काही ऑनलाईन पथ्ये

बरेच दिवस केंब्रिज ॲनॅलिटिका, फेसबुक आणि माहितीची चोरी ह्यावर प्रचंड चर्वितचर्वण सुरु आहे. सगळे हिरीरीने एकमेकांची अक्कल काढण्याची चढाओढ लावत आहेत. तंत्रजगताच्या प्रत्येक इव्हॉल्युशनरी स्टेजशी अगदी तोंडओळख असलेले; मिलेनिअल्सच्या आधीचे, केविलवाणेच असे- १९८०-२००० ह्या काळात जन्म झालेल्या लोकांचे स्ट्यांड वेगळे आहेत. आम्ही तो फक्त एकच लँडलाईन असलेल्या जगात वावरलेलो आहोत, पेजर, ब्लॅक ॲण्ड व्हाईट ठोकळा फोन, मग कलर फोन, मग मुजिक/क्यामरा/अँड्रॉईड/टच्चस्क्रीन फोन इ. प्रचंड झेपा साधारण २००३-४ नंतर प्रत्येक वर्षी पाहिलेल्या आहेत, हाताळलेल्या आहेत. हीच पिढी सध्या इंटरनेटवर ठाण मांडून आहे.

आणि आम्ही कन्फ्यूज्ड आहोत. सोशल मिडीआ वरून मिळणारी, आईवडलांच्या पिढीला न कळणारी 'मजा', आणि मिलेनीअल्स लोकांचा चालू असलेला अखंड बावळटपणा इ. मध्ये आम्ही फसलेलो आहोत.

असो. तर मी तरी ह्या पिढीतला आहे (अर्थातच) आणि मी काही पथ्यं माझ्या ऑनलाईन वावरात पाळतो. ती पाळल्यास तुमचा ऑनलाईन वावर तुमच्यासाठी आणि इतरांसाठी बराच सुखकर होतो असं माझं मत आहे. अर्थात, त्यानंतरही माहिती चोरी होऊ शकत असेल तर ती थांबवण्याचे मार्ग नाहीत इतकं मात्र नक्की.

ब्राऊझर:
सर्वप्रथम गुगल क्रोम हा मोठ्ठा डिस्प्ले असलेला, अतिशय वेगवान आणि अतिशय सोपा असा ब्राऊझर आहे. त्याखालोखाल मोझिल्ला फायरफॉक्सचा नंबर लागतो. मोझिल्लाचा डिस्प्ले अगदी अलिकडेच मोठा करण्यात आला. मोझिला मध्ये डेव्हलपर ऑप्शन्स हा प्रकार असल्यामुळे तो वेबदेवांमध्ये (Web Developers) लोकप्रिय आहे. तुम्ही खूप फ्री सॉफ्टवेअर वापरणारे असाल तर जवळपास प्रत्येक सॉफ्टवेअर एक वाईट, निरुपयोगी ॲड-ऑन किंवा टूलबार चिकटवून देते. तुमच्या इंस्टॉल्ड प्रोग्रॅम्समध्ये दिसणारे 'टूलबार' तुम्ही मुद्दामहून इंस्टॉल केलेले नसल्यास उडवून टाकावेत. इंटरनेट एक्स्पोअरर हा प्रचंड संथ आणि एक्स्टेंशन्सची सोय नसलेला एक्स्प्लोअरर आहे, जो फक्त क्रोम/फायरफॉक्स इन्स्टॉल करण्यासाठी वापरावा.
मोबाईलवर यूसी हा ब्राऊझर अजिबात वापरू नये.
कारणे:
१: त्याची इन्स्टॉलर एपीके फाईल बरेचदा व्हायरसयुक्त असते.
२: मध्यंतरी गुगल प्ले स्टोअरमधून काढला गेला होता.
३: ऑपेराच्या ग्राहकांनी त्यांना यूसीची चुकीच्या पद्धतीने जाहिरात दिसल्याबाबत मोठ्ठी तक्रार केली होती.
३: जाहिरातीच malicious असतात.
४: चायनीज आहे. Blum 3

