ऐसी अक्षरे ह्या संकेतस्थळावर मी घेतलेली प्रतिज्ञा

अलिकडे मी लिहलेल्या 'भारतीय करव्यवस्थेचे पाणीपुरीच्या संदर्भात आकलन' ह्या निबंधावर आलेल्या प्रतिक्रीया पहाता भांगसेवन करुन चांगली सृजननिर्मीती होउ शकते ही एक तद्दन खोटी अफवा आहे अशा निष्कर्षाप्रत मी आलो आहे. सबब इथुन पुढे ऐसी अक्षरे ह्या संकेतस्थाळावर पुर्ण शुद्धीत राहुन आणि किमान ४ स्टार मिळतील असे लेखन करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

शिवाय

१) ऐसीवर चार स्टार लिखाण करणारे लोक खर्‍या आयुष्यात प्रचंड आयसोलेटेड लोक असतात ही अतिशय वाईट अफवा असुन ही अफवा कशी खोटी आहे हे मी सप्रमाण सिद्ध करण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन.

२) आपल्या डोक्यात मराठीत नवा इतिहास घडवेल अशा कादंबरीची कल्पना असल्यास ती खपेल किंवा नाही ह्याचा अंदाज लावण्यासाठी त्यातले एखादे प्रकरण ऐसीवर टाकावे असा सल्ला काही लोक देत असतात. मी आयुष्यात कधी कादंबरी लिहायचे ठरविल्यास सर्वप्रथम त्यासाठी ऐसीच्या संपादक मंडळाची परवानगी घेईन. अशी परवानगी त्यांच्या कार्यकक्षेत येत नसली तरी त्यांनी ती द्यावी म्हणुन अमेरीकेतल्या इटालीयन लोकांची आणि महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी पक्षांची मी ह्या कामी मदत घेईन

३) ऐसीवर आपले लिखाण फ्लॉप गेल्यास प्रचंड पश्चातापाची भावना येते जी पिएचडीचा प्रबंध रिजेक्ट झाल्यानंतर आलेल्या भावनेच्या समकक्ष आहे. ह्या पश्चातापग्ध भावनेला टाळण्यासाठी मी ऐसीवर पिएचडीच्या प्रबंधापेक्षाही चांगल्या दर्जाचे लिखाण टाकीन.

४) फेसबुकवर एखादी कमेंट विस्तारु लागली म्हणजे तीच्यात पुर्ण पोस्टीचा जर्म आहे असा काही लोकांना साक्षात्कार होतो आणि मग ते त्या विषयावर स्वतंत्र पोस्ट लिहायला घेता. ही घाणेरडी पद्धत मी ऐसीअक्षरेवर कधीही वापरणार नाही, अवघ्या तीन ओळींच्या मुळ लिखाणाला दहा पानांचा प्रतिसाद द्यायचा असेल तरी मी तो कमेंटीतुनच देईन.

५) मुद्दा क्रमा़ंक २ मध्ये आलेले वाक्य < < कादंबरी नवा इतिहास घडवेल > > म्हणजे इतिहासाची मोडतोड करुन लिहलेली 'नवइतिहास' कादंबरी नव्हे. हा आणि असे काही संभाव्य फाटे येउ शकत असल्यास ते मी ता.क. मध्ये न टाकता मुळ मुद्द्यातच टाकण्यासाठी मी कंसाचा वापर करीन. अशाच प्रकारच्या सर्व कमेंटमधुन उपस्थीत होउ शकणार्‍या सर्व उपशक्यतांचा आगोदरच विचार करुन त्याचे स्पष्टीकरण कंसातुन आगोदरच देईन. (जसे की कंस ह्या शब्दाचा इथे अभिप्रेत असलेला अर्थ इंग्रजीतले ब्रॅकेट असुन त्याचा भगवान श्रीकृष्णांच्या मामा कंस ह्यांच्याशी नाही)

६) मुद्दा क्रमांक दोन मध्ये 'राष्ट्र्वादी पक्षांची मदत' ह्या शब्दरचनेत 'पक्षी' राष्ट्रवादी असतात का? असा संभाव्य विनोद ऐसी अक्षरेवर व्हायला हे काय फेसबुक किंवा मिसळपाव नाही हे गणीतीय प्रमेय मी नेहमी लक्षात ठेवीन.

७) फेसबुक हे एक वाईट संकेतस्थळ आहे. मी फेसबुकवर केलेले लिखाण कधीही ऐसीअक्षरे ह्या संकेतस्थळावर रिपब्लीश करुन ते कमेंटीतल्या लोकांना रिसायकल आणि रिफर्बीश करायला देणार नाही.

८) आपले जग हे लवकरच नंदनवन होणार असुन मानवप्राणी इंटरगॅलेक्जीयन स्पेशीज बनणार आहेत ह्यावर माझा पुर्ण विश्वास आहे. इंटरगॅलेक्जीयन स्पेशीज बनण्यासाठी लागणारे सर्व ट्रेनिंग, अंतर्वस्त्रे व वस्तुसेवा मी विना कटकट खरेदी करीन.

९) चिंतांतुर जंतु ह्या अकाउंटला मी माझ्या अ‍ॅमेवेच्या चेनमधल्या सर्वोच्च माणसाला दिला जाणारा आदर देईन.

१०) मी दिवाळीअंकातल्या फ्लॉप गेलेल्या लिखाणाच्या मानधनातुन चिकन मंचुरीयन खातांना ते अतिशय नम्रपणाच्या आणि अपराधीपणाच्या भावनेने खाईन.

---

(व्यवस्थापकीय टिप्पणी - पाणीपुरीच्या निबंधाचा दुवा डकवला आहे.)

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

१) ऐसीवर चार स्टार लिखाण करणारे लोक खर्‍या आयुष्यात प्रचंड आयसोलेटेड लोक असतात ही अतिशय वाईट अफवा असुन ही अफवा कशी खोटी आहे हे मी सप्रमाण सिद्ध करण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन.

लोलच लोल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

'न'बा' यांना मी विनंती करतो की या टेन कमांडमेंटस पैकी प्रत्येक प्वाइंटस च्या सर्व बाजू उलगडून दाखवाव्यात. साक्षात मोझेस ऐसीवर अवतरल्यासारखे वाटत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'न'बा' यांना मी विनंती करतो की या टेन कमांडमेंटस पैकी प्रत्येक प्वाइंटस च्या सर्व बाजू उलगडून दाखवाव्यात.

म्हणजे, आम्हाला दुसरे, याहून बरे काही उद्योग नाहीत काय?

नाही म्हणजे, नॉर्मली, मूडमध्ये असलो तर बाजू उलगडायला आम्हाला आवडते, मान्य आहे. पण हे म्हणजे निव्वळ टॉर्चर आहे हो!

साक्षात मोझेस ऐसीवर अवतरल्यासारखे वाटत आहे.

पहिली गोष्ट, आम्हाला असे काहीही वाटले नाही. रादर, दिवसाढवळ्या डोळयांसमोर काजवे चमकल्यासारखे वाटले. कानशिलेही लाल झाल्याचा भास झाला. पण ते एक असो बापडे.

दुसरे म्हणजे, मोझेसशीही आपले काही सेटिंग नाही ब्वॉ. (आणि दुश्मनीही नाही.) त्यामुळे, टेन कमांडमेंटासुद्धा जेथे उलगडून दाखविणार नाही, तेथे याचे काय घेऊन बसलात!

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा ३ व ४ फारच विनोदीआहेत. खरेआहेत. हाहाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुक हे एक वाईट संकेतस्थळ आहे.

एवढी थेट शिवीगाळ ऐसी अक्षरेवर करू नये, अशी सदस्य राहुल बनसोडे यांना विनंती. अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे म्हणून ते असं आणि एवढ्या कमी शब्दांत उधळूमाधळू नये. त्याऐवजी, फेसबुक हे चिल्लर, सवंग आणि लोकप्रिय संस्थळ आहे; असं म्हणावं. शिवाय फेसबुकवर रिच-टेक्स्ट-फॉरमॅटिंगही करता येत नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आठव्या मुद्द्याचा ऐसीशी असणारा संबंध उलगडून दाखवणाऱ्यांना माझ्यातर्फे दोन किटकॅट बक्षीस मिळतील. अर्थात, मी तुम्हाला प्रत्यक्षात भेटणार नाहीये, त्यामुळे इंटरनेटवरून पैसे मिळतील, ते किटकॅट मानून घ्यावेत.

किटकॅटच, कारण माझ्याकडे तिर्री मांजरी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रस्तुत लेखक असे म्हणतो की

८) आपले जग हे लवकरच नंदनवन होणार असुन मानवप्राणी इंटरगॅलेक्जीयन स्पेशीज बनणार आहेत ह्यावर माझा पुर्ण विश्वास आहे. इंटरगॅलेक्जीयन स्पेशीज बनण्यासाठी लागणारे सर्व ट्रेनिंग, अंतर्वस्त्रे व वस्तुसेवा मी विना कटकट खरेदी करीन.

वरील महावाक्यातील एक एक शब्द महत्वाचा आहे आणि अनेक गुढ प्रतिमा व प्रतिके यांत गुंफलेली आहेत हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्यावे. प्रस्तुत लेखक हा ग्रेसीजॉइसनकुलवंतस आहे ही महत्वाची बाब नेहमी लक्षात ठेवावी. तर

१- आपले जग हे लवकरच नंदनवन होणार असुन

आता वरील तुकडा बघा यात " आपले जग " या चा अर्थ असा आहे की ऐसीकरांचे जग म्हणजेच पर्यायाने त्यांना मराटी आंतरजालीय जग च अभिप्रेत् आहे. कारण जर दुसरे जग अभिप्रेत असते तर त्यांनी त्या जगाच्या आकाशावर त्यांची भाकिते कोरली/रखडली असती. पण त्यांनी इथे म्हणजे ऐसी अक्षरे वर असे / म्हटरखड / लेले असल्याने व आपल्यालाच उद्देशुन असल्याचे उघडच आहे.

तर ते अत्यंत आत्मविश्वासाने भाकित नोंदवीत आहेत की हे आपले ऐसीकरांचे जग नंदनवन होणार आहे. प्रस्तुत लेखक हा अगोदरच म्हटल्याप्रमाणे गुढ अशा ग्रेसीजॉइसन शैलीत लिहीत असल्याने इथे दोन तार्किक शक्यता नंदनवना संदर्भात जरी असल्या तरी ( म्हणजे एक पारंपरीक मुर्खांचे कि शहाण्यांचे नंदनवन हे जरी निश्चीतपणे सांगता येत नसले तरी ) होणार होणार बाई येणार येणार येणार सारखा आशावाद नक्कीच या बाबतीत प्रस्तुत लेखक मांडतो.

लवकरच हा शब्द थोडा गडबड आहे या संदर्भात हिंदु कलीयुगीन कालगणना डोक्यात ठेवावी किंवा अच्छे दिन कालगणनेचा ही आधार घेउ शकता. असो हा तुमचा प्रश्न झाला. तर लवकरच होणार.

२--मानवप्राणी इंटरगॅलेक्जीयन स्पेशीज बनणार आहेत ह्यावर माझा पुर्ण विश्वास आहे.

इथे मानवप्राणी म्हणजे केवळ मराठी आंतरजालच अर्थातच अभिप्रेत आहे. तर असे आहे की एक एक मराठी संस्थळ हे एक एक आकाशगंगा बनत आहे. म्हणजे आपण पुर्वी साधी माणसं होतो. आता आपण नुस्ती साधी माणसं न राहता एक एक बेटनिवासी (मुलनिवासी च्या चालीवर वाचावे संदर्भ लवकर लागेल ) बनलेलो आहोत. जणु एक एक संस्थळाच्या आकाशगंगेचे आपण दैदीप्यमान तळपणारे द्न्यानसुर्य च जणु. पण लेखक वास्तववादी असल्याने त्याला आपण इंटरगॅलेक्जीयन ( यातील इंटर हा शब्द इंटरनेटाशी असलेला संबंध उघडच दर्शवतो) स्पेसीज बनणार आहोत. यावर पुर्ण विश्वास आहे.

यात त्याला कदाचित एलियनेशन पण दाखवायचे असेल म्हणजे आपण ऐसी अक्षरकर अमुक कर तमुक कर इतके तुटक तुटक होउन जाणार आपापल्या गॅलेक्झ्यामध्ये की बस रे बस आपले फिचर्स ही आंतरबाह्य बदलुनच जाणार व एकमेकांशी आपला संवाद कायम्मचा तुटेल असे काहीसे भीषण वास्तव कदाचित ते दाखवत असावेत असा एक प्राथमिक अंदाज वाटतो.

३-इंटरगॅलेक्जीयन स्पेशीज बनण्यासाठी लागणारे सर्व ट्रेनिंग, अंतर्वस्त्रे व वस्तुसेवा मी विना कटकट खरेदी करीन.

हे काही नाही हे फक्त प्रस्तुत लेखकाचा उत्साह दर्शवणारे वाक्य आहे इतकेच याला हलक्यात घ्यावे हे वेगळे सांगणे न लगे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देवदिपावली असते तशी देवहोळीसुद्धा असते हे परवा कोकणात कळले. चैत्री पौर्णिमेला - हनुमन्तजयन्तीला. मनुष्याच्या आणि देवाच्या उड्या आणि आनंद वेगळाच असणारच.
बाकी स्पेसमध्ये विहार करायला इकडून नेलेली अंतरवस्त्रे ( सोमवारच्या बाजारतली स्वस्तातली) कशाला? मुळात ती वस्त्रेच नको. धुवायला पाणी फार लागते.
बाकी पुस्तकविक्रीत गल्ला आणि संस्थळांवर चटपटीत लाइक्स हवेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अविनाश धर्माधिकारीकृत ॐ=mc² ह्या तत्त्वाचा मुळ उगम सायंटॉलॉजी ह्या महान अमेरीकन धर्मातुन झाला आहे. त्या पंथात सामील व्हायचे असल्यास त्यांची 'मॅजीक अंडरवेअर' किंवा जादुई अंतर्वस्त्रे विकत घ्यावी लागतात. इंटरगॅलेक्जीयन स्पेशीज बनायच्या पंथातही अशी मॅजीक अंडरवेअर असण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रतिज्ञेत त्याचा उल्लेख केला.

अधिक माहितीसाठी

https://www.youtube.com/watch?v=FVYiDUwH_Tw

https://www.youtube.com/watch?v=DBhGcyqsfM8

हे पहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

++माझ्या अ‍ॅमेवेच्या चेनमधल्या सर्वोच्च माणसाला दिला जाणारा आदर देईन.++
या सर्वोच्च जीवन गौरव सन्मानाचे कारण कळेल का ?
आणि हा सन्मान त्यांना एकट्यालाच कि फुल्ल ऐसी मॅनेजमेंट ला आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अबापटजी
एमएलएम चेनमधल्या सगळ्या मॅनेजमेंटला 'श्रेय' मिळते पण फायदे वा सन्मान चेनमधल्या सर्वोच्च माणसालाच असतो. अधिक माहितीसाठी सोबत जोडलेले ग्राफीक पहावे.
Amway

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा उपाय मला चांगला दिसतोय.
राहुल बनसोडेंचा हत्ती करायचा असेल तर आपण उंटासारखा तिरका वा (खर म्हणजे तिरपागडा काहीबाही ) अर्थ काढायचा
मग ते गुमान हत्ती सारख सरळ स्पष्टीकरण देण्यास मजबुर होउन जातात.
म्हणजे मग आमच्या सारख्यांना नवा बल्ब लागतो व माहीत होते की असे आहे होय बनसोडेंच्या अंतर्वस्त्रा मागे धर्माधिकारींची ही प्रेरणा होती तर
बनसोडेंच्या अंतर्वस्त्रांतर्गत बाबीं ना उचकटण्यास्तव उत्सुक मारवा
बाकी स्पष्टीकरणासाठी धन्यवाद
किटकॅट नही मिली तो क्या हुआ क्लॅरीटी की कॅटबरी तो मिल गई
पण बनसोडे तुम्ही इतके म्हणजे इतके कसे हो तिरके ?
की तुमच्यासमोर नेमाडे/ मनोहर ही पडावे फिक्के !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राहुल बनसोडेंचा हत्ती करायचा असेल

नको हो! इथे आधीच एका हत्तीने उच्छाद मांडलाय. आणखी एक मुळीच नको.

(अवांतर: 'हत्तीने' टंकल्यास ऑटोकरेक्ट पहिल्या वेळेस त्याचे 'स्त्रीने' करते. आफत!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

पटावर राजाला क्यासल करतात. ऐसीवर हत्तीला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमाडे मनोहरांचा तिरकेपणाला इंटरनेटची जोड नाहीय. आपल्या सर्वांना ते उपलब्ध असल्याने दहापट तिरकेपणा करता येतो. किरण नगरकरांची 'सात सक्कं' ही कादंबरी कित्येक दशके पोस्टमॉडर्न समजली जात होती पण जसजसा इंटरनेटचा प्रसार झाला तसतशी कादंबरीतली अगम्यता कमी होत गेली. लवकरच ते पुस्तक 'बटाट्याची चाळ' ह्या पुस्तकासारखे सोपे होण्याची शक्यता आहे. पोस्टट्रुथला मात्र कुणी मराठी लेखक हात लावीत नाही. 'मराठी साहित्यातल्या अगम्यतेचा इतिहास' हे आंथ्रॉपोलॉजीकल संशोधन करायला हवेय आता कुणीतरी. असे संशोधन करणारा महानायक किंवा महानायिका ऐसी अक्षरेवरच जन्माला येईल अशी मला शक्यता वाटते.

ऐसीअक्षरे हे येउ घातलेल्या महान मराठी तत्त्वज्ञांचे इन्क्युबेटर (उबवणी केंद्र) आहेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चिंतांतुर जंतु ह्या अकाउंटला मी माझ्या अ‍ॅमेवेच्या चेनमधल्या सर्वोच्च माणसाला दिला जाणारा आदर देईन.

म्हणजे तुम्ही अॅमवेत का आहात? पंचवीस हात दूर राहिले पाहिजे तुमच्यापासून!

(चिंजं, आपण नसते हो ऐकून घेतले! बोले तो, आम्हाला जर कोणी आईबहिणीवरून शिवी दिली, तरी तो अपमान एक वेळ सहन करता येईल; त्याकडे एक वेळ दुर्लक्ष करता येईल. पण अॅमवेचा माणूस? आणि त्यातही चेनमधला सर्वात वरचा? मराठीच कशाला, जगातल्या कोठल्याही भाषेतली सगळ्यात गलिच्छ शिवी आहे ती! आपण नसते ब्वॉ ऐकून घेतले!)

बनसोडे, चिंजं इतकाही वाईट माणूस नाही हो!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

चिंजं इतकाही वाईट माणूस नाही हो!

आज मी भरून पावलो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुम्हाला कुठं उभं राहायचं ते रहा (म्हणजे ते तुम्ही राहालाच ) पण माझा अमवेशी संबंध नाही .
माझा प्रश्न स्वतःबद्दल नसून , ऐसी म्यानेजमेंट मधील जंतू सोडून उर्वरित हजर , गैरहजर मेम्बरांबद्दल होता .
बाकी काही म्हणा , तुम्ही जंतूंना 'इतकाही वाईट नाही' हे सर्टिफिकेट दिल्याने त्यांना मात्र स्वतः अमवेतील सर्वोच्च माणूस असल्यासारखे भासत असेल ...बहुधा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण माझा अमवेशी संबंध नाही .

नाही हो, ते कळले. तसला गलिच्छ आरोप मी तुमच्यावर केलेला नाही, आणि करणारही नाही. मला तुमच्याबद्दल (फॉर व्हॉटेव्हर रीझन) आदर आहे.

(किडिंग अपार्ट, खरोखरच आहे. आदर.)

बाकी काही म्हणा , तुम्ही जंतूंना 'इतकाही वाईट नाही' हे सर्टिफिकेट दिल्याने त्यांना मात्र स्वतः अमवेतील सर्वोच्च माणूस असल्यासारखे भासत असेल ...बहुधा

याचिसाठी केला होता अट्टाहास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही. चिंतातुर जंतू हे चांगलेच आहेत पण प्रॉब्लेम हा आहे की कदाचित ते एकटेच चांगले आहेत, त्यामुळे त्यांना आदर द्यावासा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवढा हा अपमान! मी नसतं हो हे ऐकून घेतलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चिजं, चांगलं कसं व्हायचं ? काही मार्गदर्शन ? आम्ही क्लास लावायला तय्यार आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिजं, चांगलं कसं व्हायचं ? काही मार्गदर्शन ? आम्ही क्लास लावायला तय्यार आहोत.

जर तुमच्या आयुष्याच चिज व्हायच असेल चिंजं सारखं तर तुम्ही
चांगल होण्याच्या नावानं च चांगभल केल पायजेल.
तर कुठे तरी तुम्ही चिंजत्व अर्जित करु शकण्याची शक्यता निर्माण होइल.
बघा बुवा
खखोचिजा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे एकटे नसताना,इतर ग्यान्गबरोबर बय्रापैकी वेगळेच?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांचे एकट्यातले संवाद आणि इतर गॅन्गबरोबर असतांनाचे संवाद विशेष बदलत नाहीत पण त्यांचे हसु चारचौघात असतांना इतके कमालीचे पोस्टमॉडर्न असते की त्याची पंचवीस ईंटरप्रिटशने येतात. एलएसडी घेतल्याशिवाय हा सगळ्या इंटरप्रिटेशनचे अर्थ लागणे केवळ अशक्य आहे आणि सांप्रतकाळी एलएसडीचे भाव पहाता हे अतिशयम महागडे आहे. एकुण चिजंचे हास्य हे एक अतिमहागडे हास्य आहे. पिनो नुवार वाईनच्या तीस वर्षे जुन्या बाटलीसारखे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे तुम्हाला एलएसडीचे आजचे बाजारभावसुद्धा ठाऊक आहेत?

कठीण आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बालका, माझे हसणे तुला कळायचे नाही. पंचवीस पृथ्विप्रदक्षिणा करून ये बघू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0