नाक रगडण्याच्या निमित्ताने - तुमचा चष्मा किती नंबरचा?

'आपल्याकडे' असा एक प्रवाद आहे की "आपला समाज भयंकर सहिष्णू आहे".

या वाक्याचा नीट विचार करू.

'आपला' म्हणजे काय याबद्दल मतभिन्नता भरपूर. 'आपला समाज 'म्हणजे भारतीय का हिंदू का महाराष्ट्रीय का पश्चिम महाराष्ट्रीय का मराठवाडी का वैदर्भीय का पुन्यामुंबयअमरिकावाले का ममव का ब्राह्मण का मराठा का आणिक कुणी वगैरे किरकोळ तपशील आपापल्या चवीनुसार मीठ टाकून घेण्याची पद्धत आहे.

आपण भारतीय हिंदू महाराष्ट्रीय म्हणून सहिष्णू अशा समजत असलो तरी चष्मा पुणेरी कोब्रा असला तर ब्रिगेडी वक्तव्य/मेन्टॅलिटी आपल्याला भयंकर असहिष्णू वाटते. तसेच चष्मा ब्रिगेडी असला कि पुणेरी कोब्रीय मेन्टॅलिटी आपल्याला हलकट वाटते.

म्हणजे आपण स्वतःला (किंवा कुणीतरी आपल्याला) सज्जन , बॅलन्सड भारतीय हिंदू समजत असलो तरी आपले मुसलमान विरोधी वक्तव्य आपल्याला असहिष्णू वाटत नाही एकदम बॅलन्सड वाटते . (पुरावे म्हणून कीवर्ड्स आहेत बाहेरचे, आक्रमक, मूर्तिभंजक, अतिरेकी, टोळीवाले, चारबायका, वाळवंटी, वगैरे )

म्हणजे एखादा मुल्ला काहीतरी च्युत्यासारखा फतवा काढतो तेव्हा तो मुल्ला कुठला नाक्यावरचा चाराणे मुल्ला आहे का खोमेनी लेवलचा आहे हे न बघता आपण आपली असलेलीच खात्री वाढवून घेतो. पण तेव्हाच नाक कापू / मुंडके उडवल्यास ५ कोटी वाले करणीसेना प्रमुख आपल्याला फारसे असहिष्णू/महत्वाचे वाटत नाहीत.

तर मंडळी प्रश्न असा आहे की आपण सहिष्णू आहोत असा आपल्याला वाटते का? आणि आपल्याला जगातील कुठला समाज सहिष्णू वाटतो ? सहिष्णुतेचे 'आउटर लिमिट्स' काय असतात / असावेत?

मला विचाराल तर कुठलाही समाज सहिष्णू नाही.

पण माझे फडतूस मत जाऊ दे ... तुम्ही काय बोलता ?
अवांतर : आबा धन्यवाद

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

पारशी लोक सहिष्णू झालेत आता बरीच शतके. इराणमधले फारसी. ग्रीसकडून मार खाल्यावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठले सहिष्णू? आजही इंटरकास्ट लगीन केल्यावर पोरांना अग्यारीत प्रवेश नाय मिळत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाकी जाऊदेत,

म्हणजे एखादा मुल्ला काहीतरी च्युत्यासारखा फतवा काढतो तेव्हा तो मुल्ला कुठला नाक्यावरचा चाराणे मुल्ला आहे का खोमेनी लेवलचा आहे हे न बघता आपण आपली असलेलीच खात्री वाढवून घेतो. पण तेव्हाच नाक कापू / मुंडके उडवल्यास ५ कोटी वाले करणीसेना प्रमुख आपल्याला फारसे असहिष्णू/महत्वाचे वाटत नाहीत.

हे कन्क्लुजन कुठला चष्मा घालून काढलत? ह्यात आपल्याला म्हणजे कुणाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

माझा चष्मा महत्वाचा नाही . पोल घेऊन बघा . जे उत्तर मिळेल ते ग्राह्य धरू .
आता माझा चष्मा बाजूला ठेऊ ...मूळ प्रश्न, त्याच्यावर काही मत ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहिष्णू - असहिष्णू अशी कृष्ण-धवल मांडणी न करता त्यातील करड्या छटांचा विचार करू गेलो तर असे दिसते कि सहिष्णुता ही व्यक्तीच्या सुरक्षिततेच्या भावनेच्या समप्रमाणात वाढते - घटते. एखाद्या गटाला जेवढे घाबरवाल तेवढी त्याच्या असहिष्णू पणात वाढ होईल. आणि त्याच्या असहिष्णूता वाढी मुळे लगतचे गट अधिक घाबरतील. अशी ही चक्रीय गतिमानता आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी परवा एका गोऱ्या मैत्रिणीला म्हटलं की मुलीने आय व्ही लॅगमधील एका कॉलेजात अप्लाय केले आहे तर तेवढंही सहन न झाल्यासारखी म्हणाली - छःआन. तिथे मायनॉरिटीजना प्राधान्य असते. मिळू शकेल तिला. आणी मग उगाच सारवासारव - मला ते वाईट आहे असे म्हणायचे नाही वगैरे मानभावीपणा
.
खरच! ना, काही लोक ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण भारतीय हिंदू महाराष्ट्रीय म्हणून सहिष्णू अशा समजत असलो तरी

एकंदरच असे लक्षात आलेले आहे की आपले स्वत:बद्दलचे मत हे खूप चुकीचेच असते. आपला स्वार्थ आणि जिजीविषा (सर्व्हायव्हल इन्स्टिन्क्ट) इतकी गुंतलेली असते की आपल्याला स्वत:कडे कोरी पाटी ठेऊन पहाताच येत नाही.
तेव्हा अन्य लोकांचे मत घेणे, आपला प्रभाव-कुप्रभाव इतरांवर काय पडतो ते लक्षात घेणे फार महत्वाचे असते.
____
आपल्याला आपण मारे सहिष्णु, आदर्श मानत असतो पण येस आपापला चष्मा असतोच. तो चष्मा मग बालपणिच्या संगोपनातून, मोठ्या माणसांच्या चर्चा ऐकुन, आलेला असू शकतो.
अत्यंत कमी लोक स्वतंत्र विचार करणारे असतात. (अदिती पैकी एक आणी अव्वल नंबर). शाळांमध्ये विचार करायला शिकविले जात नाही. किंबहुना विचार करणे हे पुस्तके वाचून शिकता येत नाही.

पोथी पढ़-पढ़ जग मुआ, पंडित भया न कोय |
ढाई अक्षर प्रेम के पढे सो पंडीत होय
_________________--
आमच्या सारखे लोक सहसा थोर (आमच्या मते) लोकांनी सांगीतलेले ऐकतात. खरं तर हे म्हणजे स्वत:ची विचार करण्याची जबाबदारी टाळणेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाऊ द्या ना अण्णा, करायचं काय सहिष्णुता-असहिष्णुता मोजून? असाही ऐसीचा शँपलसेट प्रातिनिधिक थोडीच असणारे? मला श्याट फरक पडत नसेल तर सहिष्णुता मिरवायला माझ्या बापाचं काही जात नाही आणि माझीच मारली जाणार असेल तर सहिष्णुता गेली गर्दभश्रोणीत, इतका साधा हिशोब करतात लोकं. सर्व परिस्थितीत सहिष्णू असणारी लोकं बहुधा १९४८ नंतर संपली.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोशिक म्हणायचं आहे का?

#अग्यारिप्रवेश हा या निकषात मी नाही बसवणार.
त्यांच्यातल्या मुलामुलींनी पारशी नसलेल्यांशी लग्न केली की ते पारशी धरत नाहीत. त्यांच्या ट्रस्टच्या जागाही देत नाहीत.

सहिष्णुता नाही/नसते/आहे/असल्यासारखी वाटते याची कारणे -
१) निर्बल होणे - शारिरीक / आर्थिक
२) असहिष्णुता दाखवल्यास काही नुकसान होण्याची भिती.
३) आता ही वेळ योग्य न वाटणे.
४) पुरेसे इतर लोक आपल्या बाजूने नाहीत असे वाटणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२) असहिष्णुता दाखवल्यास काही नुकसान होण्याची भिती.

ह्याचाच एक भाग म्हणजे दुसऱ्या गटाचा(स्पर्धक गट) जो फायदा(सो कॉल्ड) झालाय तो असहिष्णुतेमुळे असे समजणे. आणि म्हणून असहिष्णूता हवी असणे.
थोडक्यात, असहिष्णू राहिलो म्हणून आमची गांड लागली(म्हणजे काय हे सांगता येत नाही), आणि ते शिरजोर होऊन बसले, आता बास तो असहिष्णू कम बुळेपणा, असं म्हणणारे अनेक लोक नजरेस पडतात, ते वाढत आहेत.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

सहिष्णू समाज उत्क्रांतीच्या रेट्यात टिकला असता का?

याचं उत्तर थोडं क्लिष्ट आहे. मानवी उत्क्रांतीच्या काळातला बहुतांश काळ - जवळपास 90% काळ - मानवाने लहान भटक्या टोळ्यांमध्ये काढला. 100 किंवा कमी लोकसंख्येच्या टोळीतल्या व्यक्तींना 'अमुक टोळीचा' यापलिकडे ओळख किंवा अस्मिता फार नसत. त्यामुळे टोळीच्या अंतर्गत असहिष्णुता किमान त्या अस्मितांपोटी झाली नसावी. वैयक्तिक वैरं, त्यांतून होणारी भांडणं, मारामाऱ्या, खुनाखुनी असणारच. पण मला वाटतं तुमचा मुद्दा 'अस्मिताधिष्ठित सहिष्णुता' असा होता.

माझ्या मते दोन टोळ्यांमध्ये सहिष्णुता फार नसावी. किंबहुना इतर टोळ्यांबाबत जितकी एखादी टोळी असहिष्णु तितकी तिची टिकून राहाण्याची शक्यता अधिक असावी. त्यामुळे 'आपण विरुद्ध ते' ही भावना उत्क्रांतीतूनच आली असावी.

गेल्या काही शतकांत, सहस्रकांत राज्यं एकत्र होत होत राष्ट्रं झाली तसतशी लोकांच्या अस्मितांची संख्या वाढायला लागली. एके काळी 'अमुक गावचे, अमुक जातीचे' इतपतच असे. कारण इतर धर्मीय, भाषीय हे फार लांब होते. आता आपल्याला एकाच वेळी भारतीय, मराठी, महाराष्ट्रीय, जातीय अशा अनेक अस्मिता एकाच वेळी बाळगता येतात. तसंच चोवीस तास बातम्यांच्या जगात कुठे खुट्ट झालं तरी आपल्याला त्याची बातमी मिळते. त्यामुळे असहिष्णुता वाढलेल्या दिसतात. प्रत्यक्षात नक्की काय झालं आहे हे समजून घेण्यासाठी आकडेवारी तपासायला हवी.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार गुरुजी . उत्क्रांती च्या रेट्यात हा खरं तर उप उप प्रश्न आहे . मूळ विषय आहे
सहिष्णु असल्याचा आभास , सोयीस्कर सहिष्णु , आणि वर पुम्बा यांनी म्हणल्याप्रमाणे आपणच सहिष्णू( ?) असल्याचे बळी असा सोयीस्कर समज.इकडे समाजाच्या मोठ्या वर्गाच्या गळी हा समज यशस्वी पद्धतीने उतरवलेला आहे. तुमच्याकडे पण तुमच्या विद्यमान राष्ट्र पुरुषाने पण म्हणे अशाच भावनेला यशस्वी आवाहन केले होते म्हणे . (ख खो तुम्हाला माहीत) तिकडे कदाचित प्रश्न धार्मिक नसेल , वांशिक असू शकेल .
ऐशी हुन जास्त टक्के लोकसंख्येला जेव्हा खात्री होते की आपण सहिष्णू असल्याने आपली मारली गेली आहे तेव्हा नाक रगडा , ठेचा मारा ही भाषा येते का ? आणि बहुत वेळेला उत्तम स्थितीत असणारी मंडळी ( ज्यांना 'त्यांच्या कडून मारून घेण्याचा' फारसा अनुभव/शक्यता नसते ) अशाच मंडळींकडून ही भाषा का येते असे बरेच प्रश्न आहेत .
या पार्श्वभूमीवर आपला चष्मा कुठला.
वगैरे वगैरे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चा करण्या आधी, सहिष्णु शब्दाची व्युत्पत्ती स्पष्ट असावी.

उदा:- सह इष्णु(विष्णु) की सह हिंस्त्र(मनांतील) विषाणु ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहिष्णुता असहिष्णुता सर्व आकाशातले ढग आहेत कोणाला त्यात रेडा दिसेल कोणाला बुलडोझर. स्थळ काळ वय(अक्कल) आणि पुर्वाग्रहअनुसार चष्म्याची काच बदलत जाते( नंबर आणि रंग).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय रोचक कमेंट भ . कु .
फक्त आपापला रेडा का बुलडोझर कुठला हि चर्चा चाललीय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0