"प्रिये लेस्बियने"
( हसून "ते" म्हणती मला / अरे तू येडा का खुळा
अशा लेस्बियन बाईला / रस नसतो मर्दांमध्ये!
म्हटले साहेब जरा ऐका / कविता वाचून तर बघा
कामसंबंधांचा फुगा / त्याने फुटे झडकरी )
वय वाढून मोठा झालो /पन्नाशीचा बाप्या जरी
होतो नवाच कवी तरी / मनामध्ये,शरमेमध्ये
ऑफिसातली एक सुंदर /लेस्बियन ती सखी होती
एकटी आणि दुःखी होती / गप्पा-टप्पा चालायच्या
अडचण तशी मोठी बघा /मैत्रीण असून विरुद्ध-लिंगी
वासना पण सम -लिंगी/ (त्रास असले येथे फार!)
बसलो होतो आम्ही दोघे /विद्यापीठी वृक्षाखाली
सोनेरी त्या संध्याकाळी/ पानगळीच्या ऋतूमध्ये
पंचाईत तशी मोठी/ प्रेमामध्ये कसे पडणार
यातून पुढे काय घडणार / "त्यांचे" खरे ठरत होते
समोरच्या त्या सौंदर्याचे / शक्य नव्हते आकर्षण
आणि बाकीचे घर्षण?/ विचार सुद्धा त्याज्ज तो !
इतर गरजा तरी होत्याच/ परदेशातले एकटेपण
एकांताचे डोक्यात घण / दारू पिऊन पिणार किती?
आणि समोर बसली होती/ कवितांची एकच वाचक
कॉमेंट्सही नव्हत्या जाचक / नवकवींना रडविणाऱ्या
वही काढून कवितांची/ वाचू लागलो मग मी
तिच्या वाहवांची हमी / घट्ट घेऊन मनामध्ये
दोघांनाही कळले नाही / तीन तास गेले कसे
मनामध्ये वसली असे / संध्याकाळ ती सोनेरी !
तर पुरुष -मित्रांनो ऐका / यासाठी पण "सखी" लागते
उदारपणे जी राखते / लाज तुमच्या "प्रतिभे"ची !
xxx
प्रतिक्रिया
हैदोस !!!
हान तेजामायला .... काय राडा केलाय तुम्ही, मिलिंदराव .... !!!
हैदोस !!!
हैदोस
हैदोस हा शब्द वाचून क्षणभर भुतकाळात गेल्तो.
बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो
घर्षण या शब्दावरून हैदोस हा
घर्षण या शब्दावरून हैदोस हा शब्द आठवला ओ.
"हैदोस" या शब्दाविषयी (उगाचच)
हे उगाचच : "हैदोस" या शब्दाविषयी : मुहम्मदाचे नातू हसन आणि हुसैन यांना अनुक्रमे "दोस्त" आणि "दुल्हा" अशी टोपण नावे होती. लढाईतल्या त्यांच्या मृत्यूचा शोक मुहर्रम मध्ये "हाय दोस्त दुल्हा " असे ओरडत नाचत केला जातो. त्यावरून "गल्लीत हैदोस-धुल्ला चालू होता" अशी संज्ञा आली , आणि त्याचे संक्षिप्त रूप "हैदोस". हा शब्द भारतीय संसदेबाबत विशेषत्वाने वापरला जातो!
याला नेमका आधार काय आहे हे
याला नेमका आधार काय आहे हे सांगू शकाल का? मला याबद्दल कुतूहल आहे खूप दिवसांपासून म्हणून विचारतोय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
याला नेमका आधार : Dictionary link below
http://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF/word
"०दोस्त दोस दुल्ला धुल्ला हायदोस - उद्गा . [ मुसलमान लोक ताबुताचे पुढें हसन व हुसेन हे त्यांच्या लग्नानंतर लवकरच लढाईत मरण पावले , म्हणून हाय ! मित्रा ! नवरदेव ! असा दुःखोद्गार काढून नाचतात त्यावरून ] नाचणें , ओरडणें ; दंगल ; धुमाकूळ . ( क्रि० घालणें ; माजणें ; उठणें ; मांडणें ; करणें ) [ हिं . हाय ! दोस्त ! दुल्हा = नवरा ]"
अनेक धन्यवाद!!!!
अनेक धन्यवाद!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
गदारोळ्
हैदोस". हा शब्द भारतीय संसदेबाबत विशेषत्वाने वापरला जातो!
याचबरोबर 'गदारोळ' ही बहुधा संसदेतच होतो. तिथे खऱ्या गदा हातात द्याव्या, अशी माझी मनापासूनची इच्छा आहे.
एकच, तो निपक्षपाती
बाकी सारेच पक्षपाती
खऱ्या गदा हातात द्याव्या
गदगदून हसत आहे!
...
तेच ते
बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो
दर्शन्
एकेकाळी आम्ही, सर्व भक्ती-गीतांमधल्या दर्शन च्या ऐवजी घर्षण म्हणून घोर विडंबने करत असू.
एकच, तो निपक्षपाती
बाकी सारेच पक्षपाती
हे भारी दिसतय
एकेकाळी आम्ही, सर्व भक्ती-गीतांमधल्या दर्शन च्या ऐवजी घर्षण म्हणून घोर विडंबने करत असू.
एक्झाम्पल प्लीज
मुळ भक्तीगीत सांगा फक्त
I believe that we should die with decency so that at least decency will survive- Hammarskjold
प्रियतम दर्शन देई, तुजविण
प्रियतम दर्शन देई, तुजविण करमत नाही - हे भक्तिगीत नाही पण ...
दर्शन तुमचे हाच असे हो या पक्ष्यांचा चारा - ह्या ओळी - या डोळ्याची दोन पाखरे - या गाण्यातली
कशाला कशाला
कशाला कशाला, लोकांच्या भावना दुखवायला सांगता ?
साधी आरतीच घ्या ना गणपतीची!!!
एकच, तो निपक्षपाती
बाकी सारेच पक्षपाती
:ड
आमचे पूर्वज थोर होते, असं म्हणायची सोय ठेवलीत तुम्ही!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मिलीन्दजी ही कविता कविताच वाटत नाही
ही कवितापेक्षा कदाचित ललित चांगल जमल असत
एखादा अनुभव गोष्ट सांगितल्यासारखी वाटते पण
कविता वाटत नाही.
I believe that we should die with decency so that at least decency will survive- Hammarskjold
लघुकथा लिहिण्याइतका "कथावस्तूत दम नाही"
हे "मधलेच" काहीतरी वाटते हे मान्य आहे. पण लघुकथा लिहिण्याइतका "कथावस्तूत दम नाही" असेही वाटते आहे!
राकुना सुचवलं होत तेच
राकुना सुचवलं होत तेच तुम्हालापण सांगते: आठवड्याला एकच धागा काढायचा आणि त्यातच रोज एक-दोन कविता टाकायच्या reverse chronologically....
===
सध्या पहिल्या पानावर मिलिन्द् पद्की चे ९ आणि anant_yaatree चे ११ धागे आहेत. अशीच उगाच माहिती....
===
Amazing Amy (◣_◢)
ॲमी, एक विनंती आहे.
ॲमी, एक विनंती आहे. धुमश्चक्री, दणदणाट, राडा, धुमाकूळ, हैदोस असलेल्या कवितांबाबत नियम थोडे शिथील करा अशी विनंती करतो.