चिदग्निकुंडसंभूता "गार्गी" (व तिचा बाप, मी !)

१. जन्मल्यापासून विसाव्या मिनिटाला ती
त्या छोटेखानी हॉस्पिटलच्या अंगणातून
पृथ्वीकडे , माझ्याकडे टकाटका पहात होती.
("तसल्या जगात मी तिला का आणलं होतं ?).

२. तिचे निम्मे जीन्स माझे होते . ते
अनंतकाळपर्यंत चालत रहाण्याची
एक अद्भुत शक्यता निर्माण झाली होती .
(मला काही सुधरत नव्हते!).

३. पाचव्या वर्षी ती मला म्हणाली
"Daddy you know who is a "parent"?
-One who pays the rent!"
(मी लगेच भारतात आई-बाबांना फोन करून कळविले !)

४. अठराव्या वर्षी ती न्यूयॉर्क मध्ये
रस्त्यावर बेघरांसाठी किचन चालवीत
होती . "त्यातल्या एखाद्याने तुला
काही केले तर?" या माझ्या प्रश्नावर तिने
माझ्याकडे अशा प्रकारे पाहिले की
मी कायमचा चुप झालो!

५. आज तिच्या पंचविसाव्या वर्षी
जग अधिकाधिक भिकारचोट बनत
चालले आहे. (तो दोष माझा आहे!).
पण तीही या जगात कार्यरत आहे.
(या कवितेच्या हजार पट मोठी कविता
माझ्या मनात आहे!)

: मिलिंद पदकी
ब्रिज वॉटर , न्यू जर्सी

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गुड!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0