इस्कॉन चा भोंदूपणा

इस्कॉन चा भोंदूपणा
रविवारी एका सिनिअरच्या आग्रहावरून १ इस्कॉन च्या रथयात्रेला जाण्याचा योग आला. (स्थळ दार एस सलाम टांझानिया).तिथे रथ वाली गाडी जाताना पुजारी लोक एका हातात दहाहजार शिल्लिंग घेऊन प्रसाद म्हणून केळं/चिकू देत होते.
२ वर्षपूर्वी बंगळूर इस्कॉन ला गेलो होतो माझ्यासोबत एक भक्त मित्र होता. त्याचा भक्तीभाव बघून तेथे असलेल्या एका एजन्ट (जो IT industry वाला होता व सुटीच्या दिवशी 'सेवा'करायला येतो)ने आम्हाला पकडले. आणि आम्हाला हरे हरे चा फायदा सांगू लागला.आमची खोदून खोदून चौकशी केली. मित्र जेव्हा सकारात्मक प्रतिसाद देऊ लागला. तेव्हा त्या टेकीने पुढच्या रविवारी कसल्याशा कार्यक्रमाच आमंत्रण दिले. त्याचा म्हणण्यानुसार ते मोफत होत पण सेवा म्हणून ₹३०० ची देणगी द्यावी अशी अपेक्षा होती. त्याकाळी एक महिन्याचा १gb पॅक तेवढयात यायचा मित्राला म्हणालो चल जेवू आणि कल्टी मारू. पण मित्राचं चांगलंच ब्रेन वॉश झालं होत. कार्यक्रमाला जाण्याचा योग आला.(अर्थातच मी एकपण दमडी दिली नाही, ५०% डिस्काउंट वर मित्रानेच ३००₹ भरले)
पुढच्या रविवारी तिकडे गेलो काउंटर वर पैसे id वैगेरे दिले रोखपाल ने त्याचा संगणकावर टाकटुक केलं( बहुतेक Oracle ERP होती).
आतमध्ये उच्चविद्याविभूषित Msc,ME,MCom करून नोकरी सोडलेले स्वामी लोक हरे रामकृष्णा चा महिमा सांगू लागले, उदाहरण साठी गोऱ्या लोकांचे अनुभव प्रोजेक्टरवर दाखवू लागले. जेवणाची घंटा वाजली सर्वजण जेवायला गेलो पण यावेळी जेवण मागच्यापेक्षा स्पेशल होत आणि पब्लिक पासून दुसरीकडे होते.
परत प्रेझेन्टेशन सुरु. सर्वांना एक तुळशीची माळ विथ गळ्यात घालायची कापडी पिशवी दिली गेली. एक फॉर्म दिला गेला त्यावर तुम्हाला गाता येत का? ढोलकी-तुनतुणा वाजवता येतं का? इस्कॉन साठी किती किती वेळ देऊ शकता ई मह भरायचं होत. शेवटी २ मित्राचं नाव नंबर द्यायचं होत ज्यांना तुम्ही या महान कार्यात जोडू इच्छिता. (मी माझ्या बंगळूर स्थित अट्टल बेवडा मित्राचं नंबर दिल. पुढे महिनाभर त्याला फोन जात होता शेवटी त्यांनी शिव्यांचा वर्षाव केला, आणि फोन थांबले)
जेव्हा मी फॉर्मवर नकार दिला तेव्हा एक agent पुन्हा समजावू लागला इस्कॉन किती चांगलं आहे वैगेरे वैगेरे. घरी आल्यावर पुन्हा कॉल सुरु या जॉईन व्हा.
माझ्या मते इस्कॉनने देवाची मार्केटींग चालवली आहे. आम्ही बोलू तेच खरं बाकी सर्व ढोंग. मांसाहार /कांदा-लसूण खाल्याने नरकात हि शिक्षा, BP बघिल्यावर ती त्यापुढे केल्यावर आणखी दंड हे सर्व ppt वर एका ME computer च्या तोंडून ऐकताना हसू कि रडू हे समजत नव्हतं.
अमक्याला रोग झाला त्याने माळ जपली रोग बरा झाला. तमक्याला बुधवार पेठेचा नाद होत तो इथे आला माळ जपली आता जंटलमॅन झाला.
देवळाला सोन्याचा पत्रा ठोकून गरीबाच्या सेवेसाठी देणगी घेताना त्यांना काहीच वाटत नाही.
वारकरी संप्रदाय सुद्धा समान सिद्धांतावर आधारित आहे पण किती साधेपणा. आणि हे लोक आरती हातात घ्यायचे वेगळे चार्ज लावतात.
सध्या मथुरेत नवीन मंदिराचे बांधकाम चालू आहे ज्याचा खर्च ४४,०००,०००$/३,०००,०००,०००₹ आहे (Wikipedia). कुठून येतो एवढा पैसा माहित नाही बहुतेक बडे देणगीदार असावेत. किंवा सक्तीने भक्तांची रांग दुकानवाल्या हॉल मधून फिरवल्याने झालेल्या कमाईतुन असेल.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भटक्या , तिथले लोकल भारतीय /हिंदू किती नादाला लागले यांच्या ? तुला जो भोंदूपणा थेट दिसला तसा इतर लोकांना पण दिसला का ?
आणि बाकी पण मंदिरं जोरात आहेत ना दारे सलामात ?
अजून किती वर्षे मुक्काम तिथे , का जम बसलाय आता ? आवडायला लागलंय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून किती वर्षे मुक्काम तिथे , का जम बसलाय आता ? आवडायला लागलंय ?

