तंत्र-मंत्र विषयक ....

तंत्राबद्दल वाचताना हे पदोपदी वाचले गेलेले आहे की या पंथात त्याज्य काहीही नाही, टाकाऊ, घृणास्पद काहीही नाही. किंबहुना ही घृणेची भावना मारण्यासाठिचे अघोरी उपाय पहाता या पंथाची भीतीच वाटते.
आज गणपतीबद्दल वाचता वाचता एका ब्लॉगवर जाउन पोचले. बरीच नवी माहीती कळली. काही अत्यंत गुप्त ठेवावे असे फोटो सापडले. मला या पंथाची फारशी माहीतीही नाही आणि करुन घेण्याची इच्छाही नाही.
आपले गुरु नानक, श्रीराम असे सात्विक संत देव बरे.
पण इथे या ब्लॉगमधील काही उताऱ्यांचे भाषांतर दिलेले आहे.

_______________________________________

ब्रह्म या संकल्पनेचे २ भाग करता येतील एक म्हणजे शून्य तर दुसरे शून्यातीत. हे जग शून्यामधुन उत्पन्न झाले असे म्हणतात. शून्यामधुन कशाचीही निर्मिती होउच कशी शकेल? या प्रश्नाचे उत्तर शोधु यात.

एक थिअरी अशी आहे की अगदी प्रारंभी आदिम अनादि नाद होताआणि नादातून जगाची उत्पत्ति झाली.पण नाद म्हणजे तर कंपन. कंपन हे तर अवकाशातच होऊ शकते. जर शून्य होते तर कंपन झाले तरी कोठे? अर्थातच नादापासून जगाची उत्पत्ती झाली ही थिअरी बाद ठरते. बायबलमध्ये म्हटले आहे की सर्वप्रथम शब्द होता व शब्द म्हणजे ईश्वर. पण आपण वरती पाहीले की ही थिअरी तर्काच्या कसोटिवरती उतरत नाही.

मग काहीही नसण्यामधुन कशाचेही अस्तित्व निर्माण होइलच कसे? हा मुलभूत प्रश्न आहे. काहीही नसण्यामधुन, फक्त काहीही नसण्याचाच जन्म होऊ शकतो.

शून्य-शून्य-शुन्य. शुन्यामधुन काही निघु शकते का? एखादी जोडी? हां हे शक्य आहे.

० = १-१
० - २-२
० = ३-३
० = १.५-१.५
० = ३.१४ - ३.१४
०= xyz - xyz
० = t - t

शून्यातून xyz म्हणजे अवकाश निघू शकले.
शून्यामधुन t म्हणजे काळ जन्म घेऊ शकला.

We have hit on the very clue to create a space and time, in which some thing can move, a vibration. Methinks, creation of space-time interval precedes the “word, the Naada” Physics tells us that space and time chasing each other creates matter which is a vortex of space-time.

अशा द्वंद्वाच्या धन-ऋण जोड्या निघाल्यानंतर शून्य थकले का तर नाही. अशा जोड्या निघतच राहू शकतात. अनंत जोड्या जन्मु शकतात.
शून्य आणि अनंत यांच्या गुणधर्मात काहीसे साम्य आहे. शून्यामधून शुन्य वजा जाता शून्य रहाते, तसेच अनंत ज्याला पूर्ण म्हणता येईल,

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात् , पूर्ण मुदच्यते,
पूर्णस्य पूर्णमादाय, पूर्ण मेवावशिष्यते|

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मी आरशात पहाते तेव्हा मला माझे प्रतिबिंब दिसते. मी जो विचार करते तोच विचार माझे प्रतिबिंब करत असणार नाही का? पण थांबा माझ्या व माझ्या प्रतिबिंबाच्यामधील काळात सूक्ष्म अंतर आहे.

*पुढे किचकट झालेले आहे. माझ्या आकलनाचा किंचित पुढे गेलेले आहे*

________________________________________________________
शिष्य - आपले नाते काय?
गुरु - काहीही नाही. शिव आणि शक्तीने आमच्याकडे तुला सोपविले आहे. आम्ही फक्त ट्रस्टी. तुझ्या पालक. पालन पोषणाची जबाबदारी घेणारे.
शि - मग तुमचे कर्तव्य काय.
गु - आधी सांगीतले तेच. आम्ही ट्रस्टी. तुला पशूतुन, माणसात आणि माणसातून देवात रुपांतर करणारे.
शि - यासर्वामागचा हेतू काय?
गु - खेळ आहे हा सर्व आणि आम्ही केवळ या खेळातील, नाटकातील पात्रे.
शि - मग जर मी दुर्जन, वाईट, पापी होण्याचे ठरविले तर?
गु - तो तुझा विकल्प आहे. आम्ही कोण तुला अडविणारे!
शि - तुम्ही माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न नाही करणार?
गु - नाही
शि - का
गु - तुझ्या प्रत्येक निर्णयात आम्ही तुझी साथ देऊ. तू जर पापी, दुर्जन,वाईट होण्याचे ठरविले तर आम्ही तुझी मदत करु. वाईट तर मग खलातील खल बनण्यास आम्ही तुला मदत करु.
शि - तुम्ही मला काय संदेश द्याल.
गु - तुला हवे ते कर. "कोहम" या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घे.
शि - ते उत्तर शोधण्यासाठी तुम्ही मला मदत नाही करणार?
गु - करु तर. ही घे हिंट - तुला वाटते त्याहून तू खूप मोठा आहेस, भव्यदिव्य आहेस. या विश्वाचा तू निर्माता आहेस.
शि - हे कसे शक्य आहे. हे विश्व तर अफाट आहे. माझ्या १०४८ पट विशाल आहे.
गु - होय आहे ना.
शि - लहानास मोठे कसे निर्माण करता येइल?
गु - लहान मोठे हा सारा भास आहे.
शि - ते कसे?
गु - आता मी तुला एक प्रश्न विचारतो. तू जन्माला येण्याआधी हे जग कुठे होते?
शि - मला माहीत नाही.
गु. - तुझ्यापश्चात हे जग कोठे असणार आहे?
शि - परत तेच उत्तर की मला माहीत नाही.
गु - असे असू शकेल का की हे जग हा तुझ्या मनाचा खेळ आहे? फक्त तुझ्या डोक्यात हे जग आहे?
शि - शक्य आहे.
गु - मग तूच या जगाचा निर्माता नाहीस तर काय आहे? याचे अस्तित्व फक्त तुझ्या डोक्यात आहे.
शि - शक्य आहे. पण ....
गु - पण काय?
शि - मि इतका क्षुद्र आहे, जग इतके विशाल आहे...
गु - आठव मगाशी आपण काय ठरविले? लहान-मोठे हे भास आहेत, कल्पनेचा खेळ आहे.
शि - असेलही. पण ते माझ्यापुरते सत्य आहे.
गु - का?
शि - जर मी जगाचा निर्माता असेन, तर हे जग माझ्या मर्जीनुसार चालले पाहीजे पण तसे होताना दिसत नाही. मी या जगाचे नियंत्रण करु शकत नाही.
गु - ज्या आईने तुला जन्म दिला तिचे तू ऐकतोस का? मग तू जन्म दिलेल्या जगाने तुझे का ऐकावे?
शि - पण मला माझे आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य आहे.
गु - अगदी बरोबर, त्याच चालीवरती, तू निर्माण केलेल्या जगाला त्याचे स्वातंत्र्य आहे.
शि - ही तर शाब्दिक कसरत झाली.
गु - तसे समज.
शि - मला संपूर्ण विश्व होण्याचा अनुभव द्या. प्रचीती द्या.
गु - मी तो अनुभव तर तुला देऊ शकत नाही पण कसा मिळवायचा ते सांगू शकतो.
शि - बरं तर मग. सांगा.
गु - थोडे विस्तारीत आहे तुला ऐकण्याइतका वेळ-ऊर्जा आहे का?
शि - आहे.
गु - तुला ३ स्थिती तर माहीतच आहेत - जागृती, स्वप्न आणि निद्रा. तू जेव्हा जागा असतोस तेव्हा त्ला आचारविचार करता येतात, काळ हा एकसलग प्रवाही असतो.स्वप्नामध्ये तू विचार करु शकतोस, परंतु क्रूती करु शकत नाही. वेळ हा टप्प्याटप्प्यात उड्या घेत जातो. निद्रावस्थेत ना तू विचार करु शकतोस ना कृती. तेव्हा काळही निद्राधीन असतो. काळ हा अवकाश आहे. चेतना ,जीवन हा त्याचा गुणधर्म. जसे ऊर्जा-पदार्थ. काळ पदार्थाची मांडणी करतो. जेव्हा चेतना नसते तेव्हा काळ विस्कळीत होतो. जितकी चेतना जागृत तितका काळ सुस्थितीत. काळ पुढेपुढे धावतो. चेतना काळास बांधुन ठेवते. काळ हा पुरुष आहे तर चेतना आहे प्रकृती. काळ शिव आहे तर जीवन, चेतना ही आहे शक्ती. चेतना असेल तरच काळ विस्कळीत न होता, बद्ध आणि व्यवस्थित असतो हेच शिवशक्ती मिलन. हेच जीवन.

*पण पुढे हाच संवाद बराच क्लिष्ट झाल्याने कळला नाही. श्रीचक्र मधील चौकोन म्हणजे सॉलिड जागृतावस्था, १६ पाकळ्या म्हणजे स्वप्नावस्था, ८ पाकळ्या निद्रावश्तेतील अमूर्त स्थिती वगैरे ....*

http://amritananda-natha-saraswati.blogspot.com/p/sambhavi-mudra-p-mulle...

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कुठाय तो गुप्त ब्लॉग?

आज गणपतीबद्दल वाचता वाचता एका ब्लॉगवर जाउन पोचले. बरीच नवी माहीती कळली. काही अत्यंत गुप्त ठेवावे असे फोटो सापडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

दादानु पूर्ण लेख वाचत चला. शेवटी लिंक दिलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

आबा सापडला का तो फोटो?
नाही तर व्यनि करते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

लज्जागौरीचा फोटो असेल तर सापडला. मला वाटलं तंत्रसाधनेचे वगैरे फोटो आहेत की काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नाही आबा. तो नाही. जाऊ देत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

आबा, (फोटोमधे) इंट्रेस्ट असेल तर नेटफ्लिक्सावर गुरु नावाची डॉक्यु आहे. पुण्यातल्या ओशो आश्रमातल्या काही प्रकारांचे मजेशिर चित्रीकरण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

तुम्ही श्रद्धेने वाचन करता हे एक बरे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रद्धाही आणि मुख्य कुतूहलही.
द्वैत-अद्वैत यावादामागील काही विचार जर ० = १-१ अशा सोप्या पद्धतीने कोणी शिकविले तर कोणाला नाही आवडणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

काहीही नॉन्सेन्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

शक्य आहे. जोवर अनुभव येत नाही तोवर माझेही मत इतके जहाल नाही पण "मे बी?" असेच आहे.
बाकी स्तोत्रे ऐकायला व वाचायला फार आवडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

**द्वैत-अद्वैत या वादामागील काही विचार**

पुढे कॅालेजमध्ये फिजिक्समध्ये १) पॅालि'ज इक्स्क्लुजन प्रिन्सपल, २) वेव -पार्टिकल नेचर ओफ लाइट या दोन गोष्टी आणि द्वैत-अद्वैत विचार यामध्ये साम्य वाटू लागले. कसे ते अदिती/गुरुजी चांगल्या तह्रेने मांडू शकतील. पहिले उदाहरण सिद्धता असलेले फिजिकल आहे तर दुसरा वाद हा मेटाफिजिकल आहे म्हणजे समजून घेण्याचा आहे. कारण एकच - जीव म्हणजे काय ते अजून कुणालाच समजलेले नाही आणि कुणा संताला समजले तरी तो इतरांना अनुभूती देऊ शकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तंत्रातील योगातील मोठीमोठी शिल्पे केरळ - तिरुवअनंतपुरम -पद्मनाभस्वामि मंदिर ( हो , तेच खजिना सापडलेले) - प्रदक्षिणा मार्गात आहेत. फोटोग्राफीला देवळात बंदी, फॅारनरना प्रवेश नसल्याने चर्चेत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहीतीबद्दल धन्यवाद 'च्रटजी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

