"पतीच्च समुप्पाद"

भाषा पाहिजे, संस्कृति नको
भांडवल पाहिजे , संस्कृति नको
बहुराष्ट्रीय बाज़ार पाहिजे , संस्कृति नको
भूमंडलीकृत व्यापार पाहिजे , संस्कृति नको

पॅंटी बरोबर शर्ट पाहिजे
शर्टखाली बनियन
आकाश मोजायची ताकद पाहिजे,
आणि जगाच्या अजस्त्र बाजारात मिळाले तर
हवे आहे माणसाच्या जगण्यासाठी
थोडेफार अगत्य !

सकल भूमंडलाच्या विचार-यात्रेसाठी
हवे आहे एक यान
- हीन किंवा महान
पतीच्च समुप्पादाच्या वर्तमानकालीन व्याख्येसाठी
हवा आहे एक नवा व्युत्पन्न बुद्ध !

कबीर मागकामात गुंतलेला असेल तर
कदाचित उपयोगाला येईल
चरखेवाला काठियावाड़ी मोहनदास
आभासी सत्याच्या दुनियेत फार अवघड आहे
समजणे पतीच्च समुप्पाद !
xxx

अनुवाद: मिलिंद पदकी
( "पतीच्च समुप्पाद" हा बुद्धाचा सिद्धांत सांगतो की एखादी घटना ही इतर सर्व घटनांच्या एका जटिल कारण-परिणाम यांच्या जाळ्यातच अस्तित्वात येऊ शकते । )

"प्रियंकर" यांच्या मूळ हिंदी कवितेचा दुवा
https://anahadnaad.wordpress.com/priyankar-poem-prateetya-samutpaad/:

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कविता ही वाचकाने, श्रोत्याने त्याला सोयिस्कर अशा रितीनेच इंटरप्रिट करायची की त्याला गैरसोयीच्या पद्धतीने सुद्धा इंटरप्रिट करायची ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचकाने, श्रोत्याने त्याला सोयिस्कर अशा रितीनेच इंटरप्रिट करायची . The poet is not "stating" anything, he is trying to "evoke". What resonances these evocations will have is up to the reader.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(छान!)

दुव्यावर बघितले तर कवी काहीसा वेगळा अर्थ सांगत आहे. (म्हणजे बौद्ध दर्शनातला मूळ अर्थ तुम्ही सांगता तो असेल, पण त्यातील कवीला अभिप्रेत कंगोरा थोडा वेगळा आहे.)

‘प्रतीत्य समुत्पाद’ अथवा ‘पतीच्च समुप्पाद’ बौद्ध दर्शन से लिया गया शब्द है . इसका शाब्दिक अर्थ है – एक ही मूल से जन्मी दो अवियोज्य/इनसेपरेबल चीज़ें – यानी एक को चुनने के बाद आप दूसरी को न चुनने के लिए स्वतंत्र नहीं रह जाते . यानी एक को चुनने की अनिवार्य परिणति है दूसरी को चुनना . भूमंडलीकरण और बहुराष्ट्रीय कंपनियों के संदर्भ में मुझे यह शब्द बहुत भाया और मैंने इसका कविता में प्रयोग किया . क्योंकि बहुत से विद्वान यह कहते रहते हैं कि हम ‘यह’ तो लेंगे पर ‘वह’ नहीं लेंगे . पर आप जिसका पैसा लेंगे उसका पूरा पैकेज़ (भाषा-संस्कृति-रहन सहन) आपको लेना होगा . जब आप ‘यह’ लेते हैं तो ‘वह’ भी उसके साथ अनिवार्य रूप से आता है .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मान्यच आहे. पण कवीला अभिप्रेत असलेला कंगोरा त्याच सिद्धांताचे एक तर्कशुद्ध अनुमान आहे. त्याने बुद्धाचेच निरीक्षण थोडे पुढे नेले आहे इतकेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेट न्युट्रलिटी हवी असल्यास जास्ती दाम मोजावे लागेल. अन्यथा स्वस्त हवे असल्यास जाहिराती येतील.
बुद्धाने कपिलमुनिंचा सांख्ययोग बराचसा घेतला ( जातीव्यवस्था सोडून) असं वाचल्याचं आठवतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Yes!: नेट न्युट्रलिटी हवी असल्यास जास्ती दाम मोजावे लागेल. अन्यथा स्वस्त हवे असल्यास जाहिराती येतील. = "पतीच्च समुप्पाद"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सांख्ययोग

नरहर कुरुंदकर सुद्धा सांख्ययोग......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लिंकबद्दल धन्यवाद.
मोठमोठे उपनिषद,ब्रम्हणक,वेद वगैरे ग्रंथ वाचून त्यांमध्ये काय सांगितले आहे हे कळणार नाही परंतू आंबेडकरांनी त्यांच्या 'बुद्ध आणि त्याचा धम्म' यात थोडक्यात विशद केलं आहे. तिथूनच कळले या सांख्ययोग आणि इतर तत्त्वज्ञानाबद्दल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0