डाळिंब-हृदय
पहिल्याच डेट -भेटीच्या दिवशी त्याने जेंव्हा आपले
डाळिंब-हृदय उघडून प्लेटवर ठेवले तेंव्हा तिच्या कपाळावर
सूक्ष्मशी आठी उमटली ("फार लवकर होतंय हे!). निर्विकार
काट्याने जरा बऱ्या दिसणाऱ्या बिया ती उकलत राहिली,
शिक्षण, ते घेताना झालेला त्रास, पैशाची टंचाई,
भावाने केलेली फसवणूक, इंग्रजी साहित्यातला इंटरेस्ट,
तासाभराने तिने प्लेट बाजूला सरकवली, वेटरला खुणाविले ,
"नाही, मी मोबाईल नंबर देत नाही कुणाला ,
इमेल आहेना माझी तुमच्याकडे- आणि सध्या ना,
जरा बिझीच आहे मी" म्हणत उठली.
दुसऱ्या दिवशी मैत्रिणीने डेटबद्दल विचारल्यावर म्हणाली
विक्रेते त्यांच्याकडची चांगली फळं उघडून ठेवतात ग गाडीवर ,
घरी गेल्यावर पांढरट निघतात नुसती .
करायचीत काय असली डाळिंबं ?
xxx
प्रतिक्रिया
आवडली. मस्तच.
आवडली. मस्तच.
काहीही कळले नाही
काहीही कळले नाही
वाड्यावर या
रान डाळिंब भेटला नाही वाटत तिला कधी , आमच्या शेतावर पाठवून द्या , इंग्रजी साहित्य लै वाचतो जे डी सालींजर पासन दातेचे पुणेरी दिवाईन कॉमेडी
Est-ce que tu as un plan? Je me suis perdu dans tes yeux.