अनुभव

हा धागा अभ्यासपूर्ण नाही, त्यामुळे या धाग्यावरती बौद्धिक चर्चाही अपेक्षित नाही. हा अनुभव आहे.

२ अनुभव-
गुरुचरित्र स्त्रियांनी वाचु नये असे म्हणतात. आतापर्यंत मी २ दा वाचायचा प्रयत्न करुन नाद सोडुन दिला याचे कारण रात्री अनामिक भीती वाटु लागली. का ते काही कळेना. पण भीती वाटे. ग्रंथवाचन सोडले, मात्र भीती नाहीशी झाली. यामागे वैद्न्यानिक कारण असेलच तर या २ प्रसंगातच भीती का वाटली, नंतर कधी का वाटली नाही याचे कारण सापडत नाही.

अनुभव २ रा - शीख समाजाचा "ग्रंथ साहीब" हा ग्रंथ त्यांचा गुरु मानला जातो. अर्थात फक्त ग्रंथ नसुन त्यात गुरु तत्व असल्याची त्यांची श्रद्धा आहे. शीख समाजाचे १० गुरु - गुरुनानक देव जी, गुरु अंगद देव जी, गुरु अमरदास साहीब जी वगैरे. प्रत्येक गुरु अंतकाळी पुढील गुरु निवडत असे. १० वे गुरु-गुरु गोविंदसिंग जी यांनि मात्र पुढील गुरु "श्रीग्रंथसाहिब" निवडला.

या ग्रंथाची गोडी माझ्या एका शीख मैत्रिणी मुळे लागली. जप जी साहिब सकाळी, रेहरास रात्री म्हटले जाते. सुखमणी व आनंदसाहिबदेखिल अत्यंत मधुर आणि प्रासादिक प्रार्थना आहेत असे मानले जाते. मी त्या काळात रात्रंदिवस हया प्रार्थना ऐकत असे. एकदा रात्री अशाच प्रार्थना ऐकत असतेवेळी झोप लागली. प्रार्थना चालूच होत्या, आणि मध्यरात्री अनामिक भीती म्हणजे खूप वाटून जाग आली. मी लॅपटॉप बंद केला पण यत्यानंतर कधीही ग्रंथसाहिब चालू असतेवेळी झोपले नाही.

http://www.srigranth.org/servlet/gurbani.gurbani?S=y

येथे या ग्रंथाचे भाषांतर सापडेल. नानक यांनी कधीच म्हटले नाही की तुम्ही शिख व्हा त्यांनी हेच सांगीतले की मुसलमानाने चांगला मुसलमान होण्याचा प्रयत्न करावा व हिंदुने उत्तम हिंदु होण्याचा. मात्र गुरु नानक यांनी monotheism म्हणजे एक ईश्वर या संकल्पनेचा प्रसार केला. त्यांनी हीच शिकवण दिली की उच्च-नीच असे काही नाही, जातपात नको, सर्वजण समान आहेत. गुरुनानक यांचा जन्म तलवंडी गावामध्ये कालू मेहता व माता तृप्ता यांच्या पोटि झाला. त्यांचा वर्ण क्षत्रिय होता. जानवे घालायची वेळ आली तेव्हा नानक यांनी नकार दिला. त्यांच्या मुखातुन सहजुस्फुर्त शब्द निघाले- अरे पंडित, करुणेचा कापुस, समाधान हा धागा, वैराग्य गहीच गाठ असलेले, आणि सत्याचा पीळ घातलेले जानवे तुझ्याकडे असेल तर ते मला दे. कारण ते जानवे कधीही मळणार नाही की ते आगीत जळणार नाही, त्याचा ऱ्हास होणार नाही की जे हरवणार नाही आणि असे जानवे घातलेले जीव हे अत्यंत सुदैवी असतील.
असो.
नानक यांनी लंगर अर्थात एकत्र भोजनाची प्रथा सुरु केली. सर्व जातीचे, सर्व पंथांचे, गरीब-श्रीमंत सर्व लोक एकाच पंगतीला बसावेत हा हेतू. शीख लोकांचे सुवर्णमंदीर आहे तेथे सर्वांचे स्वागत आहे किंबहुना या मंदीराचे दरवाजे चारी बाजुंना खुले आहेत व हेच दर्शवितात की कोणतीही दिशा उच्च नीच नाही, सर्व दिशा समान आहेत.
नानक यांनी लिहीलेल्या जपजी साहीबमध्ये एक ओळ वारंवार येत - "सबणा जिया का इक दाता सो मै विसर ना जाई" सर्व जीवांचा निर्माणकर्ता, त्यांचा दाता हा एकच आहे हे विसरु नका.
_______________________________
अरुंधतीचा हा धागा जरुर वाचा - http://www.misalpav.com/node/15577

