रंग : उतरणारे , उतरलेले , उडणारे , उडालेले : एका जुन्या अज्ञात चित्राचं ध्यानवृत्त

चार पाच दगडी पायऱ्या उतरून रेस्तराँ मध्ये येतो. मंद जॅझ संगीत (आमच्या पोलंड मध्ये या जॅझ संगीताचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात सारखा सारखा कोमल रिषभ लागतो, धून भैरव थाटाकडे झुकते , ऐकणाराला या कोमल रिषभाच्या जागा आधीच लक्षात येऊ लागतात. दुसऱ्या प्रकारात मात्र हा कोमल रिषभ क्वचित कधीतरी येतो किंवा येतही नाही) , सुरेल प्रकाशरचना , काही भिंती कच्च्या विटांच्या , काही भिंती सुरेख शुभ्र रंगवलेल्या असा एकूण ओळखीचाच माहौल असला तरी हँगरला कोट अडकवताना आजूबाजूच्या चित्रांवर माझी नजर जातेच. योग्य आकाराचे, योग्य विषय किंवा मूड सांगणारे कॅनव्हास लावलेल्या पांढऱ्या शुभ्र भिंती म्हणजे विरागी शुभ्र रंगाने जीवनाचे सर्व भले बुरे रंग निःसंगपणे स्वीकारलेल्या एखाद्या अढळ ऋषीसारख्या दिसतात. अखेरीस सर्व शुभ्र शुभ्रच होऊन जातं म्हणा !

माझ्यासाठी राखीव असलेल्या टेबलाकडे जाऊ लागतो आणि या टेबलावर आधुनिक ट्रेंडला अनुसरून डिजिटल प्रिंटवाले कॅनव्हास लावले आहेत असं दिसतं. हिरव्या रंगाच्या विविध डिजिटल छटा असणारे कॅनव्हास. जीवनात विपुल आढळणाऱ्या या हिरव्या रंगातली जान डिजिटल प्रिंटनं न चुकता काढून घेतली आहे. सूपची ऑर्डर देऊन खुर्चीवर स्थिरस्थावर होतो आणि डावीकडच्या कोपऱ्यावर असलेल्या भिंतीवर नजर जाते. एक खूप जुना कॅनव्हास तिथं एकटाच लटकतोय. आकारानं दहा इंच बाय पंधरा इंच असावा, सकृतदर्शनी शंभर वर्षे तरी जुना असावा. चित्राची चौकट कुठल्याही अर्थाने आकर्षक नाहीए. कॅनव्हासच्या खालीच असलेल्या टेबलावरच्या खुज्या टेबल लॅम्पचा मंद प्रकाश चित्रावर पडतोय आणि ऑइल चे पॅच, त्याच्या मायक्रोसावल्या यातून त्रिमितीचं भान किंवा त्रिमितीचा मायक्रोआभास निर्माण होतोय. मी अनेकवेळा चित्रांबद्दलच्या चांभारचौकश्या आधी माझ्या मनात करतो, म्हणजे हे चित्र किती जुनं आहे, कधी घेतलं , का घेतलं, चित्रकार कोण -असे एक ना अनेक प्रश्न विचारतो आणि मग आजूबाजूच्या लोकांनाही हे प्रश्न विचारून त्रास देतो. खासकरून रेस्तराँ मधले वेटर माझ्या या प्रश्नांच्या सरबत्तीला बळी पडू शकतात. या चित्राकडं आणखी थोडा वेळ निरखून पाहिल्यानंतर माझ्या लक्षात येतं की या चित्राचा इतिहास इथे कुणाला माहीत असण्याची शक्यता कमीच आहे. चित्राच्या खाली उजव्या बाजूला प्रशियन-ब्लू मध्ये 'करीना' अशी सही दिसते. करीना नावाच्या मुलीनं किंवा स्त्री नं हे चित्र कधीतरी काढलं असावं हे स्पष्ट आहे पण का आणि कधी , कशासाठी , कुठल्या मानसिक अवस्थेत अशा प्रश्नांचा शोध घ्यायचा असेल तर काळाच्या बोगद्यात उलट मागे जात शोधावं लागतं. ते कुणाला जमलंय?

