जीवनसाथी

आज रेस्तोरंतमध्ये अचानक एक अनोळखी मध्यमवयीन गृहस्थ येऊन भेटले. मला म्हणाले,'' आपली ओळख नाही, पण मी तुमच्या सोसायटीमध्येच राहतो . मला काही खाजगी बोलायचं आहे आपल्याशी.'' मी काहीतरी संवेदनशील विषय आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखून मुद्दाम एका कोपऱ्यातील टेबलाशी त्यांना बोलायला नेले. माझी आई , इतर व्यक्ती आणि आचारी इ बाजूलाच वावरत होते.

ते गृहस्थ बसल्यावर म्हणाले,'' माझी मुलगी फेसबुकवरून तुम्हाला ओळखते आणि तुम्ही जाहीररीत्या समलैंगिक असल्याचे माहीत असल्याने काही सल्ला मागायला मी आलो आहे. माझा मुलगा मागची सहा वर्षे यूएसए मध्ये राहतो आणि तो आता अठ्ठावीस वर्षांचा आहे , कमावता आहे, आणि म्हणून (!) त्याच्याकरिता आता आमच्याकडे स्थळे येत आहेत. याबद्दल त्याच्याकडे आम्ही विचारले , तर त्याने आम्हाला तो स्वतः समलैंगिक असल्याचे शेवटी सांगितले.'' यावर मला वाटले की आता त्याला परत स्त्रियांच्यामध्ये आकर्षित कसे करावे इ काहीतरी ते गृहस्थ विचारतील म्हणून. पण नक्की काय ते कळण्यासाठी मी फक्त '' बरं, मग पुढे?'' एवढेच विचारले. तर ते म्हणाले, '' तो पुण्यातले महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर लगेच अमेरिकेला गेला आणि तिथेच स्थायिक झाला. तो फार कुणाशी बोलत नाही, कोणीही त्याचे मित्रमैत्रिणी नाहीत, वीकेंडलासुद्धा तो घराबाहेर जात नाही , तर त्याला जीवनसाथी कसा मिळणार? आम्हाला तो पुढे एकटा पडेल अशी भीती वाटते. त्याच्यासाठी आम्ही पार्टनर कसा शोधावा?''

हे ऐकून मला थोडे हुश्श झाले. हे आईवडील निदान त्याचा स्वीकार करून त्याच्या आयुष्याची पुढील चिंता करत आहेत. मला थोडे कौतुकच वाटले. मी विचारले,'' तुमच्या मुलाच्या मनात याबद्दल काही गंड / भीती/ लाज इ नाही ना? त्याचा स्वतःचा संपूर्ण स्वीकार त्याने केलं आहे ना प्रथम ? आणि तुमचा घरच्यांचा त्याला पाठिंबा आहे का?'' तर ते म्हणाले, '' हो. आम्हाला ऐकून प्रथम थोडा धक्का बसला. पण त्याने काही गुन्हा तरी नाही केलाय. त्याच्या लाजाळू स्वभावामुळे त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल फक्त आता चिंता वाटते. त्याला पार्टनर शोधण्यासाठी काय माध्यम आहे , आम्ही काय प्रयत्न करू आणि कसे ते सांगा. तुमचा पार्टनर आणि आई तुमच्यासोबत राहतात , तर काय मार्गाने त्याचे आयुष्य सुरळीत चालेल , ते सुचवा.'' हे ऐकून मी थोडा चकित झालो आणि मनाला बरं सुद्धा वाटलं की हल्लीचे भारतीय पालक संवेदनशील आहेत आणि मुलास मदत करू इच्छितात.

'' तुमचा संपूर्ण पाठिंबा त्याला असेल आणि त्याला गंड नसेल तर गोष्टी खूपच सोप्या आहेत. प्रथम, त्याला पार्टनर मिळवून देणे ही पालक म्हणून तुमची जबाबदारी नाही , तो जरी स्ट्रेट असता तरीही. आत्मविश्वास नसणे आणि लाजाळू स्वभाव असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादी लहानपणी घडलेली विचित्र / वाईट गोष्ट जर का त्याच्या आयुष्यात असेल, आणि तो ती तुम्हाला सांगू शकत नसेल तर कदाचित काही प्रॉब्लेम असू शकतो. प्रथम त्याला तुम्ही समुपदेशकाकडे जाऊन मनमोकळे बोलण्याचा सल्ला द्या. समुपदेशक ही तज्ज्ञ - तटस्थ अशी योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती असते. त्याशिवाय पालक म्हणून तुमचा असलेला पाठिंबा स्पष्ट करा. त्याचे त्याला , त्याच्या अंगभूत गुणांवर , व्यक्तिमत्वावर पार्टनर शोधू द्या. हल्लीच्या काळात स्ट्रेट मुलेमुलीसुद्धा आपले लग्न आपणच ठरवतात. त्याला अचानक जीवनसाथी मिळण्याची अपेक्षा करू नका . त्याचे आयुष्यातील मैलाचे दगड त्यालाच बनवू द्या. मित्र मैत्रिणी – डेटिंग – सेक्स – रिलेशनशिप इ त्याला अनुभवू द्या. हल्ली फेसबुकप्रमाणे गे-लेस्बियन व्यक्तींच्या साठी खास इंटरनेटवर डेटिंग apps असतात. त्याच्याआधारे मुले एकमेकांना भेटू शकतात. त्याशिवाय lgbt व्यक्तींच्या साठी प्रत्यक्ष गाठीभेटीचे कार्यक्रम असतात. तेथे सिनेमे, सहली , कलागुणदर्शन इ गोष्टी होतात. त्याद्वारे त्याच्या ओळखी होतील , आणि कदाचित पार्टनर मिळेल. ठराविक वयातच लग्न होण्याची अपेक्षा करू नका. काही गंड असतील , तर समुपदेशनामुळे नक्की फायदा होईल .’’ यावर ते गृहस्थ जरा निवांत झाले आणि थोडा वेळ इतर काही बोलून निघून गेले.

भारतात लहान गावांतील मुले घरी-गावात स्वतःबद्दल कळायला नको म्हणून मुद्दाम मोठ्या शहरात नोकरी पत्करतात, आणि मोठ्या शहरांतील मुलेसुद्धा परदेशात जातात. एकटे पडतात. घरच्यांना सांगता येणार नाही अशी भीती वाटून दुःखी होतात. निराशा येते. समुपदेशकाकडे जाणे आपण कमीपणाचे मानतो किंवा तो मार्ग आपल्याला सुचत नाही ; आणि गुंते वाढतात. सर्वच नवीन-जुन्या पालकांनी आपल्या मुलामुलींच्याबद्दल ते समलैंगिक असण्याची शक्यताही गृहीत धरावी, मुलांशी या व अश्या सर्व विषयांवर मोकळा संवाद करावा. मुले स्वतः समलैंगिक नसतील सुद्धा, पण या विषयाबद्दल संवेदनशीलता बाळगतील. आत्मविश्वासाने बोलतील. इतरांच्या मुलांना उगीच विचारले नसता स्थळे आणणे थांबवा, विनाकारण लग्न कधी करणार इ चौकश्या करू नका. मुलांना काही प्रॉब्लेम आहे असे जाणवल्यास समुपदेशन घेण्याचा सल्ला द्या पण खोदून फार विचारू नका. तुमचे मुलांशी नातेसंबंध मैत्रीपूर्ण बनवा, तरच मुले सर्व विषय तुमच्याशी बोलतील.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

समलैंगिककांचे वृद्धाश्रम असतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोले तो, लैंगिक अभिमुखतेचा नि वृद्धाश्रमांचा संबंध काय?

समलैंगिकांकरिता वेगळी वाचनालये, वेगळी उपाहारगृहे, वेगळ्या शाळा, झालेच तर वेगळ्या रेल्वेवेटिंगरुमा असतात काय? असाव्यात काय?

नाही म्हणजे, where it makes sense, जेणेकरून त्यातून एखाद्या गटाची काही विशेष निकड भागविली जाऊ शकते जी अन्यथा भागविली जाणार नाही, अशा बाबतींत separate facilities ठीकच आहेत. समलैंगिकांकरिता वेगळे वृद्धाश्रम बांधण्याने (त्यातून समलैंगिकांना isolate करण्यापलीकडे) नेमके काय साध्य होते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठो !

--

जुलै २०१२ मधे - डॅनियल वेब हे ऑस्टिन मधल्या Franklin Barbecue मधे कॅशियर होते. व श्री ओबामांनी १२ जुलै ला त्या Franklin Barbecue ला भेट दिली.

Daniel Rugg Webb to Obama : "Equal rights for gay people!"

Obama : "Are you gay?"

Daniel Rugg Webb : "Only when I'm having sex!"
.
(स्त्रोत)
.
.
---
.
पण आचरटबाबांच्या प्रश्नाचे पूर्ण उत्तर खालीलप्रमाणे -
.
(१) आमच्या माहीतीत तरी (सध्या) नाहीत. कदाचित असतीलही.
(२) पण कोणी असा वृद्धाश्रम काढला की जो फक्त समलैंगिक लोकांसाठीच असेल तर त्यावर सरकारने बंदी घालू नये.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0