पुरुषाच्या_कविता

अवघड जागी, बारीक दुखणे
कळत नाही, वळत नाही...
मी बैल होतो, टोणगा होतो
घुळी होतो, देवाला वाहिलेला....
मला घर नसते, भिंती असतात
बाई शिवाय मी घर करू शकत नाही
घराला घरपण येत नाही....
मला हे जमत नाही, मला ते जमत नाही
मला खरे तर काहीच जमत नाही....
माझ्यात असते सगळी तीच उर्मी...
मला सगळे पुरुष म्हणतात,
माणूस कुणी म्हणत नाही....
मला वैताग येतो, मी रडू शकत नाही,
म्हणजे रडू शकतो,
पण पाणी येत नाही डोळ्यात
माझ्या डोळ्यातल्या विहिरी बुजवून टाकल्यात
मनातले झरे बंधारे टाकून आतल्या आत
जिरवून टाकलेत
मी पुरुष आहे, मी पुरुष आहे
माझे व्यक्त होणे, मला बोलता येणे
आता मला आले पाहिजे,
तसा नव्हे , जसा मी बोलत आलो, बोंबलत आलो,
आता असे हवे, जसे मला बोलायचे होते
किती तरी युगांपासून,
मनाच्या आतल्या गाभ्यापासून
तसा आता बोललो पाहिजे
तसे आता लिहिले पाहिजे
माझे मन, माझे तन,
माझे सगळे आचारविचार
माझे सगळे आहारविहार
माझ्या सगळ्या कामक्रिडा
माझे माझे ते सगळे सगळे
तिच्या पासून, तिला धरून, तिला सोडून
तिच्या अवतीभवती, तिच्या पासून दूरदूर
मला घ्यावासा वाटतो,
माझाच शोध...
पुरुष म्हणून....
त्याहीपेक्षा माणूस म्हणून....

शिवकन्या

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एके काळी टोणगे कविता लिहायचे, "वात्सल्याविण अपूर्ण नारी" वगैरे. आता पुरुषांच्या कविता बायकांनी लिहून त्याचा स्त्रीवादी बदला घ्यावा.

हा आमचा स्त्रीवादी बदला. आमचा यावर भारी जीव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अत्याचारी कविता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या केहने ! क्या केहने! उत्कृष्ट कविता !
"माझ्या डोळ्यातल्या विहिरी बुजवून टाकल्यात"
केवळ थोर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला हे जमत नाही, मला ते जमत नाही
मला खरे तर काहीच जमत नाही....
.........
मला सगळे पुरुष म्हणतात,

अशा व्यक्तीला कुणीच खऱ्या अर्थाने 'पुरुष' म्हणत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0