आहे हे असं आहे...

"वॉटसन, डॉक्टरला वॉकिंग स्टिक कोण देईल? अर्थात एखादं हॉस्पिटल, जिथे तो काम करत होता. मग 'सीसीएच' म्हणजे चेरिंग क्रॉस हॉस्पिटल असण्याची शक्यता जास्त आहे."

"बरं तर मग. चेरिंग क्रॉस हॉस्पिटल. आणखी कोणते निष्कर्ष काढता येतील?"

"तुला माझी पद्धत ठाऊक आहे, वॉटसन. वापर!"

"मला सुचणारा एकच निष्कर्ष म्हणजे या माणसाने खेड्यात आपली प्रॅक्टिस सुरू करण्याआधी लंडनमध्ये काही काळ काम केलं असावं."

"बरोबर आहे. आणखी थोडं पुढे जाऊन, हॉस्पिटलने ही काठी भेट देण्याचं कारण म्हणजे डॉक्टरसाहेब लंडनची नोकरी सोडताहेत हे असू शकेल. ही गोष्ट आपल्याला काय सांगते? हा गृहस्थ फार उच्चपदावर नसावा - कारण तो अशी मोठी नोकरी सोडून खेड्यात गेला नसता. म्हणजे नोकरी सोडतेवेळी हा नवशिका डॉक्टर होता - हाऊसमन. आता आपल्यासमोर उभा राहिलाय तिशीच्या आत-बाहेर असणारा एक डॉक्टर. बऱ्यापैकी मित्रमंडळी असलेला, फारशी महत्त्वाकांक्षा नसणारा, थोडा वेंधळा. त्याच्याबरोबर त्याचा लाडका कुत्रा असतो - टेरियरपेक्षा मोठा, पण मास्टिफपेक्षा लहान."

- दि हाऊंड ऑफ बॅस्करव्हिल्स, लेखक: आर्थर कॉनन डॉईल

माणूस सामाजिक प्राणी आहे. त्याला इतर माणसांबरोबर राहायला, वावरायला आवडतं. एकलकोंडेपणा हा स्वभावातला दोष मानला जातो, आणि एकटेपणा ही अप्रिय स्थिती. माणसाच्या समाजातल्या वावरावर समाजातल्या इतरांचे डोळे रोखलेले असतात. एखाद्याच्या वावराचा उपयोग समाजातल्या इतरांनी आपली उद्दिष्टं साध्य करण्यासाठी करून घेतला तर ते गैर समजलं जात नाही, किंबहुना अशा वर्तनाला प्रोत्साहनच दिलं जातं. त्यानेच एकमेकांत देवाणघेवाण असणारा एकसंध समाज तयार होणार असतो. त्यातच सर्वांचं हित असतं.

वर दिलेल्या उताऱ्यात एका विसरून राहिलेल्या वॉकिंग स्टिकवरून शेरलॉक होम्स त्या स्टिकच्या मालकाबद्दल निष्कर्ष काढताना दिसतो. वावरावरून, हावभावावरून मनाच्या पार खोल तळातलं ओळखण्याची उदाहरणं होम्स कॅननमध्ये अन्यही आहेत. (चट्कन आठवलेलं म्हणजे 'दि रेसिडंट पेशंट' या कथेमध्ये वॉटसनच्या डोक्यातले युद्धविषयक विचार होम्स क्षणार्धात सांगतो.)

तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर समाजातला वावर प्रत्यक्ष वावरापुरता मर्यादित न राहता आभासी (virtual) ही झाला. मग मोबाईल तंत्रज्ञानातली क्रांती आणि स्वस्त इंटरनेटमुळे प्रत्यक्ष आणि आभासी वावरातल्या सीमारेषा पुसट होत आहेत. एक साधा प्रयोग करून बघा. गूगलकडे असलेल्या तुमच्या विद्याची प्रत https://takeout.google.com/ येथे मिळेल. त्यातली लोकेशन हिस्ट्रीची जेसन फाईल आणि ही साईट वापरून तुम्ही कुठेकुठे गेला होतात याचा साद्यंत इतिहास अगदी नीटस नकाशावर बघायला मिळेल!

थोडक्यात काय, तर ते बघतायत. बिग ब्रदर इज वॉचिंग यू.

बर्मंग वॉचायचं तर बसा वॉचत. आपण कोणाला घाबरत नाय. कर नाही त्याला डर कशाला, वगैरे.

कर नसला तरी डर असू शकतो हे नुकतंच केंब्रिज ॲनालिटिका आणि फेसबुकच्या कृपेने पहायला मिळालं. हा विषय इतका चावला जातो/गेला आहे, की त्याचे आणखी तपशील देण्यात हशील नाही.

आपल्याच वावराचे बारकावे वापरून आपल्या विचारांवर, आचारांवर प्रभाव टाकला जातोय. हम सब इस रंगमंच की कठपुतलियाँ. किस की डोर कब खींच जाए कोई नहीं कह सकता. ती डोर खींचून कोणी साबण विकतंय, कोणी राजकीय विचार.

पण ... जेवायला बाहेर जायच्याआधी झोमॅटोवर रिव्ह्यू पाहायचे आहेत. ठोस पत्ता हाताशी असूनही मला गूगल मॅप्स वापरायचे आहेत. दाराशी उबर पाहिजे. रेस्टॉरंटात वेटिंग आहे - बसल्याबसल्या दोन पोस्टी लाईक आणि तीन शेअर करायच्यात. "फीलिंग हंग्री विथ अन्या, गन्या अँड थ्री अदर्स" अशी क्याप्शन मारून फोटो शेअर करायचे आहेत. पान खाताना मल्लूॲप्सवर 'मी द्वापारयुगात कोण होतो' ही मौल्यवान माहिती मिळवायचीय.

म्हणजे ... समाजातल्या माझ्या वावराचा विदा मीच गावभर हगून ठेवला आहे.

पण मी ही ॲप्स वापरताना गोपनीयतेच्या शपथेवर दिली होती. फेसबुकवाले आणि ते ॲपवाले म्हणाले की कोणाला विदा देणार नाही...

असं तुम्हाला वाटत असेल, तर आप xxx (भाबडे) है!

सगळी बोंबाबोंब थांबेल, तेव्हा उरेल ते इतकंच : एका कंपनीकडे एक बायप्रॉडक्ट होतं. ते त्यांनी विकलं आणि पैशे केले.

तुम्हाला फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, दगड आणि धोंडे वापरायचे आहेत ना? त्याचे फायदे पाहिजेत ना? मग हे असंच चालणार. आहे हे असं आहे. घ्यायचं तर घ्या. नाहीतर भो...

field_vote: 
0
No votes yet

तुम्ही एखादं प्रोडक्ट बघा फ्लिपकार्ट इ इ सायटींवर, बघा की कसा मेलबाॅक्स भरायला चालू होतो, recommended for you...फलान फलान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

मला वाटलंच होतं की कोणीतरी यावर धागा काढेलच. आदूबाळ दणकट लिहिलंत ओ.

काल माझी यावरून माझ्या दुर्भाग्यवती* बरोबर जोरदार खडाजंगी झाली. प्रथम PII / PCI / PHI data, GDPR, रशियाचा अमेरिकन निवडणूकांवर प्रभाव वगैरे. नंतर मोरॅलिटी, झुक्या "माझा" डेटा वापरून बक्कळ कमवतोय वगैरे आणि सरतेशेवटी रविशंकर प्रसाद यांची झुक्याला धमकी पर्यंत विषय चघळले गेले.

मी अर्थातच झुक्याच्या बाजूने किल्ला लढवत होतो.

निष्कर्ष - अमेरिकन व भारतीय सरकारने सोशल मिडिया कंपन्यांसाठी कठोर डेटा प्रायव्हसी ची आणि and AUP ची नियमावली आणावीच. Government should must regulate FB, Twitter etc. ते झुक्याच्या पथ्यावरच पडणार आहे.

-----

* या शब्दाचा कॉपीराईट अर्थातच थत्तेचाचांचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुक (किंवा ट्विटर, इन्स्टाग्राम) बाबत माझा मूळ आक्षेप असा की माझ्या डेटापेक्षाही महत्त्वाच्या गोष्टी - एकाग्रता आणि वेळ यांची उधळपट्टी होते. फेसबुक डिलीट करा असा हॅशटॅग ट्विटरवर चालवणं हा या एकंदरीत प्रकारातला सर्वात विनोदी भाग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुगलचे अँड्राइड - everything for everyone असल्याने अॅपसवाल्यांनी त्यास पसंती दिली. माइक्रोसॅाफ्ट/बीबीची ओएस मागे पडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे नेमकं कस झालेलं आहे हे सर्व. प्राथमिक इतकेच माहीत आहे की आपण जे ॲप समजा गुगलप्ले स्टोअर वरुन डाऊनलोडवतो तेव्हा ते फ्री ॲप देणारी कंपनी आपल्या अनेक गोष्टी माहीती वापरण्याचा अधिकार मागते व तो दिला जातो.
मग अशा अनेक युजर्स कडुन जमा केलेल्या डेटा ला प्रोसेस करुन तो संबंधित ग्राहकाला विकला जातो असेच काहीसे आहे ना ? तर केंब्रिज ॲनालिटीका ही अशा ॲप डेव्हलपर्सपैकी होती का ? त्यांचा फेसबुकशी नेमका व्यवहार काय स्वरुपाचा होता ? व पॉलिटीकल पार्टीने डेटा कसा वापरला ?
राहुल बनसोडे यांनी फेसबुक च्या डेटा कलेक्शन अल्गोरीदम संदर्भात बरेच संशोधन केलेले आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टवरुन त्याची म्हणजे त्या विषयाची काही प्रमाणात कल्पना येते ज्याने भय वाटते. त्यांनी यावर प्रकाश टाकला तर बरे होइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे आबा? (म्हणजे तुमच्या लेखावरुन जे कळलं त्यावर काही मुभूप्र-)

पण मी ही ॲप्स वापरताना गोपनीयतेच्या शपथेवर दिली होती. फेसबुकवाले आणि ते ॲपवाले म्हणाले की कोणाला विदा देणार नाही...

पण, माझा विदा गावभर हगायचा की माझ्या महालात हगायचा हा माझा प्रश्न आहे ना? आणि जर तो मी उघड करत असेन तर फरक काय पडतो? हां- त्यांनी (ॲप्सवाल्यांनी) मात्र सांगितलं की आम्ही तुमचा विदा नाही बॉ देणार कुणाला- आणि तो दिला- रादर विकला तर तो उघड भ्रष्टाचार आहे. ते माझा विदा गुप्त ठेवायला बांधिल आहेत, मी माझा विदा गुप्त ठेवायला बांधिल नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

काही लोक असे वागताहेत जशी जगबुडी आली. डिलीट फेसबुक काय, आणि इंटरनेटवर निर्बंध घाला काय. त्यांना सांगणं आहे की एकतर हे सगळं तुमचंच देणं आहे. दुसरं म्हणजे एखाद्याला अनिर्बंध रिसोर्सेस (/सत्ता) दिले की मग नंतर त्यांचा मिसयूज झाला म्हणून बोंबलायचं काम नाही. आणि तिसरं म्हणजे एखाद्या गोष्टीचा फक्त फायदेच हवेत आणि धोके नकोत असं कसं चालेल? तर मला म्हणायचंय आहे हे असंच आहे, असंच राहणार आहे. गेट यूज्ड टु इट.

हां- त्यांनी (ॲप्सवाल्यांनी) मात्र सांगितलं की आम्ही तुमचा विदा नाही बॉ देणार कुणाला- आणि तो दिला- रादर विकला तर तो उघड भ्रष्टाचार आहे.

तत्त्व म्हणून बरोबर आहे. पण समजा झुक्याने नाही पाळलं, तर काय करणार आहोत आपण?

एक वास्तव आयुष्यात घडलेली घटना. काही वर्षांपूर्वी एका ब्यांकेत कर्जासाठी अर्ज केला. रीतसर सगळी कागदपत्रं, टॅक्स रिटर्न वगैरे जोडले होते.

काही दिवसांनी एका सुप्रसिद्ध दागिन्यांच्या कंपनीचा फोन आला, आणि ते त्यांची सुवर्णभिशी योजना कशी चांगली आहे ते पटवायला लागले. ते असं काहीतरी बोलले की माझी पाचावर धारण बसली - त्यांना माझं उत्पन्न, नोकरीचं ठिकाण इतकंच काय माझ्या पत्नीचा वाढदिवसही ठाऊक होता! आणखी खोदून विचारल्यावर हा विदा त्या बँकेकडून मिळाल्याचं सांगितलं.

मी बँकेत जाऊन बोंबाबोंब केली, पण 'हो विकला बुवा डेटा' असं कोण कबूल करेल?

गैर आहे का? आहे. मी तणतण कारण्याव्यतिरिक्त काही करू शकतो का? नाही. ही रिस्क माझ्या कंट्रोलमध्ये आहे का? नाही.

त्यानंतर आपणाविषयीची प्रत्येक माहिती ही पब्लिक डोमेनमध्येच आहे हे गृहित धरून पुढे जाणं सोयीचं वाटतं. उगाच कशाला लोड करून घ्यायचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

फिदुशियरी संबंध का कायशीशी कंसेप्ट असते ना. ती या संदर्भात (बँकेच्या, चेपुच्या नाही) ॲप्लिकेबल होइल का? म्हणजे बँकेने कर्ज घेणाऱ्याचा डेटा लीक करणे आणि चेपुने डेता लीक करणे यात फरक आहे असं वाटतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Fiduciary हा शब्द लॅटिन fiducia वरून आला आहे. म्हणजे 'विश्वास, भरोसा'. Fiduciary duty म्हणजे 'विश्वासघात न करण्याचं कर्तव्य'. हे जितकं बँकेला लागू आहे तितकंच फेसबुकलाही लागू आहे.

पण..

आपल्याला काही विश्वासघात चालतात, काही नाही चालत. सगळ्यात मौजेची गोष्ट म्हणजे, आपल्याला एखादा विश्वासघात चालतो की नाही हे बऱ्याचदा त्या विश्वासघाताच्या परिणामांवर अवलंबून असतं.

उदा० अन्या, गन्या आणि स्विटी कॉलेजात आहेत. अन्याचं स्विटीवर प्रेम आहे. आपली प्रेमभावना तो गन्याला सांगतो. गन्याने त्याचा बोभाटा करत फिरू नये ही गन्याची 'फिड्युशियरी ड्युटी' आहे. पण गन्या बारागंड्याचा असल्याने तो जाऊन स्विटीलाच सांगतो.

आता दोन शक्यता आहेत:

शक्यता १) स्विटीलाही अन्या आवडतो. ती अन्याला होकार देते आणि दोघांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. या शक्यतेत गन्याने केलेला विश्वासघात अन्याच्या पथ्यावरच पडला आहे. अन्या गन्याला माफ करून टाकतो.

शक्यता २) स्विटीला अन्या आवडत नाही. ती अन्याला फाट्यावर मारते आणि संपर्क तोडते. इथे गन्याने लुडबुड केल्याने अन्याचा पत्ता कट झालाय. हा विश्वासघात अन्या कसा सहन करेल?

आपलंही असंच आहे. फेसबुकने आपला डेटा वापरून आपल्याला जवळचं चांगलं रेष्टुरंट सुचवलं, किंवा परक्या शहरात जवळ राहणारे मित्र दाखवले की आपल्याला फेसबुक आवडतं. हा डेटा केंबिज ॲनालिटिकाला विकला की फेसबुक वैट, वैट, दूश्ट दूश्ट असतं...

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

फिडुशिअरी ड्युटी हा प्रकार कायदेशीर रित्या लागू असतो का? का नुस्ताचं असतो हा प्रकार. म्हणजे ही डुटी पाळली नाही म्हणून बँकेविरुद्ध कोर्टात जाता येईल का? की कोर्ट हाकलून देईल की इथे बँकेने कोणत्या कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही म्हणून.

आणि समजा चेपुने ॲप टाकतानाकिंवा साईनाप करताना सांगितलं असेल की आम्ही माहिती गोळा करू आणि शेअर करू तर यात विश्वासघात नाही राईट?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फिडुशिअरी ड्युटी हा प्रकार कायदेशीर रित्या लागू असतो का?

माहितीच्या बाबतीत असतो का मला कल्पना नाही. बँकेच्याही आणि फेसबुकच्याही बाबतीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

काय करणार आहोत आपण?

मी, एक ॲव्हरेज भारतीय काही करु शकणार नाही. बाहेरच्या देशांत म्हणे कायदे कडक आहेत आणि कोणी दुसरे बुवा खटले दाखल करुन फेबुचे मालक होऊ शकतील (म्हणे).
जरा अवांतर:
नवीन प्रत्येक ॲपच्या ऑफर पाहून मला हेच वाट्टं- तुमचा शंभर रुपयांचा, ऑथेंटीकेटेड (नाव फोन इमेल तर नक्कीच, तोही चांगला गुगलोबा व्हेरिफाईड) विदा दुसऱ्यांना विकून तुम्हाला दहा रुपयांची सवलत ते देत असावेत. ॲपवरुन काहीही- त्यातही पहिल्यांदा केल्यास जबरी ऑफर्स असतात. पेटीएम , तेझ, पण मला ह्या विदा फॉर डिस्काऊंट वाल्या (माझ्याच) तर्कात फार तथ्य असेलसं वाटलं नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

१. खाद्यपदार्थांचे फोटो अजिबात काढत नाही. काढलेच तर फुरसतीत, आरामाऽत टाकतो.
२. मोबाईल जीपीएस कायम ऑफ ठेवतो. त्याने बॅटरीही वाचते आणि विदाही.
३. कुठेही पोस्ट करताना लोकेशन टाकत नाही.
४. जिथे कुठे नवीन ॲपची ऑफर दिसते तिथे साफ दुर्लक्ष करतो.
५. प्रत्येक साईटवर ॲडब्लॉकचा भडीमार करुन मजकूर मिळवतो. बऱ्याच साईट तुम्ही साईनअप केल्याशिवाय मजकूर पाहू देत नाहीत. सरळ इन्स्पेक्ट एलिमेंट करणे किंवा ॲडब्लॉक वापरून त्यांचे पॉपअप अडवणे हे करतो.

हे पथ्य मी ह्या सगळ्या विदा बूम च्या आधीपासून पाळतो. (आधी मी ज्ऽरा वेडपट होतो.) इमेलमध्ये महत्त्वाचे इमेल सोडून दररोज ५०० इमेल्सचा कचरा यायचा. एक दिवस बसून प्रत्येक अशा साईट वरची खाती उडवली. विरोपपत्ते उडवले. तेव्हापासून आजपर्यंत विरोप बऱ्यापैकी गुप्त ठेवलेला आहे. अर्थात, माझ्या मित्रांच्या मते काहीही करत असलेली गोष्ट व्हॉट्सॅप स्टेटस किंवा इन्स्टा स्टोरी न टाकल्यामुळे, आपलं आयुष्य बाकीच्यांपेक्षा किती पेटलेलं आहे हे न दाखवत राहिल्यामुळे मी आयुष्यातला आनंद वगैरे गमावलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

डेटा विकला जातोच आहे.
पुढे बोला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बऱ्याच ब्यांका अकाउंट उघडताना तुमचे कुटुंबाचे एकूण उत्पन्न, घर तुमचे स्वत:चे आहे का? गाडी आहे का ? अशी माहिती भरून घेतात. मी नकार देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फेसबुक च्या सर्वर मधून मी कुठे गेलो होतो ही माहिती चोरणे आणि ती माझी पब्लिक पोस्ट वाचून मिळवणे यात काय फरक आहे?

जरी फ्रेंड्स ओन्ली पोस्ट असली तरी फ्रेंडने* ती माहिती बाहेर विकली/पाठवली तर? फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवताना/स्वीकारताना कुठे आपण कुठल्या कंडिशन्स मान्य/अमान्य करतो?

*अब मैं समझा झुक्या मला फ्रेण्ड रिक्वेस्ट का पाठवतो !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

आबा , हे तर तुम्ही म्हणता तसंच असणारे.पण यांच्यावर एकदम खालच्या लेवलनी कुरघोडी करणारं काहीतरी व्हायला पायजे आपल्या लाईफ टाइम मधे असं वाटतं. म्हणजे काय मला माहित नाही. ( अर्थात मला वाटून काय उपयोग ? मला बरंच काही वाटतं ... ) उम्मीद पे दुणिया वगैरे ...
आणिएक .. लोकांचं प्रोफाईलींग करून त्यांना आवडतील असे मेसेज पाठवून भडकाऊपणा वगैरे हे जरा जास्त फार फेच्ड वाटत. पण असेल सुद्धा .. प्रोफाईलींग न करताही हे शक्य असतं हे गेली पाच सात वर्ष बघतो आहेच.मनुष्य प्राण्याच्या च्युत्या बनवून घेण्याच्या अपार क्षमतेवर माझा लै विश्वास आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्रेंच राज्यक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आंद्रे वायदा ह्या पोलिश दिग्दर्शकानं केलेला दॉंतों (१९८३) हा चित्रपट कालच पाहत होतो. योगायोगाची गंमत अशी, की चित्रपटाची सुरुवातच "सर्व्हेलन्स स्टेट"पासून होते. दॉंतों हा फ्रेंच राज्यक्रांतीतला एक महत्त्वाचा सहभागी पॅरिसच्या वेशीवर आला आहे. वेशीवर सगळ्यांची आय-कार्डं तपासली जातात. त्याचं कार्ड पाहून ताबडतोब वेशीवरचा शिपाई शहरात वर्दी पाठवतो आणि दुसऱ्या शिपायाला त्याचा पाठलाग करायला सांगतो. दुसऱ्या प्रसंगात सकाळची ब्रेडसाठीची लांबलचक रांग आहे. एकीकडे गियोतिनवर आजचे बळी धाडणं सुरू झालं आहे. मुसळधार पाऊस पडतो आहे. पहाटेपासून रांगेत उभं राहिलेल्या बाईला अखेर ब्रेड मिळतो. ती ब्रेड घेऊन बाहेर पडताच एक शिपाई तिला अडवतो आणि तिचं आय-कार्ड तपासतो. क्रांतीनंतरच‌ं जे टेरर राज्य आलं होतं त्यात साधा ब्रेड घ्यायचा तर राष्ट्राची तुमच्यावर नजर होती. त्यातच १९८१च्या 'मार्शल लॉ'नंतर पोलंडबाहेर जाऊन वायदानं केलेल्या चित्रपटात ब्रेडच्या रांगा आणि "सर्व्हेलन्स स्टेट"ला कम्युनिस्ट राजवटीचा समकालीन संदर्भ येणं साहजिक आहे.

मे १९६८च्या फ्रान्समधल्या विद्यार्थी क्रांतीदरम्यान दंगली आटोक्यात आणणाऱ्या आणि त्यासाठी निःशस्त्र आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या आणि त्यांच्यावर नजर ठेवणाऱ्या विशेष पोलिस दळाची (CRS) तुलना नाझींशी होत असे :

Affiche Mai 68 - CRS SS

तर, सांगायचा मुद्दा असा, की कोणी काहीही म्हणो, आपल्यावर कुणाची तरी नजर आहे हे लोकांना सहसा आवडत नाहीच. त्यात ते पाहणारे जर वर्तमान किंवा संभाव्य राज्यकर्ते असले, तर त्यातून निर्माण होणारे धोके सुज्ञ लोकांना चांगलेच ठाऊक आहेत. त्यामुळे घडलेल्या गोष्टींवर काही प्रतिक्रिया येणं साहजिक आहे. आताच्या काळात एक गोष्ट मात्र दखलपात्र वाटते. मी दिलेल्या उदाहरणांतला डेटा नागरिकांच्या इच्छेविरुद्ध गोळा केला जात होता. इथे आपण स्वखुशीनं डेटा देतोय असं वरवर पाहता म्हणता येतं. मात्र, मी जेव्हा सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांशी बोलतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की लोक एक तर वर सांगितलेला इतिहास विसरलेले आहेेत आणि दुसरं म्हणजे चार प्रकारचा डेटा एकत्र करून त्यातून किती प्रकारचे शोध लावता येतात ह्याचा लोकांना अंदाजच नाही. उदा. माझ्या माहितीतले एक वयस्कर गृहस्थ एखाद्या पॉर्नस्टारच्या फेसबुक पानाला लाईक करतात तेव्हा त्यांना हे माहीतच नसतं की आपले लाईक्स जगजाहीर आहेत आणि आपली प्रोफाईल उघडून कुणालाही ते पाहता येतात. शिवाय, "ओन्ली मी' अशी प्रायव्हसी सेटिंग ठेवलेला डेटाही डेव्हलपरला उपलब्ध असतोच हेदेखील लोकांना माहीत नसतं. उदा. वर १४टॅन म्हणतात की ते लोकेशन पोस्टवर शेअर करत नाहीत. पण फेसबुकला आणि डेव्हलपरला त्यांचं लोकेशन माहीतच असतं. त्यातून सुटका नाहीच. हे १४टॅन यांना माहीत आहे का? मला माहीत नाही. Smile

त्यामुळे आपल्या कोणत्या गोष्टीतून काय निष्कर्ष काढता येऊ शकतात ह्याची कल्पना आली, तर लोक सोशल मीडियावर काय शेअर करतील, हे पाहण्यात मला सध्या तरी रस आहे.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

१४टॅन म्हणतात की ते लोकेशन पोस्टवर शेअर करत नाहीत. पण फेसबुकला आणि डेव्हलपरला त्यांचं लोकेशन माहीतच असतं. त्यातून सुटका नाहीच. हे १४टॅन यांना माहीत आहे का?

अर्थात. ह्याहिशोबाने तर जेव्हा मी स्मार्टफोन विकत घेतो तेव्हा मी माझं लोकेशन उघड करुन मोकळा झालेलो असतो.
तांत्रिक बाबी माहित नाहीत, पण जर तुम्ही तुमच्या फोनचं इंटरनेट बंद ठेवलंत, तर तुम्हाला सहज फोनचं लोकेशन पाहता येत नाही. तुमच्याकडे अँड्रॉईड असेल तर गुगल डिव्हाईस मॅनेजर मध्ये तुम्ही हे पाहू शकता. अर्थात कोणाला अगदी ते पिच्चरांत दाखवतात तसं सिग्नल ट्र्यांगुलेशन का काय ते हायफाय गोष्टी करुन माझं लोकेशन मिळवण्यात इंटरेस्ट असेल, तर, वेल, ही/शी डिझर्व्ज टू नो.
मला इतकंच म्हणायचं होतं, की (हे आबांच्या लेखाचं तात्पर्य) सध्या लोक विदा उघड जाहीर करून तो विकला जाण्याबद्दल कांगावा करीत आहेत, तर मी तो मला जमेल तितका गुप्त ठेवून कांगावा केला, म्हणून माझ्या कांगाव्याला जरा तरी अर्थ आहे.
माझं चेपु पान मी अतिशय गुप्त ठेवलेलं आहे. आत्ताच गुगल सर्च केलं तर ते येत नाही. त्यामुळे माझे लाईक्स बघणं जवळपास अशक्य आहे.
शिवाय त्या पथ्यांमध्ये चेपुवर लोकलमध्ये असल्यासारखं वावरावं हे एक टाकणं राहिलं. साधारण एका वर्षापूर्वीच्या एका आचरट अपडेटमुळे कोणत्या फ्रेंडने कुठल्या पोष्टवर काय कमेंट केली/काय लाईक केलं हे दिसू लागलं, आणि मी चेपुवर बराच अवघडून वावरू लागलो. भांडणं, काथ्याकूट, मुलींच्या पुनरुत्पादक भावना चेतवणाऱ्या फोटोंना लाईक करणंही सोडलं. सारांशात जर कोणी ह्यामुळे मी चेपुमधून मिळणारा जो काही आनंद आहे तो मी गमावून बसलोहे असं म्हटलं तर ते काही चुकीचं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

मुलींच्या पुनरुत्पादक भावना चेतवणाऱ्या फोटोंना लाईक करणंही सोडलं.

मुलींच्या पुनरुत्पादक भावना चेतवणाऱ्या फोटोंना, की मुलींच्या, पुनरुत्पादक भावना चेतवणाऱ्या फोटोंना?

दोन पूर्णपणे वेगळ्या चिजा आहेत त्या.

(पहिली चीज बहुधा तुलनेने खूपच कमी प्रचलित असावी. आणि, इन एनी केस, तीत तुम्हांस रस कसा काय बरे?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आहे हे असं आहे' - हे आदूबाळचं म्हणणं मला मान्यच आहे. पण सध्या अडचण अशी दिसते, जी जंतूनं थोडक्यात मांडलेली आहेच, 'हे नक्की काय आहे' हेच लोकांना अजून माहीत नाहीये. ते अमेरिकेपुरतं मर्यादित आहे, असं मला वाटत नाही. माझ्या कामाच्या ठिकाणी असणारे लोक याबद्दल विनोद आणि मीम्स पसरवतात; घराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना 'फेसबुकवर प्रसारणशील राहायचं नसेल तर फायदाच काय!' असं वाटतं.

कालच माझ्या शेजारच्या मैत्रिणीचा एसेमेस आला, "ट्रंपवर महाभियोग चालवणार आहेत म्हणे!" राष्ट्राध्यक्षाची उचलबांगडी करायची प्रक्रिया बरीच वेळखाऊ असते आणि तिची सुरुवात अशी भस्सकन होत नाही; वगैरे गोष्टीही तिला त्या क्षणी मान्य करायच्या नव्हत्या. तिला जे ऐकायचं होतं ते तिच्या कानावर आल्यावर तिनं ते लगेच खरं मानलं... आणि त्याचं प्रसारण केलं. मी त्यावर फक्त हसले आणि विनोद म्हणून दोन-चार लोकांना ही गोष्ट सांगितली.

मी आता डेटा सायंटिस्ट म्हणूनच काम करते. डेटा सायन्स म्हणजे नक्की काय, हे माझ्या ओळखीतल्या बऱ्याच लोकांना माहीत नाही; लोकांचे प्रश्न तिथूनच सुरू होतात.

नेट सिल्व्हरचं हे १७ मार्चचं ट्वीट - This is emphatically *not* meant as a comment on the ethical or security issues, but political journalists tend to overrate the sophistication of what Cambridge Analytica was doing.

नेट सिल्व्हर म्हणजे 538 चालवणारा. (हौशी लोकांनी गूगलून पाहा.) त्याला नक्की काय म्हणायचं आहे, हे किती लोकांना समजणारे!

मी अॅमेझॉनवर काल एक पुस्तक शोधत होते. लगेच तत्संबंधित जाहिराती फेसबुकवर दिसल्या, ठीकच आहे. मी खरेदीच्या बाबतीत 'नैनं छिन्दति शस्त्राणि' आहे. मला हवं असेल तरच मी पुस्तक/वस्तू विकत घेईन. पण राजकीय हेतूनं प्रेरित पोस्ट्स माझ्या फीडमध्ये दिसत असतील, त्या फेक-न्यूज असतील आणि मला डेटा-सायन्स वगैरे प्रकरणं काय-कशी हे माहीतच नसेल तर ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुझं आणि जंतूचं म्हणणं योग्य आहे, की आत्ता जे झालंय ते अजाणता, लोकांना माहीत नसताना. पण लोकांना माहीत असूनही फारसा फरक पडणार नाहीये.

डेटा सायन्सचा राक्षस बाटलीबाहेर निघालाय**. त्यातली प्रगती, त्यातून निघणारे निष्कर्ष, त्याचा वापर हे लोकजागृतीपेक्षा कायमच प्रगत असणार आहेत.

'कनेटिकट यांकी इन किंग आर्थर्स कोर्ट' कादंबरीचा नायक सूर्यग्रहण होणार आहे हे ज्ञान वापरून आर्थर राजाला येडा बनवतो. गनपावडरचा 'शोध' लावून मर्लिनला पदच्युत करतो. इथे तो नायक डेटा सायन्स आहे आणि आर्थर, मर्लिन सामान्य जनता आहे.

--------
**हे मी तुला काय सांगतोय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पण लोकांना माहीत असूनही फारसा फरक पडणार नाहीये.

हे कळीचे वाक्य.

----

हे लोकजागृतीपेक्षा कायमच प्रगत असणार आहेत.

आणखी एक षटकार.
.

आदूबाळ, मला तुमच्याबरोबर एक बिर्याणी + बियर पार्टी करायची आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांना माहीत असूनही फारसा फरक पडणार नाहीये.

सहमत. मात्र ही मॅन्युफॅक्चर्ड कन्सेंट आहे. (श्रेयअव्हेर : चॉम्स्की). हगल्यापादल्याची माहिती लोक वाटेल त्याला देत सुटतील असं १०० वर्षांपूर्वी कुणाला वाटलं असेल का?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लगेच तत्संबंधित जाहिराती फेसबुकवर दिसल्या, ठीकच आहे.

मी ॲमेझॉनवरची सर्च हिस्टरी त्वरित क्लीअर करतो, तशी गुगलचीही. दोन्ही गोष्टी अक्षरश: त्रास आहेत. प्रत्येक साईट/ॲपवर कचऱ्यासारख्या दाखवत राहतात. मध्यंतरी एआयबीचा हा व्हिडीओ आला होता, तिथे त्यांनी व्हॉट्सॅपच्या एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनवर शेरा मारला होता(३:२६), पण त्याबद्दल फार काही कुठे चर्चा पहायला मिळाली नाही.
मग अजून एक पथ्य म्हणजे व्हॉट्सॅपचे आक्षेपार्ह(!) चॅट्स डिलीट करणे.
(म्हणजे तुमच्याकडे जगातील जवळपास प्रत्येक स्मार्टफोन यूझरचा अत्यंत खाजगी डेटा असताना तुम्ही त्याच्यावर पाळत ठेवणार नाही, अदितीसारखे झाडू मारणार नाही हे अगदी अगदीच अकल्पित वाटतं. शिवाय त्या नवीन 'डिलीट फॉर एव्हरीवन' फीचरमुळे झिटाबाईट्सच्या झिटाबाईट्समध्ये असलेल्या विदावर एक जबरी फिल्टरही बसवलेलं आहे ही माझीच अजून एक थिअरी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

या संपूर्ण मामल्याशी रिलेव्हंट प्रश्न

(१) केंब्रिज ॲनॅलिटिका ने जे केलं ते राजकीय दृष्ट्या (व सोशल/पब्लिक मोरॅलिटीच्या दृष्टिने) समस्यात्मक आहे असं गृहित धरावं तर - कोणाच्या व कोणत्या अधिकारांचं उल्लंघन झालं ? कोणाचा गैरफायदा घेतला गेला ? कोणाचे प्रायव्हसी (सपोझेडली राईट्स) उल्लंघले गेले ? कोणत्या माहीतीचे प्रायव्हसी राईट्स उल्लंघले गेले ?

(२) हे उल्लंघन इन "द फर्स्ट प्लेस" होउनच द्यायला नको होतं - अशा भूमिकेतून एखादे मेकॅनिझम जर ( उदा १९९० मधे) उभे केले असते तर सोशल मिडिया हे क्षेत्र जन्माला आले असते का ? ते सर्व्हाईव्ह झाले असते का ? का रखडले असते ?

