एका अनावर कैफात

एका अनावर कैफात लिहिली होती
ती कविता

नंतर वाटलं, भाषेची इतकी आतषबाजी कशाला ह्या कवितेत?
मग काढून टाकले सर्व - अनुप्रास, यमकं, उपमा
साधे सुधे शब्द घेऊन पुन्हा लिहिली
तेव्हा
थोडी भुंडी पण
थोडी खरीही वाटली
ती कविता

नंतर वाटलं - इतके शब्द कशाला ह्या कवितेत?
मग कापलं सपासप -
वायफळ शब्दतण
तेव्हा
जास्त ओकीबोकी पण मघापेक्षा
जास्तच खरी वाटली
ती कविता

नंतर वाटलं – इतक्या ओळी कशाला ह्या कवितेत ?
मग खोडायला गेलो दोन चार हट्टी, रुतून बसलेल्या ओळी
तेव्हा
ओळीतल्या रिकाम्या जागेतून
सण्णकन फणा काढत
जिव्हारी डसली
ती कविता

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कमीतकमी शब्दात भावना पोचवायच्या असतील तर बक्षीसाहेब नाहितर साहिर चा क्लास लावायला पाहिजे.
कविता हि प्रेमाबद्दलच पाहिजे हो, कशाला कोणाला फणा काढुन डसायचे कवितारुपानी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता हि प्रेमाबद्दलच पाहिजे हो, कशाला कोणाला फणा काढुन डसायचे कवितारुपानी.

क्या ब्बात है !!!

अनु राव, डॉ. सतीश सरदेसाईंचा डायलॉग आठवला ओ - "कुठल्याही भाषेत प्रेम करावं. पण अवश्य प्रेम करावं."
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता हि प्रेमाबद्दलच पाहिजे हो

असं काही नसतं.

उदय, छान कविता, मस्त काटछाट

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकांत स्वाक्षरी
आज करे सो कल कर
कल करे सो परसो...
इतनी भी क्या जल्दी यारो
जिंदगी पडी है बरसो...

मस्त काटछाट

हो ना!

अशीच काटछाट करत ती जर logical conclusionला नेऊन कविता जर शून्य शब्दांवर आणली, तर ती सर्वोत्कृष्ट कविता बनेल, याबद्दल संदेह नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"Don't be humble. You're not that great." - Golda Meir.

खरंतर हीच कविता असते. अनुभवाला जास्त अर्थ असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपले ओढून ताणून दिलेले प्रतिसाद हास्यकारी होण्याऐवजी हास्यास्पद होत चाललेयत याबद्दल संदेह नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

बक्षीसाहेबांचे एक गाणे आहे ( ते स्वताला कवि वगैरे म्हणत नसत ).

खत लिख दे सवरिया के नाम ( बाबु )
कोरे कागज पे लिख दे सलाम ( बाबु )
वो जान जाएंगे, पहचान जाएंगे

कैसे होती है सुबहा से शाम ( बाबु )
वो जान जाएंगे, पहचान जाएंगे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता जर शून्य शब्दांवर आणली

कवितेची बदनामी थांबवा !!!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकांत स्वाक्षरी
आज करे सो कल कर
कल करे सो परसो...
इतनी भी क्या जल्दी यारो
जिंदगी पडी है बरसो...

अनावर कैफ ही द्विरुक्ती आहे.
कविता आवडली. अनुची प्रतिक्रिया आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कवितेने डसले वगैरे पाहिजे हा साहित्यिक संकेत असेलही पण तुम्ही असा 'दंशकारी असण्याचा गर्व मिरवण्याजोगी' कविता लिहल्याचे अथवा लिहली असल्यास ( आम्ही ) वाचल्याचे (आम्हाला) स्मरत नाही. तशी जळजळीत कविता लिहीत नाही तोवर तुमची वरची कविता हि 'कवितेने दंशकारी असावे' या संकेतांशी केलेला रोमँटिक चाळा यापलीकडे काही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

'दंशकारी असण्याचा गर्व मिरवण्याजोगी'

आमच्या मते "दंशकारी असण्याचा गर्व मिरवण्याजोगी" कविता जो पर्यंत आपल्या कडुन लिहुन होत नाही तो पर्यंत आपल्या कविता कुठेही पब्लिशच करु नये.
आपण महेश काळे किंवा राहुल देशपांड्यांच्या लाइनीत बसायचे ध्येय ठेवले असले तर ठीक आहे.

आज गालिबचा वाढदिवस आहे, त्याच्या आत्म्याला त्रास होऊ नये म्हणुन कमीत कमी आज तरी कोणी कविनी आपली कविता पब्लिश करु नये ही कळकळिची विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होता है शब-ओ-रोज तमाशा मेरे आगे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उल्लेख "आम्ही"करताय म्हणजे आपण समीक्षकराव वगैरे झालात की काय अशी एक बळकट शंका येतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

आपला अनाहूत सल्ला अपेक्षित त्वरेने व "समीक्षकरावांचे" वचन उधृत करून दिलयाबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

उदयजी
कविता निव्वळ अप्रतिम आहे.
Michelangelo च्या " You Just Chip Away Everything That Doesn’t Look Like David ! "
ची आठवण करुन देणारी.
याची लिंक माझ्या मित्रांना पाठवली त्यांना ही कविता फार आवडली.
धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

There's too much blood in my caffeine system.

आपल्या कविता आवडू लागल्यात. ही देखील आवडली.
इतरांच्या कविता आपल्या काळजात घुसू शकतात, डसू शकतात, मग स्वत:ची कविता का नाही दंश करू शकणार? पण ती इतरांना तितक्याच तीव्रतेने डसेल असे नाही, मुळात डसेलच असे नाही आणि ही कविता डसेल असे नाही इतकेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0