मी तृषार्त भटकत असता

मी तृषार्त भटकत असता
मृगजळास भरते आले
अक्षांश आखुनी घेता
रेखांश निखळुनी गेले

शब्दांच्या निबिडामध्ये
सावली शोधण्या गेलो
पण अनाघ्रात शब्दांचे
धगधगते पलिते झाले

क्षण कणास जोडित जाता
वाटले विश्व लंघेन
पण वितान स्थळकाळाचे
भवताल कोंदुनी उरले

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मित्रा सॉरी तू त्या अजो आणि गब्बरसिंगपेक्षा खूपच चांगला आहे. मी काही चुकीचं बोललो असंल तुला तर आयाम सॉरी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

अनाघ्रात शब्दांचे
धगधगते पलिते झाले

छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||