पोळीचा चिवडा

पोळीचा चिवडा

साहित्य-
५ पोळ्यांचा चुरा, २ चमचे तेल, एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा जिरे, हळद, कढीपत्ता, मूठभर शेंगदाणे, बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेला टमाटा, बारीक कापलेल्या २-३ हिरव्या मिरच्या, चवीपुरते मीठ, सजावटीसाठी कोथिंबीर.

कृती-
सर्वात प्रथम कढईत २ चमचे तेल घ्यावे. तेल तापल्यावर त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, शेंगदाणे, मिरच्या, कांदा, टमाटा घालून फोडणी द्यावी. नंतर त्यात पोळ्यांचा चुरा आणि मीठ घालून चांगले परतून घ्यावे. कढईवर झाकण ठेऊन २ मिनिटे शिजू द्यावे. पोळ्यांच्या चिवड्यात सजावटी साठी कोथिंबीर घालावी.

अशाप्रकारे तुमचा पोळ्यांचा चिवडा तयार आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ओ वॉव,
कसलं भारी,
ह्या पोळ्या कुठे मिळतात?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या पोळ्या कुठे मिळतात?

अर्थात पोळीबाजारात!

(तुम्हाला काय उत्तर अपेक्षित होते?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला कुणी प्रश्न न विचारणे अपेक्षित होते, येनीवे उत्तर मात्र "लक्ष्मीनारायण चिवडेवाल्यापाशी" असे मिळाले असते तरी चालले असते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभ्या , पोळ्या मी कुरियर करतो . कालच इम्पोर्ट केल्या आहेत . पण त्या आधी तू मला फोडणीची भेळ आणि फोडणीच्या गुलाबजाम ची रेसिपी पाठव ... तरच ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'...मैं तुम्हें आज़ादी दूँगा|' - नेताजी सुभाषचंद्र बोस.

अर्थात, तुम्ही मला तडकाश्रीखंड (अर्थात, लसणाची फोडणी घातलेले श्रीखंड) आणि मटणाची कोशिंबीरशिकरण यांची रेसिपी पाठवा, मी तुम्हाला (इकडूनतिकडून आणून) फोडणीची भेळ आणि फोडणीच्या गुलाबजामाची रेसिपी पाठवतो. हाय काय नि नाय काय.

- (आज़ादीचेरेशिप्यांचे अडतदुकान खोलून बसलेला) 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बापटाण्णा, नुकताच बड्डे झाला ना तुमचा, राह्यलेला केक बिक असला तरी सोबत पाठवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोडणीच्या केकचीही कल्पना तशी वाईट नाही. केकही एवीतेवी शिळाच आहे, नि तसेही 'ब्रेड मिळत नसेल तर केक खा' असे मारी आंत्वानेतबाई म्हणून गेलेलीच आहे. ('चटणीभाकर मिळत नसेल तर शिरापुरी खा' असा त्याचा (पाठ्यपुस्तकमंडळप्रणीत) मराठी तर्जुमा रूढ आहे, परंतु आपण चटणीभाकरीऐवजी पोळी चालवून घेऊ. तुमच्यासाठी काहीही. काय म्हणता?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केकला वाईनची 'फोडणी दिली' आणि खमंग वास दरवळला असं काहीसं वर्णन एका मराठी पुस्तकात वाचलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

फोडणीसाठी (बोले तो, 'सीझनिंग'साठी) टिपिकली कुकिंग वाइन वापरली असावी, नाही? Wink

(बोले तो, बचकभर मीठ मिसळलेली?)

रोचक कॉन्सेप्ट! (मराठी पुस्तकातूनच येऊ शकेल, अशी.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही लादी/स्लाइस पावांचाही असा चिवडा करतो.
त्याला फोडणीचा पाव म्हणतो.
हे पाव बय्राच दुकानांत विकत मिळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्याकडे याला फोपो = फोडणीची पोळी म्हणतात, कारण ती चिवड्याएवढी कडक होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थात, या निमित्ताने आमच्या (इतरत्र प्रकाशित झालेल्या) उकडलेल्या अंड्यांच्या रेशिपीचाही सर्वांनी आस्वाद घ्यावा, म्हणतो मी.

(आमची रेशिपीही प्रस्तुत चिवड्यातल्या पोळीइतकीच शिळी आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इन्स्टंट काॅफीची पाकृ हवी. अंड्याशिवाय कशी करावी, याचाही पर्याय लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उकडलेल्या अंड्यांसाठी आठ मिंटाचा फॉर्म्युला वापरून पहा. मोजून आठ मिनीटं अंड पाण्यात मध्यम आचेवर उकडायचं. आतला बलक मऊ शिजतो, पिठूळ नाही होत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

या पारंपरिक*१ पदार्थातून ऐसीकरांना आडून सुचवायचे आहे का?

*१-पोर्तृगिजांचे शेंगदाणेसोडून बाकी वापरलेले पदार्थ इथलेच आहेत. गव्हाऐवजी तसाच एक सातु होता भरतवर्षात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुप आणि गुळ घालून केलेले पोळीचे लाडु पण छान होतात.
सोळा सोमवारच्या उद्यापनाला, गाकर करून, नंतर ते बारीक कुस्करून त्या चुऱ्याचे लाडु प्रसाद म्हणुन देतात.

आणि शिळ्या पोळ्या ( ताज्या वापरल्या तरी चालतात ) वापरून आणि उपलब्ध असलेल्या म्हणजे फ्रिज मधे पडून असलेल्या भाज्या वापरून फ्रॅन्कीज पण करता येतात.

नुसती दुध, गुळ आणि (कुस्करलेली) पोळी पण छान लागते.

शिळ्या पोळीचे अनंत उपयोग ......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

खरंच पाकृती धागा आहे का? मला वाटलं ललित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्छा. माणिकमोत्यांची रेसिपी होय? असे सांगा की मग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************