रेम्माम्मा रेम्माम्मा रे..

भेंड्या खेळाव्यात. मुळातच हरकत किंवा वैर नाही. छान बैठा खेळ आहे. उगीच पळापळ नको. जरा मधेमधे चारेक टाळ्या वाजवल्या की झालं.

आणि बसने वगैरे दूर दूर जाताना, ऍज अ टुरिस्ट ग्रुप हक्काचं आपलं मराठी माणूस आपल्याला मुंबई ते मुंबई हाकलून हाकलून परत आणताना... किंवा नातेवाईक मिळून टेम्पो ट्रॅव्हलरने तीन दिवसांत अष्टविनायक "करत" असताना .. उपयोगी पडतो वाटेत हा खेळ.

जनरली एक पन्नाशीतले तरुण काका बसमध्ये हे सुरु करतात. त्यांना गायची आवड असते. सगळी गाणी तेच काका म्हणतात. इतरजण पहिला अर्धा तास जोरात आणि मग क्षीण टाळ्या वाजवतात. खर्ज आवाजात पुटपुट करत ओठ गाण्यानुसार हलवतात.

डिपेंडिंग ऑन व्हेदर केसरीवीणा, चौधरी यात्रा कंपनी किंवा घरचाच प्रासंगिक करार.. बाहेर शेतं, हिमशिखरं किंवा डुकरं वगैरे दिसत असतात. ती तन्मय होऊन बघता बघता मधेच काका "गा की रे" ओरडले की पुटपुट जरा वाढवायची असं तंत्र जमवून सेटल झालं की.. ती वेळ येते.
म्हणजे भेंडयांमधे अनिवार्य असलेला एक लूप कम भोवरा कम चकवा येतो.

किती काळ गेला, सहस्रक बदललं. पन्नाशीच्या काकांची जागा आम्ही तरुणांनी घ्यायची वेळ येऊ घातली. अन्नू, जतिन ललित, ए आर रेहमान, प्रीतम, रेशमिया आणि व्हॉट नॉट येऊन गेले. पण ही दिग्गज गाणी या लूपमधून सुटली नाहीत आणि तो लूप भेंडयांतून सुटला नाही.

या गाण्यांची एक खास मजा आहे. युनिक गुण.

एक म्हणजे ही गाणी अंताक्षरीखेरीज अन्यत्र कोणीही गात किंवा ऐकत नाही, संग्रही ठेवणं तर लै कोसांवर. चुभूदेघे.

दुसरं म्हणजे कोणालाही यातल्या ९९% गाण्यांतल्या दोन ओळींपलीकडे एक शब्दही माहीत नसतो.

सुरुवात यांपैकी कशानेही होऊ शकते. पण एका गाण्याने सुरुवात झाली की एकमेकांची शेपटी तोंडात धरलेल्या सापांप्रमाणे ती सगळी एका लायनीत झुकझुकगाडी बनवून येतात.

उदा. इथे एका भयाण "ड"ने मी या दैवदुर्विलासाची सुरुवात करतो.

"डम डम डिगा डिगा.. मौसम भिगा भिगा" (इथे लोक्स बिगा बिगा म्हणतात)... "बिनपिये मैं तो गिरा मैं तो गिरा हाय अल्ला. सूरत आपकी सुभानल्ला" .. शेवटच्या ओळीला तरुण काका स्वतःच्या "हिच्या"कडे हाताने निर्देश करतात. टाळ्या, हास्यकल्लोळ..

हे उत्तम झालं. रंगत भरताहेत काका.

मग काका जोरात "ल" असं ओरडतात.

आता ल वरून तशी कितीही उत्तम गाणी असली तरी आपली लूपिष्ट गाणी संपल्याशिवाय पुढे विचारच करणे कर्तव्य नसल्याने लूप सुरु होतो.

"लल्ला लल्ला लोरी. दूध की कटोरी. दूधमें बताशा, मुन्नी करे तमाशा".. "श".... काय आलं ? "श" "श"..

एक उत्फुल्ल आनंदी तरुण मुलगी :
"शायद मेरी शादी का खयाल दिलमें आया है.. इसिलिये मम्मी ने मेरे तुम्हे चायपे बुलाया है.. "

अय्या, हो का? हशा, टाळ्या चेष्टा, तरुण मुलीचं काही स्मार्ट प्रत्युत्तर आणि मग "बुलाया है.. ह ह ह" चा ओरडा.

"है ना बोलो बोलो. है ना... मम्मी को पप्पा से.. प्यार है, प्यार है.. "

पुढे कोणालाच येत नसल्याने "है ना... न. न आलं. न."

.."ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे..... ठ."

इथे एक दुःखी तरुणी एकटीच क्षीण किनऱ्या आवाजात "ठाडे रहियो.." रडू लागते. ही तरुणी पूर्ण भेंडयांत एकच गाणं म्हणते.

क्षीण तरुणी उपलब्ध नसल्यास "ठाडे रहियो.."ला फाटा मिळून तरुण काका खुद्द "ठंडे ठंडे पानी से नाहायला" सुरुवात करतात.
"गाना आये या ना आये" काय फरक पडत नाय.

ठाडे असो किंवा ठंडा पानी.. अंती दोन्ही मार्गांनी "य" लाभतो.

"यम्मा यम्मा, यम्मा यम्मा.. ये खुबसुरत समा, बस्साज की रात है जिंदगी, कल हम कहा तुम कहा".. याचीही पुढची ओळ कुण्णाला येत नाही. आणि आली तरी इतक्या नीरस गाण्याची तिसरी ओळ कोणाला नकोच असते.

सो.. कल हम कहा तुम कहा.. "ह"...!!

"हाय रे हाय नींद नही आय.. दिलमें तू समाये आया प्यारभरा मौसम सुहाना, दिवाना"... "न" "न"..

"नानी तेरी मोरनी को.." किंवा "नैनो में सपना".... दोन्हीपैकी काही का असेना.. शेवटी "य"...

मग "यम्मा यम्मा.." "ए..ए.. झालंय ऑलरेडी.."

"य" "य"...

"याहू .. चाहे कोई मुझे जंगली कहे...हम क्या करे.." "र"..

"रेम्माम्मा रेम्माम्मा रे... रेम्माम्मा रेम्माम्मा रे...हम तो गये बाजारमें लेनेको आलू...पीछे पडा भालू".. "ल ल"..

किंवा "र"ने "रमया वस्तावया.." नावाचं डिप्रेशन ट्रिगर होऊ शकतं..

रमया वस्तावयामधे असा आणखी एक लूप ट्रिगर करण्याची क्षमता आहे.

बाकी डफलीवाsssले, ए मेरी जोहराजबीं, हसता हुआ नूरानी चेहरा आणि असंख्याना वंदन. कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी च्यायला.

जाऊदे. आणखी कशाला लिहायचं.. इतकं लिहून शांतता लाभलीय.

इतर कोणी कावलेत का अशा भेंडीवर्तुळात?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वा ! मस्तच ! र - य - ए अशा अक्षरांनी सुरु होणारी गाणी आणि त्यातून निर्माण होणारी लूप हा अनुभवानी येणारा आणि समजणारा प्रकार आहे. भेंड्या खेळण्याचा इतिहास नक्की कधी सुरु झाला आणि त्याची आजची स्थिती काय आहे ? शाळेत असताना , ट्रिप मध्ये वगैरे पुष्कSSSSSSSSSळ भेंड्या खेळून झाल्याने आता अजिबात खेळाव्याश्या वाटत नाहीत. तसेच भेंड्या खेळणे हा खास भारतीय सामाजिक उपक्रम आहे असं माझं निरीक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed

ख आला की खोया खोया चांद, छ साठी छलिया मेरा नाम आणि झ साठी झनक झनक पायल बाजे ही उच्च गाणी राहिलीच. शिवाय ले के पहला पहला प्यार, नैना बरसे , गोमू माहेरला जाते हो नाखवा ही सदाकहर महापकाव गाणीसुद्धा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रत्येक गाण्यालाही प्रणाम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तं लेख! ही लूप अनिभवलेली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