(३) आणि अशा प्रकारचे मेकॅनिझम १९९५ मधे निर्माण केले असते तर त्याच्या अस्तित्वाची परिणती सेलफोन महाग होण्यात झाली असती का ? म्हंजे आज जे सेलफोन व इतर स्मार्ट डिव्हाइसेस तुम्हाला रु. १०,००० मधे मिळत आहेत ते रु. २०,००० ला मिळाले असते का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छपरावर चढून सगळ्यांना नवी टोपी ,चष्मा दाखवायचा आहे पण लोकांना बाकी बरंच दिसतय. आणि त्यांना चालतय तर घरातले लोक का कोकलताहेत?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुक २००६ मध्ये येण्याअगोदर जी इन्स्ट्न्ट मेसेजिंग होती ती बंद पडली त्यांना आनंद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपला (म्हणजे सगळ्यांच चर्चकांचा) आक्षेप नक्की कशाला आहे?
०१. आपला विदा विकून जाहिराती दाखवण्याला की
०२. आपला विदा वापरून आपली राजकीय मते प्रभावित करायला,की
०३. दोन्ही गोष्टींना
*******

काही लोक म्हणतात सोमीने माध्यमांचं लोकशाहीकरण केलं. हे बहुधा अशासाठी की सोमीपूर्व काळात लोकांना व्यक्त व्हायला उपलब्ध माध्यमे मोजकी व महत्वाचं म्हणजे सेंसर्ड होती. सोमीने हा पिंजरा तोडला. आता कोणीही कुठल्याही विषयावर कुठल्याही वेळेला आपल्या मताची पिंक टाकू शकतो. भलेही हे मत त्याच्या स्वत:च्या अभ्यासातून, चिंतनातून आलं असो वा फेक न्यूज वा प्रोपगंडाच्या प्रभावातून आलेलं मत असो. पण सर्वसामान्य माणूस त्याचं मत मुक्तपणे व्यक्त करू शकतो हा बदल महत्वाचा. पूर्वी पारंपरिक माध्यमांनीसुद्धा 'मतनिर्मिती'चा (मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कंसेट) धंदा बिनबोभाट केला आणि माध्यमकर्मींनी एक प्रकारची निरंकुष सत्ताही उपभोगली. आजच्या या नवस्वातंत्र्याची किंमत कोणी आणि कशी द्यायची, हा खरा प्रश्न आहे.

समजा आपण क्रियाशील विरोध करून (म्हणजे बहिष्कार टाकून) फेसबुक वा तत्सम सोशल माध्यमं त्यांच्या प्रवर्तकांना आर्थिक दृष्ट्या न परवडणारी केली व अखेर ती बंद पडली तर मोदी सरकार आल्यापासून रंगवण्यात आलेल्या सोमीवरच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या मुद्द्याचं काय? उदा.फेसबुकावर सरकारविरोधी मतप्रदर्शन केल्याने काही तरूणांवर सरकारने कारवाई सुरू केल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याची झालेली ओरड आपल्याला माहीत आहे. साक्षात शरदराव पवारांनाही या प्रकरणात लक्ष घालावं लागलं होतं. सोशल मिडिया नसेल तर ज्यांना हे सरकारविरोधी मत व्यक्त करायला सहज संधी मिळाली त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचं काय होईल? आपलं अभिव्यक्तीस्वातंत्र्य पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच संपादक-मुद्रक-मालक-प्रकाशकांचं बटीक व मुख्यत: सेंसॉर होईल त्याचं काय? त्यामुळे नेहमीचा सिलेक्टीव्ह पुरोगामी विचार इथे करून चालणार नाही. जर डेटा विकायला आपला विरोध असेल तर सोशल मिडीयाच्या कमर्शियल व्हायाबिलिटीसाठी दुसरं पर्यायी रेवेन्यू मॉडेल काय असू शकतं? कारण 'फुकट'चं आकर्षण हे सगळ्यात मोठं आहे.की सोशल मिडीया पूर्णपणे बंदच करावा किंवा नैसर्गिक मृत्यूने मरू द्यावा?

फेस्बुक जाहिरात उत्पन्नाकडून राजकीय डेटा विकण्याकडे वळण्यात बहुधा हालात का तकाज असावा. हे काही रोचक लेख पाहा-
१. https://www.theguardian.com/technology/2016/apr/19/facebook-users-sharing-less-personal-data-zuckerberg
२. https://www.forbes.com/sites/paularmstrongtech/2017/02/14/facebook-users-posted-a-third-less-content-in-2016-than-in-2015/#23a6f452776d

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

आजकाल बऱ्याच कर्ज देणाऱ्या कंपन्या तुमचा सोशल मिडियावरचा वावर पण तपासतात म्ह्णे, माझे फेसबुकवर किंवा लिन्क इनवर अकाऊंट नाहिये. मग आता मला १८५७ चे मॉडेल समजुन कर्ज दिले जाणार नाही काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्तापर्यंतची चर्चा वाचून मला मूळ मुद्दा समजलेला नाही. काय प्रकारची चर्चा अपेक्षित आहे?

नवे तंत्र येते तेव्हा ते जमेल तिथे वापरून पहावे वाटते (उदा बूट नीट बसताहेत की नाही हे एक्सरे काढून पहाणे.)
--

द्न्यानातला द्न्य कसा लिहायचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द्न्यानातला द्न्य कसा लिहायचा?

ज्ञ = j + q + Y (बोलनागरी)
ज्ञ = j + Y + a (गमभन)

'ऐसी अक्षरे'वर स्वागत. अधिक माहिती उजवीकडे दिसणाऱ्या 'टंकन साहाय्य' दुव्यावर मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवे तंत्र येते तेव्हा ते जमेल तिथे वापरून पहावे वाटते (उदा बूट नीट बसताहेत की नाही हे एक्सरे काढून पहाणे.)

...हातात नवा हातोडा आला, की तमाम जगातील प्रत्येक गोष्ट ही नव्या खिळ्याप्रमाणे भासू लागते, तद्वत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1