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

अनुभव रोचक.नंतर लिहितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जरुर. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मागच्या रविवारी एबीपीमाझा चानेलवर खाद्यभ्रमंतीमध्ये मुंबई माझगावातील ज्यू सिनेगॅाग आतून दाखवलं अर्धा तास. हे सहसा पाहायला मिळत नाही. धर्मगुरू पेजारकरानी प्रार्थना साभिनय म्हटली. नंतर त्यांच्या पवित्र पुस्तकाचं ' तोरा 'चं वाचन करण्याअगोदर महिलांना बाहेर घालवलं! हे एक नवीनच कळलं.

गुरुचरित्राचं वाचन स्त्रियांनी वाचू नये म्हणतात त्याचे कारण स्त्रीचा द्वेष केलेला असेल. तिचे भितीदायक वर्णन करून योगमार्गी लोकांना परावृत्त करायचं असावे. पुर्वी एकदा एका स्त्री नातेवाइकाने सांगितले की वाचवत नाही.
( मी उगाचच अभ्यास/चिकित्सेकडे जातोय पण आता विचारायला हवे पोथी वाचणाय्रांस.)

आमच्या एका मित्राकडे भिंतीवर मोठे - श्रीकृष्ण रथात, मागे अर्जुन त्याच्याकडे पाहतोय, सैन्य उभे - असं चित्र होते. नंतर कधितरी ते काढून टाकले. याचे कारण विचारले तर म्हणाला घरात भांडणे होऊ लागली भावाभावांत मग ते चित्र काढले. त्या चित्राचा परिणाम होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचवत नाही हे खरे आहे. बरीच भीतीदायक वर्णने आहेत. मे बी कमकुवत मनाच्या लोकांनी वाचु नये. कदाचित तेच कारण असेल स्वप्नांचे. पण वाचवत नाही हे खरे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या एका मित्राकडे भिंतीवर मोठे - श्रीकृष्ण रथात, मागे अर्जुन त्याच्याकडे पाहतोय, सैन्य उभे - असं चित्र होते. नंतर कधितरी ते काढून टाकले. याचे कारण विचारले तर म्हणाला घरात भांडणे होऊ लागली भावाभावांत मग ते चित्र काढले. त्या चित्राचा परिणाम होतो.