काही करायला उरलं नाही की गाण्याच्या भेंड्या. आमच्या घरी आम्ही शब्दाच्या भेंड्या खेळायचो खूप. आणि अक्षर उलटवण्यात आनंद असायचा. डबा - बाड - मग डबडं शब्द चालणार की नाही यावर वाद..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...हा पर्यायही रोचक अत एव विचारार्ह आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही पकाव कलाही येत नाही त्यांनी पिकनिकला जाऊ नये हा शोध सहावीत पहिल्यांदा लागला. पुढे कधीही गेलो नाही आणि वाचलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पकाव हा डालडा, उमदा वगैरे सीरीज़मधलाच काहीतरी प्रकार होता ना? (नाही म्हणजे, वर डालडाचा विषय अनायासे निघालाच आहे, म्हणून विचारतोय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होतेच, पण डालडा मोर दॅन इक्वल --
तुम्ही कोणता डालडा ( = वनस्पति घी )वापरता?
- आम्ही उमदा/पकाव डालडा वापरतो.

तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं इंपोर्टेड पामोलिन!
बोले तो रेल्वे खानपान सेवा स्टालवर "यहाँ के नमकिन शुध् पामोलिन मे् बनाये जाते हैं।" अधिकृत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लिहीले आहे. अनेक असे कार्यक्रम आठवले.

षीण तरुणी उपलब्ध नसल्यास >>> हे सर्वात कहर धमाल आहे. तुफान हसलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झक्कास ओ गवि. लूपिष्ट हा मस्त शब्द आहे.
.
आमच्या घरात (नेमकं बोलायचं तर मातुलघराण्यात - मामा, मावशी या मंडळीत) भेंड्या हा प्रचंड जिव्हाळ्याचा विषय आहे. भेटलो की किमान एकदा तरी भेंड्या होतातच. या लूपिष्ट गाण्यांमुळे कावलो नाही ... परंतु ह्या प्रकारांनी भेंड्यांची मजा गेल्याचे अनुभवले आहे कित्येकदा. आणि या लूपिष्ट गाण्यांविरुद्ध नियम बनवायचा म्हंटलं की लगेच - "हे तुम्हाला जमतं म्हणून तुम्ही नियम लावताय.... आमचा पण विचार करा"... वगैरे टुमणं सुरु होतं. माझी मावशी आणि माझी बहीण या दोघींचा गाण्यांचा संग्रह जबरदस्त आहे. आणि त्यांना ऐनवेळी गाणी आठवतात सुद्धा. अगदी धडाध्धड आठवतात. मग अलिखित नियम हा की त्या दोघींनी एका गटात यायचं नाही. अन्यथा भेंड्यांची मजा निघुन जाते म्हणे. पण हा असा नियम पाळला की भेंड्यांचा पिरोग्राम इतका मस्त होतो की कार्यक्रमानंतर दूरचे नातेवाईक एकदम जवळचे होऊन जातात. आणि कार्यक्रमानंतरचे दोनतिन दिवस सगळे जण त्या आनंदात तरंगत असतात.
.
जाताजाता अवांतर : अन्नु कपूर ने अंताक्षरी चा कार्यक्रम होस्ट केला होता तेव्हा पासून "लडीया पिरोनी है" हा डायलॉग एकदम हिट्ट झाला होता.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या भेंड्यात मराठी गाणी चालायची. 'ल' आलं की म्हनायचं पेटंट गाणं म्हणजे: 'ला जून हा सने अन हा सून ते पहाने' हे.'
गाणे संपली की(१०-१५ मिनिटांत स्टॉक संपायचाच) आम्ही गावाच्या भेंड्या सुरू करायचो. तिकडे र वरून सुरूवात होणाऱ्या गावाचा भलताच दुष्काळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

या लुपिष्ट गाण्यांपासून सुटका आणि वैविध्य हवे असेल, तर शिव्यांच्या भेंड्या खेळा. इतर भाषांतल्या पण चालतील, पण मराठी सर्वांना पुरुन उरणारी आहे. आम्ही खेळायचो, लहानपणी आणि मोठेपणीही!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगवेगळी पर्म्यूटेशन्स-काँबिनेशन्स करून पाहिली. परंतु दोन-तीन राउंडमध्येच अडेल, असे वाटले.

श्री-ग-णे-शा-य-न-म-हा
हरामखोर
रां*च्या
च्यायला / च्यायचा/ची / च्यायची ** / च्यायचा *** / च्यायचे **
/ च्यायचा घो / च्यामारी / च्यु***च्या

आणि इथेच गाडी अडली. बोले तो, ल वरून शिवी सुचूही शकते (पण मग पुढच्याच खेपेस ड वर अडते). च वरून वरीलपैकीच पर्याय आलटूनपालटून वापरता येतील, पण त्यानंतर काय? ड, क, घ, र वगैरे अक्षरांचे पुढे काय करायचे?

तज्ज्ञांनी लाँगप्ले करून दाखवावा. (वाटल्यास मोक्याच्या जागा तारांकित कराव्यात. गाळलेल्या जागा आम्ही यथाशक्ति भरून घेऊच.)

आगाऊ धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका शब्दाचे रिस्ट्रिक्शन नसेल तर "तुझ्या *ला *लं" छापाच्या अनेक वाक्प्रचारांची इथे वर्णी लागेल. ममव समाजाच्या नैतिक दंडेलीपुढे ज्या वाक्यांना कधी आपले प्रतिबिंब लिखाणात पाहण्याची संधी आजवर मिळालेली नाही त्या गावकुसाबाहेरच्या दुर्लक्षित शब्दांना, त्यांच्या अस्सल मातीतील अभिव्यक्तीला थोडातरी न्याय मिळेल.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एका शब्दाचे रिस्ट्रिक्शन असायचे काहीच कारण नाही. आणि, एकदा शिव्यांच्याच भेंड्या खेळायच्या म्हटल्यावर नो होल्ड्ज़ बार्ड असावयासही प्रत्यवाय नसावा. त्यामुळे, ऑल काइंड्ज़ ऑफ अभिव्यक्तीज़ शुड बी वेलकम.

परंतु तरीसुद्धा, आपण दिलेल्या पर्यायांत, (१) ल चे पुढे काय करायचे, आणि (२) मुळात 'तुझ्या'मधल्या त पर्यंत गाडी कशी आली, हे प्रश्न उरतातच.

कदाचित प्ले-बाय-प्ले उदाहरण दिलेत तर काही उलगडा होऊ शकेल. (केवळ एंडगेम नको.) धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म, तसे काही तयार करणे अवघड आहे. फक्त एक लाईकलि सिनारिओ म्हणून सांगितला, एवढेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'ड' किंवा कोणत्याच अक्षरावर अडू नये म्हणून फक्त हायब्रिड शिव्या चालतील असा नियम हवा. आणि '...या-अंत्य' एकसुरीपणा टाळायला स्त्रीलिंगी एकवचन किंवा बहुवचन हवं.

उदा० १ (बालगोपाळांसाठी) गचपणढवळे. उदा० २ (प्रौढांसाठी) लxxहेकणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सर्व भाषा वापरायच्या, हे आधीच सांगितले आहे. तरीही नमुने

ड :- ड्फर, डुक्या, डामरट, डोक्यावर पडलेला....इत्यादि, आता याला शिव्या मानायचे की नाही, त्यावरच खेळ अडू शकेल.

क :- करवाद्या, कमरेखाली गेलेला, कामुक, कार्टा, कद्रु, ....

घ :- घाणेरडा, घुम्या, घनचक्कर, घोड्या.......

र :- रेड्या, रावड्या, रास्कल, रंडीबाज, रासवट, ........

वयानुसार, पूर्वी ऐकलेल्या काही खास आग्री शिव्या आता आठवत नाहीत. पण गांवाकडे वाढलेल्यांचा संग्रह खूप मोठा असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0