टांझानियात (की टांझेनियात?) ग्रीनकार्डाच्या ईक्विव्हॅलंट काय असते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकल शी लग्न ☺

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा एकमेव मार्ग आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या माहितीत नाही. सर्वाना work permit आणि residence permit बंधनकारक आहे जो २ वर्षांनी नवीन बनवावा लागतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असल्या कामामध्ये गुजराथी लोक पुढे असतात. लोकल हिंदू मध्येही गुजराती जास्त आहेत, म्हणून चालतंय. (गुजराथी मुली सुरेख असतात). बाकी मंदिरे पण चालतात जोरात.दारेसलामात कोणी आवडली नाही, म्हणून ६-७ महिन्यांनी येतो परत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकल हिंदू मध्येही गुजराती जास्त आहेत

त्या भागातच एकंदर (पूर्व आफ्रिका: टांझानिया, केनया, आणि इदी अमीनने हाकलून देण्यापूर्वी युगांडासुद्धा) गुजराती लोक - हिंदू, आणि मुसलमानसुद्धा - भरपूर आहेत, असे ऐकून आहे.

..........

किंबहुना, रेडिओ पाकिस्तानची या लोकांकरिता गुजराती सर्व्हिससुद्धा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केनिया(मोम्बासा) मध्ये असताना fm वर हिंदी गाण्यांचा चॅनल यायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, केनियामध्ये भारतातले सगळे टीव्ही चॅनेल पण दिसतात.
सचिनचे ग्वाल्हेर ODI मधले 200 मी नैरोबीत बघितले अशी आठवण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे साले इंजिनिअरींगच्या पोरांना बळं बळं घेऊन जातात, खाऊ पिऊ घालतात. पण कोणी गरीब त्यांच्या देवळात आला तर हाकलतात. इस्कॉन इज नॉट हिंदूइझम. हे वेगळंच प्रकरण आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ईस्कॉनबद्दलचे माझे वैयक्तिक अनुभव:
१. एक मनुष्य माहित आहे, तो, त्याची बायको दोघेही इस्कॉनी आहेत गेल्या ६-७ वर्षांपासून. सर्वच्या सर्व पगार ते धर्मकार्यासाठी देतात. दरमहा ठराविक रक्कम योगक्षेम चालवण्याकरिता मिळते. वेळोवेळी धर्मप्रचार, ईस्कॉनची महती सांगणे, शोभायात्रा आदीत भाग घेणे सक्तिचे आहे. किती तरी लाख वेळा हरे राम, हरे कृष्ण वाला मंत्र म्हणण्याचा त्याचा प्रघात आहे. त्याकरिता दिवसाचे जवळजवळ ३ तास दोघांचे खर्च होतात. वैचारिकदृष्ट्या दोघेही या पंथाच्या शिकवणीच्या अक्षरश: कह्यात आहेत. जातीप्रथेचे, वर्णाश्रमाचे समर्थन काय करतात, कृष्ण हाच एकमेव देव म्हणून शिरा ताणून ताणून बाकीच्या देवांबद्दल काहीच्या काही बोलतात, सायन्सची आय-बहिण तर रोजच काढत असतात. कांदा, लसूण वर्ज्य. कुठलीही करमणूक नाही. जज करायचे नाही परंतू सेक्सविषयी ईस्कॉनचे मत असे की केवळ अपत्य्प्राप्तीकरिताच