हा असला आचरटपणा लै चालतो आपल्यात. काय तर म्हणे महाभारत घरी वाचू नये, आरण्यके घरी ठेवू नयेत ह्यांव नै अन त्यांव नै. चू साले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला नेहमी पडणारा प्रश्न विचारते - जोपर्यंत कोणी अन्य व्यक्तीस जीवित/मानसिक/शारीरीक हानी पोचवत नाही तोवर त्यांना मनमर्जीप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य का असू नये? यावर तुम्ही म्हणाल त्यांनि स्वातंत्र्य जरुर वापरावे पण आम्हीही, आमचे त्यांना शिव्या घालण्याचे स्वातंत्र्य अबाधित समजतो. हा मुद्दा मान्य आहे. म्हातारी मेली तरी काही नाही पण काळ सोकावतो असे म्हाणाल तर तेही ठीकच आहे पण मग तो निव्वळ बागुलबुवा नाही का? की आज ही अंधश्रद्धा आहे उद्या सती जाण्याच्या प्रथेचे पुनरुज्जीवन करण्यापर्यंत मजल जाईल वगैतरे.
.
पण मला जे म्हणायचय ते हे की निरुपद्रवी अंधश्रद्धा या विद्न्याननिष्ठांच्या इतक्या डोक्यात का जातात? शेवटी बिग बॅग काय, उत्क्रांती काय थिअऱ्याच आहेत. जोवर अपवाद सापडत नाही तोवर त्या ग्राह्य धरलेल्या आहेत पण याचा अर्थ अपवाद कधीही सापडणार नाही असे थोडिच आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण मला जे म्हणायचय ते हे की निरुपद्रवी अंधश्रद्धा या विद्न्याननिष्ठांच्या इतक्या डोक्यात का जातात? शेवटी बिग बॅग काय, उत्क्रांती काय थिअऱ्याच आहेत. जोवर अपवाद सापडत नाही तोवर त्या ग्राह्य धरलेल्या आहेत पण याचा अर्थ अपवाद कधीही सापडणार नाही असे थोडिच आहे?

निरुपद्रवी अंधश्रद्धा जर चालतात तर त्यांवरची टीकाही चालायला हवी,

इन रिटर्न, अशी टीका करणारे चू, महामूर्ख आणि अजून कायकाय असतात असे म्हणण्याचे तुमचे स्वातंत्र्य मी सहर्ष मान्य करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला नेहमी पडणारा प्रश्न विचारते - जोपर्यंत कोणी अन्य व्यक्तीस जीवित/मानसिक/शारीरीक हानी पोचवत नाही तोवर त्यांना मनमर्जीप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य का असू नये?

कारण 'मऊ लागलं म्हणून कोपराने खणणे' ही मानवी प्रवृत्ती आहे. निरुपद्रवी अंधश्रद्धा एकदा मान्य केली की कधीतरी हळूच त्यातला 'निरुपद्रवी' गळून पडतो, आणि त्या अंधश्रद्धा तापदायक व्हायला लागतात.

उदा १ : नात्यातल्या एका तान्ह्या मुलाचं नाव 'रुद्र' ठेवलं होतं. ते बाळ तान्हं असताना खूप रडायचं, किरकिर करायचं. कोणा 'घरगुती बाबा'ने** सांगितलं की याचं नाव रुद्र असल्याने त्याने रौद्र रूप धारण केलं आहे. तर आता त्याचं नाव बदला. "नाव तर बदलायचंय. आमचे घबा इत्के चांग्ले आहेत - कधीच खर्चिक उपाय सांगत नईत. पैसे तर बिल्कुल घेत नईत" वगैरे चर्चा होऊन एक अत्यंत पपलू नाव ठेवण्यात आलं.

पण तोवर बर्थ सर्टिफिकेट वगैरे सगळं निघालं होतं. मग कोणत्यातरी एजंटाच्या xxत काही हजार रुपये सारून त्या पोराच्या बापाने कायदेशीररीत्या पोराला पपलू केला.

उदा २ : आमच्या शाळेत एक अहिर गवळी समाजातला मुलगा होता. म्हणजे अगदी प्रॅक्टिसिंग गवळी. त्याच्या घरी अशी प्रथा होती की गाय/म्हैस बाळंत व्हायच्या दिवशी सगळ्यांनी उपास करायचा. नाहीतर ते बाळंतपण बिघडतं. एकेकाळी घरातले सगळे बाळंतपणाच्या उस्तवारीत असणार, आणि त्यामुळे रांधायला जमत नसेल. म्हणून ही उपासाची गोळी लावून दिली असावी. पण सध्याची त्यांची डेरी मोठी होती. पगारी नोकर होते. गायीम्हशींचं बाळंतपण करायला व्हेटदेखील येत असेल. पण तरी उपास प्रथा चालूच. आई त्याला बिनडब्याचं शाळेत पाठवायची. बिचारा अगदी रडकुंडीला यायचा. तेरा-चौदा वर्षांच्या पोरांना भुकेला मिळालं नाही तर फार बेकार अवस्था होते.

**हे वेगळं आणि फारच रोचक प्रकर्ण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

शेवटी बिग बॅग काय, उत्क्रांती काय थिअऱ्याच आहेत. जोवर अपवाद सापडत नाही तोवर त्या ग्राह्य धरलेल्या आहेत

बिगबँगचं म्हैत नाय. उत्क्रांती नुस्ती थेरी नव्हं मामी. अपवाद सापडले तर मज्जाच मज्जा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्क्रांतीबद्दल दुसरा काही प्रवाद नसल्याने मानतो पण त्याबद्दल साशंकच आहे. हे कोणी केले हे एक गुढ आहे हे कबूल करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"आपोआप आरएनए आणि नंतर एकपेशीय लोक तयार होणे आणि त्यातुन जीवसृष्टी निर्माण होणे" हा सिद्धांत म्हणजे गेल्या हजार वर्षातली सर्वात मोठ्ठी अंधश्रद्धा आणि क्वॅक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

अजोचा परकायाप्रवेश? ROFLROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हणजे अणुतै तुम्ही म्हणताय तसं असेलही
पण इकॉनॉमी /इझम वगैरे बाबत चर्चा करणाऱ्यांकडून आर एन ए & एकपेशीय वगैरे बद्दल तज्ञ मत ऐकून गहिवरून आलं .
सायन्स वाल्या आम्हा फडतुसांचा एक प्रॉब्लेम असतोय . निदान काय माहित नाही आणि काय संदिग्ध आहे याबद्दल एक ढोबळ अंदाज असतो . सर्वसामान्यपणे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण इकॉनॉमी /इझम वगैरे बाबत चर्चा करणाऱ्यांकडून आर एन ए & एकपेशीय वगैरे बद्दल तज्ञ मत ऐकून गहिवरून आलं .

सहमत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निदान काय माहित नाही आणि काय संदिग्ध आहे याबद्दल एक ढोबळ अंदाज असतो . सर्वसामान्यपणे .

आम्ही बिना सायन्सवाले लोक १००% खात्रीने सांगतो ना की हे सर्व ईश्वराने निर्माण केले आहे तर आबा तुम्ही सायन्स वाले लोक ऐकत नाही Smile
थांबा पुष्पदंतविरचित शिवमहिम्नस्तोत्राचाच दाखला देते Wink
_______

तवैश्वर्यं यत्तज्जगदुदयरक्षाप्रलयकृत्
त्रयीवस्तु व्यस्तं तिस्रुषु गुणभिन्नासु तनुषु .
अभव्यानामस्मिन् वरद रमणीयामरमणीं
विहन्तुं व्याक्रोशीं विदधत इहैके जडधियः

हे देव, आप ही इस संसार के सृजक, पालनकर्ता एवं विलयकर्ता हैं| तीनों वेद आपके ही सहिंता गाते हैं, तीनों गुण (सतो-रजो-तमो) आपसे हे प्रकाशित हैं| आपकी ही शक्ति त्रिदेवों में निहित है| इसके बाद भी कुछ मूढ़ प्राणी आपका उपहास करते हैं तथा आपके बारे भ्रम फ़ैलाने का प्रयास करते हैं जो की सर्वथा अनुचित है

किमीहः किंकायः स खलु किमुपायस्त्रिभुवनं
किमाधारो धाता सृजति किमुपादान इति च .
अतर्क्यैश्वर्ये त्वय्यनवसर दुःस्थो हतधियः
कुतर्कोऽयं कांश्चित् मुखरयति मोहाय जगतः .

हे महादेव !!! वो मूढ़ प्राणी जो स्वयं ही भ्रमित हैं इस प्रकार से तर्क-वितर्क द्वारा आपके अस्तित्व को चुनौती देने की कोशिस करते हैं| वो कहते हैं की अगर कोई परं पुरुष है तो उसके क्या गुण हैं? वो कैसा दिखता है? उसके क्या साधन हैं? वो इसा श्रिष्टी को किस प्रकार धारण करता है? ये प्रश्न वास्तव में भ्रामक मात्र हैं| वेद ने भी स्पष्ट किया है की तर्क द्वारा आपको नहीं जाना जा सकता |

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं काही नसतं.

(पळा!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अस काही नसतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"It's a mug's game, my dear. It's a mug's game." - 'न'वी बाजू.

डांकं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निदान काय माहित नाही आणि काय संदिग्ध आहे याबद्दल एक ढोबळ अंदाज असतो . सर्वसामान्यपणे .

बापटण्णा, इन जनरल हे खरे आहे पण, उत्क्रांतीच्या बद्दल सायन्स्वाले चुकले आहेत. ( मी सुद्धा सायन्सवालीच आहे, मला असे बाजुला काढु नका )

गेल्या १००० वर्षातली तिन क्वॅक अनुक्रमे
१. उत्क्रांतीची थिअरी
२. होमिओपाथी
३. इकॉनॉमिक्स्

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नंबर ३ बद्दल नंब्रपणे सहमत आहे.

- गरिबांचा बोकील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

या चित्राच्या संदर्भात असलेच सल्ले ऐकून, मी, मुद्दाम, माझ्या हॉलमधे श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे ते प्रसिद्ध चित्र लावले. सहा महिन्याच्या आंत ते चित्र अस्पष्ट झाले, फेड आऊट झाले. त्याचे कारण म्हणजे, आमच्या हॉलमधे संध्याकाळी त्या भिंतीवर ऊन येते. चित्र हे ओरिजिनल पेंटिंगची फोटोकॉपी असल्याने, कडक उन्हात, त्यातले रंग उडून गेले. घरांत कोणाचीही भांडणे तोपर्यंत झाली नव्हती. तरीही पुन्हा एकदा, ऊन न येणाऱ्या भिंतीवर हा प्रयोग, एखाद्या पक्क्या रंगाच्या पेंटिंगने करायचा आहे.
पाहू या, श्रीकृष्ण काय फळ देतो ते !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जो तमन्ना बर ना आए उम्रभर
उम्रभर उसकी तमन्ना किजिये |

भीती वाटणे, अशांतता वाटणे याचे दोन अनुभव लिहिले. चर्चेसाठी नाही म्हणून पुढे लिहित नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

की अज्ञानात सुख असते. एकादशी दिवशी अज्ञानते पणे अभक्ष भक्षण केलं अन् नंतर कळलं की एकादस होती की उगीच अपराध भावना वाटते. जेवन झाल्यावर शेवटी भाजीत एखादा किटक वैगेरे दिसला की मळमळल्या सारखं होतं. अज्ञानचं सुख...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकांत स्वाक्षरी
आज करे सो कल कर
कल करे सो परसो...
इतनी भी क्या जल्दी यारो
जिंदगी पडी है बरसो...

वाटलेल्या भीतीमागे वैद्न्यानिक कारण असेल"... असे वाटू शकते हे वाचून अनामिक भीती वाटू लागली. का ते काही कळेना. पण भीती वाटली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

गुरुचरित्रात भूत-प्रेत योनी, समंध वगैरे उदाहरणे असून. ४ युगांची वर्णने आहेत त्यात कलीयुगाचे बीभत्स रसातील वर्णन आहे. या अशा गोष्टींमुळे भीती वाटुन स्वप्न पडु शकत असावे. मला हॉरर सिनेमे बघता येत नाहीत, अजिबातच बघता येत नाहीत. प्रचंड अस्वस्थ वाटते. माझ्या पूर्वॅच्या एका लेखामधून्-

गुरुचरित्राच्या दुसर्‍या अध्यायामध्ये ४ युगांचे अतिशय काव्यमय आणि बोलके वर्णन येते. जेव्हा विष्णू ब्रम्हदेवाला सृष्टी निर्माण करायची आज्ञा करतात तेव्हा स्थावरजंगम्,स्वेदज, जारज, अंडज आदिंची उत्पत्ती केल्यानंतर ब्रम्हदेव ४ युगांची निर्मीती करतात, आणि प्रत्येक युगाला त्याच्या वेळेनुसार पृथ्वीवर जाण्यास सांगतात.
कृत (सत्य), त्रेता, द्वापार आणि कली या युगांना एकेक करून बोलावणं धाडण्यात येतं. ही कथा गुरुचरित्रात अतिशय रसाळतेने वर्णन केलेली आहे आणि मूळातूनच वाचण्यासारखी आहे. तिचा सारांश थोडक्यात खालीलप्रमाणे.

सर्वात प्रथम पाळी कृतयुगाची. ब्रम्हदेवाने कृतयुगाला "पृथ्वीवर जाऊन प्रकाश पसरण्याचा" निरोप धाडला आहे. त्या कृतयुगाचं लक्षण ऐका - ब्रम्हदेवाचा निरोप ऐकून मोठ्या संतोषाने कृतयुग आले.कधीही असत्य न बोलणारे, वैराग्यपूर्ण आणि ज्ञानी असे हे युग यज्ञोपवीत घातलेले, हातामध्ये रुद्राक्षमाळा घातलेले असे तेजस्वी आहे. अपवादाने का होईना पण पृथ्वीवर जे लोक असत्य, मिथ्या बोलतात, निंदा करतात ते त्याला सहन होत नाही हीच मिनतवारी ते ब्रम्हदेवाकडे करत आहे. पण ब्रम्हदेव तरी त्याला सत्वगुणाचा प्रसार करण्यासाठी धाडतातच.

सत्ययुगाचा अवधी संपल्यानंतर ब्रम्हदेव त्रेतायुगास बोलावणे धाडतात. त्रेता युगाचे लक्षण कसे आहे बरे? तर हे युग स्थूल शरीराचे आहे. याने हाती यज्ञसामुग्री घेतली आहे. कारण त्रेतायुगामध्ये सर्व लोक यज्ञ करणारे, धर्मशास्त्रनिष्ठ, कर्ममार्गी आहेत. त्रेता युगाच्या हाती कुश आणि समिधा आदि सामुग्री आहे. हे युग आनंदाने ब्रम्हदेवाचा निरोप घेऊन पृथ्वीवर गेले.

मग ब्रम्हाने निरोप दिला द्वापार युगाला. द्वापार युग दिसायला उग्र पण असायला शांत आहे. त्याने हातात खड्ग्-खट्वांग धारण केले आहे. निष्ठुरता आणि दया दोहोचा वास त्याच्यात आहे. त्याच्यामध्ये पाप-पुण्य समान आहेत. मोठ्या कौतुकाने त्याने ब्रम्हाचा निरोप घेतला आणि ते भूमीवर गेले.

द्वापारयुगाचे दिवस पुरल्यावर कलीयुगास पाचारण केले गेले. कलीयुगाचे वर्णन खरच फार बीभत्स आहे. विचारहीन अंतःकरणाच्या या युगाचे तोंड हे पिशाच्चासारखे आहे. त्यात तोंड खाली करून चालत असल्याने ठायी ठायी धडपडत ते ब्रम्हदेवापुढे चालत येत आहे. वृद्ध आणि वैराग्यहीन असे हे युग येताना सवे कलह आणि द्वेष घेऊनच आलेलं आहे. हे कमी म्हणून की काय डाव्या हातात शिश्न आणि उजव्या हातात जिव्हा धरून प्रत्यक्ष ब्रम्हदेवापुढे ते नाचत आहे, कधी दुरुत्तरं करत आहे तर कधी हसत आहे, कधी रडत आहे तर कधी वाकुल्या दाखवत आहे.
कलीयुगाचे हे लक्षण पाहून गूढ हसत ब्रम्हाने विनयाने प्रश्न विचारला "शिश्न आणि जीभ का धरली आहेस?" त्यावर कलीयुग म्हणते "समस्त लोकांना मी जिंकेन. पण ज्यांनी लिंग आणि जीभेवर ताबा मिळवला त्यांना मी स्वतःहून हरेन."

