एका लाडक्याचा पन्नासावा वाढदिवस

आज ५ आक्टोबर २०१२. एरव्ही निरुपद्रवी वाटणारी ही तारीख, पण माझ्या दृष्टीने [तसेच जगभरातील अनेक ज्ञात-अज्ञात रसिकांच्या दृष्टीनेही] या तारखेला एक आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले आहे. बरोबर ५० वर्षापूर्वी... म्हणजेच ५ आक्टोबर १९६२ रोजी एका 'पात्रा'ने इंग्लंड आणि अमेरिकेत चंदेरी पडद्यावर जन्म घेतला आणि त्याच्या जन्मदात्यालाही कल्पना नसेल इतके प्रेम आदर आणि लोकप्रियता या पोराने केवळ आपल्या 'सज्जन' प्रतिमेवर मिळविली. एकमेव व्यक्ती असेल की जी आपल्या कामापोटी समोरच्या व्यक्तीचा थंड डोक्याने वध करूनही पाहाणार्‍यांच्या मनात त्याच्याविषयी 'खूनी' असे चित्र निर्माण करीत नाही, उलटपक्षी त्या कृत्याबद्दल त्याच्याविषयी कृतज्ञताच व्यक्त करते.

जगभरातील सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेले हे पात्र म्हणजे अर्थातच "जेम्स बॉण्ड...." एमआय६ या ब्रिटिश सिक्रेट सर्व्हिस खात्यातील सर्व अधिकार्‍यांचा लाडका गुप्तहेर...कोड नंबर ००७. या नामाचे जनकत्व जाते याला पुस्तकरुपाने वाचकांसमोर आणणार्‍या इअ‍ॅन फ्लेमिंग या लेखकाकडे, जो दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश नेव्हीचा एक ऑफिसर होता. लेखनाची आवड अर्थातच होती आणि नेव्ही संदर्भात गुप्तहेरी करण्याच्या चर्चा सुरू असायच्या त्याचवेळी फ्लेमिंगच्या मनात अशा एका नेव्हल ऑफिसरला 'जन्म' द्यावा की जो बाहेरून सरकारी सेवा करीत आहे, नेव्हीची...पण प्रत्यक्षात तो ब्रिटिश सीक्रेट सर्व्हिसचा एजन्ट आहे. नेव्हीत सिग्नल्ससाठी कोडींगचा वापर होत असल्याने फ्लेमिंगने आपल्या मानसपुत्राला ००७ हा क्रमांक दिला आणि पुत्राचे नामकरण केले 'जेम्स बॉण्ड'. हेच नाव का ठेवले ? तर फ्लेमिंगच्या आवडीनिवडीमध्ये 'पक्षी निरिक्षण' हा भाग होता. त्याने त्या संदर्भात बरीचशी भटकंतीही केली होती. पक्षी निरिक्षण या विषयावरील त्याच्या काळात खूप गाजत असलेल्या पुस्तकाचे नाव होते : Birds of West Indies.. Field Guide आणि या पुस्तकाचा अमेरिकन लेखक होता 'जेम्स बॉण्ड'. पुस्तकाच्या प्रेमात पडलेल्या फ्लेमिंगला हे Masculine नाव आपल्या तितक्याच रफटफ नायकासाठी खूप भावले होते, आणि तिथेच त्याने डॉ.नो या आपल्या पहिल्या कादंबरीसाठी नायकाचे नाव निश्चित केले 'जेम्स बॉण्ड'.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचा हा अतिशय आवडता नायक. त्याला कारण असे की, खुद्द केनेडी युद्धकाळात PT109 या युद्धनौकेवर नाविक म्हणूनच कार्यरत होते, युद्धातही भाग घेतला होताच. पुढे राजकारणात पडल्यानंतर विरंगुळ्यासाठी त्यानी बाँड सीरिज वाचण्यासाठी घेतली आणि त्यातील नायकाचे शारीरिक वर्णन, उंची राहणीमान आणि कामे ही जवळपास केनेडी या व्यक्तिमत्वाला शोभतील अशीच, शिवाय जेम्स बाँडदेखील एक नेव्हल ऑफिसर. खास केनेडी आणि कुटुंबियांसाठीही डॉ.नो आणि फ्रॉम रशिया वुईथ लव्ह चित्रपटांचे प्रीमिअर शोज् ब्रोकोली साल्ट्झमन या निर्मात्यांनी आयोजित केले होते.

जेम्स बाँड ही 'आयकॉनिक इमेज' तयार झाली ती अगदी पहिल्या चित्रपटापासून...डॉ.नो. आणि जगभरातील प्रेक्षकांनी त्याला इतके डोक्यावर उचलून धरले की साहजिकच युनायटेड आर्टिस्टच्या टीमने तात्काळ फ्लेमिंगच्या सार्‍या 'बाँण्ड' कादंबर्‍यांचे हक्क विकत घेतले आणि जाहीर केले की 'बाँड मालिका अक्षय राहील...". सुरुवातीला वाटले होते की फ्लेमिंगने लिहिलेल्या एकूण १२ कादंबर्‍यांवरील चित्रपट निघाले की ही मालिका थांबणार. पण तसे होणे शक्यच नव्हते. निर्मात्यांनी कादंबर्‍यांसमवेत 'जेम्स बाँड' हे पात्राचे नावच 'कॉपीराईट' करून घेतले आणि फ्लेमिंगच्या मृत्युनंतर {१९६४ मध्ये फ्लेमिंगचे निधन झाले होते} त्याच्या वारसांना योग्य ते मानधन देऊन नव्या लेखकांच्या टीमकडून 'जेम्स बॉण्ड' हे पात्र केन्द्रस्थानी ठेवून पुढील चित्रपट तयार करण्याचे कार्य चालूच ठेवले. आजमितीला २३ बाँडपट पडद्यावर झळकले असून जगभरातील चित्रपटक्षेत्रातील हे एकमेव असे उदाहरण आहे की, या सीरीजमधील एकाची चित्रपटाने आर्थिक अपयश पाहिलेले नाही.

