" घराण्याची राणी "

मध्यरात्रीचे टोले , भुंग्याचे चिडलेले गुणगुणणे
आपल्या आजोबांच्या देहूरोडमधल्या वाड्यात
आजीच्या खाटेवर झोपलेल्या अर्चनाच्या मच्छरदाणीवर
तिच्या पणजीची बहीण गोदावरी दिसू लागते
वयस्क आरसपानी सौंदर्य , वेडावाकडा कृद्ध चेहरा
"लग्नाला दोन वर्षे झाली आणि वकीलसाहेबांना
घरी यायला रोज उशीर होऊ लागला अनेकदा ते
पलीकडे निजामगंजमध्ये दिसल्याची आवई होती
रामूने पिल्या रामोशाला बातमीला पाठविले
कोणी आयेशा म्हणून बया होती मी पैलवान दामू
आणि शेतावरच्या रामूला घेऊन निघाले रामू म्हणाला
माझ्याकडे दीड फुटी गुप्ती आहे काळजी नको
आयेशाने आत बोलाविले दूध आणले रामू म्हणाला
तुम हमारे वकीलसाबको छोडो नाही तो हम तुमको
जिवे मारेंगे आयेशा बोलली ये हमारा पोटका धंधा है
जो कुछ बोलना है तुम तुम्हारे वकीलसाबको बोलो
मारामारीची बात सोड माझ्याकडेही चार गडी हयेत
वकीलसाहेब रात्री म्हणाले भिड्यांच्या घराण्याची राणी
तुम्हीच आहात वाडा जमीन दागिने तुमचेच आहेत
वचन देतो त्यांना हात लागणार नाही उगाच
भलतीकडे लक्ष घालू नका बाहेर
आमचे आम्ही मुखत्यार आहोत दोनच वर्षात
आयेशा मेली वर्षाने भिडे वकीलही त्याच
रोगाने गेले मग थोरल्या गंगाधरपंतांनी नागवली मला.
चल एक वाजला मला जबलपूरला माहेराकडे निघायला हवं
तिथे भागी येते तिची पण हीच कथा आहे
तू तशी भिडे म्हणजे माझ्या विरुद्धचीच म्हणायची पण
बाई म्हणून सांगत्ये"
मच्छरदाणीचे छत अंधारते
गोदेच्या डोळ्यातला एक अश्रू ऍसिडप्रमाणे
मच्छरदाणी फाडत टपकन अर्चनाच्या कपाळावर पडतो
जन्मभर काळपट जळका डाग टिकून राहतो.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हान तेजायला राडा, राडा, अन राडा केलाय नुसता.

दाणपट्टा चालवलाय तुम्ही, मिलिंदराव !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी असेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चांगली आहे पण कथेची कविता केलाहात असे वाटले. ऐसीवर इथल्या कवितांकरता यावेसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी