पद्मावत- आत्मा परमात्मा मिलनाची गाथा

प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण नाही. शिवाच्या प्राप्तीसाठी पार्वतीला कठोर तपस्या करावी लागली अमीर खुसरो यांनी म्हंटले आहे:

खुसरो रैन सुहाग की जागी पी के संग,
तन मेरो मन पिऊ को दोउ भए इक रंग.

संसार रुपी रात्र जागून काढल्या शिवाय प्रेमाची प्राप्ती नाही. प्रेम हे अलौकिक आहे. प्रेम म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन. पद्मावतच्या कथा हि आत्म्याचे परमात्म्याशी मिलनाची कथा आहे. पद्मावत महाकाव्याची कथा संक्षेप मध्ये सांगताना महाकवी जायसी म्हणतात

तन चितउर, मन राजा कीन्हा हिय सिंघल, बुधि पदमिनि चीन्हा।
गुरू *सुआ जेई पन्थ देखावा बिनु गुरू जगत को निरगुन पावा?
नागमती यह दुनिया–धंधा।बाँचा सोइ न एहि चित बंधा।।
राघव दूत सोई सैतानू।माया अलाउदीं सुलतानू”।।

चित्तोडगढ हे माणसाचे शरीर आहे. रत्नसेन नावाचा आत्मा या शरीरात विराजमान आहे. त्याच्या मनात परमेश्वराच्या प्राप्तीची इच्छा आहे. गुरु बिना परमेश्वराची प्राप्ती संभव नाही. हिरामन नावाचा पोपट हा गुरु आहे. तो रत्नसेनला मार्ग दाखवितो. सिंहल द्वीप हे प्रेमाने भरलेले हृदय आहे. या सिंहल द्वीपात वाघ आणि बकरी एकाच घाटावर पाणी पितात. अर्थात हे हृदय प्रेमाने भरलेले आहे. सात्विक बुद्धी रुपी पद्मावती तिथे निवास करते. शरीररुपी चित्तोड मध्ये तांत्रिक राघव चेतन नावाचा शैतान हि राहतो. त्याच्या पाशी मायावी शक्ती होत्या. तो चंद्र्माच्या कला हि आपल्या शैतानी मायेच्या शक्तीने बदलू शकत होता. पद्मावती चित्तोडला येते. राघव चेतन नावाच्या शैतानाला देश निकाला दिला जातो. अर्थात ज्या हृदयात सात्विक बुद्धी आहे तिथे शैतान निवास करू शकत नाही. अलाउद्दीन खिलजी हा भोग आणी विलासात बुडालेला संसारिक मायेने ग्रस्त मर्त्य मानव आहे. तो आरश्यात पद्मिनीला बघतो. आरसा हा आभासी आहे. मायावी जगाचे प्रतिक. आरश्यातील पद्मिनी हि आभासी. मोह आणि मायेने ग्रस्त अलाउद्दीन खिलजी आभासी पद्मिनीच्या प्राप्तीसाठी चित्तोडवर आक्रमण करतो.

महाकाव्याच्या अंती गुरुचे मार्ग दर्शन, प्रेमपूर्ण हृदय आणि सात्विक बुद्धी (पद्मावती)च्या सहाय्याने शरीराचा त्याग केल्यावर आत्मा आणि परमात्म्याचे मिलन होते. अलौकिक प्रेमाचा विजय होतो.

राजपूत स्त्रिया हवन कुंडात सर्वस्व अर्पण करतात, सती होतात. राजपूत योद्धा संपूर्ण चित्तोड गढाला अग्नीत अर्पण करतात व युद्धात प्राणांची आहुती देतात. सर्वस्व अर्पण केल्यावर त्यांना हि अलौकिक प्रेमाची प्राप्ती.

संसारिक मोह मायेला सत्य समजणाऱ्या अलाउद्दीन खिलजी काय प्राप्त होते. शरीर नष्ट झाल्या वर बाकी राहते फक्त शरीराची धूळ किंवा चितेची राख. खिलजीच्या हाती राख आणि धूळी शिवाय काहीही येत नाही.

सारांश भोग आणि विलासितेत बुडालेल्या संसारिक जीवाला मुक्ती नाही. अलौकिक प्रेमाची प्राप्ती त्याला होऊ शकत नाही. पद्मावतच्या माध्यमाने महाकाव्याची महाकवी जायसी यांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

सुआ : पोपट

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मला वाटलं अल्लाउद्दिन - पद्मिनी ला आत्मा परमात्मा म्हणताय की काय !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला वाटलं अल्लाउद्दिन - पद्मिनी ला आत्मा परमात्मा म्हणताय की काय !!

परवरदिगार म्हणजेच परमात्मा का हो ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज काय सकाळी सकाळी पहिल्या धारेचीच का काय?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

खूपच वैतागून लिहीलेलं दिस्तय. पर्सनल रेटिंग बी द्यावं की

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

म्हणजे पद्मावती हे केवळ रूपक आहे. हो क्की नै??
मग तो कर्णी सेनांच्या माकडांचा राडा कशासाठी चाललाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

बहुतेक कुणाला हि लेख कळलेला नाही. जायसी हा सुफी परंपरेचा कवी होता. इतिहासात घडलेल्या घटनांच्या आधार घेऊन या काव्याची रचना केली.वरील चौपाईत जायसीने पद्मावत कथेचा सार दिला आहे. माणसाच्या मनात सर्व प्रवृत्ती असतात. त्याच्यात शैतान हि दडलेला असतो तो त्याला आसक्ती मार्गावर ढकलतो. सात्विक बुद्धी आणि प्रेमाने भरलेले हृदय हि त्याचा जवळ असते. एक मार्ग शाश्वत परमेश्वराकडे घेऊन जातो आणि दुसरा अशाश्वत भौतिक सुखा कडे. भौतिक सुखाकडे धावणार्याच्या हातात फक्त माती येते.

चित्तोडचे युद्ध झाले होते. राजपूत पुरुषांनी मृत्यूला आलिंगन दिले आणि स्त्रियांनी जौहर केले. हे एतिहासिक सत्य आहे. बाकी भसालीला जायसीचे पद्मावत समजणे अशक्यच.

शिवाय राजस्थान आणि मध्य प्रदेशात या वर्षी निवडणूक आहे. तिथे कानून व्यवस्था खराब झाली. गोळीबार इत्यादी झाला तर गुजरात प्रमाणे त्याचा निश्चितच कुणालातरी थोडाफार फायदा होईलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर गुजरातेत २००२ साली खून खराबा झाला. त्याचा फायदा कुणाला झाला ते सर्वज्ञात आहे

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

premalink नामक टोपण धारी. पहिली गोष्ट २००२ दंगा ISI आणि पाक समर्थक लोकांनी घडविला होता. ट्रेन जाळली आणि दंगा सुरु केला. २५० हिंदू आणि ;८५० मुसलमान दंग्यात मेले. . बाकी भूतो न भविष्यती. नरेंद्र मोदी हे देश्यातील पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी दंगा करणाऱ्या लोकांन्वर गोळ्या घातल्या. ११६ दंगाई मेले त्यात १०० च्या जवळ हिंदू होते. (बाकी अलवर, मालदा, उत्तर प्रदेश कुठेही कधीही दंगा करणार्यांवर पोलिसांनी गोळी चालविली नाही. एवढेच नव्हे १९८४ , ४००० हून जास्त सिख दिल्लीत मेले तरी पोलिसांनी गोळी चालविली नाही.) खरे तर नरेंद्र मोदी मुस्लिमांचा रक्षण कर्ता हा किताब मिळाला पाहिजे होता. सेकुलर पक्षाचे असते तर निश्चित मिळाला असता. दंगाई भाजप समर्थक असते तर मोदिजी निवडणूक जिंकले नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

premalink नामक टोपण धारी

१. ??????
२. Guess who's talking.
३. भाजपसमर्थक/उजवे (खास करून अगोदरच्या पिढीतले) सगळे इतके ठोंबे असतात काय हो?

२५० हिंदू आणि ;८५० मुसलमान दंग्यात मेले.

हं. पाक आणि आयएसआय समर्थकांनी हिंदूंच्या तिपटीहून अधिक मुसलमान मारले. विश्वास ठेवण्यासारखीच गोष्ट आहे ही.

नाही म्हणजे, भारताला नि हिंदूंना नि हिंदुत्ववाद्यांना बदनाम करण्यासाठी आयएसआय असे सहज करू शकेल, हे मानण्यासारखे आहे. प्रश्न तो नाही. पण त्या वेळेस तर गुजरातेत तुमच्या मोदींचे कार्यक्षम प्रशासन होते ना? नि त्यांनी हे होऊ दिले? ते केळी खात बसले?

(१९८४ साली दिल्लीत शिखांचे जे हत्याकांड झाले, ते काँग्रेसने घडवून आणले होते. त्याचा दोष सर्वस्वी काँग्रेसवर आहे. हे आम्ही स्पष्टपणे म्हणतो. भाजपवाले/किमान एक तरी भाजपवाला/उजवा/संघोट्या किमान एवढा तरी प्रामाणिकपणा कधी दाखवणार?)

नरेंद्र मोदी हे देश्यातील पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी दंगा करणाऱ्या लोकांन्वर गोळ्या घातल्या.

चूक. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी मोरारजी देसाई मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आदेश देऊन लोकांवर गोळीबार करविला होता. ज्यांच्यावर गोळीबार करविला, ते लोक गुंड होते, दंगलखोर होते, असा दावाही त्यांनी पुढे (बऱ्याच वर्षांनंतर) एका जाहीर सभेत केला.

खरे तर नरेंद्र मोदी मुस्लिमांचा रक्षण कर्ता हा किताब मिळाला पाहिजे होता.

आणि हिटलरला इस्राएलचा राष्ट्रपिता हा किताब मिळायला पाहिजे होता.

(हिटलर नसता, नि त्याने ज्यूंचे जे काही केले, ते जर केले नसते, तर इस्राएल स्थापन होऊ शकले नसते. पाहा विचार करून. वस्तुतः, पॅलेस्टाईनच्या भूमीत ज्यूंचे राष्ट्र स्थापन करावे, ही ज्यूंची मागणी खूप जुनी - नि हिटलरच्या कितीतरी आधीपासूनची - होती. परंतु तिला कोणी हिंग लावून विचारत नव्हते. हिटलरने जे करायचे ते केल्यावर त्या मागणीला भाव, पाठिंबा सगळे सगळे मिळाले.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0