अल्लोळीबल्लोळी

लहानपणी म्हणजे शाळेत असताना आमच्याजवळ पैसे असत नसत. एकतर घर जवळ होतं त्यामुळं रिक्षा बसचा प्रश्न नव्हता, सायकल वापरत नव्हतो त्यामुळं हवा, पंक्चरचाही प्रश्न नव्हता. दुसरं म्हणजे वह्या, पेनं, शिसपेन्सिली, शाया, पाटीपेन्सिली, सगळंच नीट असत असे. आणि डबे वाॅटरबॅगासुद्धा नीट असत. आमची पंचाईत व्हायची मग शाळेत असताना, मधल्यासुट्टीत किंवा शाळा सुटल्यावर ते बारकी बोरं, रंगीत फुटाणे, खारे शेंगदाणे, पेरु, रंगीत गोळ्या, आवळे, चिंचेचे गोळे, इमलीपाॅप्स वगैरे पदार्थ आम्हाला घ्यायला मिळत नसत. आणि घरी 'हे हवंय' असं म्हणालं की मोठ्ठच्या मोठ्ठं प्रवचन, व्याख्यान इ कायकाय ऐकावं लागत असे. "ते चांगलं नसतंय", "कसलेतरी पदार्थ वापरून केलेलं असतंय", "त्यात रसायनं मिसळलेली असतात, जीभ-घसा जळून जातंय त्यानं", "अस्वच्छ असतंय", "रस्त्यावर किती धूळ धुरळा असतोय" एकदा तर "त्यात ड्रग्ज मिसळलेली असतात, त्यांच्या टोळ्या शाळकरी मुलांना असंच भुलवतात" असंही सांगितलेलं, आणि तरीही हट्ट सुरु असला तर "काय भिकेचे डोहाळे? एकदा सांगितलेलं कळत नाही? घरात सगळं साजरं, शेलकं खायला मिळतंय ते नको आणि दळभद्री लक्षणं रस्त्यावरचं पाहीजे झालंय, पुन्हा तोंडातून शब्द काढलास तर बोलणं बंद करणार" इथं आमची विकेट पडून आम्ही गप्प बसत असू तोंड पाडूनच.

तर ते असो, आमचे वासूकाका एक चटकमटक पदार्थ करत असत, क्वचितच कधीतरी तो पदार्थ केला जात असे. अगदी सठीसहामासी वगैरे म्हण्टलं तरी चालेल. तर तो पदार्थ म्हणजे 'अल्लोळीबल्लोळी'. नंतर आई चिकारवेळा करत असे तो पदार्थ आणि आपल्या आईला एकही पदार्थ येत नाही असं नाहीये याचा अभिमानच नव्हे तर गर्व बिर्व वाटत असे. तर ते असो. हे अल्लोळीबल्लोळी म्हणजे जास्त काही नाही तर सुक्या चिंचा, हिंग, तिखट, मीठ (सैंधव), गूळ यांना खलबत्ता नाहीतर पाटा वरवंट्यावर नीटस वाटून घेऊन त्याची चिकटसर चटणीसदृश करायचं. आईस्क्रीम खायच्या लाकडी भुशाच्या चमच्याला त्या चिकट चटणीचे गोळे करून लावायचे आणि लाॅलिपाॅप्स सारखं ते खायचं. झालं! चटकमटक, टाॅक्क् असं हे खाणं. चुटकीसरशी तोंडाची गेलेली चव परत येते.

आता हे नाव 'अल्लोळीबल्लोळी' नेमकं कुठून आलं माहित नाही. उत्तर कर्नाटक(म्हणजे आमचा मूळ प्रांत) किंवा आमचं कोल्हापूर इथला शब्द असू शकेल, पण फारा लोकांना हे नाव माहित नाही. या पदार्थाबद्दल बोलताना, चर्चा करताना काहीजणींकडून याला 'हिंगणमीठा' असं म्हणतात असंही समजलं, तर काहीजणांकडून याला 'चिंगळ्या' म्हणतात असं समजलं. मग म्हण्टलं नावाच्या चर्चा नंतर कराव्यात वगैरे.
तर आता खलबत्ता किंवा पाटावरवंटा न घेता मिक्सरच्या बारक्या भांड्यातून हे मिश्रण भरडसरच काढून घेऊन, आईस्क्रीमच्या कांड्या आणायचा कंटाळा केल्यानी त्याचे छोटेछोटे लाडू किंवा पेढे बांधून ते कुकी आणि केकसाठीच्या म्हणून आणलेल्या फाईन कॅस्टरशुगरमधे घोळवून ठेवले.

आता येताजाता टाॅक्क् टाॅक्क् करणं सुरू.

~अवंती

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मी कोल्हापूरचा. हुबळीतही कांही काल होतो. या पदार्थाला आम्ही 'चिंचेचा कुट्टा' म्हणत असू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गावरान

आपल्या आईला एकही पदार्थ येत नाही असं नाहीये याचा अभिमानच नव्हे तर गर्व बिर्व वाटत असे.

आम्हालाही एक(च) पदार्थ येतो. त्याबद्दल इतःपर स्वतःचा अभिमान बाळगेन.

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

चिंगळ्या!!! मलाही चिंगळ्या असं आठवतंय ! पण हे जास्तकरून मुली खात असत ! मी एकदा किंवा दोनदा च खाल्लं असेल ! पण ही बाकीची नावं मस्त आहेत , खासकरून अल्लोळीबल्लोळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

ऐसीवर नवीन आहात की बऱ्याच दिवसांनी लिहीत आहात ? लिखाण आवडले.( पूर्वी ऐसी वर अशा प्रकारचे बरेच लिखाण होई. आणि त्याला प्रतिसाद ही भरपूर मिळत. हल्लीच इथे काय झालंय कळत नाही )तुम्ही बरेच लिहिता याची कल्पना आहे . इकडे जास्त का लिहीत नाही ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुन्याच आहेत.

(अरे, कोणी 'माहितीपूर्ण' द्याल की नाही? गेला बाजार 'पकाऊ' तरी?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिली हो दिली , माहितीपूर्ण !!!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनापासून आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"माहितीपूर्ण"वर समाधानी आणि कृतज्ञ?

इतकं अध:पतन?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'नाइलाजा, राष्ट्रपिता तुझे नाव!'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाव ऐकले नव्हते. आम्ही आमसुलाची जिरागोळी करायचो. आता या दुकानात तयारच मिळतात.
चिंचगोळ्या आणि बोरकुटही तयार मिळते. आवळासुपारीही. परंतू आवळाकँडी मिळमिळीत असते.
आणखी एक पदार्थ - रावळगाव - गुळ वितळवून त्यात साय घालायची. उत्तम रावळगाव होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान! सांगलीला आजोळी गेल्यावर गोळ्या, खाऊ मागितला की मावशी सुकली चिंच, त्यात किंचित तिखट मीठ, गुळ अस एकत्र कुटून काडीला गोळा लावून द्यायची. तेच आमचं लालिपॉप I-m so happy
आता मी पण मुलाला कधीकधी ते बनवून देते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रेणी कशी द्यायची??

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रेणी देण्याची सुविधा प्रख्यात समिक्षा लेखिका अनुरावनाही नव्हती!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या आहेत कुठे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

खरंच कशी द्यायची श्रेणी?
कोणती पुण्ये अशी येती फळाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

पूर्वजन्म..

गतजन्मात कधी तुम्ही एखाद्या मुंगीवर पाय दिला असेल. ज्यांनी नाही दिला त्यांना श्रेणिसुविधा आहे.

गतजन्मी काय बल्ल्या केलेलात तुम्ही ते जाणायचं असल्यास ऍप आलीयत असं वाचलं. ती वापरून पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हास एक माहितीपूर्ण सप्रेम..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

गतजन्मी काय होता ते पंचांगात संक्रातीफलानंतरच्या पानावर अवकहडाचक्र पाहावे. योनि कुठली, आराध्य दैवत,वृक्ष आणि घातवार/नक्षत्र/संस्थळ इत्यादी सापडेल. मार्जारयोनि ( म्हणजे मार्जारकुलोत्पन्न आळशी शिंव्व रास) असल्यास श्रेणी देण्याची सुविधा आयती असते पण ती वापरत नाही असे एक बिनाविदासांगोवांगी निरीक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मार्जारकुलोत्पन्न आळशी शिंव्व रास!!!!
बिनाविदासांगोवांगी!!!!!
अचरटबाबा : you are keval thor!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेख.
हे प्रथम चाटताच जिभेतून कारंजी उडत असल्यामुळे सदृश शब्द म्हणून चिंगळ्या म्हणत असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे प्रकरण माहीत नव्हतं.

हल्लीच फार्मर्स मार्कटात मेक्सिकन माणसाच्या स्टॉलवर चिंचेचं सरबत मिळालं. चिंचेचा कोळ, साखर आणि पाणी. कोकम सरबतासारखंच. त्यात जिऱ्याची पूडही छान लागेल, असं लगेच माझ्या भारतीय मनानं अवांतर केलं. आता मुहूर्त शोधून, दुकानात चिंचा शोधून (आमच्याकडे अमेरिकी वाण्याकडे कधीमधी चिंचा मिळतात) चिंचांचं सरबत बनवून बघेन म्हणत्ये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चिंचेचा कोळ अथवा कॉन्सन्ट्रेट, इंडियन किंवा इंडियन माल ठेवणाऱ्या चिन्यांकडे मिळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार प्रक्रिया केल्यामुळे आणि प्रिजरव्हेटिव्ह्जमुळे (मराठी?) चव बदलते. बाकी मसाले वगैरे असताना ती चव जाणवत नाही, पण सरबत बनवल्यावर चांगलंच जाणवतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जिरवणी,मुरवणी,खारवणी करण्यासाठी गुळ,मीठ होते. त्या पठडीतला टिकवणी शब्द "प्रिजरव्हेटिव्ह्ज"करता कसा वाटतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0