सचिन काळे.

माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे दिवाळी अंकातला लेख Image of Reality and Reality of Image यातून -

उदाहरणार्थ, प्रतिमाशास्त्रानुसार (iconography) कालीदेवीच्या प्रतिमेला पुष्कळ हात असतात. मात्र, ते हात अवकाशात पुष्कळ नाहीत तर ते कालाच्या मितीमध्ये आहेत. हे अधिक चांगलं क्यूबिझम आहे. आफ्रिकन मुखवटे बघून पिकासोनं जेव्हा वस्तू बनवली, तेव्हा त्यामागे त्याचा विचार असा होता की सगळ्या बाजूंनी वस्तू घडवायची आहे. संपूर्ण वास्तव दाखवायचं आहे. कारण आधी आपण समोर पाहूनच बनवत होतो. त्यात इतर बाजूंचं वास्तव निसटून जात होतं. आता त्यानं मागून-पुढून-बाजूनं कसं दिसतं हे बघितलं; त्याची प्रतिमा बनवली; तेव्हा मूळ वस्तू भंगली. पण देवीच्या हातांमागे काळ हा फार मोठा आयाम होता. एकाच प्रतिमेत काळाच्या वेगवेगळ्या तुकड्यांतले हात होते ते. ती काळाची जोडणी होती. देवीचे एवढे हात इंग्रजांनी बघितले तेव्हा ते म्हणाले, की हे राक्षसी आहे. कारण त्यांना बघता येत नव्हतं. देवीच्या मूर्तीतला stylistic genius त्यांना समजला नाही. हे प्रतिमाशास्त्र देशभरात अनेक ठिकाणी सापडेल. पूर्ण संस्कृतीच्या सामायिक स्मृती यामागे कार्यरत असतात. म्हणूनच मोठ्या प्रमाणावर या प्रतिमा लोकांना कळतात. यात जणू काही सगळ्यांच्या कल्पनेचं योगदान असतं. म्हणजे हे एक प्रकारचं shared creation असतं. त्याच आधारावर शिल्पशास्त्र बनतं.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अशा खूप गोष्टी असतात ज्या पाहिल्या की आपसूकच एक शब्द सुचतो...च्यामारी...डब्लूटीएफ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा! हा! हा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतक्या साध्यासोप्या चित्रातून इतके तरल विचारतरंग उमटतात, तर पिकासोची अनवट चित्रं पाहून अजूनच जास्त विचारकल्लोळ उमटत असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी! अगदी!!! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी आमचेच शब्द!

http://aisiakshare.com/comment/8720#comment-8720

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिकासोने कबुतराचे चित्र काढल्यावर लोक म्हणालेच - च्यामारी, यासाठी पिकासो कशाला हवा? आम्हीही काढले असते. त्याचे कबुतर अधिक पांढरे शु्भ्र होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...पिकासोने कबूतराचे चित्र ठोकळेबद्ध काढले नाहीन्? खालती 'हे कबूतर आहे' असे लिहावे लागण्याची वेळ यावी, असे?

(पिकासोची चित्रकला कच्ची होती - आमच्यासारखीच - असे आमचे प्रामाणिक मत आहे. शाळेत नक्की शून्य मार्क मिळत असणार लेकाच्याला!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शांतिदूत प्रसिद्ध कबुतर हो।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण राज ठाकरे नाना पाटेकरना जे म्हटलेत ते सपशेल चुकीचे आहे. तुमचे काय मत आहे यावर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?