आता वळूया इतर एक्स्टेन्शन्स-ॲडॉन्स कडे.
सर्वप्रथम, फोनवर ॲप-लॉक वापरावं. दुर्दैवाने कोणाच्या हातात स्क्रीन अनलॉक झालेला तुमचा फोन पडल्यास ते त्याला तुमचे खाजगी संदेश आणि इमेल वाचण्यापासून रोखू शकतं. प्ले स्टोअरवर उपलब्ध. स्क्रीन लॉक्ड ठेवावी.(पॅटर्न-पिन-पासवर्ड पैकी एक, मी पॅटर्न वापरतो, कारण मग फोन लोकल मध्ये पटकन एका हाताने अनलॉक करता येतो.) फोन चोरीला गेल्यास तो त्या माणसाने स्विच ऑफ करेपर्यंत तुम्हाला फोन करुन आवाजाचा वेध घ्यायला एखादं मिनीट मिळू शकतं.

१) ॲडब्लॉक:

कुठलाही ब्राऊझर वापरा, हे एक्स्टेंशन अतिशय उपयोगी आहे. क्रोम आणि फायरफॉक्स वर अतिशय उपयोगी आहे. गाणी/व्हिडीओ/फाईल्स डाऊनलोड करताना, वृत्तपत्रे वाचताना होणाऱ्या जाहिरातींमुळे रसभंग टाळण्यासाठी हा प्रकार जबरदस्त आहे. स्वस्त, लो-एंड, टॉरेंट वगैरे साईट्स वर जाहिरातींची सरबत्ती टाळण्यासाठी, बऱ्याच नकली लिंक्स, विचित्र संदेश आणि नवीन टॅब्स उघडणे हे प्रकार टाळण्यासाठी हे एक्स्टेंशन अतिशय उत्तम आहे. ह्या एक्स्टेंशनचा 'टेरर' एव्हढा आहे की महाराष्ट्र टाईम्सची वेबसाईट ॲडब्लॉक डिसेबल केल्याशिवाय बातम्या वाचू देत नाही.

२) गुगल लोकेशन सर्व्हिस:

ही ऑफ ठेवावी. ह्याच्यामुळे फोनची बॅटरी वाचते. माननीय आबा ह्यांच्या ह्या धाग्यात तुमच्या वावराचा आलेख/नकाशा गुगल कसा ठेवते ह्याबद्दल वाचायला मिळेल. ह्या सर्व्हिसचा तसा उपयोग फक्त तुम्ही हरवल्यास/एखादी जागा सापडत नसल्यास होतो. तुम्हाला नकाशे नीट,व्यवस्थित,अचूक वाचता येत असतील तर त्याचीही गरज नाही. फक्त मोबाईल डेटा(आंतरजाल) चालू करून तुम्ही सगळ्या गोष्टी नकाशावर आरामात पाहू शकता. ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, मॅकडिलीव्हरी, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ह्या (तुमच्या घराशी संबंध असलेल्या सगळ्याच) ॲप्स ही गुलोस सुरु ठेवायचा प्रचंड आग्रह करतात; जो तुम्ही टाळू शकता आणि तुमचे काम तसेच उरकू शकता. अर्थात ह्यात वेळ जातो, आणि लोकेशन सर्व्हिसने हे काम अक्षरश: तीन सेकंदांत होतं. एरवी ह्या कामांस एखाद दुसरे मिनीट जाते. हे इतकं अजाणतेपणी होतं की आपण कोणाकोणाला लोकेशन ॲक्सेस देऊन बसलोय हे आपल्याला विसरायला होतं. हे टाळण्यासाठी दरवेळी अतिशय सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
सोय हवी की जोखीम हा तुमचा निर्णय आहे.

३) फेसबुक

शेवटी अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण आलोच. फेसबुकवर काय करावं हे सांगण्यासाठी हा लेख लिहीलेला नाही. फेसबुकने जे केलं त्याचं समर्थनही करायचा उद्देश नाही. पण फेसबुकवर बाकीच्यांना जळवण्याची जी अमर्याद चूष असते तिला जितका आवर घालू तितकंच बरं. आदूबाळ ह्यांच्या उपरिनिर्दिष्ट धाग्यात लिहील्याप्रमाणे आपला विदा आपणच गावभर हगून ठेवल्यानंतर तो चोरल्याची तक्रार करण्यात अर्थ नाही. हॉटेल्समध्ये चेक-इन करणं, फिल्लम पाहिल्यावर ते पहिले फेस्बुकावर टाकणं, इन्स्टाग्रामवर असाल तर अन्नपदार्थांचे फोटो टाकून त्या हॉटेलला टॅग वगैरे केल्यानंतर 'मॉजा डाटा चोरलाऽ' करून भोकाड पसरण्यात काहीही अर्थ नाही.
'इथे बाकीच्यांना जळवण्याच्या चूषे'वर आक्षेप येतील हे माहितीए, पण, उदाहरणार्थ, तुमच्या तिसऱ्या नोकरीतल्या मित्रांबरोबर तुम्ही कुठल्या पॉश हॉटेलात गेलात हे शाळेतल्या नवीन नवीन फेस्बुकावर आलेल्या तुमच्या बाईंना कळवण्यामागे; हे सोडून दुसरं कितीही सयुक्तिक कारण असलं तरी ते मला पटणार नाहीये. इथेही तुम्ही नसता विदा फेसबुकावर सोडता. बरं, कधीतरी कुठल्या मित्राने 'अरे त्यादिवशी का आला नाहीस' केल्यास 'मला जरा अंगात कणकण होती' इ. उत्तर दिल्यास एक मित्र नक्कीच कमी होईल ह्याची खात्री बाळगा. कारण त्या मित्राने नक्कीच त्यादिवशी, तुमची फेसबुक भिंत पाहून ते स्वत:च्या मनात साठवलेलं असतं. खरोखर सुरेख आणि मनोरम्य पर्यटनस्थळ, एखादी डिश ह्यांची कधीतरी प्रकाशचित्रं टाकावीत. (माझे काही मित्र साप्ताहिक अंडा भुर्जी आणि मेवाड आइस्क्रीमचे फोटो टाकतात. इथे 'दररोज'वर आक्षेप आहे.)
नॉन्सेन्स ग्रुप सरळ सोडा. फेसबुक ग्रुपांमध्ये फार काहीही राहिलेलं नाही. मी सभासद असलेल्या प्रत्येक ग्रुपवर काहीतरी स्पॅम (जाहिरातपर-बव्हांश नकली संदेश) येत असतोच किंवा फालतू आऊटडेटेड मीम्स वगैरे. ह्यात मराठी पुस्तकप्रेमी आणि खगोल मंडळ ह्यासारख्या (एकेकाळी दर्जेदार असलेल्या) ग्रुपचाही समावेश आहे. हे ग्रुप्स सोडायचे नसल्यास 'अनफॉलो' करावेत. सेल्फी टाकून गुड मॉर्निंग म्हणणाऱ्या ताया आणि गॉगल घालून दैनिक सेल्फी टाकणारे दादा इ. लोकांचा वीट आला असल्यास, आणि अनफ्रेंड करायची इच्छा नसल्यास अनफॉलो करावे. चाय पी लो.

४) व्हॉट्सॅप
सर्वप्रथम सेटींग्स- (तीन उभे बिंदू-) डेटा स्टोरेज- मध्ये जाऊन सर्व मिडीआ फाईल्सचं ऑटो-डाऊनलोड बंद ठेवावं. म्हणजे खालील प्रकार क मधून मेमरी भरत जाण्याची वारंवारिता कमी होते.

क) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुड मॉर्निंग आणि सुप्रभात संदेश पाठवणं सोडा. शिवाय सकाळी मौलिक उपदेश/देवांची चित्रे पाठवल्यास तुमची गणना सरळ पन्नाशी पार अंकल/आंटी मध्ये होते इतकं लक्षात ठेवा, ज्यांच्या आयुष्यात हे असे संदेश पाठवणं हे एक थ्रिल असतं. असे खास संदेश बनवणारी शेअरचॅट वगैरे ॲप्स उपलब्ध आहेत. वापरु नयेत. त्यांची सिग्नेचर टेक्स्ट (मेसेज सेन्ट फ्रॉम शेअरचॅट) खाली आल्यास तुमची 'लोनली अंकल/आंटी'मध्ये गणना होते. ही त्याहून खालची पायरी आहे.

ख) वेळोवेळी इंटर्नल स्टोरेज मध्ये जाऊन, Whatsapp-Media-Sent- ह्या मार्गाने गेल्यास प्रत्येक मिडीआ टाईपचा एक फोल्डर दिसेल. त्यात जाऊन सगळ्या फाईल्स डिलीट करत रहा. ह्या फाईल्स तुम्ही 'पाठवलेल्या' आहेत. जर एखादा व्हिडीओ तुम्ही पाच लोकांना फॉरवर्ड केला, तर त्याच्या पाच नकला तुम्हांला त्यात दिसतील. म्हणजे साधारण ५ एमबीची फाईल, फक्त पाच लोकांना केलेल्या फॉरवर्ड्समुळे २५ एमबीची होते. अशा आठवड्याला दहा फाईल गणल्या तर २५० एमबी. फोटो, वर दिलेला प्रकार क मध्ये असाल तर त्या इमेजेस ह्यांचेही साधारण ३० एमबी दिवसाला होतात. ह्या सगळ्याच्या सगळ्या सरळ डिलीट कराव्यात. ह्या फोल्डर्समध्ये असलेल्या मिडीआ फाईल्स तुमच्या फोनच्या गॅलरीत दिसणार नाहीत. म्हणजेच, तुमचं व्हॉट्सॅप फोनची मेमरी क्षणोक्षणी व्यापत असतं. ह्या कामासाठी फाईल एक्स्प्लोअरर ॲप असणं गरजेचं आहे. बऱ्याच फोन्समध्ये अंतर्भूत असतं, नसल्यास प्ले स्टोअरवर फाईल मॅनेजर असंख्य उपलब्ध आहेत.
ह्या बहुतेक तुम्हाला कोणाकडून तरी आलेल्या असल्यामुळे त्या तुमच्या Whatsapp-Media- ह्या फोल्डरात मिळण्याची शक्यता आहेच. त्या तुम्हाला गॅलरीत दिसू शकतात आणि डिलीटही करता येतात.

ग) रीड रिसीट आणि लास्ट सीन
रीड रिसीट म्हणजे दोन निळ्या 'टिक्स' जे संदेश तुम्ही वाचला असल्याची पोचपावती देणाऱ्याला पाठवतात. ह्या बंद ठेवाव्यात कारण 'केव्हाचा मेसेज केलाय आणि आता रिप्लाय केला' छाप प्रकारांना तोंड द्यावं लागत नाही. लास्ट सीनही बंद ठेवतो कारण 'ऑनलाईन होता आणि माझा मेसेज बघायला वेळ नाही' इत्यादी प्र.तों.द्या.ला.ना. ह्यात तुमच्या रक्तात दुसऱ्यांना असे संदेश न पाठवण्यापुरतं बॅडॅस्य भिनलेलं असलं पाहिजे.

घ) बॅकप आणि चॅट डिलीट
तुमचे एकतरी अगदी बिनकामाच्या मंडळीचा ग्रुप असणार. तो साप्ताहिक/दैनिक 'क्लिअर चॅट' करत रहावा. जुने चॅट्स, महत्त्वाची माहिती/गॉसिप/पुरावे नसल्यास फटाफट डिलीट मारावेत. एखाद्या माणसाबरोबर केलेले चॅट अतिशय उपयोगाचे असेल, तर 'इमेल चॅट'चा पर्याय आहे तो वापरावा. शिवाय पुरावा म्हणून हवा असल्यास स्क्रीनशॉट काढावेत आणि त्या फाईल्स गुगल ड्राईव्हवर चढवाव्यात. फोन तुम्ही दररोज ज्यावेळी घरी असता त्यावेळी ऑटो बॅकपला ठेवावा, म्हणजे फोन बदलायचा प्रसंग आल्यास महत्त्वाच्या गप्पा जशाच्या तशा मिळतात. वरील सगळ्या कृतींमुळे ह्या बॅकपची साईझ १००एमबी पेक्षा कमी होते आणि बॅकप पटापट होतो. शिवाय फोन बदलल्यानंतर तो पटकन डाऊनलोडही होतो.

धागा माहितीपर असला तरी एक चर्चाविषयच आहे. मते माझी वैयक्तिक आहेत. बऱ्याच गोष्टी अव्यवहार्य वाटायचा संभव आहे. तुम्हालाही अशा क्लृप्त्या माहित असल्यास डकवाव्यात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

संकलन चांगलं केलंय माहितीचं. म्हटली तर काहीसं अवांतर ठरू शकेल, पण म्हटली तर कामाची सुद्धा आहे अशी एक लिंक आठवली.

https://datadetox.myshadow.org/detox

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंटरेस्टींग! आत्ताच पाहतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

गुगल लोकेशन सर्व्हिस: ही ऑफ ठेवावी. ह्याच्यामुळे फोनची बॅटरी वाचते.

आजकाल हे कितपत महत्त्वाचं आहे? लोकेशनमध्ये आता हाय अॅक्युरसी / बॅटरी सेव्हिंग असे मोड असतात. बॅटरी सेव्हिंग मोड वापरला तर ठीकठाक होत असावं असा अंदाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्यांना battery saving mode आणावा लागला, ह्यातच सगळं आलं नाही का?
आणि हो, बॅटरी खरंच प्रचंड वेगाने संपते. ही सर्व्हिस बंद ठेवूनही काम भागतं इतकंच सांगण्यातला आशय आहे. आणि ती सर्व्हिस चालू ठेवली, की लोकांना गुगल आपल्यावर नजर ठेवून असल्याचा साक्षात्कार होतो. तर ते मुळापासून नष्ट करण्यासाठी गुलोस बंदच ठेवणं श्रेयस्कर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

काय खावं सांगण्याऐवजी पथ्य सुरू झालं रविबाबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेळोवेळी इंटर्नल स्टोरेज मध्ये जाऊन, Whatsapp-Media-Sent- ह्या मार्गाने गेल्यास प्रत्येक मिडीआ टाईपचा एक फोल्डर दिसेल. त्यात जाऊन सगळ्या फाईल्स डिलीट करत रहा.

काही काळापूर्वी गूगलनं 'फाइल्स गो' नावाचं एक अॅप दिलं आहे. ते अधूनमधून तुम्हाला वेगवेगळ्या फाइल्स डिलीट करायला सुचवतं. डुप्लिकेट फाइल्स तेच शोधून काढतं आणि दाखवतं. शिवाय फालतू मीम्स आणि गुड मॉर्निंग टाईपच्या फाइल्स वगैरे. सामान्य माणसाला डोकं न चालवता फोन स्वच्छ ठेवण्यासाठी हे उपयोगी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जाम अॅड चाल्लीये त्याची. मी ते ट्राय करायलाही इन्स्टॉल करणार नाहीये. बग्जच खूप असतील आणि डोक्याला कटकटच इतकी होईल की त्यापेक्षा स्वतः जाऊन जाळपोळ केलेली बरी असं मला वाट्टं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

फाईल्स गो आवडलय. (ऐसीचा इनस्क्रिप्' कीबोर्[ नी' चालत नाही मालक, काहीतरी करा).
barech diwas vapartoy. duplicate files shodhaychi idea changli ahe.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यात कोणी मदत केली तर फार बरं होईल. सगळा कोड - म्हणजे कीयांचं मॅपिंग - व्यवस्थित असूनही चालत नाही. बरेच वेब डेव्हलपर्स ओळखीचे असूनही ड्रूपाल वापरणारं कोणीही ओळखीचं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इथले नाही पण प्रसाद शिरगावकर ड्रूपलवर काम करतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पैसे देण्याची तयारी असूनही ड्रुपालवर काम करणारे आणि वेळेत प्रश्नांना, इमेलांना उत्तरं देणारे लोक सापडत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. या धर्माचे पालन केल्यास लोकं करतात बऱ्याच वेळी मदत. असा स्वानुभव .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'फाइल्स गो' काही कामाचं नाही. केवळ मोठ्या साइजचे विडिओ मोठे आहेत म्हणून गोसाठी सुचवण्यात काही अर्थ नाही. पिकनिकचे काढलेल्या भरमसाठ फोटोंपैकी कोणते काढले तरी चालतील हे मोबाइल मालकाच समजतं.

गुलोसबद्दलच बोलायचं तर ते विंडोजमध्ये फोनमध्ये नाही फक्त लोकेशन आहे. आणि मी अमक्या ठिकाणी गेलो हे छपरावरून ओरडण्याचं वय राहिलं नाही. ओरडलोच तर लोक म्हणतील पडाल,पहिले खाली उतरा.
म्याप वापरत नाही शोधाशोध करण्यासाठी. तोंडीच विचारत जातो आणि रूट ट्रेस चालू करतो तेव्हा लोकेशन चालू होतं.
विंडोज सिस्टम एवरिथिंग फॅार एवरीवन नसल्याने सुखी. पण ती बंदच केली त्यांनी.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवळ मोठ्या साइजचे विडिओ मोठे आहेत म्हणून गोसाठी सुचवण्यात काही अर्थ नाही.

ते तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. हे फोटो बराच काळ फोनवर आहेत, ते आता काढून टाकायचे आहेत का? पद्धतीचे प्रश्नही ते विचारतं. काही अॅप्स फारसे वापरले जात नसतील तर ते काढून टाकायचे का, असंही विचारतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

१) युट्युबचे विडिओ ओफलाइन असतात पण ते काढा म्हणून गो सुचवेल का? ते वेगळ्या स्वतंत्र फाइलमध्ये नसतात, ट्युबअॅपच्या आत असतात पण मेमरी खातातच.
२) मी दुसय्रा फोनमधून काही विडिओ ट्रान्सफर केले तर मात्र विचारणा होते हवेत काहवेत का?
३) संशयास्पद, काही फुकट देणारे, किंवा लैंगिक साइट न पाहाणे हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
४) सेटिंग्जमध्ये असलेला इमेल हा खरा न ठेवता खोटा वापरावा.
नोटिफिकेशन येत नाहीत परंतू त्रासदायकपणा कमी होईल. खरा इमेल लॅागिन करून ब्राउजरमधून वापरतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युट्युबचे विडिओ ओफलाइन असतात पण ते काढा म्हणून गो सुचवेल का?

ह्याची मात्र मला कल्पना नाही, कारण मी फोनवर व्हिडिओ ठेवतच नाही.फोनवर साठवलेले सर्व व्हिडिओ, इमेजेस वगैरे पाहून पाहिजे ते डिलीट करायची सोय 'गो'मध्ये आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कुठेकुठे **न ठेवलय हे शोधण्याची गरज नाही कारण २०१०पासून फेसबुक खातं मोबाइलवर सुरू केलं तेच मुळी ओपन पब्लिक. जे काही जगाला कळलं तरी चालेल तेवढंच लिहायचं, फोटो टाकायचे.

मोबाइल/ सेशल नेटवर्किंग याचा प्रसार होण्याअगोदरपासून डिजिट, आइसी चिप इत्यादी मासिकांतले लेख वाचत असे त्यामुळे सावधता आली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त धागा.

आणखी एक:

ऑनलाईन विमानतिकिटं बुक करायची वेळ आपल्यावर नेहेमी येते. स्कायस्कॅनर, मेकमायट्रिप, वगैरेसारख्या संस्थळांवरून आपण बुक करतो. कोणीतरी सांगितलेलं असतं, की किमती चेक करत रहा, आणि कमी किंमत दिसली की बुक करा.

पण दर वेळेला उघडून पाहिलं की असं आढळतं की किंमत मेली इंचाइंचाने वाढतेच आहे.

तर होतं काय, की हे दूश्ट साईटवाले आपल्या कॉम्प्युटरवर 'कुकी' घालून ठेवतात. आपण परत चेक केलं की त्यांना कळतं की ते आपणच आहोत. त्यामुळे, दर वेळी चेक करताना ब्राउझरच्या इन्कॉग्निटो मोडमध्ये चेक करावं. अशाने कुकी सेव्ह होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण5
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ही युक्ती प्रत्येक बझफीड, स्कूपव्हूप वगैरेंच्या यादीत असते: 10 Things to remember before travelling/ You'll never book the tickets in normal mode again... इत्यादी शीर्षकांखाली.
इसरलंय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

ऑनलाईन विमानतिकिटं बुक करायची वेळ आपल्यावर नेहेमी येते.

आबा, उडान स्कीम सर्वथा यशस्वी झालीय असा भावार्थ घ्यावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

धन्यवाद आबा. मला बरेच दिवस हा प्रश्न पडायचा. कोणत्याही ट्रीप च्या तारखा नक्की झाल्या की साधारण २-३ दिवस सर्च करून आपण फेअर चा अंदाज घेतो आणि बेस्ट डील बुक करतो. नेमक्या त्या ३-४ दिवसांत किंवा ७-८ दिवसांत भाडे $४०-$५० ने कसे वाढते असा मला प्रश्न पडायचा. म्हणजे दोन शहरांतील भाडे सुरूवातीला $३०० असेल आणि त्या ३-४ दिवसांत ते $३५० वर गेले, तर त्या वेगाने पुढच्या महिन्याभरात ते दुप्पट तिप्पट व्हायला हवे. पण तसे होत नाही. गर्दीच्या वेळा सोडल्या तर भाडे इतके वाढत नाही. म्हणजे एअरलाइन कंपन्या काहीतरी ट्रॅक करूनच हे करतात हे जाणवत होते पण हे स्पेसिफिकली ब्राउझर चे डोक्यात आले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोडबोल्याने गिरिश कुबेर यांनी हेच काही मुद्दे न मांडता उगाच लेख पाडला शनिवारी.
खफवरही चुकून हेच नाव टाकलं!!

दुवा : https://www.loksatta.com/anyatha-news/apple-iphone-1697980/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुवाद्यादुवाद्यादुवाद्यादुवाद्यादुवाद्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

फाइल्स गो आल्यापासून दोनदा अपडेट झालं आहे.
काही AI वापरावेच लागणार त्यांना.
- बरेच दिवसात न उघडल्या फाइल्सना उडवा अथवा क्लाउडला न्या सांगणे,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कारण 'ऑनलाईन होता आणि माझा मेसेज बघायला वेळ नाही' इत्यादी प्र.तों.द्या.ला.ना. ह्यात तुमच्या रक्तात दुसऱ्यांना असे संदेश न पाठवण्यापुरतं बॅडॅस्य भिनलेलं असलं पाहिजे.

भारतातल्या अनेक लोकांना मी फोन करत नाही याचं कारण फोन केला की पहिला अर्धा तास गेले काही महिने फोन का केला नाही, हे समजावण्यात जातो. ज्या लोकांना अशी स्पष्टीकरणं द्यावी लागतात, "ऑनलाईन होते, पण दुसरं महत्त्वाचं काही सुरू होतं", हे सांगावं लागतं, असल्या लोकांशी मी संबंध ठेवत नाही. आपणच स्वतःच्या आणि लोकांच्याही विश्वाच्या केंद्रस्थानी आहोत, असं वाटणाऱ्या लोकांना वेळेत बायबाय केलेलं बरं.

आपला डेटा सुखासुखी लोकांना मिळू द्यायचा नसेल किंवा मिळालेला डेटा गोंधळवणारा असावा असं वाटत असेल तर गुंतागुंतीचं आयुष्य जगावं. जंतूनं 'फस्टक्लास मिसळ' नामक दुकानात फेसबुक चेकिन करावं, मी तरणतलावातून चेकीन करावं.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुंतागुंतीचं आयुष्य जगावं. जंतूनं 'फस्टक्लास मिसळ' नामक दुकानात फेसबुक चेकिन करावं, मी तरणतलावातून चेकीन करावं.

काले काले पथ्थर पर पीला पीला फूल
माझी आयडिया ढापून अदितीने केलाय फाऊल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

कालच मला गूगल दाखवत होतं, त्यांची माझ्याबद्दल काय मतं आहेत ते. मी ३५-४४ वयोगटातली स्त्री आहे; हे योग्य. मी पायथन वापरते हेही गूगलला समजलं आहे. मात्र मला मातृत्व आणि बालसंगोपन या विषयांत बागकामापेक्षा अधिक रस असेल असं सध्या गूगलला वाटतंय.

तर माझ्या डोक्यात कल्पना आली की एखादा सर्च बॉट लिहायचा. त्यात काय वाटेल त्या 'सर्च टर्म्स' भरायच्या. लॉगिन केलं की दिवसाला दोन रँडम सर्च या बॉटनं करायचे. कसलेही, भडक भगव्यांपासून, गोडगुलाबी डिस्नीपर्यंत काय वाटेल ते.

माझ्याबद्दल गूगलची मतं गंडकी असणं हे सहज शक्य आहे. संपूर्ण गूगलच गंडेल वगैरे अपेक्षा मी धरत नाही. पण असं काही जमलं तर हा कोड मैत्रमंडळात पसरवायता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गूगल गंडो वा न गंडो, बॉट लिहायला मजा येईल. आमचे येथे श्रीकृपेकरून बॉट लिहून मिळेल. - अनुभवी बॉटलेखक.
असाच एक बापटअण्णांच्या लेखनातील विरामचिन्हांच्या आधीच्या मोकळ्या जागा आणि तुझ्या लेखनातील हुच्चभ्रू अतिरिक्त अनावश्यक अर्धविराम भिरकावून देणारा बॉट लिहायची कधीपासूनची इच्छा आहे.
१. साभार 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॉट लिहिताना एक पथ्य पाळ, गूगलला बॉट सहज ओळखता येतात. ते टाळण्यासाठी दोन सर्चांमध्ये ऱ्यांडमली, काही सेकंदांचा अवधी ठेवायचा. शिवाय, जमल्यास ऐसीकृपेने आटुकमाटुक, नाही तर हातानं, सर्च टॉपिक्स मिळवता येतील. सुरुवातीला मर्यादित यादी (list; set नव्हे) वापरता येईल.

सेलेनियम नावाच्या मॉड्यूलमधून ब्राऊजर उघडल्याचा आव आणता येतो. सेलेनियम वापरून गार्डियनची साईट सावडण्याचा कोड इथे पाहा. त्यातला हा भाग उपयुक्त असू शकेल. - Using a Phantom Browser for Selenium

मलाही कोड लिहायला आवडेल पण वेळेची टंचाई डायन आहे.(!) गिटवर कोड ठेवणार असलास तर मलाही लिंक पाठव, तुझ्या कोडमधून शिकता येईल. जमेल तसा हातभार लावेनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रीड रिसीट म्हणजे दोन निळ्या 'टिक्स' जे संदेश तुम्ही वाचला असल्याची पोचपावती देणाऱ्याला पाठवतात. ह्या बंद ठेवाव्यात कारण 'केव्हाचा मेसेज केलाय आणि आता रिप्लाय केला' छाप प्रकारांना तोंड द्यावं लागत नाही.

अशा लोकांना मग मी अनेकदा फेसबुक मेसेंजरवर संदेश पाठवतो! Biggrin
......

ह्या एक्स्टेंशनचा 'टेरर' एव्हढा आहे की महाराष्ट्र टाईम्सची वेबसाईट ॲडब्लॉक डिसेबल केल्याशिवाय बातम्या वाचू देत नाही.

ह्यावर उपाय म्हणून हे यक्षटेण्षण वापरून जावास्क्रीप्ट्स डिसेबलाव्यात, मग गप्प बसतात. बोनस म्हणून आपोआप सुरू होणारे व्हिडिओज वगैरे बंद होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिहीरभौ, एक्स्टेंशन जबरी आहे. झक्कास. तबाही मचा दी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

म्हशीच्या पाठीवर बसून फिरायचे आहे पण म्हशीने चिखलाच्या डबक्यात बसून राहू नये म्हणून करायच्या क्लुप्त्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक3
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग) रीड रिसीट आणि लास्ट सीन
- मी हे नेहमीच चालू ठेवतो, कारण लोकांना कळायला हवं की करण्यासारख्या इतर अनेक रोचक गोष्टी जगात असताना ते मला बोअर करू पाहताहेत.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

he pan kharay. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रायव्हसीशी संबंधित मुद्दे पटले.

पण बाकी "टाइमपास" कॅटेगरीत केल्या जाणाऱ्या गोष्टींचा प्रायव्हसीशी काय संबंध आहे? फेबुवर 'दवणीय अंडे' आणि "आय लव्ह ट्रॅशी हिंदी मूव्हीज" हे दोन ग्रूप म्हणजे भयंकर करमणूक आहे. मुळात आपल्या फेबु प्रोफाइल वर फारशी वैयक्तिक माहिती नसेल तर हे उद्योग करत राहण्यात काय धोका आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप खूप छान नि उपयुक्त लेख. लेखातल्या अनेक गोष्टी माहित नव्हत्या पण हव्या होत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एचटिएमेलचे आणि सिएसएसचे कोड शिकून ते तपासायचे, वापरायचे मार्ग आहेत आणि ते संस्थळावर उपयोगात आणताही येतात. सर्वरसाइड कोडचं काय करणार कुठे तपासून पाहणार? तेही मोबल्यातून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0