ती त्सुनामी

सागराच्या गहनगर्भातून अवचित उमटते
तटतटा मृद्स्तंभ तिथले तोडुनी भिर्काविते
वितळणारा तप्त लाव्हा प्राशुनी मग झिंगते
गूढ अंध:कार अवघा ढवळुनी फेसाळते
थर्थरे भवताल जेव्हा ती अनावर उसळते
गाज दर्याची चराचर भेदुनी रोरावते

प्रलयतांडव ती त्सुनामी
आतले सगळे किनारी उधळुनी आक्रंदते
...साचले सांडून जाते
...घडविले उखडून जाते
...वेचले विखरून जाते
...मांडले मोडून जाते

ती त्सुनामी विप्लवी
...पण केवढे शिकवून जाते.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

विप्लवी चा अर्थ काय?
कविता सुंदर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विप्लवी
विशेषण
1.
क्षणभंगुर, अस्थायी।
2.
विप्लव करनेवाला।
Translate विप्लवी to
1. insurgent
2. viplavee

https://www.google.com/search?q=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! नवा शब्द कळला. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..शुचि, तिरशिंगराव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदरच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...साचले सांडून जाते
...घडविले उखडून जाते
...वेचले विखरून जाते
...मांडले मोडून जाते

ती त्सुनामी विप्लवी
...पण केवढे शिकवून जाते.

कवितेत वाचणाऱ्याने ... च्या जागी रिकाम्या जागा भरा असे काही अपेक्षित आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

इनोदी बा तुमी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0