खानावळ - एक शतशब्दकथा

एक जुनी, सरकारी अनुदानावर चाललेली खानावळ होती.
सर्व मेंबरं, तिथे गुण्यागोविंदाने जेवत असत.
जेवण साधेच असे, रविवारी एखादी स्वीट डिश असे.
तर, हळुहळु मेंबर्सची संख्या वाढत गेली.
काही नवीन मेंबर आले.
त्यांनी रोजच स्वीट डिशची मागणी केली.
कंत्राटदार गयावया करु लागला.
शेवटी आमटीतले पाणी वाढवून, ही मागणी त्याला पुरी करावी लागली.
त्यानंतर आणखी मेंबर आले.
ते स्वतःचे स्वीट खाऊन शेजारच्याचेही मागू लागले.
जुन्या मेंबरांनी निषेध नोंदवला.
पुढे पुढे तर, ते हिसकावून घेण्यापर्यंत मजल गेली.
वातावरण फार गढुळ झाले.
नवीन मेंबरांची आपापसात भांडणे सुरु झाली.
कंत्राटदार तर जेरीस आला.
नासधूस सुरु झाली.
शेवटी, जुन्या मेंबरांनी, मुकाट्याने दुसर्‍या खाजगी खानावळीचा रस्ता धरला.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

जुन्या मेंबरांनी चिवटपणा सोडला?

((word count = 100 कसं काय जमवलं?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खानावळीत खाड्यांचाही खोडा असेल, वरुन सरकारी अनुदानित म्हणल्यावर तर आनंदच असेल. (Let me guess, reservation???)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

नोकरी.

- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिरशिंगराव, झक्कास ओ. मस्त कथा लिहिलीत.
.

शेवटी आमटीतले पाणी वाढवून, ही मागणी त्याला पुरी करावी लागली.

.
हे वाक्य एकदम मार्मिक. "तिरशिंगराव फॅन क्लब" चा मला फाऊंडिंग मेंबर बनायचं आहे.
.
.

शेवटी, जुन्या मेंबरांनी, मुकाट्याने दुसर्‍या खाजगी खानावळीचा रस्ता धरला.

.
Gresham's law आठवला.
.
तिरशिंगराव, ही कथा मी माझ्या फेबु वर टाकु इच्छितो. (अर्थात तुमच्या नाममुद्रेसह). परवानगी द्यावी ही विनंती. रॉयल्टी द्यायला तयार आहे. एक पिनो न्युआर/न्वार ची बाटली किंवा बिर्याणी.
.
तिरशिंगराव, परवानगी दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. तुमच्या नावाची पिनो न्युआर/न्वार ची बाटली राखीव आहे.
.
.
"जाहिद" शराब पीने से काफ़िर हुआ मैं क्यूँ
क्या डेढ चुल्लू पानी में ईमान बह गया
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0