लैंगिक संबंध असले पाहिजेत त्यामुळे ती मजा फारशी करत नसावेत(जजमेंटल होत असेन तर माफी.). मूल अतिशय कडव्या धार्मिक संस्कारात वाढते आहे, मुलसुलभ भावना, खाऊ, खेळणे यापासुन वंचित राहते असे वाटते. मला तरी हे चाइल्ड अब्युज वाटते. तसे दोगेह्ही सज्जन म्हणावे असे आहेत, हुषार तर खुपच होते/आहेत मात्र धार्मिक भावनेची पुटे एवढी आहेत की ग्रंथाच्या बाहेरचा कुठलाही विचार त्याज्यच मानतात. अगदी नातेवाईकांतदेखिल तर्हेवाईकपणे बोलतात, सणासमारंभात अगदी पांढरेधोप कपडे घालून येतात. त्यांची दया येते कधे कधी, या सगळ्यांतून त्यांना काय मिळते आहे त्याचा हिशेब ते कधी करणार आहेत का हे कळत नाही.
२. एक क्लासमेट ईस्कॉनि झालेला आम्ही २ ऱ्या वर्षात असताना मंदिरात सेवा करण्याच्या निमित्ताने ४ ४ दिवस जायचा, कुठले कुठले गुरू, दादा आणून त्याना जरा अध्यात्मिक वगैरे वाटणाऱ्या पोरांना भेटवायचा. लहानपणापासून नॉन व्हेज वगैरे खाल्लेला तो लसूण, कांदा नको आणी एकूणच जिभेचे चोचले नकोत म्हणून ज्वारीचे पीठ केवळ हळद व मिरपूड घालून शिजवून खायचा. असलं करून आजारे पडला तरीही त्याचे ते वेड ६ वर्षे चालू राहिले. एमेसला गेला तरीही ईस्कॉनचे फंदे सुटलेले नव्हते. आजकाल बऱ्याचदा निरनिराळ्या डिशेसचे फिल्टर्ड फोटो इन्स्टावर अपडेटत असतो त्यामुळे बोळा निघून पाणी वाहतं झाला असल्याचा संभव आहे.
३. योग वर्गाला आलेला एक जण. कट्टर म्हनण्यासारखा इस्कॉनी. कृष्णाबद्दल, भगवतगीतेबद्दल, महाभारताबद्दल इथे ऐसीवर, मिपावर,, युगांत, व्यासपर्व वाचून आलेल्या द्न्यानावर आधारीत शंका विचारल्या. गडी भैसाटलाच. दुसऱ्या दिवसापासुन बोलणेच सोडले. कृष्ण हाच एकमेव परमपरमात्मा या मुद्द्यावर योग शिकवणाऱ्या शिक्षकालासुद्धा बरंच पिडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

ज्या दारेसलामाच्या सिनिअर ने आम्हाला रथयात्रे नेलं त्याचा मुलगाही इथेच इंडियन स्कूल मध्ये ४थी त आहे. तोही म्हणे एकादशीचा उपवास ठेवतो.
दुःख तेव्हा होते जेव्हा चांगली शिकलेले लोक आत्मा-परमात्मा, नरकात ठेवलेली तेलाची कढई गोष्टी सांगतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नरकात ठेवलेली तेलाची कढई गोष्टी सांगतात.

कदाचित गरमागरम भजी तळत असतील.

तुम्हाला काय माहीत, नसते कढई म्हणून? जाऊन आला आहात का तुम्ही तिथे? कोणी अनुभवाचे बोल सांगत असेल, तर ऐकून घ्यावे; त्याचा असा अवमान करू नये. हो बाबा, तू सांगतोस तर असते कढई!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कांदाभजी. कांदा हराम आहे. कढईत फक्त बीपी बघणार्यांना तळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कांदा हराम आहे. मात्र, बीपी बघणारे हलाल आहेत, हं? हे कसे?

