गंमत

नवकवितेच्या वाटेवरचे वळण द्यायचे हाक,
"गण-मात्रांचे कृत्रिम बंधन सत्वर तोडुनी टाक !"

यतिभंगाचे भूत लेखणीस कायम भिववित होते
त्या भीतीने तरल काहिसे हातून निसटत होते

गोळा करूनी धैर्य, ठरविले, नको अता मळलेली
वाट पुन्हा ती छंद-बद्ध कवितांची कोंदटलेली

वृत्त-छंद-मात्रांचे अवजड ओझे लेवुनी बसली..
..होती माझी कविता, विमुक्त होता निर्मळ हसली

त्या हसण्याचा खळाळ ध्वनि मज सांगुनी गेला काही,
"मुक्तक लिही, पण ध्यानी ठेव..यमकाविण "गंमत" नाही !"

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

'यात्री टच' नाही जाणवला, पण वृत्तात आहे असं वाटतंय. कोणतं बरं?
शेवटची ओळ अगदी अचूक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

अगदी अगदी. यमकाने गंमत येते पण मुक्तकातुन कविता जास्त उलगडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१४टॅन, ..शुचि आपल्या प्रतिसादाबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"मुक्तक लिही, पण ध्यानी ठेव..यमकाविण "गंमत" नाही !"

हे माहिती नव्हतं Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

प्रश्नच कुठे येतो? गंमत फार गांभीर्याने नका घेऊ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केशवसुतांची कविता वाचून न आवरता आलेली काव्यपिपाणी ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

वाचून ? जरा बादरायण संबंध विस्कटून सांगा की

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप च छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0