पुण्याची मुंबई आता झाली की राव!

आजकाल आपले पुणे सुध्दा..
रात्रभर जागे राहून धडधडत असते!
कारण आपली सुध्दा मुंबई झाल्याचे..
स्वप्न जागेपणी त्याला पडत असते!

पुण्यातील पीएमटी खचाखच गर्दीने भरून..
केविलवाणी धावत रडत असते!
मुंबईतील लोकल ट्रेनचा हात हातात धरून..
ती सुद्धा मैत्रीला जागत असते!

मुंबईतील मराठीपणा हद्दपार झाल्याचं..
दुःख मुंबई पचवत जगत असते!
पुणे सुध्दा तिच्याशी समदुःखी होऊन..
गळ्यात गळा घालून रडत असते!

कशापायी आमच्या मुंबईला ठेवता नाव?
पुण्याची मुंबई आता झाली की राव!
तुमचा आमचा असतो सेम वडा पाव..
दिवसरात्र लोकांची जीवघेणी धावाधाव!

- निमिष सोनार
(आता पुणेकर पण भूतकाळातील मुंबईकर)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आजकाल!! खरंच की भाइसाब।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यक, पूर्वीचं पुणं राहिलं नाही..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुंबैला जाताना "मी पुंबईकर" असे रिअल इस्टेट वाल्यांचे होर्डिंग्ज लागलेले आहेत. पुंबई? मुमणे का नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला