ॲडव्हर्स सिलेक्शन बद्दल .....
यापूर्वी आपण मोरल हझार्ड बद्दल चर्चा केली. मोरल हझार्ड चा भाऊ आहे ॲडव्हर्स सिलेक्शन. कारण दोघांच्या मुळाशी एकच संकल्पना आहे. ॲडव्हर्स सिलेक्शन हे समजायला थोडे गहन आहे. तेव्हा उदाहरण देऊन सांगतो. सेकंड हँड कार चे मार्केट डोळ्यासमोर आणा. आता सेकंड हँड कार घेऊ इच्छीणाऱ्या ग्राहकासमोर एकाच मेक व मॉडेल च्या दहा सेकंड हँड गाड्या उपलब्ध आहेत असं समजा. आता या ग्राहकाला हे कसं कळणार की यातली कोणत्या गाडीचा दर्जा उच्च आहे व कोणत्या गाडीचा दर्जा खराब आहे ते ? ती माहीती फक्त विक्रेत्याकडेच असणार व विक्रेता खरं सांगेल हे कशावरून ? परिणामत: ग्राहक हा सरासरी किंमतीपेक्षा जास्त दाम द्यायला अनुत्सुक असेल. पण त्या दहा पैकी जी गाडी सर्वात् उच्च प्रतीची असेल तिचा मालक या सरासरी किंमतीवर विकायला अनुत्सुक असेल (कारण त्याला त्याच्या गाडीच्या उच्च दर्जाला अनुरुप दाम हवे आहेत) व तो बाजारातून बाहेर पडेल. आता उरलेल्या ९ गाड्यांची सरासरी किंमत आणखी घसरेल व त्यातला आणखी एक विक्रेता (ज्याची गाडी त्या ९ मधे सर्वात उच्च प्रतीची असेल तो) बाहेर पडेल. असं ते चक्र सुरू होईल व सरतेशेवटी मार्केट मधे फक्त खराब प्रतीच्या गाड्याच उरतील व अनेक ग्राहक बाजारातून बाहेर पडतील. संभाव्य ग्राहकांची संख्या घटल्यामुळे सरासरी आणखी घसरेल. व हे दुष्टचक्र सेकंड हँड गाड्यांच्या मार्केट च्या मृत्यूस कारणीभूत होईल. हे ॲक्च्युअली असं घडत नाही (कारण सेकंड हँड कार चे मार्केट अस्तित्वात आहे व बळकट आहे हे आपल्याला समोर दिसत आहे.) पण मुद्दा समजवून सांगण्यासाठी हा लिहिण्याचा खटाटोप केला.
दुसरं उदाहरण देतो. आरोग्य विमा. ज्यांना डॉक्टर कडे जाण्याची शक्यता नजिकच्या भविष्यात वाटत नाही ते आरोग्यविमा विकत घेण्याची शक्यता कमी असते. ज्यांच्याकडे आर्थिक स्थैर्य व सुबत्ता असते त्यांना सुद्धा असं वाटतं की डॉक्टर चं बिल आलंच तर आपल्याकडे पुरेसे पैसे आहेत व आपण ते भरू शकतो व म्हणून आरोग्यविमा विकत घेण्याची गरज त्यांनाही वाटत नाही. म्हंजे आरोग्यविमा विकत घेणारे ग्राहक हे सर्वसामान्यपणे ज्यांना डॉक्टर, औषधे यांची भविष्यात निकड असणार आहे तेच होतात. पण विमाकंपनीच्या दृष्टीने बघितलंत तर विमा कंपनी ला त्यांची जोखीम व्यवस्थापन करायचं असेल तर फक्त रोगी, संभाव्य रोगी, किंवा निर्धन लोकच ग्राहक म्हणून मिळतात. हे लोक विमा कंपनी साठी खर्चीक ठरतात. परिणामत: विम्याचे प्रिमियम वाढतात आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक संभाव्य ग्राहक (विशेषत: जे बऱ्यापैकी निरोगी आहेत व/वा ज्यांना हे दर परवडणार नाहीत ते) मार्केट च्या बाहेर पडतात. परिणामत: आरोग्यविम्याचे मार्केट रोडावते.
जगातल्या अनेक देशात जी सामाजिक सुरक्षा योजना त्या त्या देशांतील सर्वांना उपलब्ध आहे तिच्यामधे योगदान करणे हे ॲडव्हर्स सिलेक्शन च्या समस्येमुळेच अनिवार्य केले गेलेले आहे. ते जर अनिवार्य नसेल तर ती सामाजिक सुरक्षा योजना न बनता खाजगी सुरक्षा योजना बनेल. म्हंजे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर सामाजिक सुरक्षेअंतर्गत ज्या सेवा उपलब्ध करून दिल्या जातात त्या पुरवणाऱ्या अनेक खाजगी कंपन्या कदाचित निर्माण होऊ शकतील. ज्यांना ह्या सेवा नको आहेत ते किंवा ज्यांना ह्या सेवा परवडत नाहीत ते ह्या खाजगी कंपन्यांचे सबस्क्राईबर बनणार नाहीत. कदाचित या सेवा पुरवणाऱ्या सहकारी तत्वावर चालणाऱ्या सोसायट्या सुद्धा निर्माण होऊ शकतील. परंतु अजून तरी भारतात अशा सहकारी सोसायट्या निर्माण झालेल्या नाहियेत. भारतात सहकार तत्वं रुजून त्याला किमान पन्नास वर्षं झालेली असूनही या अशा सहकारी तत्वावर चालणाऱ्या सोसायट्या निर्माण झालेल्या नाहियेत.
या संकल्पनेचा समाजवादाशी नेमका संबंध काय ? तर समाजवादात स्पर्धा प्रक्रिया मारून टाकणे हे इष्ट मानलेले आहे. ॲडव्हर्स सिलेक्शन चा परिणाम म्हणून सामाजिक सुरक्षा व आरोग्यविमा ह्या योजना जगातील काही देशांत सरकारकरवी चालवल्या जातात. व व्यक्तीने या योजनांमधे योगदान करणे हे त्या देशांतील सरकारतर्फे अनिवार्य करण्यात आलेले आहे. उदा. अमेरिकेत सामाजिक सुरक्षेत योगदान करणे हे प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीसाठी अनिवार्य आहे. यामधे स्पर्धा मारून टाकली जाते कारण एकमेव कंपनी सरकार चालवते. अमेरिकेन सरकार हे सामाजिक सुरक्षा चालवते. खाजगी स्पर्धक निर्माण होऊ शकतो व् असतीलही. पण एकाच सेवेसाठी दोन सबस्क्रिप्शन्स (एक सरकारी व एक खाजगी) कोण घेईल ? परिणामस्वरूप स्पर्धा मारून टाकली जाते.
.
हे ॲक्च्युअली असं घडत नाही
जे ॲक्च्युअली घडत नाही ( तुच असे म्हणतोयस ) तेच उदाहरण म्हणुन दिले तर मुद्दा कसा काय समजेल?
-----------------------
तसेही ह्या लेखात तुला काय म्हणायचे आहे ते कळले नाही. ते कुठेतरी सांगितले तर बरे होइल ( २-४ वाक्यात )
तपशील इथे
(१) म्हंजे सेकंड हँड कार मार्केट मधे ॲडव्हर्स सिलेक्शन च्या समस्येवर काही प्रमाणावर मात करण्यात आलेली आहे. उदा. सेकंड हँड कार विकत घेण्याआधी त्या कार चा कारफॅक्स / केबीबी रिपोर्ट मागवणे व विकत घेताना त्या रिपोर्ट्च्या आधारावर किंमतीचा निर्णय घेणे.
(२) काही प्रमाणावर मात करण्यात आलेली असल्यामुळे मार्केट रोडावलेले नाही. व म्हणून ॲडव्हर्स सिलेक्शन ची समस्या समोर प्रकर्षाने दिसत नाही.
(३) कारफॅक्स / केबीबी रिपोर्ट प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असेलच असे नाही. इतर मार्ग सुद्धा वापरले जातात - उदा. कार विकत घेण्याआधी मेकॅनिक ला दाखवून त्याच्याकडून रिपोर्ट मिळवणे. पण मेकॅनिक ला दाखवण्यामधे कार ची सद्यस्थिती समजते. इतिहास समजतो असं नाही. अँड टू दॅट एक्सटेंट मार्केट फॉर सेकंड हँड कार्स डिमिनिशेस.
वरील ३ वाक्ये ही तुझ्या प्र्श्नाचे संपूर्ण उत्तर आहे.
सेकंड हँड कार मार्केट मधे या समस्येवर काही प्रमाणावर मात करण्यात आलेली असणे म्हंजे इतर मार्केट मधे पण मात करण्यात आलेली असणे असे नाही.
----
ॲडव्हर्स सिलेक्शन ही बाजाराधिष्टीत व्यवस्थेमधील एक समस्या आहे. बाजाराधिष्ठित व्यवस्था ही समस्याविहीन नाही.
पण या समस्येवर काही प्रमाणावर आणि काही क्षेत्रात मात करण्यात आलेली आहे.
वरील ३ वाक्ये ही तुझ्या
माझा प्रश्न काय होता?
स्वताच म्हणायचे की हे उदाहरण लागु होत नाहि आणि वर म्हणायचे की हे उदाहरण तुम्हाला समजावयासाठी दिले आहे.
माझा प्रश्न असा होता की " जे उदाहरण लागुच होत नाही ते देऊन लोकांना कुठलीही कल्पना कशी समजेल?"
ह्या लेखावर मनोबाची छाप जरा जास्तच दिसत आहे.
केलीय ना मात आता, मग प्रॉब्लेम काय हाय? १०० वर्षापूर्वीच्या कल्पनांवर धागे काढण्यात काय पॉइंट आहे?
जनतेला हे सर्व माहीती आहे, हे समजुनच करंट विचारांवर / कल्पनांवर लेख लिहीण्याचे तू कबुल केले होतेस.
-----------
तुझे म्हणजे भारतातल्या सिलॅबस सारखे झाले आहे. थत्तेचाचांना लँकेशायर बॉयलर शिकायला लागला होता, जो कधीच आउट ऑफ मार्केट झाला होता.
जनतेला हे सर्व माहीती आहे, हे
हे बरोबर आहे. मी मान्य केले होते.
परंतु ॲडव्हर्स सिलेक्शन ही संकल्पना भल्याभल्यांना माहीती नसते. नावानिशी माहीती नसते हे साहजिक आहे. पण तपशील दिल्यावर सुद्धा लोक (अगदी सुशिक्षित) चकित होतात - की त्यांना ही माहीती नव्हती. म्हणून मी मनोबा ला भरीस पाडले की मी याबद्दल लिहितो.
.
अनु राव, मला वाटतं तत्त्व
अनु राव, मला वाटतं तत्त्व म्हणून समजावून सांगण्यासाठी हे जुन्या अमेरिकन पाठ्यपुस्तकातलं उदाहरण आहे. ज्याकाळी ते लिहिलं गेलं तेव्हा खरोखरच एखादी छान दिसणारी गाडी आतून सडलेली आहे की नाही हे जाणून घेण्याचा मार्ग ग्राहकाला नसे. किंबहुना नवीन गाड्यांसाठीही लेमन लॊज होते, आजही कागदावर असतील. या अमेरिकी उदाहरणाऐवजी गाई-बैल विकण्याचं उदाहरण जास्त लागू होईल. ते चालेल का?
मला हे तत्त्व म्हणून योग्य वाटतं. पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे काही सर्व्हिसेस निर्माणच होऊ शकत नाहीत. याउलट ती माहिती उपलब्ध झाल्यावर ती सर्व्हिस निर्माण होते आणि ग्राहक व विक्रेते यांचा एक नवीन वर्ग तयार होतो हे आपल्या डोळ्यासमोर घडताना दिसलेलं आहे. उबर-ओला, किंवा एअर बीएनबी ही ठळक उदाहरणं. इन्फर्मेशन असिमेट्री असल्यामुळे सर्वांसाठीच रिस्क जास्त असते, ती नष्ट झाली तरच त्या वस्तू-सर्व्हिसेस विकल्या खरेदी केल्या जातात. ब्रॆंड नेम तयार करणं, फ्रॆंचाइझीतून विशिष्ट क्वालिटीची हमी देणं हे त्यावरचे तोडगे असंख्य कंपन्या वापरतात. आणि हो, सर्व व्यवस्थांमध्ये सामील होण्यासाठी सर्वच लोकांवर सक्ती करणं हेही केलं जातं. उदाहरणार्थ रेस्टॊरंटमध्ये लोकांनी उघडंवाघडं येऊ नये ही सक्ती सर्वच रेस्टॊरंट्स करतात. सरकारने हेच केलं की त्याला समाजवाद असं नाव पडतं.
गब्बु, तुझे आरोग्यविम्याचे
गब्बु, तुझे आरोग्यविम्याचे उदाहरण पण गंडलेले आहे. तू हे उदाहरण क्लासिक पाठ्यपुस्तकातुन घेतले आहेस, ते ठिक आहे ( म्हणजे पाठ्यपुस्तकातली उदाहरणे देणे ठिक आहे ). पण जग पुढे गेले आहे.
-------
ह्या बद्दल आधी बोलु,
ज्यांच्याकडे सुबत्ता आहे आणि जे डॉक्टरांचे बिल भरु शकतील अशीच लोक जास्त करुन आरोग्यविमा घेतात. त्याची
१. कॅपिटल प्रिझर्व्हेशन हा जास्त प्रायमल विचार असुन, आहे ती सुबत्ता डॉक्टरांच्या बिलामुळे थोडी कमी होऊ नये असे वाटते.
२. प्रिमिअम भरायला पैसे असतात.
निर्धनांना आरोग्यविम्याचा प्रिमिअम भरण्यापेक्षा जास्त निकडीच्या दुसऱ्या गोष्टी असतात.
पाहिजे तर तू विदा काढुन बघ.
-------------------------------
असे अजिबात नाही, विदा असे दाखवतो की निरोगी लोक पण तितक्याच प्रमाणात आरोग्यविम्याचे ग्राहक होतात.
ज्यांना भविष्यात आरोग्याचा खर्च दिसत आहे, त्या लोकांना मुळात विमा कंपन्या त्या त्या स्पेसिफिक आजाराचा विमाच देत नाहीत.
आरोग्य आणि आयुर्विमा कंपन्यांची रिस्क मॅनेजमेंट जागेवर असते, प्रत्येक रिस्क कव्हर करण्यासाठी त्या त्या प्रमाणात भुर्दंड ग्राहकाला लावलाच जातो.
ही उदाहरणे फार बाबा आदमच्या जमान्यातली आहेत.
बहुतेक
गब्बरना सध्याचे मध्यमवर्गीय हे 'निर्धन' मधून म्हणायचं असावं. अगदी शब्दार्थाने निर्धन लोक डॉक्टरकडेही जात नाहीत, विमा वगैरे अतीच.
तसंच आर्थिक स्थैर्य व सुबत्ता म्हणजे एक गाडी, एक दुचाकी, एक व्हेकेशन होम इ. बेअर मिनीमम असलेले लोक.
- श्री टॅनोबा चौदावे
गब्बु, तुझे आरोग्यविम्याचे
हॅहॅहॅ.
तू हे उदाहरण क्लासिक पाठ्यपुस्तकातुन घेतले आहेस, ते ठिक आहे - आयव्होरी टॉवर, पुस्तकी वगैरे वगैरे.
पुस्तकातून किंवा पुस्तकी असणे म्हंजे असत्य असणे असं असतं का ?
----
उदाहरण गंडलेले आहे की जग पुढे गेलेले आहे ?
जग पुढे गेलेले असेल तर उदाहरण पूर्वी अस्तित्वात होते आता त्यावर कमी अधिक प्रमाणावर मात करण्यात आलेली आहे - असा अर्थ होत नाहि का ?
हे उदाहरण मी का दिले ? वाचकांना समजावे म्हणून - साधं उत्तर आहे.
-----
हे एकदम मान्य आहे.
जास्त निकडीच्या दुसऱ्या गोष्टी असणे म्हंजेच सध्या न परवडणारे असणे असे नाही का ?
हायपरबोलीक डिस्काऊंटिंग असा जार्गन वापरला तर ते आवडेल का तुला ?
----
(१) आरोग्यविम्याचे उदाहरण फार बाबा आदमच्या जमान्यातले आहे हा तुझा जावईशोध आहे. कसा ? खाली (३) पहाणे.
(२) तांबड्या भागाबद्दल - हो. बरोबर आहे. त्या स्पेसिफिक आजाराचा विमा न देणे (Denying coverage for pre-existing conditions) हा विमा कंपनीने शोधून काढलेला तोडगा आहे (ॲडव्हर्स सिलेक्शन च्या समस्येवर). पण मग असा विमा घ्यायला सर्व ग्राहक राजी असतील का ? काही नसतील. व ते नसतात व म्हणूनच मार्केट रोडावू शकते.
(३) प्रि-एग्झिस्टिंग कंडीशन्स चे कव्हरेज नाकारले जाते हे ओबामाकेअर च्या जन्माचे मोठे कारण होते. मोठे म्हंजे एकमेव नव्हे. तेव्हा - आरोग्यविमा - हे बाबा आदम च्या काळातले उदाहरण् नाही.
ॲडव्हर्स सिलेक्शन चा परिणाम
सरकारी आरोग्यविमा आणि युरोपात एनएचएस सारख्या गोष्टी चालवल्या जातात ह्याचे कारण ॲडव्हर्स सिलेक्शन हे अजिबात नाही.
युरोपातिल सरकारे बेसिक ( त्यांच्या व्याख्येप्रमाणे, भारतातल्या नाही ) आरोग्यसेवा आणि सामाजिक सुरक्षा ( पुन्हा बेसिक ) बऱ्यापैकी यशस्वीपणे देत आहेत. त्याचा संबंध समाजवाद किंवा ॲडव्हर्स सिलेक्शन शी नसुन त्यातुन अनेक मुलभुत गोष्टि साधल्या जातात ( जसे की देश आणि समाजाचे अस्तित्व टिकवुन ठेवणे ).
मुळात तो रिस्क मॅनेजमेंट चा भाग आहे.
आयकर हा सुद्धा रिस्क मिटिगेशन चा भाग आहे ( हे मी तर म्हणतेच पण तुला नावे फेकलेली आवडतात म्हणुन रॉबर्ट शिलर सारखे नोबेल ( पुन्हा नावे फेकणे ) मिळवणारे पण म्हणतात )
-----------------------
एकुणात काय तर हा लेख काय काय गोष्टींचा समाजवादाशी बादरायण संबंध लावायचा प्रयत्न आहे. तुला असे काही लिहायला लावण्यामागे मनोबा आहे असे मला वाटते ( आत्ता तो हसत असेल ).
सरकारी आरोग्यविमा आणि युरोपात
मग ह्या योजनांमधे योगदान करणे हे अनिवार्य का आहे ते सांग.
ते ऐच्छिक का नाही ?
------
(१) समाजवादामधे स्पर्धा प्रक्रियेचे दमन अभिप्रेत आहे. हे मी पहिल्या धाग्यातच लिहिलेले आहे
(२) सामाजिक सुरक्षेत योगदान हे अनिवार्य आहे. Individuals cannot opt out of social security. म्हंजे स्पर्धा प्रक्रियेला क्राऊड आऊट केले जाते. म्हंजे सरकारी सामाजिक सुरक्षा अस्तित्वात असली तरी प्रायव्हेट सुरक्षा सेवा निर्माण होऊ शकते. पण ते तसे होऊ शकत नाही कारण एकाच प्रकारच्या सेवेसाठी दोन दोन ठिकाणी पैसे भरणे हे बहुतेक लोकांना परवडत नाही.
(३) योगदान किती टक्के, कोणत्या आधारावर व कोणी करावे हे सुद्धा सरकार ठरवते. लाभाविषयीचे नियम सुद्धा सरकार बनवते. हे प्राईस मेकॅनिझम चे थेट रेग्युलेशन आहे.
(४) वरील (१) ते (३) हे समाजवाद कसे नाही ते सांग.
मग ह्या योजनांमधे योगदान करणे
एनएचएस मधे योगदान करणे अनिवार्य नाही आहे. योगदान नाही केले तरी एनएचएस स्कीम खाली उपचार मिळतात.
इतकेच काय ब्रिटिश सरकार इतके कनवाळु आहे की माझ्या प्रोजेक्ट मधली एक मुलगी १२ वर्षापूर्वी युके आल्याच्या दुसऱ्यादिवशी जिन्यावरुन पडली. तिचे तर रजिस्ट्रेशन पण झाले नव्हते तरी तिच्यावर फुकटात २ कॉम्प्लेक्स सर्जरी झाल्या आणि १ महिना हॉस्पिटल स्टे झाला. त्याचा सर्वाचा खर्च १२ वर्षापूर्वी भारतात ७ लाख आला असता.
-----------
मुळात वेलफेअर स्टेट म्हणजे समाजवाद आहे ही तुझी मुलभुत चुकीची समजुत आहे. मुळात प्रत्येक गोष्टीला समाजवाद येस/नो अशी लेबले लावणे चुकीचे आहे.
हे साहीर ने काय म्हणले आहे ते वाच.
और गम भी है दुनिया मे "समाजवाद" के सिवाय.
किंवा
"समाजवाद" का गम ही तनहा नही, हम क्या करे.
एनएचएस मधे योगदान करणे
नॅशनल इन्श्युरन्स हा अनिवार्य नाही आहे ?
व एनएचएस साठी चा निधी हा टॅक्सेस + नॅशनल इन्शुरन्स मधून येत नाही का ?
----
वेल्फेअर स्टेट बद्दल चा धागा आधीच काढलेला आहे मी. व त्यात मुद्दे विशद केलेले आहेतच. कल्याणकारी राज्य व समाजवाद यांच्यात काही कॉमन घटक आहेतच.
मुळात समाजवादाचा मुळापासून विचार गेली अनेक वर्षे झालेला आहे. कल्याणकारी राज्यसंकल्पनेचा सुद्धा. या दोन्ही संकल्पनांवर व्यापक संशोधन व लिखाण झालेले आहे.
.
महागडी वस्तू, सेवा म्हणजेच
महागडी वस्तू, सेवा म्हणजेच चांगले असे मानणारे आणि ते घेण्याची ऐपत असणारे ती घेतात. पण ती घेणे प्रतिष्ठा चिकटल्याने त्याचे अॅडवर्स सिलेक्शन होत राहाते. कोणी योग्य सल्ला - उपयुक्ततेला प्राधान्य देऊन सांगत असेल तर तिकडे दुर्लक्ष करतात.
आरोग्य विमा हा डॅाक्टरांच्या( पॅथालॅाजि लॅब्ज) फायद्यासाठीच असतो. ते एक फसवे दुष्टचक्र आहे.
मुळात १)आरोग्य विमा अतिमोठ्या रकमेचा, २) महागडे मोबाइल/वस्तू घेणे हेसुद्धा अॅडवस सिलेक्शन आहे.
"आम्ही अशा वस्तू घेऊ शकतो" हे मिरवणारा वर्ग इतरांना डिवचत राहातो.
कारबद्दल १) हिस्टरी समजत नाही
कारबद्दल १) हिस्टरी समजत नाही - हे गुप्तच असते. त्याचा किंमत ठरवण्रावर परिणाम होणार नाही. ही कार घेतल्यावर मालक धंध्यात डुबला - म्हणून विकतो आहे का घेतलेला रंग आवडला नाही म्हणून? २) किती किमि वापरली यावर किंमत कमी होत जाते. परंतू कमी वापरलेल्या कारच्या गियरबॅाक्स/गियर सिस्टमची मालकाने वाट लावली असेल तर ती वाइटच ठरेल.३) एंजिन तापते. ४) वारंवार दुरुस्ती निघते इत्यादींमध्ये विरुद्ध निर्णय खरेदीदार घेईल.
५) आरोग्यविम्याचे पैसे मिळतातहेत ना म्हणून डॅाक्टर सांगतो त्या ट्रिटमेंट करून घेण्यातही चुकीचे निर्णय झाले आहेत.
६) जास्ती मेगापिक्सेल कॅम्रा चांगला कॅम्रा समजून घेतलेला डिएसलार फोटो क्वॅालटीत मार खाणारा निघतो.
कारबद्दल १) हिस्टरी समजत नाही
https://www.carfax.com/vehicle-history-reports/