आय मीन, बीपी पाहणाऱ्यांची भजी हे मांसाहारात मोडू नये काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...हा पांढऱ्या लोकांना नादी लावून *त्या बनविण्याचा एक चांगला धंदा होता, अशी आजपावेतो समजूत होती. हल्ली देशी लोकसुद्धा (अॅम्वेसारखे) त्याच्या गळी लागू लागले आहेत, ही खेदाची गोष्ट आहे. (आणि आफ्रिकी बांधवांनासुद्धा आपल्या जाळ्यात खेचू पाहात असतील, तर त्याहून दुर्दैवाची गोष्ट. पण आय सपोज़ आफ्रिकी बांधवाज़ हॅव बेटर सेन्स दॅन दॅट.)

साल्यांना पाकिस्तानात नाहीतर सौदी अरेबियात धाडले पाहिजे. लावा म्हणावे काय लोकांना नादी लावायचे ते. नव्हे, लावून दाखवाच.

..........

खुलासा: 'आत्या' नव्हे.

'साल्यांना' असे टंकले, तर मोबाइलवरचा ऑटोकरेक्ट त्याचे ऑपॉप 'सावरकरांना' करतो. काय आफत आहे! (त्यापेक्षासुद्धा, काय लॉजिक आहे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इस्कॉनबद्दल काय बोलावं, आमच्या गावाकडे एक चांगल्या घरातला पोरगा. माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान. एकुलता एक देखणा. शेतीवाडी मुबलक. बापाने हट्ट करुन जवळच्या कॉन्व्हेंट शाळेत शिकवलं. इंजिनियरिंग कॉलेजमध्ये असताना इस्कॉनच्या नादाला लागला आणि त्याचं घरी येणं कमी झालं. नंतर तर वागणं बोलणं एकदम बदललं. येड्यागत वैराग्य वैगैरे गोष्टी करायला लागला. माळ जपणं सुरु झालं. ते मोठमोठे पांढरे टिळे लावायला लागला. सारखं कृष्ण कृष्ण. आणि सेवा करायला निघून गेला. इंजिनियरिंगची शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली नाही आता पूर्णवेळ तिकडेच कुठेतरी असतो. मथुरेला होता कितीतरी दिवस. लग्नाचं वय उलटून चाललं. माय बाप रडत असतात सारखे. शेतीची कामं म्हतारा म्हतारी बघतात. गावकी हळहळते पण त्या पोरावर काय परिणाम नाही. अनेक जण समजावून थकले. हा उलट त्यांनाच काय काय अध्यात्मिक डोस पाजत असतो. मागच्या दिवाळीत हा भेटला होता मला त्यांचं गीतेचं ( जशी आहे तशी ) पुस्तक दिलं होतं. सेवा/दान म्हणून पैशे मागू लागला मी दिले नाही. पुस्तक तसंच सोडून गेला. हा म्हणे याची सगळी प्रॉपर्टी इस्कॉनला दान करणार आहे. लग्न करणार नाहीच म्हणतो. बाप तळतळ करतो. इस्कॉनला घाण शिव्या देतो. पण काय उपयोग नाही. असा सगळा प्रकार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

(भटक्या दारे सलामात भेटला होता. तो असल्या नादाला लागेल असं वाटत नाही . शेवटी कोकणाचं पाणी आहे हो ते !!)

भटक्या , १०००० शिलिंगा देऊन केळं घेण्यापेक्षा " मराठा क्लब ( बॅडमिंटन इन्स्टिट्यूट ) मध्ये जाऊन सरळ कांदा भाजी बटाटा भजी कोल्हापुरी वगैरे का खात नाहीस . (पत्ता माहित आहे ना ? नसेल तर तिथल्या कोपऱ्यावरच्या मराठा शॉप च्या देसायांना विचार .) ऐश कर की जरा भौ !! आत्ताच कुठे देवाधर्माला लागतोहेस ? "

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो हो जातो ना तिकडे. चांगलं आहे स्वस्तात मस्त. आणि देवधर्म काय करायचे आहेत ते घराच्या आत. नसता दिंडोरा का वाजवा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांना वाटलं तर करू दे. इथे दुसरे पंथ, त्याचे अनुनायी काय करतात असं वाटलं?
प्रत्येक फिलॅासफीत लंगड्या बाजू आहेतच, त्यावर त्यांना छेडायचे नसते.