फॅारनरना प्रवेश नसल्याने

'फॉरेनर' कसा ओळखतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फॉरीनर्स ओळखु येतात की. इतर भारतियांपेक्षा वेगळे दिसतात, वागतात. काय नबा बाल की खाल काढताय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

अहो मामी , त्यांचा पाइंट बराबर आहे . आता बघा , तुम्ही किंवा न बा तिथे गेलात तर कसे ओळखणार ते ? तुम्ही फॉरेनर नाय का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण साधारण 'च्रटजींना काय म्हणायचय ते कळतय की सर्वांना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

फॅारनरचा प्रश्न थोडासा किचकट झालेला आहे नबा. ते ओळखून सरकारच्या ASI पुरातत्त्व खात्याने प्रवेश तिकिटात फरक केला आहे. " address proof mandatory at the entry" असं छापलं आहे. मी आताच्या पुरी/कोणार्क ट्रिपमध्ये टेलिफोनबिल नेले होते. बय्राच भारतीयांकडे परदेशी नागरिकत्व/ग्रिन कार्ड आहे आणि ते ताजमहाल /कोणार्क/खजुराहो पाहण्यासाठी येतात. १०-१५रु ते १०-१५ डॅालर्स एवढ्या फरकावर सरकार पाणी सोडायला तयार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बय्राच भारतीयांकडे परदेशी नागरिकत्व/ग्रिन कार्ड आहे आणि ते ताजमहाल /कोणार्क/खजुराहो पाहण्यासाठी येतात. १०-१५रु ते १०-१५ डॅालर्स एवढ्या फरकावर सरकार पाणी सोडायला तयार नाही.

१. परदेशी नागरिकत्वाचा नि अॅड्रेस प्रूफचा संबंध काय? परदेशी नागरिकांच्या नावावर टेलिफोन बिल असू शकत नाही काय? (मान्य, 'प्रत्येक परदेशी नागरिक हा बाय डीफॉल्ट टेररिस्ट अनलेस प्रूवन अदरवाइज़ असतो' या गृहीतकाखाली तुमच्या सरकारने परदेशी नागरिकांस स्वतःच्या नावावर सिमकार्ड मिळवणे अशक्यप्राय करून ठेवलेले आहे - आणि तेही 'अच्छे दिन' येण्याच्या कित्येक वर्षे अगोदरपासून. पण लँडलाइनसुद्धा?)

२. ग्रीनकार्डधारक भारतीय तथा बरेच अन्य एनाराय हे भारतीय नागरिक असतात. त्यांनासुद्धा भुर्दंड काय म्हणून?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नक्की मुद्दा मांडता आला नाही नबा. पण address proof नसलेले भारतीय ग्रीन कार्डवाले 'माझ्या' देशासाठी दहा डॅालर्सचे तिकिट घेतील/घ्यावे का?

प्रत्यक्ष अॅड्रेस प्रुफ मागितले नाही कोणार्कला परंतू इतरही हेरिटिज साइटवर आवश्यक केले तर?
२) परदेशी विद्यार्थ्यांचे काय?

(धाग्यावर अवांतर झाले आहे इथे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेवटी,
गु = शि ?
-> गु x (दीर्घ) = शि x (दीर्घ)
-> गू = शी
हेच सार्वकालिक सत्य!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

कोणीतरी व्यनित विचारले की तंत्र म्हणजे ब्लॅक मॅजिक म्हणायचे आहे का?
उत्तर - नाही. शाक्तपंथिय देऊळ आहे. देवीपुरम. त्याबद्दल तो ब्लॉग आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

बाकी तो मार्गआपला नाही हे मला केव्हाच पटलेले आहे.
हे फक्त कुतूहल.
__________
कुतूहल वाटतं. पण हा मार्ग आपला नाही याची खात्रीच आहे. त्यांची फिलॉसॉफिच वेगळी आहे. निषिद्ध काहीच नाही त्या पंथात. असं कसं चालेल. काही गोष्टि या त्याज्यच आहेत हेच तर ओळखता येणे म्हणजे विवेक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

Blog ची लिंक (URL) दिसले नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्यनि केलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

TANTRA means technique. Tantra is non-philosophical and existential. To be philosophical, to be dogmatic, to be doctrinaire – this is easy. To tackle a problem intellectually is very easy. But to tackle a problem existentially – not just to think about it, but to live it through, to go through it, to allow yourself to be transformed through it – is difficult. That is, to know love one will have to be in love. That is dangerous because you will not remain the same. The experience is going to change you. The moment you enter love, you enter a different person. And when you come out you will not be able to recognize your old face; it will not belong to you. A discontinuity will have happened. Now there is a gap, the old man is dead and the new man has come.
http://www.oshorajneesh.com/download/osho-books/Tantra/Vigyan_Bhairav_Ta...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्म्म्म ती पीडीएफ पाहीली पण इंग्रजीत असल्याने वाचायचा क़ंटाळा करते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

आजची संध्याकाळ 'शाबर मंत्र' वाचण्यात सार्थकी घालविली. शाबर म्हणजे ग्राम्य, गावंढळ. तंत्र मार्गातील ही एक ग्राम्य शाखा आहे. भगवान शंकरांना आदिगुरु मानले जाते म्हणजे सर्व सिद्धांचे गुरु मागे बघत गेल्यास , उगम थेट शंभूशंकरापर्यंत जाउन थांबतो. तर पार्वतीस उदयगुरु म्हणतात. गुरु मच्छींद्रनाथ व गोरखनाथांना शाबर मंत्राचे जनक समजले जाते. सिद्ध आणि नाथ संप्रदायामध्ये संस्कृत् वगैरेला काट मारुन सरळ ग्रामीण भाषेतील श्लोकांना, मंत्रांचा दर्जा दिला गेलेला आहे. तर शाबर मंत्रांमध्ये शपथ आणि शाप दोन्हींचा उपयोग केला जातो, म्हणजे श्रद्धेला हात घातला जातो तर कधी धाकदपटशेने काम साध्य करुन घेतले जाते. होय मंत्रदेवतेला शिव्या, शापाची धमकी घालून वगैरे. म्हणजे इथे साधक जरी याचक असला तरी देवतेला धमकी देतो, अपशब्द बोलतो हे म्हणजे साधक जणू बालक आहे, व मंत्रदेवता जणू आई-वडील आहेत. बालकाने जर आईवडीलांना उद्देशुन अपशब्द बोलले तरी आईवडील रागावणार थोडेच आहेत? तर असे हे सरळ साधे नाते आहे. अनेक क्षेत्रिय भाषांच्या सरमिसळीने हे मंत्र बनलेत. सहसा मंत्रांचा शेवट - '‘शब्द साँचा पिण्ड काचा, फुरो मन्त्र ईश्वरी वाचा’ ' या ओळीनेही होतो. याचा अर्थ शब्द अक्षय आहे, तर देह नाशवंत आहे.
शब्द अक्षय आहे या उक्तीवरुन सहजच गुरबाणीमधील 'एक ओंकर, सत नाम, ...' कोणाला आठवेल. आणि ते तसे आठवले तर वावगे नाही.

ॐ इक ओंकार, सत नाम करता पुरुष निर्मै निर्वैर अकाल मूर्ति अजूनि सैभं गुर प्रसादि जप आदि सच, जुगादि सच है भी सच, नानक होसी भी सच –मन की जै जहाँ लागे अख, तहाँ-तहाँ सत नाम की रख ।
चिन्तामणि कल्पतरु आए कामधेनु को संग ले आए, आए आप कुबेर भण्डारी साथ लक्ष्मी आज्ञाकारी, बारां ऋद्धां और नौ निधि वरुण देव ले आए ।
प्रसिद्ध सत-गुरु पूर्ण कियो स्वार्थ, आए बैठे बिच पञ्ज पदार्थ ।
ढाकन गगन, पृथ्वी का बासन, रहे अडोल न डोले आसन, राखे ब्रह्मा-विष्णु-महेश, काली-भैरों-हनु-गणेश ।
सूर्य-चन्द्र भए प्रवेश, तेंतीस करोड़ देव इन्द्रेश ।
सिद्ध चौरासी और नौ नाथ, बावन वीर यति छह साथ ।
राखा हुआ आप निरंकार, थुड़ो गई भाग समुन्द्रों पार ।
अटुट भण्डार, अखुट अपार । खात-खरचत, कछु होत नहीं पार ।
किसी प्रकार नहीं होवत ऊना । देव दवावत दून चहूना ।
गुर की झोली, मेरे हाथ । गुरु-बचनी पञ्ज तत, बेअन्त-बेअन्त-बेअन्त भण्डार ।
जिनकी पैज रखी करतार, नानक गुरु पूरे नमस्कार ।
अन्नपूर्णा भई दयाल, नानक कुदरत नदर निहाल ।
ऐ जप करने पुरुष का सच, नानक किया बखान,
जगत उद्धारण कारने धुरों होआ फरमान ।
अमृत-वेला सच नाम जप करिए ।
कर स्नान जो हित चित्त कर जप को पढ़े, सो दरगह पावे मान ।
जन्म-मरण-भौ काटिए, जो प्रभ संग लावे ध्यान ।
जो मनसा मन में करे, दास नानक दीजे दान ।।”.

.हाच मंत्र घ्याना. यार गुरबाणीतील कितीतरी शब्दांच्या लडी समाविष्ट आहेत.
.
या मंत्राचा उगम असा आहे - द्वापारयुगात अर्जुनाने पाशुपत अस्त्र मिळवण्यासाठी शिवाची आराधना केली. शंकर प्रसन्न तर झाले पण त्यांनी अर्जुनाची परीक्षा घ्यायची ठरवली. अर्जुनाने एक डुक्कर बाणाने मारले तेच डुक्कर त्याच वेळी एका पारध्याने मारले. आणि मग अर्जुनात व त्या पारध्यात झाले युद्ध सुरु. शेवटी कृष्णानेच अर्जुनास सावध केले की अरे जे तुझे आराध्य दैवत त्यावरच बाण चालवतोस? अर्जुनाने शंकरांना साष्टांग दंडवत घालुन माफी मागीतली व शंकरांनी त्याला पाशुपत अस्त्राचा वर दिला. आता झाले काय याच वेळी हे युद्ध पहात होती पार्वती. तिने भिल्लीणीचा वेश धारण केलेला होता. युध पहात असतेवेळी तिने अन्य भिल्ल जमातीबरोबरच मांसही ग्रहण केलेले होते. युद्धोपरांत ती आपल्या मूळ रुपात आली तेव्हा तिने त्या भिल्ल-पारध्यांना वर मागण्यास सांगीतले. तेव्हा ते ग्राम्य, अडाणी पारधी म्हणाले की माते ना आम्हाला व्याकरण येतं ना आमची भाषा शुद्ध आहे. संस्कृत तर दूरच. पण तेव्हा तू असे मंत्र दे की जे सोपे, आमच्या भाषेत असतील तसेच त्यांना सिद्ध करणे अत्यंत सोपे असेल. पार्वती प्रसन्न झाल्याने शंकर म्हणजे आदिनाथांनी हेच मंत्र भिल्लांना दिले. जे की नंतर मत्स्येंद्रनाथांनी विस्तारीले. कानिफनाथ, चर्पटीनाथांनीही विस्तार केला. या मंत्रांचे मुख्य ५ प्रकार आहेत - प्रबल, बर्भर, बराटी,डार आणि अढैय्या आणि प्रत्येका प्रकाराची काही विशेषता आहे.
खरंतर हे गुप्त/सुप्त मंत्र आहेत कारण सभेत बोलले तर ते प्रभावहीन होतात. पण मला नेटवर काही सापडले ब्वॉ.

|| मन्त्र ||

सत नमो आदेश! गुरूजी को आदेश ॐ गुरूजी ,ड़ार शाबर बर्भर जागे जागे अढैया और बराट
मेरा जगाया न जागेतो तेरा नरक कुंड में वास ,दुहाई शाबरी माई की,दुहाई शाबरनाथ की ,आदेश गुरु गोरख को,

आणि मग पुढे त्या मंत्राची सिद्ध करण्याची सोपी पद्धत वगैरे नेटवर आहे. आणि मग त्या मंत्रांच्या पुनरुच्चारणाच्या काळात घोंगडिवर झोपायचे, ब्रह्मचर्य पाळायचे वगैरे नियम आहेत. सिद्ध करण्याआधी गुरु व गणेशाची पूजा करण्याची पद्धत आहे. आठवा - गणपती ही मुख्यत्वे तांत्रिक देवता आहे.

लक्ष्मी-पूजन मन्त्र
~~~~~~~~~~~~

“आवो लक्ष्मी बैठो आँगन, रोरी तिलक चढ़ाऊँ। गले में हार पहनाऊँ।। बचनों की बाँधी, आवो हमारे पास। पहला वचन श्रीराम का, दूजा वचन ब्रह्मा का, तीजा वचन महादेव का। वचन चूके, तो नर्क पड़े। सकल पञ्च में पाठ करुँ। वरदान नहीं देवे, तो महादेव शक्ति की आन।।”
.
.
.
महा-लक्ष्मी मन्त्र
~~~~~~~~~~

“राम-राम रटा करे, चीनी मेरा नाम। सर्व-नगरी बस में करुँ, मोहूँ सारा गाँव।
राजा की बकरी करुँ, नगरी करुँ बिलाई। नीचा में ऊँचा करुँ, सिद्ध गोरखनाथ की दुहाई।।”

वगैरे अनेक मंत्र आहेत.
मुख्यत्वे मी वाचल्यानुसार वशीकरण, जादू-टोणा नाश करण्याकरता, शारीरीक व्याधी नाहीशा व्हाव्या म्हणुन, किंवा इष्टदेवतेचे संरक्षण आपल्याला, आपल्या घरदाराला लाभावे म्हणुन असे हे मंत्र आहेत.
म्हणजे विद्न्यान प्रगत नसतेवेळी, मनुष्याला जे काही भय आधि (मानसिक), व्याधी (शारीरीक) होत्या त्या दूर करणासाठी तसेच धन-सौख्यप्राप्ती हेतू हे मंत्र आहेत असे दिसते.

नानक जी अन्नपूर्णा मन्त्र
ॐ सत्त नाम का सभी पसारा, धन गगन में जो वर तारा।
मन की जाय जहाँ लग आखा, तहँ तहँ सत्त नाम की राखा।
अन्नपूरना पास गई बैठाली, थुड़ो गई खुसाली।
… चिनत मनी कलप तराये। कामधेनु को साथ लियाये।
आया आप कुबेर भण्डारी, साथ लक्ष्मी आज्ञाकारी।
सत गुरू पूरन किया सवारथ, विच आ बइठे पाँच पदारथ।
राखा ब्रह्मा विशनु महेश काली भैरव हनु गनेस,
सिध चैरासी अरू नवनाथ बावन वीर जती चैसाठ।
धाकन गमन पिरथवी का वासन, रहे अम्बोल न डोले आसन।
राखा हुआ आप निरंकार, थुड़ी भाग गई समुन्दरो पार।
अतुत भण्डार, अखुत अपार, खात खरचत कुछ होय न ऊना, देव देवाये दूना चैना।
गुरू की झोली मेरे हाथ, गुरू वचनी बँधे पँच तात।
वेअण्ट बेअण्ट भण्डार, जिनकी पैज रखी करतार।
मन्तर पूरना जी का संपूरन भया।
बाबा नानकजी का गुरू के चरन कमल को नमस्ते नमस्ते नमस्ते।

एकंदर भाषा वेगळीच वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

सिरियसली ????

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोल माहीती म्हणून दिले आहे गवि. हाही प्रवाह समाजात आहे.
भाषा बघा ना कशी आहे ते. एकदम रांगडी. नाथसंप्रदायाचे प्रस्थ समाजात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

मामी तिकडं थंडगार विस्कॉन्सीनात का मिनीसोट्यात राहून तुम्ही हे असं कसं शोधता कुठेतरी ?
काय कळना झालंय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अबा शब्दांचं प्रेम आहे मला. शब्द बघा ना. आपल्या परीटघडीच्या टाय-सूट सारखे शब्द नाहीत, तटस्थ नीरीक्षण म्हणुन नोंद घेतली आहे. आता जेव्हा दिवेने नव्हते, अगदी हाकेच्या अंतरावर बिबट्या, वाघ,सापाचा वावर होता, लसी नव्हत्या, बालमृत्यू अचाट होत्रे तेव्हा या मंत्रांनी दिलासा दिलाच की. आता वीज आहे, लसी आहेत, इन्टरनेट आहे. आता काउन्सिलर आहेत, ॲबेलिफाय आणि क्लोनोपिन आहेत या जमान्यात हे सर्व आऊटडेटेडच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

तिकडे देवधर्माच्या गूढ गोष्टी ग्रुपवरती लोक बोलतायत फारच सुंदर विश्लेषण केले आहे आपण. शाबर विद्या जनहीतकारी आहे Wink इथे तुम्ही ..... शिका काहीतरी शिका!
____________
जर गोंदवलेकर महाराजांनी, रामदास स्वामींनी सांगीतलेला, 'श्रीराम जय राम जय जय राम' आपल्याला चालते तर हे मंत्र का चालत नाहीत? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक काय?
_________
अर्थात मी हे मानते की स्पेक्ट्रम आहे. अंधश्रद्ध - सश्रद्ध-अश्रद्ध असा स्प्रेक्ट्रम आहे. पण प्रत्येकजण कुठे ना कुठे आहेच ना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

शिका म्हणताय, पण सगळं नाकारल्यावर या वयात इकडे वळणं अवघड आहे हो.. एकदा स्वरचित सिनिक स्तोत्र शिकून बघा, मग मागे वळणं किती अवघड हे लक्षात येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिनिक झालं की अँग्झायटी होते. एकदम अधांतरी वाटतं, आधार जातो Sad
यापेक्षा अर्थहीन का होइना, काल्पनिक का होइना ईश्वर बरा वाटतो. जेव्हा गणपतीचे एक नाव कुळरक्षकाय नम: म्हणतो तेव्हा कुठेतरी लंगडी पण खात्री असते की आपल्या अपत्याचे रक्षणकर्ता कोणीतरी आहे, आपण त्या शक्तीस जागृत केले आहे, खरे तर भक्तीने वश केले आहे. हे एक उदाहरण झाले.
_____________
पण मग आबा एकदा म्हणाले त्याप्रमाणे, हे अंधश्रद्धा पसरविणे झाले. मान्य आहे असे लेख लिहून श्रद्धा/अंधश्रद्धेला खतपाणी मिळते. खरं तर देव ही अतिशय वैयक्तिकच बाब असायला हवी. हे मान्य आहे. पण म्हणूनच आधीच्याच मंत्रतंत्र धाग्यावरती टाकली. अजुन एक माझा स्वत:चा या मंत्रांवर/जादू-टोण्यावरही विश्वास नाही. पण तरीही मी तंत्रमार्गाबद्दल खूप वाचते. श्रीराम जय राम जय जय राम हा मला सापडलेला सर्वात मोठा आधार आहे. पण मग मी बौद्ध, शीख धर्म, तंत्र मार्ग याबद्दल वाचन करते. I have no idea why am I drawn to all this.
.
असो. स्वगत थांबवते.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

अर्थहीन का होइना, काल्पनिक का होइना ईश्वर बरा वाटतो. जेव्हा गणपतीचे एक नाव कुळरक्षकाय नम: म्हणतो तेव्हा कुठेतरी लंगडी पण खात्री असते की आपल्या अपत्याचे रक्षणकर्ता कोणीतरी आहे, आपण त्या शक्तीस जागृत केले आहे, खरे तर भक्तीने वश केले आहे.

बऱ्याच गोष्टी ultimately अर्थहीन असतात हे मान्य, पण..

अशी सगळी जाणीव झालेली असूनही स्वतःलाच मूर्ख बनवणं कसं शक्य आहे?

तुम्ही स्वतःच स्वतःला गुदगुल्या करुन घेऊन त्याद्वारे हसू शकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गवि - चंद्र दाखवायचा असेल तर झाडाच्या फांदीकडे अंगुलीनिर्देश केला तरी चालतो.
खालील स्तोत्र व मुख्य त्याचे विश्लेषण वाचा, विशेषत: हायलाइटेड्. टेंबेस्वामींच्या डोळ्यांपुढे स्तोत्र झरझर जात असे व ते लिहून काढत, ही अफाट प्रतिभा कशी काय येते? कुठुन येते? आणि अशा प्रतिभेची व्यक्ती जर म्हणते ईश्वर आहे तर आपण (मी) कोण त्याचा प्रतिवाद करणारी?
____________
अन्नपूर्णास्तोत्रम्
श्रीदेवि दर्शनीयेऽशा ऐद्याद्या अंबिके तव ।
भव्ये दत्ताभये ताभिर् र्‍हीं बीजेन नतानव ॥ १ ॥
गत्ये मात्रे नमस्तेऽस्तु श्रीगाये पूर्णसंविदे ।
वस मे योगिनि स्वांते क्लींमयेऽर्णेश्र्वरेश्र्वरि ॥ २ ॥
दक्षे सहस्त्रवक्त्रस्ते न वेत्ति सकलान्गुणान् ।
वदेत् कोरिःष्टदे सर्वान् मोक्षसंदात्रि ते गुणान् ॥ ३ ॥
धूताद्ये कृपया पाहि भगवत् पूज्य पादुके ।
तमः पूष्ण इवाविद्या गतापर्णे तवेक्षणात् ॥ ४ ॥
पतिता उध्दृतास्ते हि वरदे शंकरप्रिये ।
दयाजन्महराचेत्ते तिष्ठेद्धि कथमावृतिः ॥ ५ ॥
कस्ते चित्तार्तिहे वेत्ता मान्येऽमऽर मनोतिगे ।
मम ज्ञानं कियत्प्राज्ञि हे शंभुप्राणवल्लभे ॥ ६ ॥
लसद्वेदनुते द्वास्थश्र्ववद्गणय मामुमे ।
भ्रमप्रदार्थवादाऽयेरिप्राया वञ्चितोस्मि तेः ॥ ७ ॥
मर्त्योर्भोय इहांबाया अंके संल्लभतेर्थितम् ।
रक्षिता कः च मे ह्यार्ये नतेर्भो भेद दर्शिनि ॥ ८ ॥
वासना मुक्तिकृद्देवि पूर्णविज्ञानदायिनि ।
सुखदे नित्यमांगल्येऽर्णेशे ध्यानमुपाविश ॥ ९ ॥
देवा अर्दितशांत्यर्थमलं तेवैत्वदीरिताः ।
वासनागंधो मे मास्तु मानादेरार्तिदोत्र यः ॥ १० ॥
नंदिनी बलिनी ब्राह्मी भिक्षाभाग्यविवर्धिनी ।
दयाब्धिरोजस्विनीड्या लक्ष्मीस्त्वं सिद्धिरुपिणी ॥ ११ ॥
सत्येऽस्यंऽबा कृपांभोभिषिञ्चात्रघ्यधिपालके ।
रक्ष्यो बालः स्वको मात्रा तत्वतोर्थ ब्रवीमि ते ॥ १२ ॥
स्वल्पज्ञोऽपि शठोऽदांतो मंदो वाभिमतोऽपि वा ।
तीव्रमाशापरो वायं न चोपेक्षां शिवेर्हति ॥ १३ ॥
भिया नचोक्तवांन्शब्दान्देवेड्ये देहि कांक्षितम् ।
क्षुच्छांत्यै ज्ञानभिक्षात्रं हितज्ञे हि तमर्पय ॥ १४ ॥
कृपयाऽनस्तमितया देहि ते चरणे रतिम् ।
तपोदे सादरं याचे हितं मे पारदे कुरु ॥ १५ ॥
स्तवे तेगह्यशक्तं मां स्वान्ते शर्वप्रिये स्मर ।
वर्ये वरः स एवार्थो हार्दज्ञेऽतिथिवल्लभे ॥ १६ ॥
इति प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचित अन्नपूर्णास्तोत्रं संपूर्णम् ॥
अन्नपूर्णास्तोत्र मराठी अर्थः
हे अन्नपूर्णास्तोत्र प.प.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये स्वामी) यांनी रचिलेले आहे. प्रतिभा आणि विद्वता यांचा अभूतपूर्व आविष्कार या स्तोत्रांत दिसून येतो. श्री स्वामी म्हणत असत की मला शब्द समोर दिसतात आणि ते शब्द मी जसेच्या तसे उतरवून काढतो.
अर्थः १) हे देवी अंबिकामाते, तू अत्यंत दर्शनीय, सौंदर्यवान आहेस. तू समृद्धीदात्री आहेस. ऐंद्री आदि देवता म्हणजे तुझेच अंश आहेत. त्या सर्व अंशमय देवतांसह तू आम्हाला अभयदान देतेस. ‘र्‍हीं ‘ या बीजमंत्राने तुला नमन करणार्‍या, तुझी स्तुति करणार्‍या भक्तांचे तू संरक्षण कर.
२) हे माते, तूच आमचे शेवटचे आश्रयस्थान आहेस. तुला आमचे प्रणाम असोत. हे योगिनी तू अखंड चैत्यरुपिणी आहेस. सर्व जण तुझी ‘श्रीं’ या बीजमंत्राने स्तुति करतात. तू ‘क्लीं’ बीजमय आहेस. हे महेश्र्वरस्वामिनी तू आमच्या अंत:करणांत येऊन रहा.
३) सदासर्वदा भक्तकल्याणासाठी जागृत राहणार्‍या हे दक्षपुत्री अन्नपूर्णामाते, हजार मुखांचा शेषनागसुद्धा तुझ्या गुणांचे वर्णन करु शकत नाही. तू आमचे संकटांपासून रक्षण करतेस. आम्हाला मोक्षरुपी दान देतेस. हे माते तुझ्या गुणांचे वर्णन कोण करु शकेल? (तर हे वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही असे तुझे अनंत गुण आहेत.)
४) हे परमपावन आदिमाये, सर्व देव तुझ्या चरणांना पूजनीय मानतात. हे अपर्णे पार्वतीमाते, तुझ्या केवळ दृष्टीक्षेपानेच, जसा सूर्यापुढे अंधकार नाहीसा होतो, तसे आमचे अज्ञान नाहीसे होते.
५) हे वरदायिनी, तू भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहेस. तुझ्या केवळ दृष्टीक्षेपानेच पतितांचा उद्धार होतो. हे माते तुझ्या कृपेने भक्तांची जन्ममृत्युच्या फेर्‍यांतून मुक्तता होते. मग पुनर्जन्म कसा होणार.
६) हे चिंता, क्लेश हरण करणार्‍या प्रज्ञावती, आदरणीय देवते, तू देवांच्याही मनशक्ती पलीकडे आहेस. तर मग शंकरप्राणप्रिये माझे अल्प ज्ञान तुला जाणण्यास कसे समर्थ असेल?
७) हे वेदांनी स्तुति केलेल्या तेजस्विनी देवते, तू मला तुझ्या द्वारी उभा असलेला कुत्राच समज. माझ्या मनांत भ्रम उत्पन्न करणारे, शत्रुवत वाटणारे जे अर्थवाद (स्तुतिपर आणि/किंवा निंदापर वाक्ये) आहेत. त्यांनी माझी फसवणूक केली आहे.
८) हे माते, या मर्त्यलोकांतील हे तुझे बालक तुझ्या मांडीवर पहुडले की त्याला पाहिजे ते मिळवते. हे श्रेष्ठमाते तुझ्या चरणी नम्र झालेल्यांना तू द्वैत-अद्वैतज्ञान तू देतेस. माते तुझ्याशिवाय कोण आमचे रक्षण करु शकेल?
९) हे अक्षरवर्णस्वामिनी तू भक्तांना संपूर्ण ज्ञान देतेस. त्यांची वासनांपासून मुक्तता करतेस. त्यांना सर्व प्रकारचे सुख देतेस. हे नित्यमंगलमाते माझ्या ध्यानांत तू प्रकट हो.
१०) देवसुद्धा त्यांना त्रस्त करणार्‍या पीडांची शांती करुन घेण्यासाठी तुझ्याकडे आले म्हणजे तुझ्या प्रेरणेने सुखी होतात. हे माते, अहंकार आदि वासनागंधाचा मला त्रास न होवो.
११) हे माते, तू आनंददायिनी, शक्तीनी आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्मस्वरुपिणी आहेस. तू दयेचा सागर आहेस. तुझी स्तुति करावी तेवढी कमीच आहे. तू अत्यंत तेजस्विनी आणि सर्व सिद्धींचेरुप असलेली प्रत्यक्ष लक्ष्मी आहेस. १२) हे सर्वसंरक्षणदात्री, तू खरोखर सर्वांची माता आहेस. तू आपल्या कृपारुपी जलाने या बालकाला (मला) स्नान घाल. या बालकावर सतत कृपेचा वर्षाव कर. आईने बालकाचे रक्षण करावे हे तत्व मी तुला कसे सांगू? (ते तुला माहितच आहे.)
१३) हे परमपावन माते, हा तुझा बाळ जरी बुद्धिहीन, लबाड, असंयमी, मंद व तुला आवडणारा असला/नसला तरी तुझ्याकडे अत्यंत आशेने आलेला असल्याने त्याची तू उपेक्षा करणे योग्य नाही. (तू त्याची उपेक्षा करु नकोस.)
१४) हे देवपूजिते माते, केवळ कसे सांगावे या भीतीने भक्त जरी काही न बोलला तरी त्याला पाहिजे आहे ते दे. हे भक्तांचे हित जाणणार्‍या माते, त्याची भूक भागावी म्हणून त्याला ज्ञानरुपी भिक्षान्न दे.
१५) हे माते, तुझ्या कधीच न मावळणार्‍या कृपेने तू मला तुझ्या चरणांची निरंतर भक्ती दे. हे तपःसामर्थ्य देणार्‍या माते, तू सर्व दुःखांचा अंत करणारी आहेस. मी अत्यंत आदराने तुझ्याकडे याचना करतो की माझ्यासाठी जे जे हितकर आहे ते ते सारे तू कर.
१६) हे माते तू शिवप्रिया आहेस. तुला अतिथी अत्यंत प्रिय असतात. तू सर्वांचे मन जाणतेस. खरे म्हणजे तुझी स्तुति करण्यास मी अत्यंत असमर्थ आहे. जो वर मागणे योग्य आहे तोच वर मी तुझ्याकडे मागतो आहे. अशारीतीने प.पू. वासुदेवानंदसरस्वती विरचित हे अन्नपूर्णास्तोत्र संपूर्ण झाले.
स्तोत्राची अधिक विस्मयकारक माहितीः
हे स्तोत्र एकंदर सोळा श्र्लोकांचे आहे.
त्यातील प्रत्येक श्लोकांतील पहिले अक्षर घेतले तर तयार होणार्‍या वाक्यांत श्री टेंब्येस्वामीनी आपले नांव गुंफले आहे. तयार होणारे वाक्य खालील प्रमाणेः
॥ श्रीभगवतअवधूतपदकमलभ्रमर वासुदेवानंद सरस्वतीभिक्षुकृत स्तव ॥
अशा प्रकारे आपले नांव गुंफले आहे.
प्रत्येक श्लोकांतील चवथे अक्षर घेतले तर,
दत्तात्रेयो हरिः कृष्ण उन्मत्तानंददायकः ।
मुनिदिगंबरो बालः पिशाचो ज्ञानसागरः ॥
असा मंत्रयुक्त श्लोक तयार होतो.
प्रत्येक श्लोकांतील नववे अक्षर घेतले तर,
ऐं र्‍हीं श्रीं क्लीं नमो भगवति माहेश्र्वरि अन्नपूर्णे, ममाभिलषितमनन्देहि देहि स्वाहा ।
(मम अभिलषितं अनंते देहि देहि स्वाहा ।) असा श्री अन्नपूर्णादेवीचा बीजयुक्त मंत्र तयार होतो.
प्रत्येक श्लोकांतील बारावे अक्षर घेतले तर,
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राणवल्लभे ।
ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वति ॥
असा मंत्रयुक्त श्लोक तयार होतो.
अशा प्रकारच्या स्तोत्राला ‘मंत्रगर्भस्तोत्र’ असे म्हणतात.

या स्तोत्राचा पाठ केल्याने स्तोत्रांतर्गत सर्व मंत्रांचा अभिनव पद्धतीने आपोआप पाठ होऊन अन्नपूर्णादेवीची कृपा होते.
या स्तोत्राचा मराठी अर्थ आणि वरील माहिती “शक्तिस्तोत्रे” या श्री काशिनाथ दत्तात्रेय समुद्र यांच्या पुस्तकांतून साभार घेतली आहे.

साभार - http://ioustotra.blogspot.com/2013/04/shree-annapurna-stotram.html

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

चला गाण्याच्या धाग्यावर.. गाण्यागिण्याचं बोलू..

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ये हुई ना बात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

मंत्रातंत्राचा दृष्य परिणाम : काविळ उतरवणे. हे आमच्या भागात कित्येक वर्षे चालू होते.
लागणारा वेळ एकदोन मिनिटे. दोन-पाच रुपये ऐच्छिक .
काविळ रुग्णाने हात परातीतल्या पाण्यात ठेवायचे. मांत्रिक एक चुन्याची छोटी पुडी ( पानवाल्याकडे मिळते ती) पाण्यात टाकतो. दुर्वांच्या जुडीने हातांवर वरून खाली फिरवतो. पाणी पिवळे पडत जाते,काविळ उतरते. एखाद्यास दोन दिवसांनी पुन्हा येण्यास सांगतो.

यास अनिसवाल्यांनी ( अंधश्रद्धा निर्मुलनवाले) कधी आक्षेप घेतला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कावीळ उतरते म्हणजे बरी होते ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय.
शिवाय यात अघोरी काहीच नाही. तो मांत्रिकही अगदी फाटका असतो. लोभी नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका एमडी डाॅक्टरने सांगितले की यावर तुम्हाला तात्पुरता आराम पडणारी औषधं मिळतील पण...
अखेर उतारावी लागलेली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

आहे त्या डॉक्टरांची.
हा विषाणूजन्य रोग असीक्लोव्हिर नावाच्या गोळ्यांनी लगेच आटोक्यात येतो. गोळ्या थोड्या महाग आहेत पण. इतर कोणत्याही झाडपाल्यावर, मंत्रा-तंत्रावर अजिबात विश्वास ठेवू नये

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

त्याच घेतलेल्या. पण आग कमी होत नसे.
झाडपाला नाही, मंत्र... ते खरं की खोटं माहीत नाही पण फरक जाणवतो, ताबडतोब.
मी स्वत: विंचू चढवताना (नबा, टँप्लीज) व उतरवताना पाहिला आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

नागिण विषाणूजन्य आहे- मान्य.
-------------
लेखातल्या विषयाकडे वळून -
पुर्वी ( नबा, टॅम्प्लीज) आताही या तीन कारणांसाठी लोक मंत्रतंत्रावर विश्वास ठेवायला तयार आहेत. -
- संतती,
- गुप्तधन प्राप्ती,
- वशिकरण,
- गुप्तविद्या, वस्तु लंपास करणे इत्यादी.
- जारणमारण ( एखाद्या वारसाला वेडे करून प्रापटी हडप॥ हॅम्लेट.)
- शत्रुचा नायनाट, ( स्थानिक वैर वगैरे. मंतरलेला खिळा ठोकणे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाश्चात्यांमधील एंजल्स, विचक्राफ्ट, सायकिक तेच आहे. प्रकार तोच - गूढ, अमानविय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.... मेरा खींचती है आँचल मन मीत तेरी हर पुकार

काही जादू वाटतील अशी तंत्रं मला अवगत आहेत. एक तंत्र वापरलं की सकाळी रोज त्याच वेळी जाग येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

...तपश्चर्येने आम्ही काबू मिळविला आहे. एक हात लांब करून मारल्याने झोपेची वेळ एका खेपेस पंधरा मिनिटांनी वाढविता येते. (किंवा, विकल्पाने, एकाच फटक्यात उठण्याची वेळ अनिश्चित काळाकरिता स्थगित करता येते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मित्राकडून मोबाइल( टचस्क्रीन) कसा असतो ते पाहण्यासाठी घेतलेला संध्याकाळी. पहाटे त्यातून कोंबडं आरवायला लागलं. हात मारला पण थांबेचना. मग उशी दडपली त्यावर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुट्टीच्या दिवशी मी असंच करतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी