अधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान

माणसाने विवेकाचा, शिक्षणाचा, आधुनिकतेचा कितीही टेंभा मिरवला तरी गैरसोईचे सत्य पुढे आले की तो गडबडुन जातो, चवताळतो. हे गैरसोईचे सत्य मी-मी म्हणणार्‍या लोकांना अडचणीत आणते. मग मूळ प्रश्न शिताफीने नाकारून तो प्रश्न उजेडात आणणार्‍याला सुळावर चढविण्याचे उद्योग होतात.

हे सर्व ठाऊक असून आज एक गैरसोईचे सत्य मला सांगायचे आहे. हे सत्य सांगायचे आणि स्वीकारायचे धाडस फार थोडे लोक करतील.

आपण अन्नधान्याची आधुनिक तंत्रज्ञानाने निर्मिती करतो, तेव्हा त्या अन्नाचे पोषणमूल्य जास्तीत असावे यासाठी उत्तम प्रतीच्या बियाणाचा वापर शेती करताना व्हावा याकडे आग्रह आपला असतो. पशुपालनात जास्तीतजास्त दूध देणार्‍या गाईम्हशी, कुक्कुटपालनासाठी जास्तीत जास्त अंडी देणार्‍या कोंबड्या मिळाव्यात यासाठी सर्व जनुकीय तंत्रज्ञान पणाला लावतो. नुकतेच एका प्रसिद्ध दुग्ध उत्पादकाच्या जाहिर मुलाखतीत असे कळले की म्हशीला हमखास म्हैसच होईल असे (म्हणजे लिंगनिश्चितीचे) तंत्रज्ञान आता विकसित झाले आहे. या सगळ्या उपद्‍व्यापामागे माणसे इतर जीवांसाठी जी मूल्ये विकसित करतात ती मूल्ये स्वत:साठी मात्र झिडकारतात. (उदा. द्यायचे झाले तर संततीच्या लिंगाची निवड किंवा उत्तम वाणाची संतती हा विचार मनुष्य स्वत:च्या बाबतीत स्वीकारणार नाही. असो.)

मला जे गैरसोईचे सत्य सांगायचे आहे, ते समजण्यासाठी प्राथमिक जीवशास्त्राची उजळणी आवश्यक आहे. सर्व लैंगिक प्रजोत्पादन करणार्‍या जीवांमध्ये जेव्हा मादी गर्भ धारण करते तेव्हा अर्धी गुणसुत्रे (केंद्रकाम्ले) नराकडून शुक्रजंतुच्या मार्फत आणि अर्धी गुणसूत्रे स्त्रीकडून बीजांडाच्यामार्फत येतात आणि गर्भधारणेच्या वेळेला संयोग पावून गर्भ वाढायला सुरुवात होते. यात महत्त्वाचा आणि धक्कादायक पुढे आहे. सध्याच्या काळात शिकून नोकरी करणार्‍या स्त्रिचे लग्नाच्या वेळी सरासरी वय २८-३० असते. म्हणजे आज जन्माला आलेल्या मुलाचे बीजांड त्याच्या आईचा गर्भ तयार होत असताना (तिच्या आजीच्या गर्भधारणेच्या वेळी) तयार झालेले असते. म्हणजे आईकडून मिळणारा जनुकीय वारसा सुमारे ३०वर्षे या जगात अस्तित्वात असतो. त्यात मुंबई, कलकत्ता सारख्या बकाल शहरांमध्ये जन्माला आलेल्या आणि वाढलेल्या आईच्या पोटातील बीजांडांवर तेथील प्रदूषण आणि जगण्याचा संघर्ष यामुळे केंद्रकाम्लावर घातक परिणाम होण्यास सुरुवात होते आणि अत्यंत संथपणे बीजांडे किडायला सुरुवात होते आणि सदोष संततीसाठी कारणीभूत ठरते. गर्भधारणेपूर्वी आईला धूम्रपान आणि मद्यपान यांचे व्यसन असल्यास याची गंभीरता अधिक वाढते. यातील काही सदोष संतती नैसर्गिक गर्भपाताच्या रुपाने बाहेर टाकली जाते. पण ते जन्माला येणार्‍या सर्वच जीवांच्या बाबतीत होत नाही आणि काही व्याधी किंवा दोष जन्मत:च घेऊन बाळ जन्माला येते किंवा काही दोष पुढे उत्तर आयुष्यात व्याधींना जन्म देतात. जन्माला येणार्‍या बाळाचा काही (अर्ध्यापेक्षा कमी) जनुकीय वारसा वडिलांच्याकडून येत असला तरी पुरुषांचे शुक्रजंतू तूलनेने ताजे असल्याने सदोष संततीचा दोष (दूर्दैवाने) स्त्रियांकडे जास्त जातो, हा गैरसोईच्या सत्याचा महत्त्वाचा भाग. शुक्रजंतूवर पण ताण आणि प्रदूषणाचे परिणाम होतच असतात आणि प्रजननाची समस्या किती गंभीर बनत चालली आहे, हे अधुनमधुन वाचायला मिळणार्‍या बातम्यांमुळे कळते. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर महानगरे "किडकी प्रजा" निर्माण करत आहेत...

सजीवांच्या पेशीतील केंद्रकाम्लाचा शोध १९५३ मध्ये लागला, त्यानंतर पेशीविज्ञानात अधिकाधिक प्रगतीच होत राहीली. संपूर्ण मानवी जनुकसंचाचे तसे़च पेशीकेंद्रकाच्या अंतर्रचनेचे रहस्य शास्त्रज्ञानी आता उलगडले आहे. पेशीच्या केंद्रकामध्ये केंद्रकाम्लाच्या लडी तयार झालेल्या असतात. हिस्टोन या प्रथिनांभोवती एखाद्या रिळाप्रमाणे केंद्रकाम्लाचे वेढे बसलेले असतात. हे वेढे बसण्याची कारणे गमतीदार आहेत - पेशीतील केंद्रकाम्लाची जर नुसती साखळी उलगडली (जिला इंग्लिश्मध्ये क्रोमॅटिन म्हणतात) आणि तिची लांबी मोजली तर ती सुमारे २ मीटर इतकी भरते. आता इतकी मोठी साखळी एका पेशीच्या सूक्ष्म केंद्रकामध्ये बसवण्याचे काम निसर्ग मोठ्या हुशारीने करतो. हिस्टोन हे धनभारित अल्कली गुणधर्माचे प्रथिन असते तर केंद्र्काम्ल ऋणभारित असते. हीस्टोन प्रथिनांना शेपट्या असतात. केंद्रकाम्लातील जनुक, हिस्टोनच्या शेपट्याना कोणते रेणू चिकटतात यावर ते सक्रिय होणे अथवा निष्क्रीय होणे अवलंबून असते. हिस्टोनच्या शेपट्याना सहसा मेथिल, ऍसिटील आणि फोस्फोरिल रेणू चिकटतात. या प्रथिनांभोवती गुंडाळले गेल्यामुळे केंद्रकाम्लाची लांबी आपोआप बरीच कमी होते आणि ते पेशीच्या केंद्रकात व्यवस्थित बसते.

हीस्टोन प्रथिनांचे चार मुख्य प्रकार आहेत. ते h1, h2 h3 आणि h4 या सांकेतिक नावांनी ओळखले जातात. हिस्टोनच्या शेपट्याना कार्बन आणि नायट्रोजन यातील एका बाजुला कार्बनचा अणु आणि दूसर्‍या बाजुला नायट्रोजनचा अणु असतो. नायट्रोजनचा अणु असलेली शेपटी जरा लांब असल्याने ती केंद्रकाम्लाच्या हिस्टोनभोवती तयार झालेल्या गुंडाळीतून बाहेर डोकावते. ही हिस्टोन प्रथिने एखाद्या कळीप्रमाणे (स्वीच) जनुकांना सक्रिय, निष्क्रिय करण्याचे काम करतात. गर्भधारणेच्यावेळी आद्य पेशीमध्ये जेव्हा मातेचे आणि पित्याचे केंद्रकाम्ल संयोग पावते तेव्हा या लडीं हिस्टोनसह नवीन जिवामध्ये संक्रमित झालेल्या असतात. पूर्वी म्हटल्याप्रमाणे पित्याकडुन फक्त केंद्रकाम्लाची अर्धी साखळी शुक्रजंतू वाहून आणतात. हिस्टोनची देणगी मात्र आईकडूनच मिळते. पित्याकडून जेमेतेम १०% हिस्टोन मिळतात.

आपले पर्यावरण, अन्न आणि जगण्याचा संघर्ष जनुकीय पातळीवर दूरगामी बदल घडवून आणतात, हे सांगणार्‍या अधिजनुकशास्त्राची मुहूर्तमेढ कोनरॅड वॅडींग्टनच्या संशोधनातून 1942 मध्ये रोवली गेली. तेव्हापासून या शाखेची वाढ वेगाने होत असून दरवर्षी प्रसिद्ध होणार्‍या संशोधन निबंधांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे.

आईवडिलांच्या आणि आईच्या आईच्या जीवनशैलीचे संततीवर जनुकांमार्फत कायमस्वरूपाचे दूरगामी परिणाम होतात, हा अधिजनुकशास्त्राचा महत्त्वाचा संदेश आहे. त्याच बरोबर आपले पर्यावरण, जीवनशैली आपल्या जनुकांना अधिजनुकीय बदलांद्वारे नियंत्रित करते. शारीरिक व्यंगापासून कर्करोगासारख्या गंभीर व्याधीपर्यंत अधिजनुकीय बदलांचा प्रभाव कारणीभूत ठरतो. नुकतेच दिवंगत झालेले विख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकींग आणि अनेक विद्वान मानवजातीच्या भवितव्यबद्दल धोक्याचे इशारे देत आहे आणि अधिजनुकशास्त्रातील संशोधन या इशार्‍यांना पुष्टी देत आहे. विज्ञानप्रसाराला वाहून घेतलेल्या अनेक व्यक्ती आणि संघटना याबाबत मूग गिळून गप्प आहेत.

आपले जनुक आपल्या कर्तृत्वाचे कारण आपण आजवर मानत आलो आहोत. पण हे जनुक कार्यान्वित होणे अथवा निष्क्रिय होणे हे आपली जीवनशैली आणि पर्यावरण यावर अवलंबून असेल. त्यामुळे आपले कर्तृत्व मनगटापेक्षा आजुबाजुच्या वातावरणाने जास्त नियंत्रित होईल. खगोलशास्त्रापेक्षा जनुकशास्त्र आणि अधिजनुकशास्त्र जर लोकप्रिय झाले तर समाजाचा जास्त फायदा होईल असे वाटते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मूल होण्याअगोदर तीन वर्षे बाळंतपणासाठी दूरवर खेडेगावात राहिले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ते म्हणतात की जन्मल्यापासूनच त्यात किडण्याची प्रक्रिया चालू असते.

आयुष्यभर बेबंद वागल्यावर शेवटी देवपूजा करून काही फायदा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वातावरण पर्यावरण स्वच्छ हवे तर आठवड्यातून एकदाच बाजारच्या दिवशी एसटी येते अशा गावात जायला नको का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण आजीच्या जलमापासून सतत अशाच गावात राहायला हवे. आता मूल जलमाला घालायचे आहे म्हणून दोन वर्षे राहायला जाऊन पुरणार नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण आजीच्या जलमापासून सतत अशाच गावात राहायला हवे. आता मूल जलमाला घालायचे आहे म्हणून दोन वर्षे राहायला जाऊन पुरणार नाही

"मल्टायजनरेशन फ्यामिली प्लॅनिंग : हाऊ टू हॅव नॉन-किडके ग्रेट ग्रँडचिल्ड्रेन" असा एखादा पेपर लवकरच प्रसिद्ध व्हावा ही 'सदिये'च्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

मामला गंभीर आहे ! आणि अशा प्रकारचं संशोधन देखील फारच रोचक ! "किडकी प्रजा" हे याच विषयाचा उहापोह करणाऱ्या एका फिक्शन ( कदाचित सायन्स फिक्शन) कादंबरीचं नाव म्हणून भारी वाटेल !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

अतिशय मोलाचे संशोधन.

आपण या संशोधनाच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे का? नसल्यास त्वरीत करा. किडक्या प्रजेतील काही जण तुमच्या संशोधनावर आपले नाव लावतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

५५२ फोटो पाहणे अशक्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणूनच आयुष्यात काही करू पाहणाऱ्या स्त्रियांनी मुलं जन्माला घालण्याच्या फंदात पडू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बंड्यांना ( बंडी आणि बंडू यांना) शिकलेली आई मिळालीच पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.
शिकलेली आई. नोकरी करणारी बायको. स्वयंपाक करणारी सून. नवरा सोम ते शुक्र काम करुन थकतो म्हणून त्याला फ्रेश होण्यासाठी विकेंडला रिसोर्टमधे पाय ओढत पोराबाळांचे लेंढार घेऊन त्याच्या मागे धावत जाणारी वगैरे सर्व.

आणि हे सर्व एकाच बाईने केले पाहिजे ही अपेक्षा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाचे तात्पर्य:- आधुनिक राहणीमान जीवनशैली सोडा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

या अत्यंत महत्वाच्या विषयावर फारच कमी संशोधन झाले आहे. PUBMED या मेडिकल डेटाबेस मध्ये पहिले, वाटले होते हजारो शोधनिबंध असतील, पण कोणत्याही प्रकारे सर्च केला तरी सरासरी वीस-पंचवीसच निघाले. निम्मी मानवजात आता शहरात राहते हे लक्षात घेता हे एक मोठे आश्चर्य आणि त्रुटी मानावी लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"या अत्यंत महत्वाच्या विषयावर फारच कमी संशोधन झाले आहे."

पुढील आलेख ’वाढत’ असलेल्या संशोधनाचा पुरेसा निदर्शक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे तर्कतीर्थ आणि मिलिंद पदकी यांची चर्चा झाली तर वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गरोदरपणात केलेल्या बेबंद वाचनात १९ ते २३ वयात झालेली अपत्ये जनुकीय दृष्ट्या उत्तम प्रतीची असतात असे शास्त्रीय (वाटणारे) संशोधन सापडले होते. तेव्हा, हे संशोधन सर्वमान्य झाले, तर, सध्या गरोदरपणाची रजा असते त्या धर्तीवर शिकताना एकेक वर्ष गॅप घेऊन मूल जन्माला घालायची प्रथा येईल असा निष्कर्ष काढला होता. बाळाच्या आईकडील नातेवाईक पुढे काही वर्षे बाळाला सांभाळायला मदत करतील व आईची करियर मार्गी लागल्यावर व आयुष्यभराचा जोडीदार सापडल्यावर जबाबदारी आईवडिलांकडे येईल. या प्रकारे, आपल्याला जनुकीय दृष्ट्या प्रेमात पाडणाऱ्या व्यक्तीबरोबर अपत्यनिर्मिती करणे आणि स्वभाव, आवडी जुळणाऱ्या व्यक्ती बरोबर संगोपन, संसार करणे असा (ओरिजिनल नैसर्गिक) अल्गोरिदम परत वापरात येईल असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रकारे, आपल्याला जनुकीय दृष्ट्या प्रेमात पाडणाऱ्या व्यक्तीबरोबर अपत्यनिर्मिती करणे आणि स्वभाव, आवडी जुळणाऱ्या व्यक्ती बरोबर संगोपन, संसार करणे असा (ओरिजिनल नैसर्गिक) अल्गोरिदम

म्हणजे पुरुष जात ही १.वळू आणि २. वझ्याचे बैल अशा दोन गटांत विभागली जाईल.

मग बेंबट्याचे बाबा डोईवर तेल थापत सांगतील: बेंबट्या जगात वझ्याच्या बैलांना तोटा नाही. तस्मात वळू हो.. कांय समजलांस? Wink

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यापेक्षा , वयाच्या १९-२३ दरम्यान स्त्रीबीज काढून गोठवून नंतर वापरता येईल की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0