सत्संग नावाचा एक प्रकार असतो इकडे! एक अति सौम्य प्रकार. संध्याकाळी अर्धातास कोणाकडे जमून काही भजनं वगैरे म्हणायची पाच मिनिटं निरुपण. त्याबद्दल नंतर कधीतरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या ओळखीत असले अनेक पंथ, संप्रदाय आहेत:
निर्मलादेवी, अनिरूद्धबापू, रवीशंकर, नरेंद्र महाराज, निरंकारी, स्वामी समर्थ, दिंडोरी.
सगळ्यांचे धंदे व्यवस्थित चाललेत. मात्र, इस्कॉनईतकं फायद्यात कोणीच नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

वेगवेगळ्या बाबांचे कस्टमर सेगमेंट वेगवेगळे आहेत. हा विषय मला फार मनोरंजक वाटतो उदा.

१- श्री श्री रवीशंकर -
यांच्या वृषभवर्गात जनरली मेट्रो./ सिटी त्यातही उच्चशिक्षीत त्यातही फायनान्स आणि इंजिनीयरींग विषय केलेले व बीजेपीला व्होट टाकणारे अधिक प्रमाणात असतात. या वृषभवर्गाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यांना हार्ड हटयोगात्मक अधिक बंधने नको असतात. हलका फुलका संडे रीलीजन , विकएंडला माफक रीलीजीयस रीफ्रेशमेंट घेऊन खुनी सोमवार ला सामोर जाणे इतपत यांचा आवाका असतो.
पारंपारीक भजन चालींचा तिटकारा व तुलनेने बॉलिवुड वा आधुनिक वाद्याधिष्ठीत भजनांवर डोलणारा हा वुषभवर्ग आहे.
२- आसाराम गेलाबाजार वा तत्सम
तरी जेव्हा आसाराम फॉर्मात होते वा तत्सम बाबांचा वृषभवर्ग हा तालुका पातळीवर अधिक, शिक्षणात प्रामुख्याने मागास, सोपेपणा प्रिफर करणारा, मुळ हिंदु कर्मकांड वर्तुळाच्या बाहेर च्या रीच्युअल्स चा तिटकारा वा प्रतिकुल असणारा हा वृषभवर्ग असतो. गावठीपणा तुलसीदासी भाषा पातळी अपील होणारा,
मोठा लाउडस्पीकर चा आवाज प्रिय असलेला व उत्सवी धिंगाणा आवडणारा वर्ग यांच्या भक्तात प्रामुख्याने आढळतो

ब्रह्माकुमारी-

एक्स्र्ट्रीम सायको , जगावेगळी थेअरी, आपण जगातल्या फारच थोड्यातल्या थोड्यातले आहोत, आपली निवड वेस्ट होउ नयेम आपण जनरल क्सास मध्ये चुकुन पडु नये याची काळजी घेणारा, असा यांचा भक्त वर्ग आहे. यातील मंडळीना कडक अती अवघड मागच्या पेक्षा पुढचा कठीण टारगेट द्याच करुन दाखवुच ही खुमखुमी आव्हान घेण्याची वृत्ती आढळते. यात कठीणात कठीण चाळे रीती नियम यांचे पालन करुन दाखवण्याची जिगर आढळ ते.

अजुन आहे बरेच पण टंकाळा
असो

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान अनालिसिस!

वृषभवर्गात

हा शब्द कुठे वाचला यापूर्वी? मस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजुन आहे बरेच पण टंकाळा

मारवा सर, टंकाळा टाळा बरं..
लिहा अजून..
नविन बाबा जग्गी वासुदेव आलाय मार्केटमध्ये.. सध्या अमीर वर्गात त्याचं दुकान तेजीत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

हल्ली साधगुरू जग्गी वासुदेव नामक नवा कल्ट सुशिक्षित आणि रॅशनल म्हणवणाऱ्या लोकांत निर्माण होत आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जग्गी म्हणजे भंपकपणाचा कळस आहे. ओशोची कॉपी मारायला बघतो.. पण आमच्या ओशोची बातच निराळी हो.. असल्या लुंग्यासुंग्यांना ओशोची कॉपी करता येणं अशक्य आहे..

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

या जग्गीवर बायकोच्या खुनाचा आरोप आहे. त्याच्या सासऱ्यानेच लावला होता आरोप. त्याला घरी पोचू न देताच बायकोचा अंत्यसंस्कार करून टाकलेला आणि कशामुळे मेली बिचारी ते दाबून टाकलं या जग्गीने असं त्याचा सासरा म्हणतो. दाबून टाकलं असंल म्हणा आतापर्यंत प्रकरण .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

बघा आमच्या ओशोची कॉपी मारायचा आणखी एक प्रयत्न..पण जमणे नाही! ओशो एकमेवाद्वितीय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

हा बुवा न्यू यॉर्क टाईम्सचा बेस्टसेलिंग ऑथर आहे म्हणे. ह्यासदृश माणसाचा टेड टॉक बघितला होता. मुळात टेडटॉकांत किती अर्थ आहे तो नंतरच समजला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

मारवा गुरुजी, असा कंटाळा करू नका. या साधू पुरुषांबद्दल आणि त्यांच्या वृषभांबद्दल माहिती सांगा अजून, वाट बघतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रम्हकुमारि? पांढरेधोप कपडे, नवीन कार्स तीन वर्षांत मोडीत काढतात,माउंट अबु उर्फ अबु पर्वतावरचे मोठे मुख्यालय. वज्रेशवरी-गणेशपुरीचे आनंदमार्गी, नित्यानंद; प्रशांतिनिलयमचे स्वामि यांचेही पाहा. पण ते फार प्रचार करतात का तुलनेने हे सांगता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मते गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर, क्रॊसड्रेसर या लोकांना जसा समाज हळूहळू संवेदनाशील दृष्टीने बघायला लागलेला आहे, तसं अतिधार्मिक लोकांसाठीही करायला हवं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर, क्रॉसड्रेसरादि मंडळी आपल्या हक्कांसाठी भांडतात, अगदी आक्रमकरीत्या भांडतात जरूर, परंतु त्यांचा रोख हा जास्तीत जास्त 'आम्हाला आमची लाइफस्टाइल जगू द्या' याकडे असतो. इतरांनी - सर्व समाजाने - आमची लाइफस्टाइल जगली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे नसते, आणि आपली लाइफस्टाइल संपूर्ण समाजावर लादण्याच्या दृष्टीने ते कायदेही करू पाहात नाहीत.

धार्मिकांचे तसे नसते. अतिधार्मिकांचे तर मुळीच नाही. आणि राजकीय धार्मिकांचे त्याहूनही कमी.
हं, आता, समलिंगी जीवनपद्धती कायदेसंमत करणे हे योग्यच आहे; मात्र, ती धर्मसंमत झाली, तर कोण जाणे, वरील चित्र पुढेमागे कदाचित बदलू - कदाचित पलटूसुद्धा - शकेलही. समलिंगी हक्कवादी चळवळ ही एक सामाजिक चळवळ आहे, धार्मिक नव्हे, ही भाग्याची गोष्ट आहे. धर्मासारखी डोक्यात चढणारी गोष्ट विरळाच.

(आणि म्हणूनच, अतिधार्मिक लोकांकडे सहानुभूतीने, संवेदनशील नजरेने मुळीच पाहता कामा नये. नाहीतर उद्या ते आपल्याच सपोर्टने प्रबळ झाले, तर आपल्याच डोक्यावर मिऱ्या वाटायला कमी करणार नाहीत.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी आक्रमकरीत्या भांडतात

भारतात तरी विवादास्पद. आमचे आक्रमकतेचे निकष ज्याम उच्च पातळीचे झालेयत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

अहो, करुणा महत्त्वाची. समजा, त्या बिचार्या लोकांना मूर्खपणा करण्याची जेनेटिक प्रीडिस्पोझिशन असेल तर? त्यांनाही आपलं म्हणा....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांना भक्ती आणि सुरक्षितता विकत घ्यायची असते. मग धंदेवाले येतात. कायद्यानं धर्माच्या नावाखाली या गोष्टी विकायला बंदी केलेली नाही. हे लोक विकतात.

रधोंचं उद्धृत मध्यंतरी फेसबुकवर वाचलं होतं, ते असं काहीसं होतं - देहविक्रय करणारी स्त्री आणि धर्म विकणारा पुरुष यांच्यात फार फरक नसतो. देहविक्रय करणाऱ्या निदान नैतिकतेचा आव आणत नाहीत. त्यांचा प्रामाणिकपणा या धर्मविक्यांकडे नसतो.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माऊंट अबूच्या 'प्रजापिता' मधे गेलो होतो. हॉटेलवाला म्हणाला, थोडं ब्रेन-वॉशिंग सहन करावं लागेल, पण त्यांची फुलबाग फार सुंदर आहे, ती बघण्यासाठी तरी जा. प्रत्यक्षांत, फुलबाग खरंच फार सुंदर होती. पण ब्रेन-वॉशिंग बरंच होतं. त्यांची मेंबरशिप घेतील ते डायरेक्ट सत्ययुगांत जन्म घेणार. कारण कलियुग संपत आलं आहे. मी विचारलं, कलियुग नक्की कधी संपणार? आधी उत्तर मिळत नव्हतं, पण खनपटीला बसल्यावर , अजून २५-३० वर्षांनी, असं उत्तर मिळालं. नंतर नेटवर वाचलं की हेच उत्तर ते गेली १०० वर्षे देत आहेत. तिथून बाहेर पडलेले नेटवर त्यांना खच्चून शिव्या घालतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिरशिंगराव तिमीरातून बाहेर या, स्मायल्यांच्या पुढचं जग वाट बघतय तुमचं. त्या स्मायल्या सध्यातरी जाळून किंवा पुरुन टाका...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

प्रजापिताचे दोन मठ आहेत अबुला. एक गावात ( टुअरमध्ये हा दाखवतात) आणि मोठा गावाबाहेर मोठा. बाग इकडेच आहे. आम्ही (बायको, मुलगी) तिकडे संध्याकाळी फिरतफिरत गेलो. असल्या चालून आलेल्या गिह्राइकांच्या ते मागे लागत नसावेत. आदल्या दिवशीच्या टुअरमध्ये सर्वांना वीस मिनिटे दर्शन,थोडे बाळबोध मिळालेले. ब्रम्हज्ञान नावाचं गुपित फक्त त्यांच्याकडेच आहे.
आता कधी कोणी गेलात तर ऐसीकर आहे सांगू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांची मेंबरशिप घेतील ते डायरेक्ट सत्ययुगांत जन्म घेणार.

इतकी पावर आहे यांच्यात, तर मग साल्यांना सिंधमधून गां*ला पाय लावून भारतात पळून का यावे लागले होते म्हणे?

https://www.dawn.com/news/1387908

(आणि, हे लोक 'फेमिनिष्ट' आहेत म्हणे. व्हॉटेवर!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक जुना प्रतिसाद आठवला.

गोली मार भेजे में...
इथे "भेजा" हे अज्ञानाचं, विषयांचं प्रतीक आहे, आणि "गोली" हे सद्गुरूचं प्रतीक आहे.

.. के भेजा शोर करता है
म्हणजे अज्ञानाच्या गलबल्यामुळे परमतत्त्वाचा आवाज मानवाला ऐकू येत नाही. विषयवासनेच्या पुटांमधून झळझळीत असं परमतत्त्व झाकोळलं गेलं आहे.

.. भेजे की सुनेगा तो मरेगा कल्लू... मामा
म्हणजे विषयलोलुपतेच्या मागे लागून कल्लू (म्हणजे माणूस) तात्पुरता मरेल, पण...

.. तू करेगा दूसरा भरेगा कल्लू... मामा
त्याला मोक्ष मिळणार नाही. दूसरा (म्हणजे दुसरं शरीर) गतजन्मातली पापं धूत बसेल. चक्र चालू राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

'अहो, चला हो एकदा आमच्या गुरूदेवांकडे. लो म्हणून नाही, हाय म्हणून नाही, ब्लड नाही, प्रेशर नाही, काही म्हणुन राहणार नाही बघा!'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचलंय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचलंय? अहो मीच लिहिलंय. गुरुदेव एका रात्री स्वप्नात आले आणि म्हणाले, वत्सा तू लिही पुस्तक. मी लिहिलं मग. माझं नाव प्रोफेसर भगवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हू ॲम आय? अँड हू इज ही?

आय ॲम द यू इन हू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...या सगळ्या युनिव्हर्सल केऑसमधून एक कॉसमॉस निर्माण होतानावाले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, पण त्याहीपुढे जाऊन तुम्ही सुप्राकॉन्शसच्या पातळीवरून ऑकल्ट एक्सपिरियन्स घेतलात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुरुदेव एक पाय वरती करून तप करते नी वाघ त्यांना दूध देते असा एक फोटो आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाघ???
आयला, हे नवीन आहे. वाघ दूध द्यायला लागला म्हणजे कलियुग आलंय म्हणायचं. का त्या वाघाची साडेसाती सुरू आहे? कलियुग / साडेसाती चालू झाली तर काहीही होतं असं एकलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाघ नव्हे, वाघाची बायडी. ते पण तेनसिंग पण नाय जाव शकत अशा ठिकाणी.

.. नाय तर मग काय तुमचा आरे मिल्क कॉलनीचा टॉन्ड मिल्क पिवून तप होते काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) यात भोंदुपणा कसला?
२) समाजाला मठाधिशांची जेवढी गरज लागते त्यापेक्षा अधिक त्यांना समाजाची गरज लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चार जुलई ची परेड पहात असताना, एक अंगाला दुर्गंधी यणाऱ्या एका माणसाने हँडशेक (याइक्स!!!) करुन 'जिजझ बद्दल तुम्हाला काय वाटतं?' वगैरे सुरु केलेलं. मी म्हटलं आम्ही हिंदु आहोत. नंतर एकंदरच त्याने नाद सोडला पण जाताना तेजायला परत शेकहँड करुनच गेला Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हगपासून वाचलात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं रे देवा. आकाशातल्या बापानीच वाचवलं मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या जगात तुम्हाला काहीतरी विकता आले पाहिजे. कुणी आकडेमोड, कुणी आवाज, युक्तीच्या चार गोष्टी,पाइपींग, वायरिंग, सेवा, आरोग्य, सुंदर शरीर, वस्तू कि़वा स्वर्गात जागा मिळण्याची शाश्वती.
या शेवटच्या भुलावणीवरच बरेच धर्म टिकून आहेत.
( आशा की मां हमेशा खटिया पे सोयी रहती है। मध्य प्रदेश म्हण.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा पंथीय लोकांपासून चार हात लांबच असावे हे बरे .

"दूरून डोंगर साजरे .."

पुण्यात असताना असे काही प्रचार करणारे असायचे, माहितीपत्रक वगैरे द्यायचे. प्रश्न विचारले की तुम्ही या अनुभव घ्या, म्हणजे सारे काही कळेल -- असे सांगायचे.
एकाने तर सांगितले की त्यांच्या बीपी च्या गोळ्या निम्म्यावर आल्या . इतकी मन:शांती मिळाली.

मला बीपी वगैरेचा त्रास नसलयाने मी काही गेले नाही.

"इन ट्युन विथ ट्युन" वाचायचे आहे.

'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

"इन ट्युन विथ ट्युन" वाचायचे आहे.

वाचता कशाला?

लिहूनच टाका, नि मोकळ्या व्हा ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिहूनच टाका, नि मोकळ्या व्हा ना!

आधी गुरूदेव 'लिहि' तर म्हणू देत!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

गुरूदेव किती जणांना लिही म्हणून सांगणार?

इतक्या लोकांना दृष्टान्त द्या .. लिही म्हणून सांगा ..
पिडाच की हो ती ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

लिहायच काय हो? कधीही लिहीता येईल. त्यात काय विशेष?
चार दोन प्रवचनांना उपस्थिती लावावी लागेल इतकच.

पण त्या पुस्तकाबद्दल इतक ऐकलं आणि वाचलं आहे. त्यामूळे ते एकदा वाचवस वाटत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

डाव्या आणि तथाकथित पुरोगाम्यांपेक्षा हे इस्कॉनवाले कैक पटीने चांगले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1