शब्दांनो

पाह्यलंय तुम्हाला
जिज्ञासेचा तळठाव घेताना.
अज्ञाताच्या कडेलोट दरीतून उसळताना.
स्वप्नवास्तवाच्या हिंदकळत्या सीमेवरून खुणावताना.
सत्याभासाच्या मृगजळातून ठिबकताना.
स्थूलसूक्ष्माच्या अथांग वर्णपटातून विखुरताना.
क्षुद्रतेत बुजबुजताना.
कोलाहलात गजबजताना.
एकांतात निनादताना.
जाणिवेत- नेणिवेत अथक धपापताना.

अनघड शब्दांनो
वेचून वेगळं करतोय
तुम्ही उष्टावलेलं - आजच्या आयुष्यासाठी.
तुम्ही कवेत घेतलेलं- कवितेसाठी.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

ह्म्म्म प्रयत्न जमला आहे. संकल्पना आवडली पण काहीतरी कमी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही उष्टावलेलं - आजच्या आयुष्यासाठी.
तुम्ही कवेत घेतलेलं- कवितेसाठी.

आणि तुम्ही(म्हणजे शब्दांनी, तुम्ही नव्हे) दुखावलेलं, रक्तबंबाळ केलेलं कोणासाठी ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज कुसुमाग्रज फिवर का ? ऑम्लेटसारखी कविता आणखी लिही की रे अया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0