मध्यान्हीच्या सूर्याची निर्भर्त्सना

आगीच्या गोळ्या तुला कोणी का , कसे बनविले
हा वाद सोडून देऊ . तुझ्या प्रचंड तापमानाच्या पोटात
कार्बन , ऑक्सिजन , हायड्रोजन बनले , त्या कार्बनला
एकमेकांशी जुळण्याची अवदसा/कला मिळाली
आणि तुझ्या प्रकाशाला कैद करू शकणाऱ्या
जीवांनी या जीवन नावाच्या प्रचंड दुर्घटनेकडे
वाटचाल सुरु केली तिथेच , एकेकाळी पूर्ण
निरंजन, निरामय अशा तुझा पराभव सुरु झाला ,
मासे, डायनॉसॉर्स, मध्यम/मोठी वानरे
यांनी तो रक्तमय प्रकारे पुढे नेला, नंतर तर काय
माझाच जन्म झाला. वाफाळलेल्या गरम पाण्याने
नहाताना होणाऱ्या यातनात मी वाढलो , आता
मी येताना बघूनही निर्दयपणे
लिफ्टचे दार बंद होऊ देणाऱ्या लठ्ठ स्त्रियांचे
राज्य आले आहे. हा सर्व दोष तुझाच!
काळी टोपी आणि गॉगल घालून मी तुझे
माझ्याकडे बघणे पूर्ण बंद केले आहे!
xxx
06/01/2018
ब्रिज वॉटर , न्यू जर्सी , यू एस ए .

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उचलला हात बडवला कीबोर्डवर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुरितांचे तिमिर जावो

हाच आल्गोरिदम वापरून अनंत मर्कटांनी समग्र शेक्सपियर रचला होता. तो बरा चालला?

..........

हे श्रेय काहीजण पहिल्या एलिझाबेथ राणीस देतात. परंतु आम्हांस ते मान्य नाही. कारण आम्ही स्त्रीवादी नाही - आम्ही मर्कटवादी!

(हं, आता, पहिल्या एलिझाबेथ राणीने अनंत मर्कट घोष्टरायटरांची फौज बाळगून रचनेचे काम त्यांना औटसोर्स केले होते, असा दावा असेल, तर मग ठीक आहे. परंतु त्याही परिस्थितीत, श्रेय - झालेच तर (असल्यास) कॉपीराइट वगैरे - योग्य ठिकाणी गेले पाहिजे. बोले तो, अनंत मर्कटांकडे.पहिल्या एलिझाबेथ राणीकडे नव्हे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आगीच्या गोळ्या तुला कोणी का , कसे बनविले

माटीके बुधले, तुझे किसपे गुमान है
खाली हाथ आया है, खाली हाथ जाना है

या गाण्याची आठवण झाली. (हिंदुत्ववादी चिडतात कारण, त्यांनी याचा अर्थ गणपतीशी जोडला आहे)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच, तो निपक्षपाती
बाकी सारेच पक्षपाती

गणपतीचा हाथ खाली कसा काय ब्वॉ? मोदक नसतो काय त्यात, ?

थोडक्यात काय, ओढूनताणून स्वतःवर ओढवून घ्यायचे, झाले. कांगावा करायला बरे असते.

हिंदुत्ववाद्यांना नाहीत उद्योग! <गब्बर सिंग सदृश मोड>तमाम हिंदुत्ववाद्यांना फटके मारून पाकिस्तानात हाकलून दिले पाहिजे, उंटावर बसून शेळ्या हाकण्यासाठी.</गब्बर सिंग सदृश मोड>

(किंबहुना, ब्रिटिश इंडियाची फाळणी करायचीच होती, तर तिहेरी फाळणी करायला हवी होती. सेपरेटिस्ट मुसलमानांसाठी पाकिस्तान (आजच्या पाकिस्तान आणि बांगलादेशच्या भूमीत), हिंदुत्ववाद्यांकरिता हिंदुस्थान (आजच्या पूर्व यूपी, बिहार नि झारखंडच्या भूमीत), नि मनुष्यवस्तीकरिता भारत (उर्वरित भूमीत).)

..........

फक्त उजव्या हातात. गणपतीबाप्पाचासुद्धा डावा हात काही विशिष्ट कृत्यांसाठी आरक्षित असावा.

मोदकच असेल, असेही नाही. हिंदूंप्रमाणेच आग्नेय आशियातील बौद्धांमध्येही गणपतीला मान असतो म्हणे. तर मागे एकदा आमचे येथील एका थाई रेष्टारंटाच्या दर्शनी भागात बुद्धमूर्तीशेजारीच गणपतीबाप्पाची मूर्ती होती. दोघांसमोरही उदबत्त्या, नैवेद्य वगैरे केटेरिस पारिबुस. (धन्यवाद, नंदन!) गणपतीबाप्पाच्या हातात नैवेद्य म्हणून श्रिंपचा तुकडा होता. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0