'हॅरी पॉटर' सीरीजच्या मागोमाग बाँडचित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचा इतिहास रचला आहे. पॉटर सीरिज थांबली आहे, पण आमचा जेम्स बाँड पन्नाशीनंतरही थकायला तयार नाही....तो कायमस्वरुपी 'तरुण'च राहिला पाहिजे...त्याने नेहमी 'पॉश' कपडे घातले पाहिजेच, हातात 'ओमेगा' घड्याळच असले पाहिजे ['ओमेगा' ने जाहिरातासाठी जबरदस्त फी निर्मात्यांना दिली आहे], नित्यनेमाने जेम्स बाँडने क्लब्जमध्ये जाऊन तिथे उंची मद्य...विशेषतः मार्टिनीचे घुटके सुशेगातपणे घेण्याची त्याची अदा ट्रेडमार्क झाली आहे...शिवाय मदनिका त्याच्या सहवासासाठी जणू काही वाटच पाहात राहिल्या आहेत, असा 'करिश्मा' त्याच्या व्यक्तिमत्वाभोवती असलाच पाहिजे...अशी जेम्स बाँडप्रेमींची लाडकी मागणी असते...जी ती भूमिका साकारणारा प्रत्येक नायक पूर्ण करतोच.

५ आक्टोबर २०१२ या दिवशी 'जेम्स बॉण्ड' ५० वर्षाचा झाला म्हणून लंडनच्या डार्लिंग किंडर्सलय लि. {डीके नावाने प्रसिद्ध} पब्लिशर्सनी 'JAMES BOND : 50 YEARS OF MOVIE POSTERS" या शीर्षकाने अतिशय देखणे असा 'बाँड स्मृतीगंध' प्रकाशित केला असून त्याची भारतीय रुपयात किंमत २५००/- रुपये आहे...मला हे पुस्तक फ्लिपकार्टकडून २२३०/- रुपयाला मिळाले. पुस्तकातील पहिल्या पानापासून ते शेवटच्या {आगामी 'स्कायफॉल'} चित्रपतापर्यंत 'बाँड चित्रपटांच्या पोस्टर्स'चा मन हरखून टाकणारा चित्ररुपी इतिहास देखण्या आर्टपेपरवर आणला गेला आहे. पहिल्या डॉ.नो पासून 'पोस्टर्स कसे आणि तसे का असले पाहिजेत ?" या प्रश्नावर वेळोवेळी संबंधितांमध्ये कशी चर्चा होत गेली आणि विविध देशात {भाषेच्या गरजेनुसार} त्यांच्या प्रसिद्धीची मांडणी कशी करावी लागेल ? अमुकच शब्द पोस्टर्समध्ये का आले पाहिजेत ? त्यांची रचना कशी करावी ? रंगसंगती कोणत्या तर्‍हेने असली पाहिजे [लाल आणि पिवळ्या रंगाचा पोस्टर्समध्ये खूप वापर करण्यामागील भूमिका मांडणे]....'फ्रॉम रशिया वुईथ लव्ह' या नावाने भारतात तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नसल्याने [भारताची रशियासमवेत असलेली मैत्री विचारात घेता] मग इथल्याच 'शिवकाशी प्रेस'कडून खास भारतीय मनाला रुचेल असे 'फ्रॉम ००७ वुईथ लव्ह' या नावाने नव्याने पोस्टर्स करून घेणे...बाँडच्या ललना दाखविताना विश्वभरातील सार्‍या खंडांचे त्या प्रतिनिधीत्व करतात असे दाखविण्यासाठी मदनिकांची त्यानुसार कपडे आणि केशरचना, देहरचना दाखविण्याची पोस्टर्स, ब्लॅक अँण्ड व्हाईट पोस्टर्स करायची झाल्यास ती कशी असली पाहिजेत याचा उहापोह. प्रत्येक चित्रपटाच्या प्रत्येक पोस्टर्समागील इतिहास आणि ते तसे का तयार करण्यात आले त्याची कारणमीमांसाही त्यासोबत देण्यात आली आहे.

प्रॉडक्शन डिझाईनिन्गसाठी 'ऑस्कर' मिळविलेल्या डेनिस गॅसनर [ज्याने 'कॅसिनो रॉयल' आणि आगामी 'स्कायफॉल' चे डिझाईन केले आहे] याच्या संपादकत्वाखालील टीमने या पुस्तकाची रचना आणि सादरीकरण केले आहे. त्यातील काही पोस्टर्स :

[या निमित्ताने १९६२ पासून अगदी पुढील महिन्यात प्रकाशित होत असलेल्या 'स्कायफॉल' पर्यंतच्या बाँडपटांची आणि ते पात्र साकार करणार्‍या नायकांची नावे इथे देत आहे :

१. डॉ. नो ~ १९६२ ~ शॉन कॉनेरी
२. फ्रॉम रशिया वुईथ लव्ह ~ १९६३ ~ शॉन कॉनेरी
३. गोल्डफिंगर ~ १९६४ ~ शॉन कॉनेरी
४. थंडरबॉल ~ १९६५ ~ शॉन कॉनेरी
५. यू ओन्ली लिव्ह ट्वाईस ~ १९६७ ~ शॉन कॉनेरी
६. ऑन हर मॅजेस्टिज सीक्रेट सर्व्हिस ~ १९६९ ~ जॉर्ज लेझन्बी
७. डायमंडस आर फॉरेव्हर ~ १९७१ ~ शॉन कॉनेरी
८. लिव्ह अ‍ॅण्ड लेट डाय ~ १९७३ ~ रॉजर मूर
९. द मॅन वुईथ द गोल्डन गन ~ १९७४ ~ रॉजर मूर
१०. द स्पाय व्हू लव्हड मी ~ १९७७ ~ रॉजर मूर
११. मूनरेकर ~ १९७९ ~ रॉजर मूर
१२. फॉर यूवर आईज ओन्ली ~ १९८१ ~ रॉजर मूर
१३. आक्टोपसी ~ १९८३ ~ रॉजर मूर
१४. अ व्ह्यू टु किल ~ १९८५ ~ रॉजर मूर
१५. द लिव्हिंग डेलाईट्स ~ १९८७ ~ टिमोथी डाल्टन
१६. लायसेन्स टु किल ~ १९८९ ~ टिमोथी डाल्टन
१७. गोल्डन आय ~ १९९५ ~ पीअर्स ब्रॉस्नन
[कायद्याच्या झगड्यामुळे 'बॉण्ड निर्मिती' मध्ये सहा वर्षाचा खंड पडला होता]
१८. टुमारो नेव्हर डाईज ~ १९९७ ~ पीअर्स ब्रॉस्नन
१९. द वर्ल्स इज नॉट इनफ ~ १९९९ ~ पीअर्स ब्रॉस्नन
२०. डाय अनादर डे ~ २००२ ~ पीअर्स ब्रॉस्नन
२१. कॅसिनो रॉयल ~ २००६ डॅनिअल क्रेग
२२. क्वांटम ऑफ सोलॅस ~ २००८ ~ डॅनिअल क्रेग
२३. स्कायफॉल ~ २०१२ ~ डॅनिअल क्रेग

{याशिवाय शॉन कॉनेरी अभिनित 'नेव्हर से नेव्हर अगेन' हा स्वतंत्र निर्मित एक बॉण्डपट झळकला होता....१९८३ मध्ये}

५० वर्षाच्या या 'तरुणा'चा इतिहास सांगायला एक लेख खूप अपुरा आहे याची मला जाणीव आहे, पण जसे जेम्स बॉण्ड कायमचे 'अमर' असे पात्र झाले आहे तद्वतच त्याच्यावरील विविध रसिकांच्या लेखमालाही सातत्याने जालावर येत राहतील याची खात्री असल्याने, 'वन अ‍ॅण्ड ओन्ली वन ००७ जेम्स बाँड' ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन हा लेख आटोपता घेतो.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (5 votes)

प्रतिक्रिया

पण शीतयुद्धाच्या काळात, साम्राज्यवादी आकांक्षांना खतपाणी घालणार्‍या, सरसकटीकरण करणार्‍या व मुख्य म्हणजे एम.सी. पी गिरी - स्त्री ही अबला व उपभोग्य वस्तु असे सुरवातीला उघड उघड दाखवणार्‍या व नंतर स्त्री भूमिकेत किंचीत कणखरता घालून आणणार्‍या अश्या जेम्स बाँडला यापुढे म्हातारे व्हावे लागेल? का अश्या मनोवृत्तीला उचलून धरणारा पुरेसा चाहतावर्ग जगभर अजुनही असल्याने हे असेच चालू राहील?

बाँडकाकांना म्हातारे न होण्याकरता काय करावे लागेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॅपी बर्थडे टु बाँड!!! लहानपणी रमेश मंत्र्यांच्या जनू बांडे मुळे जेम्स बॉंड जास्त आवडायचा त्याची या निमित्ताने आठवण झाली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जनू बांडेमुळेच जेम्स बाँड्मधे रस निर्माण झाला.
बाकी, सीन कॉनरीचा बाँडच सर्वात सरस वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सीन कॉनरी

शॉन कॉनरी.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिरव्या देशात जसे स्केड्यूल किंवा स्केज्यूल म्हणतात तसे आम्ही सीनच कॉनेरी म्हणणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

म्हणायचे असेल तर सीन कॉनरी म्हणा सीनच कॉनरी नको. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो तो संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे मधला च आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बरी आठवण केली. जनू बांडे याची चित्रमालीकाही प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी केली आहे. कोण बरं ते? ज्ञानेश सोनार?
'रविवारची जत्रा' या मासीकात यायची ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

जिव्हाळ्याच्या विषयाला स्पर्श केलात अशोकमामा.

जेम्स बॉन्डच्या भूमिकांसाठी अगदी अमेरिकन नटांचीही स्क्रीनटेस्ट घेतली गेली असली तरी आपल्याला असं दिसतं की ग्रेट ब्रिटनच्या असलेल्याच नटांची वर्णी लागलेली आहे. ती पुढीलप्रमाणे:

Sean Connery - Scottish
Roger Moore - English
George Lazenby - Australian
Timothy Dalton - Welsh
आणि आता पुन्हा....
Danial Craig - English.

खरं सांगायचं तर शॉन कॉनरी नंतर मला टिमथि डॅल्टन जास्त आवडतो. त्याला अधिक सिनेमे मिळते तर जेम्स बॉन्डचे चित्रपट अधिकाधिक वास्तववादी झाले असते.

डॅनियल क्रेग मात्र जेम्स बाँडच्या भूमिकेत अजिबात शोभत नाही. जेम्स बॉन्डबद्दलचं प्रेम खोल नसतं तर या माणसामुळे माझा ते सिनेमे बघण्यातला रस संपला असता.

मात्र मी ते बघतो. क्रेग साठी नसलं तरी, बॉन्ड साठी बघतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चक्क पिअर्स ब्रॉस्नॅन चे नावही नाही?
ही भूमीका उत्तम वठवणार्‍या अभिनेत्यांचा मी लावलेला क्रम याप्रमाणे
१) कॉनरी
२) ब्रॉस्नॅन
३) डेनियल क्रेग
४) मूर
५) डाल्टन
६) लेझेम्बी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहजरावांशी सहमत आहे.

ब्रॉसनन ने बाँडपटांना एक वेगळी संजीवनी दिली आहे.
गोल्डनआय जेव्हा पडद्यावर झळकला तेव्हा सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा थरार आणि जेम्स बाँडचे व्यक्तीमत्त्व पिअर्स ब्रॉसननने जेवढे थंड व निर्दय डोक्याचे रंगवले होते ते बघणे हा एक थरारक अनुभव होता. पुढील चित्रपटांतून ब्रॉसनन ने त्याची भूमिका अधिक खुलवली. तरीसुद्धा ब्रॉसनन चे चारही चित्रपट एकदम जबरदस्त होते.

अशोक काका,
तुम्ही जेम्स बाँडच्या पुस्तकाची माहिती सांगितलीत तेव्हाच खात्री होती की लवकरात लवकर तुमच्याकडून जेम्स बाँड वर एक लेख येणार आणि अपेक्षेप्रमाणे तो आलाही. Smile
तुम्ही दिलेली एका स्वतंत्र बाँडपटाची माहिती रोचक आहे. मी सगळे एका सीरिज चे समजत होतो. सगळे बाँडपट मात्र पाहिले आहेत.
डॅनियल क्रेग बाँड म्हणून पचायला जड वाटतो पण कॅसिनो रॉयाल पाहील्यावर माझे हे मत बदलले. क्रेग ने एक वेगळा बाँड साकारला आहे आणि तो लक्षवेधी आहे. यामुळेच की काय जेम्स बाँडच्या निर्मात्यांनी क्रेग ला पुढील ५ बाँडपटांसाठी करारबद्ध केले.
अशोक काका, बाँडचे हे पुस्तक लवकरच घेईन. Smile
एका अजरामर पात्राची संक्षिप्त पण अतिशय सुरेख ओळख तुम्ही करुन दिली आहे. जेम्स बाँडचा प्रत्येक चित्रपट हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहेच. तुम्हाला माझी आग्रहाची विनंती आहे की तुमच्या आवडीच्या बाँडपटावर लेख(माला) लिहा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉरी सागर....काहीशा उशीराने तुझा प्रतिसाद पाहिला, आत्ताच वाचला.....[डॅनिअल क्रेग चा फोटो तुझ्या पानावर लावल्याचेही मी पाहिले....मस्तच !]

एक सूचना ~ जेम्स बाँडचे मी घेतलेले हे पुस्तक 'वाचनीय' नसून 'बघनीय' आहे. त्यात फक्त पोस्टर्स आणि पोस्टर्समागील कथा इतकेच मॅटर आहे. पुस्तक आहे सुरेख, नो डाऊट. पण तिथे जेम्स बाँडचा जनक-पिता इअ‍ॅन फ्लेमिंग तसेच बॉण्ड व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आदी पडद्यामागील तंत्रज्ञ यांच्याविषयी कसलीही माहिती मिळणार नाही तुला. हे पुस्तक म्हणजे साधारणतः 'कलेक्टर्स ईश्यू' असल्यासारखे आहे.

जगप्रसिद्ध 'लाईफ' ने खास जेम्स बाँड स्पेशल अंक काढला आहे. तो अर्थातच अमेरिकेत सहजी उपलब्ध असला तरी इथे भारतात मिळणे काहीसे दुरापास्त वाटते. मी फ्लिपकार्टला या संदर्भात स्वतंत्र विनंती करीत आहेच. तो अंक जर मिळाला तर मात्र तो शंभर टक्के वाचनीय असेल.

सो...पॉईन्ट इज....वेट अ व्हाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय अशोक काका, सध्या तरी आगामी बाँडपट स्कायफॉल ची आतुरतेने वाट पहात आहे म्हणून प्रोफाईलमधील हा बदल Wink

जेम्स बाँडचे मी घेतलेले हे पुस्तक 'वाचनीय' नसून 'बघनीय' आहे
अशोक काका, पुस्तक घेईन तेव्हा हे आवर्जून लक्षात ठेवीन. पोस्टर्समागील कथा मात्र मला या पुस्तकातील महत्त्वाचा भाग वाटतो. कारण त्या अनुषंगाने नजरेसमोर फोटोबरोबर चित्रपटातील दृश्ये तरळू लागतील याची खात्री आहे Smile

'लाईफ' चा जेम्स बाँड स्पेशल अंक मिळवण्याचा मी पण प्रयत्न करतो काका. Smile
तूर्तास वाट पहाण्याशिवाय पर्याय नाही. (जेम्स बाँडच्या चित्रपटांतून झटपट कृती स्वभावात उतरली असली तरी वाट पाहण्याएवढा संयम देखील आहे)
तुम्हाला लाईफचा अंक उपलब्ध झाल्याची माहिती मिळाली की अवश्य सांगा. तो अंक लगेच घेईन Smile
तूर्तास गूगलून मुखपृष्ठ मिळाले. (दुधाची तहान तूर्तास ताकावर Wink ) लाईव की लाईफ? असा थोडासा गोंधळलोय. पण कदाचित टंकनचूक असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>> 'लाईफ' चा जेम्स बाँड स्पेशल अंक मिळवण्याचा मी पण प्रयत्न करतो काका.
सागर, तू महिन्याची किती कमाई पुस्तकांवर खर्च करतो रे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

व्वा...व्वा....पाषणभेद.....तुम्ही अगदी माझ्या मनातीलच प्रश्नाला शब्दरूप दिले आहे.

[....तरीही तो इतका खर्च करतो, ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सागर, तू महिन्याची किती कमाई पुस्तकांवर खर्च करतो रे?

दगडफोड्या - खरे तर वर्षाला २ महिन्यांचा पगार Wink दर महिन्याला अपेक्षेपेक्षा जास्तच खरेदी होते आहे. पण गेल्या काही महिन्यांत वेग थोडा मुद्दाम कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

अशोक काका, खरे तर मी पुस्तकांवर खर्च करण्यास प्राथमिकता देण्याचे एक कारण आहे. जुन्या काळातील काही अतिशय दर्जेदार पुस्तके आता मराठी वाचकांना जंग जंग पछाडूनही मिळत नाहियेत. आणि प्रकाशक ती पुन्हा छापत नाहियेत (मग कारणे काहीही असोत). म्हणून आवडलेली व हवी असलेली पुस्तके मिळत आहेत तर मी ती घेऊन ठेवतो आहे एवढेच. पुढे ५-१० वर्षांनी ती पुस्तके मिळतील असे मला वाटत नाही. म्हणून सध्या आर्थिक गणित जुळवावे लागत असले तरीही पुस्तके दर महिन्याला मी घेतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महापाप, महाघोरपाप ब्रॉस्नन विसरलो. कान पकडून माफी मागतो Smile

Pierce Brosnan - Irish

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. मंदार....

अरे विशेष म्हणजे दस्तुरखुद्द इअ‍ॅन फ्लेमिंग या बॉण्डच्या जनकपित्याला शॉन कॉनेरी त्या भूमिकेसाठी पसंत नव्हता. त्याच्या मनात होता तो 'कॅरी ग्रॅण्ट'. पण कॅरीची फी त्या काळात इतकी जबरदस्त होती की साल्ट्झमन आणि ब्रोकोली यांचे 'डॉ.नो' चे एकूण बजेट त्या आकड्यापेक्षा कमी होते. त्यामुळे ते नाव मागे पडले. फ्लेमिंगने मग डेव्हिड निव्हेनचे नाव पुढे केले, ती निवड खुद्द निव्हेन यानीच नाकारली....वय जास्त झाले होते त्यांचे त्या वेळी. मग तर लंडन टाईम्समध्ये 'भूमिकेसाठी शोध' अशी चक्क जाहिरात देण्यात आली होती. शेवटी 'मॅनली' शॉन कॉनेरीच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यावर चर्चा थांबली. तरीही कॉनेरी आणि फ्लेमिंग या दोघांत सौहार्दाचे नाते कधीच निर्माण झाले नाही. फ्लेमिंग पक्का "इंग्लिशमन' असल्याने आपल्या पात्राच्या भूमिकेसाठी एका 'स्कॉटीश' ची निवड व्हावी हे त्याला कधीच रुचले नव्हते....[खुद्द शॉन कॉनेरी यानेच एका मुलाखतीत हे सांगितले आहे.]

२. सहज...

पीअर्स ब्रॉस्नन....अतिशय देखणा गडी....आणि टीव्हीवर ज्यावेळी त्याची 'रेमिंग्टन स्टील' ही मालिका गाजू लागली त्यावेळीच लक्षात आले होते की कधीना कधी हा हीरो 'जेम्स बाँड'च्या भूमिकेत दिसेल...झालेही तसेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मामा, गैरसमज झाला वाटते Smile
मी शॉन कॉनरी नंतर टिमथी डॅल्टन आवडतो म्हणालो. त्याच्या पेक्षा नव्हे. शॉन कॉनरी तर कायमच क्र.१ .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेख... आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१९६२ साली From Russia with Love ह्या नावाला सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्याने भारतापुरते त्या चित्रपटाचे नाव From 007 with love असे बदलण्यात आले होते कारण तो काळ चाचा नेह्ररु-हिंदी-रूसी भाईभाई-राजकपूर रशियात सर्वांचा आवडता नट आहे- अशा वातावरणाचा होता.

Nearer home,रमेश मंत्रींनी जेम्स बाँडवरून जनू बांडे असा मराठी हीरोहि बेतला होता.

Exotic म्हणता येतील अशी प्रवासवर्णने लिहिणारा पीटर फ्लेमिंग हा इयनचा भाऊ. त्याची अनेक प्रवासवर्णने - News from Tartary - चीनपासून हिंदुस्तानपर्यंतचा १९३५च्या सुमाराचा हिमालयातून पायी प्रवास - बरीच गाजलेली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतका भारी विनोद घडलेला असूनही आमच्या चिंतातूर जंतूना नेहमीच सत्ताधाऱ्यांना विनोदाचं वावडं असतं, असं का वाटतं बरं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रशियाशी आपली असलेली मैत्री भारताने कधीच लपवून ठेवली नसल्याने [युनोमध्येही भारताच्या बाजूने अमेरिका नव्हे तर रशियाच खंबीरपणे उभा असल्याचा इतिहास आहेच] दिल्लीकरांना 'रशिया' च्या विरूद्ध जर अमेरिका वा एखादे युरोपीअन राष्ट्र 'पोलिटिकल प्रोपागंडा'' करीत आहे असे वाटले आणि त्या कृतीला प्रतिबंध करणे गरजेचे वाटत असेल तर संबंधित राजकारणी मंडळी आपले विचार सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांपर्यंत नक्कीच पोहोचविणार. आंतरराष्ट्रीय संबंध सलोख्याचे राखताना अशी काही पाऊल उचलावी लागतातच.

'फ्रॉम रशिया वुईथ लव्ह'चे मूळ पोस्टर खाली दिले होते. यातील LOVE शब्दातील 'विळाहातोडा' या सांकेतिक चिन्हालादेखील आपल्या सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. शेवटी मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या शिवकाशीतील 'द सफायर इंडस्ट्रीज' यांच्याकडून भारतीय बाजारपेठेसाठी विशेष पोस्टर्स करून घेण्यात आली..... O देखील नेहमीच्या फॉण्टमधील वापरला होता. [हे बदललेले पोस्टर जालावर उपलब्ध नाही, पण वर दिलेल्या पुस्तकात मात्र आहे.]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"५ नोव्हेम्बर २०१२ या दिवशी 'जेम्स बॉण्ड' ५० वर्षाँचा झाला म्हणून लंडनच्या...." हे वाक्य ५ ऑक्टोबर २०१२ असे हवे ना?
बाँड पट रिलीज होउन ५० वर्ष झाली तर. छान छान!
बाकी सहज यांच्या पहील्या प्रतिसादाशी सहमत. पण बाँड बॉर्ने चित्रपटातली स्लिक ऐक्शन पहायला मजा येते. आणि ते बाँड च थीम म्युझिक पण लै भारी. बाँड आणि 'सज्जन', Blum 3 हे नवीनच कळलं.
आणि हो आम्हाला पिअर्स ब्रोसनन मुळेच बाँड माहीत झाला आणि फक्त तोच बाँड आवडतो. व आम्ही सीन कॉनरीच म्हणणार Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस्स....अस्मिता....थॅन्क्स फॉर द पॉईन्ट. तारीख दुरुस्त केली आहे. बाकी अन्य ठिकाणी आक्टोबर असताना नेमकी तिथेच कसे काय नोव्हेम्बर टंकले गेले, हे समजत नाही. वास्तविक लेख प्रकाशित करण्यापूर्वी मी एकदा नाही तर दोनतीनदा शुद्धलेखनासाठी तसेच अन्य रेफरन्सेस योग्य आहेत का नाही याची खातरजमा करून घेतो.

पण असो....चूक जरी अनवधानाने झाली आहे म्हणून ती क्षम्य ठरू नये हेही मला मान्यच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काका चूक आणि क्षमा वगैरे काही नाही ओ! पण माझ्यासारखे माठ कंफ्युज होतात ना Sad
एक तर तो स्कायफॉल नोव्हेँबर मधे रिलीज होतोय अशी माझी समजुत होती, त्यामुळे नक्की कोणती तारीख ते गुगलाव लागलं, म्हणुन सांगीतलं, बाकी काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेम्स बाँडचे पिच्चर आवडतात पण डॅनियल क्रेग काही रुचला नाही. ब्रोस्नन सगळ्यात बेस्ट.
शॉन कॉनरीने जेम्स बाँड अगदी स्त्रीलंपट अन चीप दाखवलाय. ब्रोस्नन ग्रेसफुल वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शॉन कॉनरीने जेम्स बाँड अगदी स्त्रीलंपट अन चीप दाखवलाय.

बाँडकथा वाचलेल्या नाहीत, बाँडपटांच्या वाटेलाही फारसा गेलेलो नाही (जाण्याची इच्छा झाली नाही), पण या वाक्याने जॉर्ज मिकॅशच्या 'द स्पाय हू डाइड ऑफ बोअरडम' या बाँडकथांवरील स्पूफात्मक कादंबरीची आठवण झाल्यावाचून राहिली नाही.

कादंबरी वाचून आता बरेच दिवस उलटले, परंतु जे काही थोडेफार आठवते, ते येणेप्रमाणे.

आमचा हीरो हा केजीबीने ब्रिटनवर हेरगिरी करण्यासाठी पाठवलेला प्रतिबाँड असतो. याला सोपवलेली कामगिरी: ब्रिटन पालकापासून बनणारे ('स्पिनॉफी' नामक) कॉफीसदृश पेय बनवण्याकरिता संशोधन करीत आहे, अशी (अर्थात सोविएत गुप्तचरसंस्थाजगतात) आवई असते, आणि त्याने अन्नोत्पादनक्षेत्रात मोठी खळबळ माजणार अशीही कुजबूज असते; त्या 'स्पिनॉफी'चे गुपीत सोविएत संघाकरिता मिळवणे. आणि याचे लक्ष्य: सोपविलेली कामगिरी पार पाडण्यासाठी शक्य तितक्या स्त्रियांबरोबर झोपणे. अर्थात, सोविएतच गुप्तहेर तो; दर वेळेस ऐन मोक्याच्या वेळी याचा पोपट होतो, आणि हेही काम तो धडपणे करू शकत नाही, नि फजिती होते, हे ओघानेच आले. मजा आली होती वाचताना.

(जॉर्ज मिकॅशच्या (George Mikes) इतर अनेक पुस्तकांप्रमाणे हेही पुस्तक तूर्तास बहुधा अनेक वर्षांपासून औट-ऑफ-प्रिंट आहे. मात्र याच्या सेकंडह्यांड कॉप्या अमेझॉनवर मिळतात.)

आणि बाँडस्पूफांची गोष्ट आता काढलेलीच आहे, तर 'अ‍ॅस्टेरिक्स'-मालिकेतील 'अ‍ॅस्टेरिक्स अँड द ब्लॅक गोल्ड'ही आठवते. यात 'डबलओसिक्स*' हा गॉलिश वैदू (ड्रूइड) रोमनांचा गुप्तहेर म्हणून अ‍ॅस्टेरिक्सच्या गावी हेरगिरी करण्यास येतो. (* हा वैदूगिरीची परीक्षा सहा वेळा नापास झाला, आणि सातव्या वेळेस परीक्षकमंडळींनी कंटाळून यास उत्तीर्ण केले. तेव्हापासून याच्या मनात वैदूंविषयी आणि एकंदरच गॉलांविषयी निव्वळ सूडभावना आहे. तर अशा रीतीने सहा वेळा नापास झाला म्हणून याचे नाव डबल-ओ-सिक्स.) तर हा डबलओसिक्स हुबेहूब शॉन कॉनरीसारखा दिसतो. आणि याच्या रथात बाँडरथाप्रमाणेच अनेक चमत्कृती आहेत. जसे, शत्रूच्या रांकांतून भरधाव वेगाने जात असता, एक कळ दाबल्यावर याच्या रथाच्या चाकांतून तलवारी बाहेर पडून त्या नेमक्या शत्रूच्या रथाच्या घोड्यांच्या पायांआड येऊन त्यांची धूळधाण उडवतात; किंवा, दुसरी कळ दाबली असता पाठलाग करणार्‍या शत्रूच्या डोळ्यांत डांबराची पिचकारी उडवता येण्याची सोय आहे. (याच्या रथात आणखी एक तिसरीही कळ आहे, जी, पाठलाग करणार्‍या शत्रूपासून पळताना अचानक समोर कडा आल्यामुळे त्या कड्यावरून उडी मारण्याची वेळ आली असताना ती दाबल्यामुळे काहीतरी होऊन वेळ निभावली जाणे अपेक्षित आहे. परंतु ही तिसरी कळ मात्र ऐनवेळी अनपेक्षितरीत्या काम करत नाही. चालायचेच.) शिवाय, हेडक्वार्टर्सशी संपर्क साधण्यासाठी याने एक मधमाशीही बाळगली आहे. हा जगाच्या पाठीवर कोठेही असो, आणि ती मधमाशीही जगाच्या पाठीवर कोठेही असो, पण याने मधाचा घडा उघडला असता, ती बोलावणे पाठवल्याप्रमाणे तातडीने हजर होते, आणि याने सूक्ष्मभूर्जपत्रावर ('मायक्रोपपायरस') लिहिलेला गुप्तसंदेश पाठीवर बांधून घेऊन थेट मुख्यालयात बसलेल्या गुप्तचरप्रमुखाच्या सुपात (पक्षी: पिण्याचे सूप.) येऊन थडकते. आणि उलटटपाली गुप्तचरप्रमुखाचा संदेश घेऊन डबलओसिक्सच्या सुपात येऊन थडकते. वगैरे वगैरे.

आणि हो. डबलओसिक्स काम करतो त्या रोमन गुप्तचरसंघटनेचे नाव? MI-VI.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता बाँडस्पूफांची गोष्ट काढलेलीच आहे तर त्या निमित्ताने ऑस्टिन पॉवर्सचाही उल्लेख करता येईल. महाविद्यालयीन जीवनातील अनेक पांचट विनोदांचा उगम याच्या चित्रपटांपासून प्रेरणा घेऊन झाला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुने बॉण्डपट पाहिलेले नाहीत. रेडीओ अ‍ॅस्ट्रॉनॉमीचा शिक्का भाळी बसल्यावर अरेसिबो टेलिस्कोपच्या चित्रणामुळे 'गोल्डन आय' पाहिला. मग पुढचे बरेचसे बॉण्डपट पाहिले. तेवढ्यापुरती करमणूक निश्चितच झाली. पीअर्स ब्रॉझननची सवय झाल्यामुळे असेल किंवा (माझ्या) वयामुळेही, इतर कोणी बॉण्ड फार आवडले नाहीत. डॅनियल क्रेगतर कुरूपच वाटतो. 'कसिनो रोयाल' दोन स्त्री पात्रांमुळे डोळ्यांना सुसह्य वाटला.

जनू बांडे लहानपणी माहित होता, वाचला होता. जेम्स बॉण्डचे चित्रपट बघितल्यानंतर तोंड मिटायला बराच वेळ लागला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसाद वर योग्य ठिकाणी स्थलांतरित केल्याकारणास्तव येथून रहित केलेला आहे. संपादनमंडळाने कृपया तो येथून त्वरित नष्ट करावा, ही नम्र विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ शिल्पा...

"शॉन कॉनरीने जेम्स बाँड अगदी स्त्रीलंपट अन चीप दाखवलाय. ब्रोस्नन ग्रेसफुल वाटतो....."

~ यातील दुसर्‍या भागातील मताशी तर १००% सहमत. ब्रॉस्नन, बॉण्डच नव्हे तर, त्याने केलेल्या अन्य भूमिकेतही तो तितकाच ग्रेसफुल....रीच....आणि कॉमेन्डेबल नायक वाटतो [विशेषतः Thomas Crown Affair, The Ghost Writer].

त्या अगोदरच्या 'शॉन कॉनेरी' मताबाबत काहीशी असहमती दर्शवित आहे. शॉन कॉनेरीच काय पण अन्य कोणत्याही अभिनेत्याने साकारलेला 'जेम्स बाँड' हा स्त्रीलंपट [याला इंग्रजीत Womanizer असे म्हटले जाते....] कधीच वाटला नसून उलटपक्षी कथानकातील रमणी [एक वा अनेक] त्याच्या मागे लागली असल्याचे दिसते. हां, तो जरूर फ्लर्ट करताना दिसतो, पण दॅट्स पार्ट ऑफ हिज जॉब.

'चीप' या विशेषणाचे प्रयोजन समजले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रॉस्नन आमच्या काळातला बाँड असल्यामुळे त्याचे सर्व चित्रपट पाहिले आहेत आणि ते आवडलेही आहेत. शॉन कॉनरी मुळातच मला आवडतो त्यामुळे त्याने दगडी चेहर्‍याने साकारलेला तोंडावरून माशी न हलणारा बाँडही आवडून गेला. ऑक्टोपसी या भारतात चित्रीकरण झालेल्या बाँडपटात विजय अमृतराज टेनिसची रॅकेट घेऊन मारामारी करताना दाखवला आहे ते पाहून मात्र हहपु झाली होती.
तरीही माणसे मारायचा परवाना मिळालेला हा मांग आणि त्याचे कारनामे बघायला जाम मजा येते हे मात्र खरे. त्यामुळे हा लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--
सस्नेह,
अदिति
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||

फ्रॉम रशिया विथ लव्ह हे पुस्तक वाचले आहे आणि ते आवडलेही आहे पण त्याच्यावरच्या चित्रपटाने मात्र निराशा केली होती. तेव्हापासून बॉंडची पुस्तके न वाचता चित्रपटच बघायचे ठरवले आहे.
चिट्टी चिट्टी बँग बँग हे धमाल पुस्तक माझ्या आठवणीप्रमाणे इयान फ्लेमिंग किंवा त्याच्या भावाने लिहिलेले आहे हे जाताजाता नमूद करावेसे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--
सस्नेह,
अदिति
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||

अदिति....

विशेष सांगायचे झाल्यास 'फ्रॉम रशिया वुईथ लव्ह' हे फ्लेमिंगसाठी फार आवडते पुस्तक होते. त्यावरील बॉण्डपटालाही कित्येक समीक्षक २३ चित्रपटापैकी सर्वोत्कृष्ट मानतात. असो.

"चिट्टी चिट्टी बँग बॅंग" ही कादंबरी इअ‍ॅन फ्लेमिंग यांचीच. आपला मुलगा 'कॅस्पर' साठी त्यानी १९६४ मध्ये लिहून पूर्ण केली होती.....यावर एक चित्रपटही निघाला होता. त्याचा निर्माताही बॉण्ड चित्रपट काढणारा ब्रोकोली हाच होता.

[दुर्दैव असे की, हाच कॅस्पर मुलगा बापाच्या मृत्युनंतर वाईट वळणाला लागला....कॉलेजच्या प्रथम वर्षातच त्याला ड्रग्जचे व्यसन लागले होते आणि त्यातून निर्माण होणार्‍या नैराश्येपोटी त्याने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली....अवघा १७ वर्षाचा होता तो. एकुलता एक मुलगा होता फ्लेमिंगचा.]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेटेष्ट बातमीनुसार शाहरुख खान हा जेम्स बॉण्डची भूमिका करू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तसे पाहिले तर आज चाळीशीच्या आगेमागे असलेल्या तसेच 'एस्टॅब्लिश' झालेल्या कोणत्याही अभिनेत्याला "जेम्स बॉण्ड" इमेजचे आकर्षण वाटावे साहजिकच आहे. शिवाय सध्या जगभरातील प्रिंट मिडीयाने 'जेम्स बॉण्ड वय वर्षे ५०' हा एक इंटरनॅशनल इव्हेन्ट बनविला असल्याने [जगप्रसिद्ध 'लाईफ' नेही या महिन्याचा अंक "बाँड स्पेशल' काढला आहे] अशा मॅगेझिन्स, न्यूजपेपर्सचे 'सप्तरंगी' पुरवणीचे संपादक्/वार्ताहर काहीतरी चमचमीत द्यावे म्हणून मग अशा 'खान' मंडळींची भेट असणारच....मग त्यांच्याकडून "....ही माझी इच्छा होते, आणि आजही आहे..." असेच अपेक्षित उत्तर येत राहणार.

तिकडे हॉलीवूडमध्येही 'मेन इन ब्लॅक' फेम विल स्मिथ यानेही 'पहिला ब्लॅक बाँड साकार करायची माझी इच्छा आहे...' असे वक्तव्य केलेले आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाहरुख खानला मुंगेरीलाल सारखी हसीन सपने पडु लागली आहेत. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तशी वेळ आलीच तर शाहरुख पेक्षा अक्षय कुमार केव्हाही जेम्स बाँडच्या भूमिकेला जास्त चांगला न्याय देऊ शकेल. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॉन्डला काहीही होणार नाही, तो अखेर सहीसलामत बाहेर पडणार पुढच्या सिनेमासाठी हे माहिती असल्याने फारसा फरक कधी पडला नाही मला कोण बॉन्ड आहे याचा. 'तो आत्ता या प्रसंगातून सुटण्यासाठी कोणता वैज्ञानिक चमत्कार वापरणार' हे सगळ्यात महत्त्वाचं असतं माझ्यासाठी.

अवांतरः Mrs. Doubtfire मध्ये Pierce Brosnan हा बॉन्डची भूमिका करणारा (जरी तो त्या चित्रपटात बॉन्ड नव्हता तरीही..) अभिनेता पराभूत होतो हे पाहताना गंमत वाटली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कार्यबाहुल्यामुळे लेख वाचायला जमलं नव्हतं.. आता देर आये...
असो.. उशीराने का होईना लेखन वाचल्याचा आनंद झाला.. बॉन्डपट आणि पुस्तकं यात मला तरी (ज्यात दोन्ही --> पुस्तक वाचलं + पट बघितला आहे) पुस्तक अधिक आवडत आलं आहे.

बाकी या हिरोने 'गुप्तहेर' या प्रोफेशनला एक असामान्य ग्लॅमर दिलं हे नक्की! या भुमिकेला अजरामर होण्यासाठी शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बॉण्डपटाचा लेखाजोखा आवडला. पीअर्स ब्रॉस्ननने साकारलेला जेम्स बॉन्ड अधिक आवडला होता.

जेम्स बॉन्डच माय नेम इज बॉन्ड!! जेम्स बॉन्ड हे वाक्य कॉलेजमध्ये फेमस झालेल.

बाकी या हिरोने 'गुप्तहेर' या प्रोफेशनला एक असामान्य ग्लॅमर दिलं हे नक्की! या भुमिकेला अजरामर होण्यासाठी शुभेच्छा!

असेच म्हणते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.