देखोनि तयाचे लक्षण । ब्रह्मा हासे अतिगहन । पुसतसे अतिविनयाने । लिंग जिव्हा का धरिली ॥८१॥
कलियुग म्हणे ब्रह्मयासी । जिंकीन समस्त लोकांसी । लिंग जिव्हा रक्षणारांसी । हारी असे आपणाते ॥८२॥

मग पुढे ब्रम्हदेव आणि कलीयुगाचा सविस्तर संवाद आहे ज्यामध्ये कशाप्रकारचे लोक कलीयुगास धार्जीणे असतील आणि कोणते वेचक पुण्यात्मे कलीयुगाचे कळीकाळ ठरतील त्याचा उहापोह आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुरुचरित्रात भूत-प्रेत योनी, समंध वगैरे उदाहरणे असून. ४ युगांची वर्णने आहेत त्यात कलीयुगाचे बीभत्स रसातील वर्णन आहे. या अशा गोष्टींमुळे भीती वाटुन स्वप्न पडु शकत असावे.

मला हे समजत नाही. बोले तो भूत, प्रेत, समंध वगैरेंची भीती वाटू शकते इथवरही एक वेळ ठीक आहे. पण योनीची भीती??? आणि तीही इतकी, की दुःस्वप्ने पडावीत??? यह बात कुछ हज़म नहीं हुई|

(ओली स्वप्ने पडली, तर एक वेळ समजू शकतो. पण दुःस्वप्ने म्हणजे कैच्याकैच आहे. बोले तो, नक्की काय होते? त्या 'कथा' पिच्चरमध्ये - चांगला होता, बैदवे - त्या नसरुद्दीन शाहला दिवादुःस्वप्न पडते, तसले काही होते काय?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"It's a mug's game, my dear. It's a mug's game." - 'न'वी बाजू.

भूतयोनी, प्रेतयोनी असे म्हणायचेय, भावनाओंको समझो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...योनी इज़ योनी. त्यात काय घाबरायचे? (खाते की गिळते कोणाला?)

- (अॅब्सोल्यूटिस्ट) 'न'वी बाजू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"It's a mug's game, my dear. It's a mug's game." - 'न'वी बाजू.

एनीवे तर हा ग्रंथ वाचावासा वाटतो पण वाचवत नाही अशी "धरले तर चावते-सोडले तर पळते" अशी अवस्था आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व धर्माचे मूळ - जिवाजिवांत असमानता का आणि मृत्यू का येतो हे शोधण्याचा, स्पष्टिकरण देण्याचा प्रयत्न आहे. परंतू शेवटी याचे उत्तर न देता इतर वर्णनं ,मार्ग दाखवत ग्रंथ आटोपता घेतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा प्रतिसाद आवडला. शिवाय धर्माचे अजुन एक काम म्हणजे केयॉसमधुन ऑर्डर आणणे. असमानता, प्रोमॉर्डिअल इन्स्टिन्क्ट्स (आदिम प्रेरणा व गरजा) यांची सांगड घालुन, समाजात त्यातल्यात्यात ऑप्टिमम (आदर्श नव्हे) ऑर्डर आणणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी गुरुचरित्र वाचलं आहे. इंटरेस्टिंग आहे पण भयावह वगैरे नक्कीच नाही. किंवा मग माझी इमॅजिनेशन इतकी व्हिव्हिड नसेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0