रेस्तराँ मध्ये लटकणारे कॅनव्हास अनेक प्रकारचे असतात. अत्यंत नावाजलेल्या , अत्युत्कृष्ट चित्रकारांच्या अत्युत्कृष्ट कलाकृती ; यातल्या काहींना ओव्हर पॉप्युलॅरीटी चं वरदान असतं किंवा शाप असतो ( अत्यंत अत्यंत नावाजलेल्या , अत्युत्कृष्ट चित्रकारांच्या काही अत्युत्कृष्ट पण अज्ञात कलाकृती पण असतातच आणि त्यांना चित्रकाराच्या स्टुडिओत , त्याच्या मनात किंवा त्याला समजून घेणाऱ्या काही मोजक्या लोकांच्या मनात राहण्याचा शाप असतो किंवा वरदान असतं) , नंतर येतात काही सुमार, फक्त वाणिज्य लक्षात ठेऊन केलेले कॅनव्हास!

हा समोरचा कॅनव्हास काही फारसा महत्वाचा किंवा महान नाहीए ! टेबल वर ठेवलेल्या चार पाच काचेच्या बाटल्यांचं स्थिरचित्र ! त्यांची बाह्यरेखा प्रशियन ब्लू च्या पातळसर रेघेनं दाखवलेली आहे. एकूण रचना म्हणूनही हे चित्र फार भारी नाहीच. पण तरुण असताना अगदीच सामान्य जीवन जगणारे लोक सुद्धा वयोवृद्ध झाले की त्या वयाची कसलीशी अज्ञात झळाळी त्यांना आकर्षक बनवते असं काहीसं या चित्राचं झालंय! तरुणपणातल्या चुका उमगलेल्या म्हाताऱ्या सुरकुतल्या चेहऱ्याचं सौंदर्य या चित्रात आहे ! संपूर्ण चित्राचा मुख्य रंग म्हणजे यलो ऑकर! म्हणजे मूळ रंग यलो ऑकर असावा असा अंदाज करायला खूप वाव आहे. करीनाच्या मनात , किंवा तिच्या अवती भवती यलो ऑकर ची फुलपाखरं उडाली असावीत याचीच साक्ष हा आता उडून गेलेला यलो ऑकर देतो आहे. यलो ऑकर आधी मनात उतरला असावा आणि मग कॅनव्हास वर. तिच्या नाईफ चे फटकारे फारसे सुबक किंवा एकसारखे नाहीत. एक दोन ठिकाणी रंग किंचित खरवडल्या सारखा झालाय , पण अगदी जवळ जाऊन लक्षपूर्वक पाहिलं तरच ते लक्षात यावं.

युरोपातलं आत्ता दिसणारं जीवन म्हणजे युद्धाच्या भीषणतेतून वाचलेल्या जीवनाची एक सातत्यरेखाच ! इथल्या संवेदनशील लोकांनी माणसांचे जीव वाचवण्याची शर्थ केलीच पण सुबक फर्निचर, वाद्ये, चित्र, अपुऱ्या कॅनव्हास च्या गुंडाळ्या , जुनी पुस्तकं अशा वस्तूही प्राणपणाने वाचवल्या! हे चित्र कदाचित कुठल्याश्या तळघरात पडून असावं; किंवा अँटिक दुकानात देखील.

जुन्या अज्ञात चित्रांचे प्रवास रहस्यमय असतात आणि जीवनाच्या मुख्य प्रवाहातली व्यवधानं आपल्याला जणू जखडून ठेवतात , जुनी चित्रं , अज्ञात चित्रकार याबद्दल आपल्याला फारसं घेणं देणं उरत नाही. सर्वसाधारण मनुष्याची नजर ' आत्ता' मध्ये नवे रंग शोधत असते . कालांतराने तेही उडणार असतात, उतरणार असतात. पण त्याची जाणीव किंवा फिकीर 'आत्ता' ला नसते, कधी नसावीच.

चित्र लावलेल्या भिंतीच्या जरा पलीकडे एक छोटं टेबल आहे. तिथे एक सुंदरशी पोलिश तरुणी बसली आहे , समोर तिचा प्रियकर , मित्र वगैरे. दोघेही मंद हसत संवाद करीत आहेत, या संवादात कोमल रिषभ लागत नसावा असं आपलं मला उगाच वाटतं. कुणी सांगावं आत्ता या चित्राखाली बसून आपल्या प्रियकराशी गुफ्तगूमग्न असलेली ही मुलगीच काही जन्माआधीची करीना असावी. एकोणिसाव्या किंवा विसाव्या शतकातली करीना ! त्यावेळी कॅनव्हास वर रंग उतरवण्यात मग्न असलेली करीना आत्ता प्रियकरावर नजर लावून बसलीय. मुलींची किंवा स्त्रियांची समस्या हीच आहे. गेल्या जन्मीचं पुष्कळसं त्या विसरून जातात अगदीच ! या जन्मातल्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवतात मात्र ! पुष्कळ मुलींच्या बोटांत मला कधी गेल्या जन्मीचे रंग दिसतात, ब्रश दिसतात, काहींच्या गळ्यात अजून गेल्या जन्मी घोळवलेले सूर रेंगाळत असतात; पण त्याबद्दल सांगायला मन धजत नाही. करीना कशी असेल ? आज ती कुठे असेल ? या जन्मात जर ती चुकून या चित्रासमोर आली आणि तिला या चित्राची याद आली तर तिला या उडालेल्या रंगांबद्दल दुःख वाटेल की एव्हाना तिच्याकडे नवीन रंगांची पॅलेट तयार असेल , की उडालेल्या , उतरलेल्या रंगांनी शिकवलेल्या अर्थगूढ धुना ती गुणगुणेल आणि त्यातून निर्माण झालेली थरथर चित्रात उतरेल आणि नाईफचे फटकारे एकसंध होऊन जातील एकदम ?

सूप संपवतो ! पैसे देतो , काउंटर वरली मुलगी सवयीने स्त्रीसुलभ हसते. रेंगाळत बस स्टॉप वर येतो. बस मध्ये बसल्यावर डोळे मिटून घेतो. एका क्षणी सर्व रंग उडून जातात , मिटल्या डोळ्यांसमोर एक अनंत शुभ्र कॅनव्हास पसरतो ! अखेरीस सर्वच शुभ्र शुभ्र होऊन जातं म्हणा !

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ओघळलेले रंग आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

‌असं काही तर नव्हतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अरे वा ! हे चित्र सुरेख आहे! नाही ते चित्र हे नव्हतं हे नक्कीच आणि असंही नव्हतं! जमल्यास फोटो देईन ! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

छान लिहिलय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

विनंती १ : तुमचं लेखन विषयामुळे नि भाषेच्या प्रवाहामुळे वाचावसं वाटतं. आभार! लिहीत राहावे ही विनंती.
--

विनंती २ :
लेखन तुम्ही स्वत:साठी करत असाल, तरी ते लोकांसाठी प्रकाशित करणं हा वेगळा भाग. लेखन सार्वजनिक करताना तुम्ही केलेले टंकन कुणाकडून तरी तपासून घ्यावे ही विनंती. टंकलेली भाषा हे तुमचे लोकांपर्यंत पोचण्याचे साधन आहे. ते जबाबदारीने वापरावे. एखादे जेवण उत्तम चवीचे असले, तरी दर घासागणिक खडे लागत राहिल्यास चवीचा आस्वाद घेणे दुष्प्राप्य होते.
माझा निर्देश विभक्ती आणि शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून लिहिण्याकडे आहे. '-चा', '-ला', '-ही', '-मध्ये' इ. सर्व शब्दाला जोडून लिहावे ही विनंती. शब्द मराठी असो वा इंग्रजी. तुम्ही इंग्रजी शब्दांच्या विभक्त्या नि अव्ययं तोडून लिहिता असा कल दिसतो. तसा ठेवायचा तर टेबल हा शब्द मराठी आहे का हो?
उदा.
..टेबलावर आधुनिक ट्रेंड ला अनुसरून डिजिटल प्रिंट वाले कॅनव्हास लावले आहेत..
ट्रेंड ला, प्रिंट वाले हे तोडून लिहिलेत तर टेबला वर असे तोडून सातत्य का नाही बरे राखलेत?

उलट विचार करू.
इंग्रजीत लिहिताना तुम्ही Sarva Sanchari's असं लिहाल, की Sarva Sanchari 's असं? ॲपोस्ट्रोफी एस हा जोडून असतो, की तोडून ?
किंवा ontable, accordingtotrend, ofprint असे इंग्रजी लिहिलेत, तर लोकांचा तुमच्या लेखातला रस किती वाक्यं टिकेलसं वाटतं तुम्हांला?
स्वत:साठी लिहिताना तुम्ही कसेही लिहा, पण प्रकाशित करताना टंकनाचे भान बाळगावे ही विनंती.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या सूचनांसाठी खूप आभार ! पुढल्या वेळी निश्चितच जास्त खबरदारी घेईन ! परंतु या निमित्ताने माझी एक समस्या मांडू इच्छितो ! गेली काही वर्षे मी एकूणातच खूप टंकन करतो आहे, आणि लघु कथा किंवा कविता असतील तर मला शुद्धलेखनाच्या फार समस्या येत नाहीत , आणि ते स्वतःहून तपासून पाहणं देखील सोपं जातं परंतु दीर्घ पाठ असेल तर माझ्या हातून अशा चुका होतात, किंवा तपासताना सुटून जातात. कागदावर लिहिताना ( माझं अक्षर फार सुरेख नाहीए तरीही) या चुका जवळजवळ होत नाहीत. माझी नजर स्क्रीन ला अजून सरावलेली नाही की काय माहीत नाही. याबाबत कोणाचे काही अनुभव असतील तर जरूर सांगावेत! पुन्हा एकदा धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

. शुद्धलेखनाऐवजी प्रमाणलेखन म्हणू आपण. शुद्ध कशाला म्हणायचं नि ते कसं ठरवायचं ह्यात बरेच वाद आहेत. ते सोडून देऊ.
. मी जाणीवपूर्वक टंकन हा शब्द वापरला आहे, लेखन नाही. मला कल्पना आहे, की सवयीने मराठीलेखनात जरी जोडून लिहिणं होत असलं, तरी टंकनात तोडण्याची शक्यता आहे. कारण माहीत नाही, पण सवय नसल्याने नि भाषेबद्दल जागरूक नसल्याने हे होत असावं.
. मराठी टंकन करताना हे तोडून लिहिण्याचा प्रघात पडत चालल्याचं मला आजकालच अधिक दिसत आहे. परवापरवापर्यंत विभक्त्या नि शब्दयोगी अव्ययं नीट जोडून लिहिणारेही (नि लहानपणापासून मराठी वाचणारे) जालावर टंकताना ह्या चुका करताना दिसत आहेत. हिंदी वाचण्या-लिहिण्याच्या प्रभावातून हे आलं असण्याची एक शक्यता जाणवते, कारण हिंदीत तोडून लिहिणं प्रमाण मानतात. (उदा. घाटे में चल रही एअर इंडिया का भारत सरकार पर लगभग 326 करोड़ रुपए बकाया है।..यह कर्ज अलग-अलग मंत्रालयों से वीवीआईपी चार्टर्ड फ्लाइट्स के बिलों का भुगतान नहीं करने की वजह से हुआ है)
.तुम्ही हिंदी कितपत वाचता वा लिहिता मला माहीत नाही. किंवा तुमचं वास्तव्य पोलन्डमध्ये असल्याने नि पोलिशमध्ये असं तोडून लिहिणं प्रमाण असल्यास त्या प्रभावाखाली टंकन होत असेल तर मला कल्पना नाही. पण तसं वाटत नाही. वानगीदाखल तुमच्या लघुप्रतिसादातल्या अव्ययांच्या टंकनातल्या चुका सुधारून देत आहे -
या सूचनांसाठी खूप आभार ! पुढल्या वेळी निश्चितच जास्त खबरदारी घेईन ! परंतु या निमित्ताने माझी एक समस्या मांडू इच्छितो ! गेली काही वर्षे मी एकूणातच खूप टंकन करतो आहे, आणि लघुकथा किंवा कविता असतील, तर मला शुद्धलेखनाच्या फार समस्या येत नाहीत , आणि ते स्वतःहून तपासून पाहणंदेखील सोपं जातं परंतु दीर्घ पाठ असेल तर माझ्या हातून अशा चुका होतात, किंवा तपासताना सुटून जातात. कागदावर लिहिताना ( माझं अक्षर फार सुरेख नाहीए तरीही) या चुका जवळजवळ होत नाहीत. माझी नजर स्क्रीनला अजून सरावलेली नाही की काय माहीत नाही. याबाबत कोणाचे काही अनुभव असतील तर जरूर सांगावेत! पुन्हा एकदा धन्यवाद Smile
....आता वरील प्रतिसादात '-देखील' आणि '-ही' ह्या शब्दयोगी अव्ययांचे अर्थ सारखेच आहेत. म्हणजे 'पाहणं देखील' = 'पाहणंही' आणि 'तरीही' = 'तरीदेखील'. तरीही, ह्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी आलेल्या शब्दांत तुम्ही 'देखील' हे तोडून (चुकीचे) नि 'ही' हे जोडून (योग्य) लिहिले आहे. हे नक्की कशामुळे व्हावे ते नाही सांगता येत मला.

तुमच्या लेखनाबाबत आपलेपणा वाटला म्हणून सांगावसं वाटलं, नि तुम्ही म्हटल्याप्रमाणे खबरदारी घ्याल ह्याची शाश्वतीही वाटते. त्यामुळे पुन्हा एकदा - स्वत:साठी मोकळेपणी लिहिताना चुका व्हायच्याच, कारण डोक्यातलं कागदावर येणं अधिक महत्त्वाचं. तिथे व्यक्त होण्याची गरज ही अधिक. भाषेच्या प्रमाणांमुळे निर्मितीला अडथळा नको, हे सांगणे न लगे. फक्त एकदा ते हातावेगळं झालं, नि सार्वजनिक करायचं म्हटलं, की वेगळी जबाबदारी येते. विनंती त्याविषयी होती. Na zdrowie!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा , मी पोलंड मध्ये राहून हिंदी शिकवतो. हिंदी मी दररोजच भरपूर वाचतो , त्यात भारी साहित्य ते अगदी प्राथमिक दर्जाच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टी असं सर्वच आलं. मी हिंदी मध्ये लिहितोसुद्धा ! Smile मी इथे मराठी बोलतो आणि वाचतो ते प्रामुख्याने ऑनलाईन! याचा जर लिखाणावर प्रभाव पडत असेल तर त्याचा शोध घेतलाच पाहिजे ! पुन्हा एकदा अनेक धन्यवाद ! Dziękuje serdecznie!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

मनस्वी लेखन आहे. आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या अनेक दिवसांत इतकं सुंदर इतकं तल्लीन करणारं तरल असं काही वाचलं नाही,
बेहतरीन !
शुभ्र काही जीवघेणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास लिहिलंय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं ललित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

//
चारपाच दगडी पायऱ्या उतरून रेस्तराँमध्ये येतो. मंद जॅझ संगीत (आमच्या पोलंडमध्ये या जॅझ संगीताचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात सारखासारखा कोमल रिषभ लागतो, धून भैरव थाटाकडे झुकते, ऐकणाराला या कोमल रिषभाच्या जागा आधीच लक्षात येऊ लागतात. दुसऱ्या प्रकारात मात्र हा कोमल रिषभ क्वचित कधीतरी येतो किंवा येतही नाही,) सुरेल प्रकाशरचना, काही भिंती कच्च्या विटांच्या, काही भिंती सुरेख शुभ्र रंगवलेल्या असा एकूण ओळखीचाच माहौल असलातरी हँगरला कोट अडकवताना आजूबाजूच्या चित्रांवर माझी नजर जातेच. योग्य आकाराचे, योग्य विषय किंवा मूड सांगणारे कॅनव्हास लावलेल्या पांढऱ्या शुभ्र भिंती म्हणजे विरागी शुभ्र रंगाने जीवनाचे सर्व भलेबुरे रंग निःसंग पणे स्वीकारलेल्या एखाद्या अढळ ऋषीसारख्या दिसतात. अखेरीस सर्व शुभ्र शुभ्रच होऊन जातं म्हणा!
माझ्यासाठी राखीव असलेल्या टेबलाकडे जाऊ लागतो आणि या टेबलावर आधुनिक ट्रेंडला अनुसरून डिजिटल प्रिंटवाले कॅनव्हास लावले आहेत असं दिसतं. हिरव्या रंगाच्या विविध डिजिटल छटा असणारे कॅनव्हास. जीवनात विपूल आढळणाऱ्या या हिरव्या रंगातली जान डिजिटल प्रिंटनं न चुकता काढून घेतली आहे. सूप ची ऑर्डर देऊन खुर्चीवर स्थिरस्थावर होतो आणि डाविकडच्या कोपऱ्यावर असलेल्या भिंतीवर नजर जाते. एक खूप जुना कॅनव्हास तिथं एकटाच लटकतोय. आकारानं दहा इंच बाय पंधरा इंच असावा. कॅनव्हास सकृतदर्शनी शंभर वर्षे तरी जुना असावा. चित्राची चौकट कुठल्याही अर्थाने आकर्षक नाहीए. कॅनव्हासच्या खालीच असलेल्या टेबलावरच्या खुज्या टेबल लॅम्पचा मंद प्रकाश चित्रावर पडतोय आणि ऑइलचे पॅच, त्याच्या मायक्रोसावल्या यातून त्रिमितीचं भान किंवा त्रिमितीचा मायक्रोआभास निर्माण होतोय. मी अनेक वेळा चित्रांबद्दलच्या चांभारचौकश्या आधी माझ्या मनात करतो, म्हणजे हे चित्र किती जुनं आहे, कधी घेतलं, का घेतलं, चित्रकार कोण असे एक ना अनेक प्रश्न विचारतो आणि मग आजूबाजूच्या लोकांनाही हे प्रश्न विचारून त्रास देतो. खासकरून रेस्तराँमधले वेटर माझ्या या प्रश्नांच्या सरबत्तीला बळी पडू शकतात. या चित्राकडं आणखी थोडा वेळ निरखून पाहिल्यानंतर माझ्या लक्षात येतं की या चित्राचा इतिहास इथे कुणाला माहीत असण्याची शक्यता कमीच आहे. चित्राच्या खाली उजव्या बाजूला प्रशियन ब्लूमध्ये करीना ... अशी सही दिसते. करीना नावाच्या मुलीनं किंवा स्त्री नं हे चित्र कधीतरी काढलं असावं हे स्पष्ट आहे पण का आणि कधी , कशासाठी, कुठल्या मानसिक अवस्थेत अशा प्रश्नांचा शोध घ्यायचा असेल तर काळाच्या बोगद्यात उलट मागे जात शोधावं लागतं. ते कुणाला जमलंय?
रेस्तराँ मध्ये लटकणारे कॅनव्हास अनेक प्रकारचे असतात. अत्यंत नावाजलेल्या, अत्युत्कृष्ट चित्रकारांच्या अत्युत्कृष्ट कलाकृती; यातल्या काहींना ओव्हर पॉप्युलॅरीटीचं वरदान असतं किंवा शाप असतो ( अत्यंत अत्यंत नावाजलेल्या, अत्युत्कृष्ट चित्रकारांच्या काही अत्युत्कृष्ट पण अज्ञात कलाकृतीपण असतातच आणि त्यांना चित्रकाराच्या स्टुडिओत, त्याच्या मनात किंवा त्याला समजून घेणाऱ्या काही मोजक्या लोकांच्या मनात राहण्याचा शाप असतो किंवा वरदान असतं,) नंतर येतात काही सुमार, फक्त वाणिज्य लक्षात ठेऊन केलेले कॅनव्हास, अनेक प्रवास करून आलेले थकले भागलेले कॅनव्हास!
हा समोरचा कॅनव्हास काही फारसा महत्वाचा किंवा महान नाहीए! टेबलावर ठेवलेल्या चारपाच काचेच्या बाटल्यांचं स्थिरचित्र! त्यांची बाह्यरेखा प्रशियन ब्लूच्या पातळसर रेघेनं दाखवलेली आहे. एकूण रचना म्हणून ही हे चित्र फार भारी नाहीच. पण तरुण असताना अगदीच सामान्य जीवन जगणारे लोकसुद्धा वयोवृद्ध झाले की त्या वयाची कसलीशी अज्ञात झळाळी त्यांना आकर्षक बनवते असं काहीसं या चित्राचं झालंय! तरुणपणातल्या चुका उमगलेल्या म्हाताऱ्या सुरकुतल्या चेहऱ्याचं सौंदर्य या चित्रात आहे! संपूर्ण चित्राचा मुख्य रंग म्हणजे यलो ऑकर! म्हणजे मूळ रंग यलो ऑकर असावा असा अंदाज करायला खूप वाव आहे. करीनाच्या मनात! किंवा तिच्या अवतीभवती यलो ऑकरची फुलपाखरं उडाली असावीत याचीच साक्ष हा आता उडून गेलेला यलो ऑकर देतो आहे. यलो ऑकर आधी मनात उतरला असावा आणि मग कॅनव्हासवर. तिच्या नाईफचे फटकारे फारसे सुबक किंवा एकसारखे नाहीत. एक दोन ठिकाणी रंग किंचित खरवडल्या सारखा झालाय, पण अगदी जवळ जाऊन लक्षपूर्वक पाहिलं तरच ते लक्षात यावं.
युरोपातलं आत्ता दिसणारं जीवन म्हणजे युद्धाच्या भीषणतेतून वाचलेल्या जीवनाची एक सातत्यरेखाच! इथल्या संवेदनशील लोकांनी माणसांचे जीव वाचवण्याची शर्थ केलीच पण सुबक फर्निचर, वाद्ये, चित्रं, अपुऱ्या कॅनव्हास च्या गुंडाळ्या, जुनी पुस्तकं अशा वस्तूही प्राणपणाने वाचवल्या! हे चित्र कदाचित कुठल्याश्या तळघरात पडून असावं; किंवा अँटिक दुकानात देखील.
जुन्या अज्ञात चित्रांचे प्रवास रहस्यमय असतात आणि जीवनाच्या मुख्य प्रवाहातली व्यवधानं आपल्याला जणू जखडून ठेवतात, जुनी चित्रं, अज्ञात चित्रकार याबद्दल आपल्याला फारसं घेणं देणं उरत नाही. सर्वसाधारण मनुष्याची नजर 'आत्ता' मध्ये नवे रंग शोधत असते. कालांतराने तेही उडणार असतात, उतरणार असतात. पण त्याची जाणीव किंवा फिकीर 'आत्ता'ला नसते, कधी नसावीच.
चित्र लावलेल्या भिंतीच्या जरा पलीकडे एक छोटं टेबल आहे. तिथे एक सुंदरशी पोलिश तरुणी बसली आहे, समोर तिचा प्रियकर, मित्र वगैरे. दोघेही मंद हसत संवाद करीत आहेत, या संवादात कोमल रिषभ लागत नसावा असं आपलं मला उगाच वाटतं. कुणी सांगावं आत्ता या चित्राखाली बसून आपल्या प्रियकराशी गुफ्तगूमग्न असलेली ही मुलगीच काही जन्माआधीची करीना असावी. एकोणिसाव्या किंवा विसाव्या शतकातली करीना! त्यावेळी कॅनव्हासवर रंग उतरवण्यात मग्न असलेली करीना आत्ता प्रियकरावर नजर लावून बसलीय. मुलींची किंवा स्त्रियांची समस्या हीच आहे. गेल्या जन्मीचं पुष्कळसं त्या विसरून जातात अगदीच! या जन्मातल्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवतात मात्र! पुष्कळ मुलींच्या बोटांत मला कधी गेल्या जन्मीचे रंग दिसतात, ब्रश दिसतात, काहींच्या गळ्यात अजून गेल्या जन्मी घोळवलेले सूर रेंगाळत असतात; पण त्याबद्दल सांगायला मन धजत नाही. करीना कशी असेल? आज ती कुठे असेल? या जन्मात जर ती चुकून या चित्रासमोर आली आणि तिला या चित्राची याद आली तर तिला या उडालेल्या रंगांबद्दल दुःख वाटेल की एव्हाना तिच्याकडे नवीन रंगांची पॅलेट तयार असेल, की उडालेल्या, उतरलेल्या रंगांनी शिकवलेल्या अर्थगूढ धुना ती गुणगुणेल आणि त्यातून निर्माण झालेली थरथर चित्रात उतरेल आणि नाईफचे फटकारे एकसंध होऊन जातील एकदम?
सूप संपवतो! पैसे देतो, काउंटरवरली मुलगी सवयीने स्त्रीसुलभ हसते. रेंगाळत बस स्टॉपवर येतो. बसमध्ये बसल्यावर डोळे मिटून घेतो. एका क्षणी सर्व रंग उडून जातात, मिटल्या डोळ्यांसमोर एक अनंत शुभ्र कॅनव्हास पसरतो! अखेरीस सर्वच शुभ्र शुभ्र होऊन जातं म्हणा!
//

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेंटींग देखनेका डर नही लगता बाबूजी,
अयसे कोई अल्लग अल्लग कलरांके नामा डालके ना समझनेवाली क्या तो बाता लिखताय तो डर लगता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोले तो ये कलरां दुनिया में नै हैं क्या ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed