कवितेचं देणं

ती ठिणगी होऊन येते
अन् वणवा होऊन छळते
कधि लकेर अवखळ होते
अन् गाण्यातून रुणझुणते

धगधूर निखारा होते
विझुनी मग होते राख
उमलविते त्यातून फूल
मग तिचीच फुंकर एक

ती उल्केसम कोसळते
उखडून दिशांचे कोन
लवथवत्या चित्रखुणांची
ती लिहिते भाषा नविन

जे तरल नि अक्षर ते ते,
जे गहन नि अथांग ते ते,
जे दूर असूनही भिडते,
जे जटिल तरी जाणवते,
ते तिचेच देणे असते….

…..किती घ्यावे? तरीही उरते !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एकदम सहज कविता. मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

गॅरी स्नायडर यांच्या मते कविता

How poetry comes to me
It comes blundering over the
Boulders at night, it stays
Frightened outside the
Range of my campfire
I go to meet it at the
Edge of the light

.

आज चपाती करताना सहजच वाटून गेले की कणकेचा गोळा आपण लाटतो, मधे तेल लावुन पीठ भुरभुरवुन, त्रिकोण करत लाटतो व चपाती-मेकिंगमध्ये एक क्षण असा येतो की तव्यावर ३ पदर सुटलेली टम्म फुगलेली, खरपूस भाजली जाऊन सुगंधाने दरवळून जाणारी, खाणार्‍याकरता पौष्टिक तसेच खाणार्‍याला तृप्त करुन सोडणारी चपाती फुलते. अमूर्त मनातून निघालेली कविता ही तशीच असते - अनेक पदर असलेली, व वाचकाचे मन सुगंधाने भरुन टाकणारी, आत्म्याकरता पौष्टिक अशी कविता. - शुचि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या कविता आवडतात.

जे दूर असूनही भिडते,
जे जटिल तरी जाणवते,
ते तिचेच देणे असते….

या ओळी समर्पक आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार आवडली.

धगधूर निखारा होते
विझुनी मग होते राख
उमलविते त्यातून फूल
मग तिचीच फुंकर एक

नितांतसुंदर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

खरे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप सुंदर कविता. आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या प्रतिसादांबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली. धगधूर शब्दाचा वापर आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॉण्ड, जेम्स बॉण्ड!
अर्थात
छान, खूपच छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद, खूप धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवल्डी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

"xxxची कविता वाचून न आवरता आलेलं काव्यyyy" या आपल्या साचेबद्ध "समीक्षे" ची अपेक्षा होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी समीक्षक नाही.

हां ! सांगून ठेवतो. उगा वाईट वंगाळ बोलायचं काम नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

शब्द ठीकाय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही फार लवकर ट्रोल होता. पण मी ट्रोल नाही त्यामुळे म्हणा "चिर्फाडक" म्हणायचे असेल तर. चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

'जिस नाम से तुम पुकारो, वही मेरा नाम होगा|'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही क्वालिटिज लागतात उदयजी, उगीच त्या शब्दाचा अपमान करु नका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं