कापडाचोपडाच्या गोष्टी

बरेच दिवसांपासून वेशभूषेचा इतिहास या विषयाला धरून काहीतरी लिहायचं मनात होतं.
वेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं असतं ते मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं.
तर तेच सगळं 'जे जे आपणास ठावे ते ते दुसर्‍यांसी सांगावे' यास्तव वेशभूषेच्या इतिहासावर आधारित एक सदर लिहिते आहे. सकळ जनांना शहाणे करून सोडण्याचा दावा अजिबात नाही पण कदाचित काही माहितीत भर पडेलही. Smile
जानेवारी २०१८ पासून लोकमतच्या सखी पुरवणीमध्ये हा विषय घेऊन सदर सुरू केले आहे. दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी हे सदर येईल. सदराचे नाव आहे ‘कापडाचोपडाच्या गोष्टी’. थोडी गम्मत, थोडी माहिती असे काहीसे स्वरूप आहे या सदराचे.
संपूर्ण लेख इथे टाकत नाहीये कारण लेखमाला संपल्यावर त्याचे पुस्तक करायचे मनात आहे. इथे लोकमतच्या लेखांच्या लिंका देते आहे.

१. "माणसाच्या मूलभूत गरजा तीन - अन्न, वस्त्र आणि निवारा हे आपण शाळेत असताना पाठ केलेले आहे. या तिन्ही गरजांचा इतिहास म्हणजे अख्ख्या मानवजातीचा इतिहास आहे. राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक सर्व प्रकारच्या स्थित्यंतरांचे प्रतिबिंब या इतिहासात पडलेले दिसते. विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर माणसांचे स्थलांतर होते. अशा स्थलांतरानंतर जी देवाणघेवाण होते त्यातून कपड्यांचा इतिहास नवे वळण घेत जातो."
- २९ जानेवारी २०१८ ला प्रसिद्ध झालेला लेख : 'हे सर्व कुठून येते?'

२. "आजच्या जगाचा विचार केला तर अंगाभोवती वेगवेगळ्या प्रकारे कापडाचे वेढे घालून बनवायची वस्त्रं ही केवळ भारतीय उपखंडात किंवा भारतीय उपखंडात मूळ असलेल्या लोकांच्यातच दिसतात. त्यामुळे भारतीयांनाच केवळ ही भन्नाट आयडिया सुचलेली आहे असा गैरसमज व्हायला भरपूर वाव असतो."
- २७ फेब्रुवारी २०१८ ला प्रसिद्ध झालेला लेख 'नेसूचे आख्यान'

पुढचा लेख २७ मार्चला प्रसिद्ध होईल. तो झाला की इथे लिंक देईनच.
वाचा आणि प्रतिक्रिया कळवत राहा.

- नी

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुझा दुसरा लेख अजून वाचलेला नाही. इथे डकवलेस की जरूर वाचले जातील.

नवा लेख प्रकाशित झाला की प्रतिसादही दे आणि धागाही अपडेट कर. म्हणजे लक्षात येईल. आणि या लेखनाचं पुस्तक निघण्यासाठी शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो अपडेट करत जाईन लोकांना इंटरेस्ट असेल तर.

या लेखनाचं पुस्तक निघण्यासाठी शुभेच्छा. - थँक्स!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

तुमचं लिखाण आवडलं. तुमचा विषय रोचक आहेच शिवाय तो खुलवून सांगण्याची हातोटीही छान आहे. ह्या लिखाणाचं पुस्तक कराल अशी आशा आहे. लेखमालिकेसाठी शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

தநுஷ்

लेखन खास वाटल नाही. खुप सुधारणा आवश्यक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

नक्की काय प्रकारची सुधारणा आवश्यक ते तपशिलात लिहिल्यास मला काही उपयोगही होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

सहमत आहे. परंतु तुमचा इतिहास पहाता सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे.

तरी पाहू जमल्यास करु दोन चार सुचना

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

पारंपरिक भारतीय वस्त्रे ही विणलेलीच आहेत. शिवलेली वस्त्रे भारतात उशीरा आली. याचे कारण प्राचीन भारतीयांना शिवणकला ज्ञात नव्हती हे आहे काय? बहुधा नसावे. कारण हडप्पात प्राण्यांच्या हाडापासून बनवलेल्या सुया मिळाल्या असे वाचले आहे. तरीही, शिवलेली वस्त्रे फारशी प्रचलीत होती, असे वाटत नाही.

हवामान हे एक कारण लेखात दिले आहे. परंतु, त्यामागे आर्थिक कारणदेखिल असावे. एखादा कपडा शिवला की तो फक्त ती व्यक्तीच वापरू शकते. नेसूचे कापडमात्र घरातील इतर व्यक्तीदेखिल वापरू शकतात. तेवढीच बचत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विणलेलीपेक्षा गुंडाळलेली म्हणूया. शिवलेले असो वा गुंडाळलेले कपडे त्याचे कापड हे (चामडे वगळता) मागावर वा सुयांवर विणलेलेच असते.
आपल्याकडे शिवणकला तेवढ्या मोठ्या प्रमाणात विकसित झाली नाही. याचे कारण तलम कापडासाठी कापसाची मुबलकता आणि हवामान असे असावे असा एक अंदाज आहे.
तसेच अंग झाकणे व त्याला जोडून आलेल्या सभ्यतेच्या कल्पना या गोष्टीही आहेतच.

आर्थिक कारण हा मुद्दा नाही कारण समाजात अति श्रीमंत ते अति गरीब असे सर्व स्तर सर्व काळात होतेच की.
आर्थिक कारण असते तर निदान राजघराण्यातले लोक तरी शिवलेले कपडे वापरताना दिसले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

या संदर्भात, बचत हा मुद्दा फार महत्त्वाचा वाटत नाही. तुलनेसाठी उधळमाधळ करणारा पाश्चात्त्य समाज बघता येईल; त्यांच्याकडे शिवलेले कपडे वापरण्याचं प्रमाण बरंच जास्त होतं. आजही गरीब किंवा निम्नमध्यमवर्गीय घरांमधून आलेल्या पाश्चात्त्यांची उधळमाधळ कमी दिसते. उदाहरणार्थ, वस्तू पुरवून-पुरवून वापरणं; अन्न वाया न घालवणं; वापरलेल्या वस्तूंचा आपल्याला उपयोग नसेल तर इतरांना देणं आणि पर्यायानं आपणही इतरांनी वापरलेल्या वस्तू वापरणं.

उलटपक्षी, सभ्यतेच्या आणि शरीरप्रदर्शनाच्या कल्पना न बदलता, शिवलेल्या कपड्याला कमी कापड पुरतं आणि गुंडाळायचं असेल तर कापड जास्त लागतं. त्यातही, गुंडाळलेलं कापड दिसायला निदान बरं दिसेल आणि दिनचर्या बदलावी लागणार नाही हे गृहीत धरलं आहे. उदाहरणार्थ, लांब टांगा टाकत किंवा सायकलवरून जायचं तर विजारीला कापड कमी लागतं, दुटांगीकरण केलेल्या धोतराला जास्त. साधारण एकसारख्या दिसणाऱ्या शिवलेल्या स्कर्टाला कमी कापड पुरतं, स्कर्ट गुंडाळायचा असेल - wrap around - तर जास्त कापड लागतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरंय हे पण आर्थिक मुद्दा बघायचा भारतीय पारंपरिक अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवहारांकडेही बघावे लागेल. केवळ पैसे/नोटा/नाणी हे विनिमयाचे साधन होते का? निदान बेसिक वस्त्रांच्या बाबतीत याचा अभ्यास करावा लागेल. आपल्याकडे बार्टर सिस्टीम होती. कापूस उगवणारा शेतकरी आणि कापड विणणारा कोष्टी हे दोघेही बलुतं व्यवस्थेचा भाग होते. त्यामुळे आजच्या आणि इतिहासातल्या परिस्थितीची इतकी सहज तुलना करून चालणार नाही असे वाटते. तसेच वस्तू उपलब्ध असण्याचे प्रमाण (हातमाग-पॉवरलूम , हातशिलाई ते शिवणाचे मशिन वगैरे) हा ही एक महत्वाचा मुद्दा आहे.

आता पुढचा लेख पूर्ण करायला जाते. वरच्या सगळ्या गोष्टींवर जमल्यास लेखमालेत भाष्य करेनच.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

उलटपक्षी, सभ्यतेच्या आणि शरीरप्रदर्शनाच्या कल्पना न बदलता, शिवलेल्या कपड्याला कमी कापड पुरतं आणि गुंडाळायचं असेल तर कापड जास्त लागतं.

याबद्दल एक शंका आहे.

गांधीजी पंचा नेसायचे. त्यामागे, 'माझ्या देशबांधवांना नेसायला कपडा नाही, सबब मी कपड्याची बचत करावी' असा काहीसा फंडा होता.

गांधीजींनी पंचाऐवजी बॉक्सर शॉर्ट्स घातल्या असत्या, तर त्यांचे उद्दिष्ट अधिक प्रभावीरीत्या साध्य झाले असते, किंवा कसे?

दुसरा मुद्दा म्हणजे, शिवायच्या कपड्याला भले ही कापड कमी लागत असेल. परंतु शिलाईचे काय? तो अतिरिक्त खर्चसुद्धा विचारात घ्यावयास नको काय?

(अर्थात, भारतासारख्या देशात (मॅन्युअल) लेबर कॉस्ट ही एकूण किमतीत उलथापालथ करणारी गोष्ट नसावीही कदाचित. शिवाय, लेखिका म्हणतात त्याप्रमाणे बलुतेदारी/बार्टर सिस्टिममध्ये ते हिशेब वेगळ्या बेसिसवर होत असतील वा होत नसतीलही कदाचित. परंतु हे गृहीतक जागतिक पातळीवर ताणता यावे काय?)
..........

(बाकी, सभ्यतेचा मुद्दा इग्नोरला आहे. गांधीजी पंचा नेसोत वा बॉक्सर शॉर्ट्स घालोत वा टॉवेल गुंडाळोत; आमच्या लेखी ते सभ्यच आहेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------
"Politics is like driving. To go backward put it in R. To go forward put it in D." - Senator Tom Harkin.

>>शिवलेले असो वा गुंडाळलेले कपडे त्याचे कापड हे (चामडे वगळता) मागावर वा सुयांवर विणलेलेच असते.

सुयांवर विणलेले कापड म्हणजे निटिंग केलेले का? एक सुलट दोन उलट वगैरे (मोजे, स्वेटरसदृश?*) ते तर खूपच अलिकडे भारतात आले असावे. (औरंगजेब टोप्या विणून पैसे मिळवीत असे म्हणतात. पण ते क्रोशे असावे का? दोन सुयांनी विणलेले तितके जुने नसावे)

भारतीय पारंपरिक कपडे शिवलेले नसतात. धोतर, साडी, मुंडासे/पागोटे, पंचा, लंगोट, कंचुकी इत्यादि. शिवलेल्या कपड्यांतले सुद्धा पारंपरिक कपडे निटिंग केलेले नसतात. स्वेटर ऐवजी बंडी/जाकीट. हातमोजे/पायमोजे तर नसतातच.
भारतात कापड म्हणजे मागावर विणलेलेच असावे.
---------------------------------------------------------------
अवांतर : कापड चोपड यातील चोपड म्हणजे चोपडायच्या गोष्टी उर्फ अळिता, उटी वगैरे सौंदर्यप्रसाधने का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सुयांवर विणलेले कापड म्हणजे निटिंग केलेले का? -- हो.

विणलेली आणि शिवलेली असे दोन गट त्यांना अभिप्रेत होते. त्यातला गोंधळ स्पष्ट करण्यासाठी लिहिलेले ते वाक्य आहे. शिवलेल्या वस्त्रांचे कापड हेही विणलेलेच असते.
पारंपरिक वस्त्रे सुयांवर विणलेली आहेत असा कुठेच दावा नाही.

भारतीय पारंपरिक कपडे शिवलेले नसतात -- हे अर्धसत्य आहे.

कापड चोपड यातील चोपड म्हणजे चोपडायच्या गोष्टी उर्फ अळिता, उटी वगैरे सौंदर्यप्रसाधने का? -- तसा अर्थ घेऊ शकता पण कापडचोपड असा एक जोडशब्द वापरला जातो मराठीत. ज्यात मूळ शब्दाला वजन यावे म्हणून दुसरा , पहिल्यासारखाच नाद असलेला शब्द जोडला जातो. दुसऱ्या शब्दाला अर्थ असेलच असे नसते. मी वापरताना तश्याच प्रकारे वापरते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

वाचतो आहे!

मला टायसंबंधी एक प्रश्न आहे. तो योग्य वेळी विचारेनच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

मला टायसंबंधी एक प्रश्न आहे. तो योग्य वेळी विचारेनच.

प्रतीकात्मकता, लांबी, दिशादर्शकत्व (होकायंत्रसदृश गुणधर्म) आदींबद्दल काय?

(हिंट: उगाच नाही काही त्याला कंठ-लंगोट म्हणत! असो.)
..........

'सदृश'चा खुलासा (समझने वाले को इशारा, इ.इ.):

फारा वर्षांपूर्वी मागे एकदा दुबईमार्गे भारतात आलो होतो. अटलांटाहून दुबईपर्यंतचे विमान डेल्टा या अमेरिकन विमानकंपनीचे होते. (त्यापुढले दुबईहून मुंबईला जाणारे विमान हे कोठल्यातरी स्वस्त, टंपडू कंपनीचे होते, परंतु ते येथे महत्त्वाचे नाही. तर ते एक असो.)

तर लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांत प्रवाश्यांच्या करमणुकीकरिता प्रत्येक प्रवाश्याच्या खुर्चीसमोर सहसा एक एलसीडी स्क्रीन उपलब्ध असतो, आणि त्यावरील उपलब्ध पर्यायांत सहसा विमानाचा एकंदर उड्डाणमार्ग तथा विमानाची त्या उड्डाणमार्गावरील तात्कालिक स्थिती दर्शविणारा एक नकाशाही असतो१अ, हे लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाचा अनुभव असणाऱ्या मंडळींच्या गोटांत बहुधा सर्वज्ञात असावे१ब. त्याप्रमाणे, दुबईला जाणाऱ्या डेल्टाच्या आमच्या उड्डाणातही असा नकाशा उपलब्ध होता. मात्र...

नकाशा बनविताना दिशेच्या संदर्भासाठी त्यात कोठेतरी उत्तरेची दिशा दर्शविणारा एक छोटासा बाण अंतर्भूत करावा, असा एक संकेत आहे. सहसा सर्वच नकाशांत तो पाळला जातो, आणि लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांतले उपरोक्त नकाशेही त्याला सहसा अपवाद नसतात. मात्र...

अटलांटाहून दुबईला जाणाऱ्या डेल्टा या अमेरिकन विमानकंपनीच्या आमच्या उपरोक्त विमानातील नकाशात तसा तो नव्हता. त्याऐवजी... होल्ड युअर ब्रेथ... नकाशात मक्केची जागा ठळक करून त्याशेजारी मक्केची दिशा दर्शविणारा एक छोटासा बाण होता. आता बोला!

(ही ष्टोरी मी येथे का सांगितली, हे ज्या सुज्ञास समजले, त्यास या धाग्यातील या प्रतिसादाचे तथा विशेषतः या ष्टोरीचे औचित्य लक्षात आले असेलच. असो.)

१अ त्याव्यतिरिक्त, उड्डाणाची तात्कालिक उंची, त्या उंचीवरील तात्कालिक बाहेरचे तापमान, विमान ज्या भागातून उडत आहे तेथील तात्कालिक स्थानिक वेळ, गंतव्यस्थानाची तात्कालिक स्थानिक वेळ, आणखी किती वेळ उड्डाण बाकी आहे, अशी काही उपयोगी आणि बरीचशी तद्दन निरुपयोगी माहिती असते. तर असो.

१ब आजकाल कोणी वाटेल तो - युअर्स ट्रूली इन्क्लूडेड - उठून लांब पल्ल्याचा आंतरराष्ट्रीय विमानप्रवास करत असल्याकारणाने, हे ज्ञान बहुधा जागतिक असावे असे मानावयास प्रत्यवाय नसावा. चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

----------
"Politics is like driving. To go backward put it in R. To go forward put it in D." - Senator Tom Harkin.

गडबड करा, लवकर लेख टाका. अच्युत गोडबोले आणि एखादी सहलेखिका "अंगात" नावाचं पुस्तक पाडण्याआधी तुमचं पुस्तक येऊ द्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी5
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केवढी ही गोडबोल्याची दहशत. नीरजा, मनावर घेच गं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रोफल ROFLROFLROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त लेखन.

जाता जाता: पेशवाई काळात देशावरील सर्वसामान्य ब्राह्मणांचे शिरस्त्राण काय होते? रामजोशी पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे पगडी की अजून काही? पुणेरी पगडीचाच तो एक प्रीकर्सर असावासे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ब्राह्मणी रूमाल. तपशील नंतर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- नी

धन्यवाद, तपशिलांच्या प्रतीक्षेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उपक्रम स्तुत्य.

रोमन/इजिप्शन वस्त्रांचे फोटो जालावरून फ्री इमिजिज ठीक आहे परंतू
भारतात अथवा इतर देशांत फिरून काही फोटो घेतले असतील तर ते विकिकॅामन्सवर टाकून त्याच्या लिंक्स वापरणे पुस्तकासाठी योग्य ठरेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0