तंत्र-मंत्र विषयक ....
तंत्राबद्दल वाचताना हे पदोपदी वाचले गेलेले आहे की या पंथात त्याज्य काहीही नाही, टाकाऊ, घृणास्पद काहीही नाही. किंबहुना ही घृणेची भावना मारण्यासाठिचे अघोरी उपाय पहाता या पंथाची भीतीच वाटते.
आज गणपतीबद्दल वाचता वाचता एका ब्लॉगवर जाउन पोचले. बरीच नवी माहीती कळली. काही अत्यंत गुप्त ठेवावे असे फोटो सापडले. मला या पंथाची फारशी माहीतीही नाही आणि करुन घेण्याची इच्छाही नाही.
आपले गुरु नानक, श्रीराम असे सात्विक संत देव बरे.
पण इथे या ब्लॉगमधील काही उताऱ्यांचे भाषांतर दिलेले आहे.
_______________________________________
ब्रह्म या संकल्पनेचे २ भाग करता येतील एक म्हणजे शून्य तर दुसरे शून्यातीत. हे जग शून्यामधुन उत्पन्न झाले असे म्हणतात. शून्यामधुन कशाचीही निर्मिती होउच कशी शकेल? या प्रश्नाचे उत्तर शोधु यात.
एक थिअरी अशी आहे की अगदी प्रारंभी आदिम अनादि नाद होताआणि नादातून जगाची उत्पत्ति झाली.पण नाद म्हणजे तर कंपन. कंपन हे तर अवकाशातच होऊ शकते. जर शून्य होते तर कंपन झाले तरी कोठे? अर्थातच नादापासून जगाची उत्पत्ती झाली ही थिअरी बाद ठरते. बायबलमध्ये म्हटले आहे की सर्वप्रथम शब्द होता व शब्द म्हणजे ईश्वर. पण आपण वरती पाहीले की ही थिअरी तर्काच्या कसोटिवरती उतरत नाही.
मग काहीही नसण्यामधुन कशाचेही अस्तित्व निर्माण होइलच कसे? हा मुलभूत प्रश्न आहे. काहीही नसण्यामधुन, फक्त काहीही नसण्याचाच जन्म होऊ शकतो.
शून्य-शून्य-शुन्य. शुन्यामधुन काही निघु शकते का? एखादी जोडी? हां हे शक्य आहे.
० = १-१
० - २-२
० = ३-३
० = १.५-१.५
० = ३.१४ - ३.१४
०= xyz - xyz
० = t - t
शून्यातून xyz म्हणजे अवकाश निघू शकले.
शून्यामधुन t म्हणजे काळ जन्म घेऊ शकला.
We have hit on the very clue to create a space and time, in which some thing can move, a vibration. Methinks, creation of space-time interval precedes the “word, the Naada” Physics tells us that space and time chasing each other creates matter which is a vortex of space-time.
अशा द्वंद्वाच्या धन-ऋण जोड्या निघाल्यानंतर शून्य थकले का तर नाही. अशा जोड्या निघतच राहू शकतात. अनंत जोड्या जन्मु शकतात.
शून्य आणि अनंत यांच्या गुणधर्मात काहीसे साम्य आहे. शून्यामधून शुन्य वजा जाता शून्य रहाते, तसेच अनंत ज्याला पूर्ण म्हणता येईल,
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात् , पूर्ण मुदच्यते,
पूर्णस्य पूर्णमादाय, पूर्ण मेवावशिष्यते|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मी आरशात पहाते तेव्हा मला माझे प्रतिबिंब दिसते. मी जो विचार करते तोच विचार माझे प्रतिबिंब करत असणार नाही का? पण थांबा माझ्या व माझ्या प्रतिबिंबाच्यामधील काळात सूक्ष्म अंतर आहे.
*पुढे किचकट झालेले आहे. माझ्या आकलनाचा किंचित पुढे गेलेले आहे*
________________________________________________________
शिष्य - आपले नाते काय?
गुरु - काहीही नाही. शिव आणि शक्तीने आमच्याकडे तुला सोपविले आहे. आम्ही फक्त ट्रस्टी. तुझ्या पालक. पालन पोषणाची जबाबदारी घेणारे.
शि - मग तुमचे कर्तव्य काय.
गु - आधी सांगीतले तेच. आम्ही ट्रस्टी. तुला पशूतुन, माणसात आणि माणसातून देवात रुपांतर करणारे.
शि - यासर्वामागचा हेतू काय?
गु - खेळ आहे हा सर्व आणि आम्ही केवळ या खेळातील, नाटकातील पात्रे.
शि - मग जर मी दुर्जन, वाईट, पापी होण्याचे ठरविले तर?
गु - तो तुझा विकल्प आहे. आम्ही कोण तुला अडविणारे!
शि - तुम्ही माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न नाही करणार?
गु - नाही
शि - का
गु - तुझ्या प्रत्येक निर्णयात आम्ही तुझी साथ देऊ. तू जर पापी, दुर्जन,वाईट होण्याचे ठरविले तर आम्ही तुझी मदत करु. वाईट तर मग खलातील खल बनण्यास आम्ही तुला मदत करु.
शि - तुम्ही मला काय संदेश द्याल.
गु - तुला हवे ते कर. "कोहम" या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घे.
शि - ते उत्तर शोधण्यासाठी तुम्ही मला मदत नाही करणार?
गु - करु तर. ही घे हिंट - तुला वाटते त्याहून तू खूप मोठा आहेस, भव्यदिव्य आहेस. या विश्वाचा तू निर्माता आहेस.
शि - हे कसे शक्य आहे. हे विश्व तर अफाट आहे. माझ्या १०४८ पट विशाल आहे.
गु - होय आहे ना.
शि - लहानास मोठे कसे निर्माण करता येइल?
गु - लहान मोठे हा सारा भास आहे.
शि - ते कसे?
गु - आता मी तुला एक प्रश्न विचारतो. तू जन्माला येण्याआधी हे जग कुठे होते?
शि - मला माहीत नाही.
गु. - तुझ्यापश्चात हे जग कोठे असणार आहे?
शि - परत तेच उत्तर की मला माहीत नाही.
गु - असे असू शकेल का की हे जग हा तुझ्या मनाचा खेळ आहे? फक्त तुझ्या डोक्यात हे जग आहे?
शि - शक्य आहे.
गु - मग तूच या जगाचा निर्माता नाहीस तर काय आहे? याचे अस्तित्व फक्त तुझ्या डोक्यात आहे.
शि - शक्य आहे. पण ....
गु - पण काय?
शि - मि इतका क्षुद्र आहे, जग इतके विशाल आहे...
गु - आठव मगाशी आपण काय ठरविले? लहान-मोठे हे भास आहेत, कल्पनेचा खेळ आहे.
शि - असेलही. पण ते माझ्यापुरते सत्य आहे.
गु - का?
शि - जर मी जगाचा निर्माता असेन, तर हे जग माझ्या मर्जीनुसार चालले पाहीजे पण तसे होताना दिसत नाही. मी या जगाचे नियंत्रण करु शकत नाही.
गु - ज्या आईने तुला जन्म दिला तिचे तू ऐकतोस का? मग तू जन्म दिलेल्या जगाने तुझे का ऐकावे?
शि - पण मला माझे आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य आहे.
गु - अगदी बरोबर, त्याच चालीवरती, तू निर्माण केलेल्या जगाला त्याचे स्वातंत्र्य आहे.
शि - ही तर शाब्दिक कसरत झाली.
गु - तसे समज.
शि - मला संपूर्ण विश्व होण्याचा अनुभव द्या. प्रचीती द्या.
गु - मी तो अनुभव तर तुला देऊ शकत नाही पण कसा मिळवायचा ते सांगू शकतो.
शि - बरं तर मग. सांगा.
गु - थोडे विस्तारीत आहे तुला ऐकण्याइतका वेळ-ऊर्जा आहे का?
शि - आहे.
गु - तुला ३ स्थिती तर माहीतच आहेत - जागृती, स्वप्न आणि निद्रा. तू जेव्हा जागा असतोस तेव्हा त्ला आचारविचार करता येतात, काळ हा एकसलग प्रवाही असतो.स्वप्नामध्ये तू विचार करु शकतोस, परंतु क्रूती करु शकत नाही. वेळ हा टप्प्याटप्प्यात उड्या घेत जातो. निद्रावस्थेत ना तू विचार करु शकतोस ना कृती. तेव्हा काळही निद्राधीन असतो. काळ हा अवकाश आहे. चेतना ,जीवन हा त्याचा गुणधर्म. जसे ऊर्जा-पदार्थ. काळ पदार्थाची मांडणी करतो. जेव्हा चेतना नसते तेव्हा काळ विस्कळीत होतो. जितकी चेतना जागृत तितका काळ सुस्थितीत. काळ पुढेपुढे धावतो. चेतना काळास बांधुन ठेवते. काळ हा पुरुष आहे तर चेतना आहे प्रकृती. काळ शिव आहे तर जीवन, चेतना ही आहे शक्ती. चेतना असेल तरच काळ विस्कळीत न होता, बद्ध आणि व्यवस्थित असतो हेच शिवशक्ती मिलन. हेच जीवन.
*पण पुढे हाच संवाद बराच क्लिष्ट झाल्याने कळला नाही. श्रीचक्र मधील चौकोन म्हणजे सॉलिड जागृतावस्था, १६ पाकळ्या म्हणजे स्वप्नावस्था, ८ पाकळ्या निद्रावश्तेतील अमूर्त स्थिती वगैरे ....*
प्रतिक्रिया
कुठाय तो गुप्त ब्लॉग?
कुठाय तो गुप्त ब्लॉग?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
दादानु पूर्ण लेख वाचत चला.
दादानु पूर्ण लेख वाचत चला. शेवटी लिंक दिलेली आहे.
आबा सापडला का तो फोटो?
आबा सापडला का तो फोटो?
नाही तर व्यनि करते.
लज्जागौरीचा फोटो असेल तर
लज्जागौरीचा फोटो असेल तर सापडला. मला वाटलं तंत्रसाधनेचे वगैरे फोटो आहेत की काय?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
नाही आबा. तो नाही. जाऊ देत.
नाही आबा. तो नाही. जाऊ देत.
आबा, (फोटोमधे) इंट्रेस्ट असेल
आबा, (फोटोमधे) इंट्रेस्ट असेल तर नेटफ्लिक्सावर गुरु नावाची डॉक्यु आहे. पुण्यातल्या ओशो आश्रमातल्या काही प्रकारांचे मजेशिर चित्रीकरण आहे.
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
तुम्ही श्रद्धेने वाचन करता हे
तुम्ही श्रद्धेने वाचन करता हे एक बरे आहे.
श्रद्धाही आणि मुख्य कुतूहलही.
श्रद्धाही आणि मुख्य कुतूहलही.
द्वैत-अद्वैत यावादामागील काही विचार जर ० = १-१ अशा सोप्या पद्धतीने कोणी शिकविले तर कोणाला नाही आवडणार?
माझं मत.
काहीही नॉन्सेन्स.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
शक्य आहे. जोवर अनुभव येत नाही
शक्य आहे. जोवर अनुभव येत नाही तोवर माझेही मत इतके जहाल नाही पण "मे बी?" असेच आहे.
बाकी स्तोत्रे ऐकायला व वाचायला फार आवडतात.
**द्वैत-अद्वैत या वादामागील
**द्वैत-अद्वैत या वादामागील काही विचार**
पुढे कॅालेजमध्ये फिजिक्समध्ये १) पॅालि'ज इक्स्क्लुजन प्रिन्सपल, २) वेव -पार्टिकल नेचर ओफ लाइट या दोन गोष्टी आणि द्वैत-अद्वैत विचार यामध्ये साम्य वाटू लागले. कसे ते अदिती/गुरुजी चांगल्या तह्रेने मांडू शकतील. पहिले उदाहरण सिद्धता असलेले फिजिकल आहे तर दुसरा वाद हा मेटाफिजिकल आहे म्हणजे समजून घेण्याचा आहे. कारण एकच - जीव म्हणजे काय ते अजून कुणालाच समजलेले नाही आणि कुणा संताला समजले तरी तो इतरांना अनुभूती देऊ शकत नाही.
तंत्र शिल्पे
तंत्रातील योगातील मोठीमोठी शिल्पे केरळ - तिरुवअनंतपुरम -पद्मनाभस्वामि मंदिर ( हो , तेच खजिना सापडलेले) - प्रदक्षिणा मार्गात आहेत. फोटोग्राफीला देवळात बंदी, फॅारनरना प्रवेश नसल्याने चर्चेत नाहीत.
माहीतीबद्दल धन्यवाद 'च्रटजी.
माहीतीबद्दल धन्यवाद 'च्रटजी.
?
'फॉरेनर' कसा ओळखतात?
फॉरीनर्स ओळखु येतात की. इतर
फॉरीनर्स ओळखु येतात की. इतर भारतियांपेक्षा वेगळे दिसतात, वागतात. काय नबा बाल की खाल काढताय.
अहो मामी , त्यांचा पाइंट
अहो मामी , त्यांचा पाइंट बराबर आहे . आता बघा , तुम्ही किंवा न बा तिथे गेलात तर कसे ओळखणार ते ? तुम्ही फॉरेनर नाय का ?
पण साधारण 'च्रटजींना काय
पण साधारण 'च्रटजींना काय म्हणायचय ते कळतय की सर्वांना.
फॅारनरचा प्रश्न थोडासा किचकट
फॅारनरचा प्रश्न थोडासा किचकट झालेला आहे नबा. ते ओळखून सरकारच्या ASI पुरातत्त्व खात्याने प्रवेश तिकिटात फरक केला आहे. " address proof mandatory at the entry" असं छापलं आहे. मी आताच्या पुरी/कोणार्क ट्रिपमध्ये टेलिफोनबिल नेले होते. बय्राच भारतीयांकडे परदेशी नागरिकत्व/ग्रिन कार्ड आहे आणि ते ताजमहाल /कोणार्क/खजुराहो पाहण्यासाठी येतात. १०-१५रु ते १०-१५ डॅालर्स एवढ्या फरकावर सरकार पाणी सोडायला तयार नाही.
त्रुटी
१. परदेशी नागरिकत्वाचा नि अॅड्रेस प्रूफचा संबंध काय? परदेशी नागरिकांच्या नावावर टेलिफोन बिल असू शकत नाही काय? (मान्य, 'प्रत्येक परदेशी नागरिक हा बाय डीफॉल्ट टेररिस्ट अनलेस प्रूवन अदरवाइज़ असतो' या गृहीतकाखाली तुमच्या सरकारने परदेशी नागरिकांस स्वतःच्या नावावर सिमकार्ड मिळवणे अशक्यप्राय करून ठेवलेले आहे - आणि तेही 'अच्छे दिन' येण्याच्या कित्येक वर्षे अगोदरपासून. पण लँडलाइनसुद्धा?)
२. ग्रीनकार्डधारक भारतीय तथा बरेच अन्य एनाराय हे भारतीय नागरिक असतात. त्यांनासुद्धा भुर्दंड काय म्हणून?
नक्की मुद्दा मांडता आला नाही
नक्की मुद्दा मांडता आला नाही नबा. पण address proof नसलेले भारतीय ग्रीन कार्डवाले 'माझ्या' देशासाठी दहा डॅालर्सचे तिकिट घेतील/घ्यावे का?
प्रत्यक्ष अॅड्रेस प्रुफ मागितले नाही कोणार्कला परंतू इतरही हेरिटिज साइटवर आवश्यक केले तर?
२) परदेशी विद्यार्थ्यांचे काय?
(धाग्यावर अवांतर झाले आहे इथे)
शेवटी,
शेवटी,
गु = शि ?
-> गु x (दीर्घ) = शि x (दीर्घ)
-> गू = शी
हेच सार्वकालिक सत्य!
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
कोणीतरी व्यनित विचारले की
कोणीतरी व्यनित विचारले की तंत्र म्हणजे ब्लॅक मॅजिक म्हणायचे आहे का?
उत्तर - नाही. शाक्तपंथिय देऊळ आहे. देवीपुरम. त्याबद्दल तो ब्लॉग आहे
बाकी तो मार्गआपला नाही हे मला
बाकी तो मार्गआपला नाही हे मला केव्हाच पटलेले आहे.
हे फक्त कुतूहल.
__________
कुतूहल वाटतं. पण हा मार्ग आपला नाही याची खात्रीच आहे. त्यांची फिलॉसॉफिच वेगळी आहे. निषिद्ध काहीच नाही त्या पंथात. असं कसं चालेल. काही गोष्टि या त्याज्यच आहेत हेच तर ओळखता येणे म्हणजे विवेक.
URL दिसले नाही
Blog ची लिंक (URL) दिसले नाही
व्यनि केलेली आहे.
व्यनि केलेली आहे.
Osho Rajneesh on Tantra
TANTRA means technique. Tantra is non-philosophical and existential. To be philosophical, to be dogmatic, to be doctrinaire – this is easy. To tackle a problem intellectually is very easy. But to tackle a problem existentially – not just to think about it, but to live it through, to go through it, to allow yourself to be transformed through it – is difficult. That is, to know love one will have to be in love. That is dangerous because you will not remain the same. The experience is going to change you. The moment you enter love, you enter a different person. And when you come out you will not be able to recognize your old face; it will not belong to you. A discontinuity will have happened. Now there is a gap, the old man is dead and the new man has come.
http://www.oshorajneesh.com/download/osho-books/Tantra/Vigyan_Bhairav_Ta...
ह्म्म्म ती पीडीएफ पाहीली पण
ह्म्म्म ती पीडीएफ पाहीली पण इंग्रजीत असल्याने वाचायचा क़ंटाळा करते आहे.