कृपादृष्टी

काळा आणि गोरा / दोघे ते बेघर
पांघराया पेपर / टाइम्सचा
झोपायला होता / फुटपाथ दगडी
गरम शेगडी / कुठे नाही
कचऱ्यात मिळाला / चिकनचा तो तुकडा
लॉट्रीचा आकडा / लागला की!
उंच इमारती / आभाळी चढती
बडे विसावती / त्यांच्यामध्ये
त्यांवर ते दिसे / मोकळे आभाळ
विराट सकळ / फांकलेले
बर्फाळ ती थंडी / चढू जी लागली
शुद्ध हरपली / दोघांचीही
दोघांवर होई / "त्या"ची कृपादृष्टी
मोठी हिमवृष्टी / सुरु झाली
सकाळी मिळाली / थडगी ती सुंदर
एकाला शेजार/ दुसऱ्याचा
पोलीसवाला म्हणे / माझीच ही गल्ली
कशी सापडली / चोरांना ह्या. .
xxx

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आठवड्यापूर्वीच्या हिम-वादळात न्यू यॉर्क मध्ये दोन बेघरांचा मृत्यू झाला त्याविषयी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरेरे! किती वाईट मृत्यु.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हान्स अँडरसनची परीकथा आठवली. थंडी घालवण्यासाठी रसत्यावर कुडकुडणारी काडी पेटवणारी गरीब मुलगी. क्रिसमसच्या काळात.
--

परवश तो मानव।
परी बुद्धीचा तो कैफ करी।
शाल दिली 'त्या'ने गाढवाला।
कच्छमध्ये अधिक पन्नास
लडाखमध्ये वजा पन्नास।
प्रच्छन्नपणे विहार करी
समाजवाद याच्या पायाखाली।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अप्रतिम सुंदर कथा आहे ती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0