बग फिक्सिंग

'भगवान जब देता है तब गधे को भी छप्पर फाड के ही देता है' या उक्तीची विश्वासार्हता पटण्याची , हि काही दिनूची पहिलीच वेळ नव्हती. अनेकदा असे हृदयाला इंगळ्या डसणारे प्रसंग दिनूने अनुभवले होते, पचवले होते आणि त्यांचा स्वतः:वरती यत्किंचितही परिणाम होऊ ना देण्यात निदान तसे भासविण्यात दिनू एव्हाना वाकबगार झालेला होता. पण यावेळचा प्रसंग फारच जिव्हारी लागणारा होता. याबद्दल वाचकांना सविस्तरचं सांगितले पाहिजे.

त्याचे काय ना, दिनू टिपणीस, हा ऑफिसातील एकमेव 'वेळेवर येणारा, टापटीप राहाणारा, कोणतेही काम तत्परतेनेच नव्हे तर हसतमुखाने करून देणारा, कधीही चढ्या आवाजात न बोलणारा', इत्यादि इत्यादि एक आदर्श आय टी कारकून होता. निदान दिनूचा तरी आत्ताबद्दल हाच समज होता. उदाहरणार्थ 'डेली हडल मिटींग्स मध्ये जिथे प्रत्येकजण २ वा जास्तीत जास्त ४ ओळींचे पाट्या टाकल्यासारखे स्टेटस टाकत तिथे दिनू, आपण आदल्या दिवशी काय केले याचे अ पासून ज्ञ पर्यंत साग्रसंगीत वर्णन करत असे मग कोणाला उभ्या उभ्या झोप लागली तरी बेहत्तर. जिथे पहाटे पहाटे ८ च्या सोमवार च्या विकली मिटींग्स मध्ये अन्य कर्मचारी कसेबसे झोप आवरीत, चडफडत हजेरी लावत तिथे दिनू तत्परतेने ५ मिनिटे आधीपासूनच वेबेक्स वरती हजार राहून, 'वेटिंग म्युझिक' ऐकत असे. खरं तर त्याच्या फसफसून वाहणाऱ्या उत्साहाचे रहस्य जाणून घ्यायला अनेकजण उत्सुक होते - असा दिनूचा खात्रीशीर समज होता.

दिनू या कंपनीत लागल्यापासून १ वर्ष ९ महिने झाले होते. बरीच functionality व तिचे कंगोरे आतापर्यंत दिनूच्या हाताखालून गेलेले होते. बरं अन्य मोठ्या कंपनीज प्रमाणे ही काही फारशी डायनॅमिक, aggressive growth असलेली कंपनीही नव्हती पण ते जे प्रॉडक्ट विकीत त्याची बाजारपेठेत सातत्याने मागणी असे व त्या जोरावरच कंपनी चांगले clientale राखून होती. सांगायचा मुद्दा हा कि दिनू त्याच्या niche कामात पटाईत होता. दिनूचे ग्रह अनुकूल होण्यास व सरोज कारखानीस ऑफिसात जॉईन होण्यास एकाच गाठ पडली नसती तरच नवल होतं. दिनू सकाळी बरोबर ९ ची कॉफी घेऊन परत स्थानापन्न होण्यास आणि क्युबिकलच्या रुक्ष भींतीआडून सरोज कारखानिसचा सुरेख , तरतरीत, स्मार्ट चेहेरा नजरेस पडण्यास एकच समसमा संयोग झाला आणि दिनू अर्धा हवेत , अर्धा बसण्याच्या पोझिशनमध्येच स्टॅच्यू झाला. दिनूला , सरोज म्हणजे कोणी कुरङ्गनयना, आधुनिक अप्सरा असल्याचा भास झाला. सरोजनेच दिनूला हसून अभिवादन केले व स्वतः:ची ओळख करून दिली. दिनू प्रोग्रॅमर होता तर सरोज टेस्टिंग ग्रुप मध्ये जॉईन झालेली होती. म्हणजे दोघांचे विळी-भोपळ्याचे सख्य होते तर.

ते काही का असेना पण त्या दिवसापासून, दिनूच्या कामात अधिकच उत्साह व चैतन्य आले याबद्दल दुमत नव्हते. खरं तर त्याला ऑफिस चा नको तेवढा लळा लागू लागला. त्याची कामे पटापट होऊ लागली, code कधी नव्हे ते भराभर डीबग होऊ लागला. वीकेंडस एकदाचे कधी संपतात व सोमवार कधी उजाडतो अशी जगावेगळी अवलक्षणयुक्त घाई त्याला होऊ लागली. 'दिन दुने-रात चौगुने' रेटने, सरोजचे फक्त आणि फक्त चांगले गुणच त्याच्या लक्षात येऊ लागले. उदाहरणार्थ - वेळी अवेळी सरोजच्या क्युबिकलच्या दिशेने येणारा जिवघेण्या सुगंधाची झुळूक, तिची सजवलेली क्यूब, आणि कामातील तिचे कौशल्य तर वाखाणण्यासारखेच त्याला वाटू लागले. मग भलेही तिने त्याचा code चुटकीसरशी break करून दाखवो. त्याला त्या गोष्टीचे देखील कौतुक वाटू लागले. आफ्टरऑल तो एक स्पोर्ट्स प्रोग्रॅमर होता, अन्य कलिग्जसारखा डूख धरणारा नव्हता. एवढेच काय दिनूला क्वचित स्वतः:च्या किंवा अन्य लोकांच्या कोडमध्ये मुद्दाम डीफेक्टस पेरावेसेही वाटू लागले. अगदी त्या पातळीवरती जरी दिनूचे अध:पतन झाले नसले, तरी अधेमधे सरोजला jabber करून तो कामाविषयक तसेच इकडल्या तिकडल्या गप्पा मारू लागला. सरोजचाही मोकळा मैत्रीपूर्ण प्रतिसाद मिळाल्याने दोघांच्या jabber वरती वरचेवर गप्पा होऊ लागल्या. अन्य कोणाच्या लक्षातही न येता दोघांची मैत्री फुलू लागली - अर्थात दिनूच्या मते. IT क्षेत्रात गमतीने म्हटले जाते की - A tester has the heart of a developer......in a jar on the desk. पण इथे तर खरच दिनूचे हृदय सरोजपाशी गहाण पडले होते., अगदी हवे तसे डिसेक्ट करायला.

सरोज मात्र सर्वांशी संयत पण सलोख्याचे संबंध राखून होती. जिथे दिनू फक्त सरोजला jabber करत असे, तिथे, सरोज मात्र एकाचवेळी मल्टायटास्किंग करण्यात वाकबगार होती. ती एकाच वेळी टेस्ट केसेस लिहिताना, अनेकांना आळीपाळीने jabber वर कामाचे संदेश देणे, मध्येच ऑफशोअर टीमला ईमेल्स पाठविणे, स्वतः:ची ईमेल चेक करणे, QA मॅनेजर ला स्टेटस अपडेट पाठविणे आदि कामे करण्यात हुशार होती. तिला झळ पोहचता तर नव्हतीच पण आपण दिनूला आवडत असू हे तिच्या गावीही नव्हते. या वेळच्या ख्रिसमस पार्टीला दिनू ने काही प्लॅन आखले होते. पार्टीचा venue एक प्रशस्त व आरामदायक हॉटेल असून संगीत , खेळ, खाणे-पिणे यांची रेलचेल असल्यामुळे, त्यादिवशी दिनूने, सरोजला मनातील गुपित सांगायचे ठरविले. दिनू जरी शेखचिल्ली स्वप्ने रंगवीत असला, तरी त्याने नकार घेण्याचीही मनाची तयारी केलेलीच होती.

शेवटी एकदाचा २२ डिसेंबर उजाडला. ऑफिसमधून बरेचसे लोक लवकर निघून थेट पार्टीला येणार होते. सरोजही अपवाद नव्हती. निमंत्रण सर्वाना होतेच शिवाय अजून एक मित्र मैत्रीण आणण्यास परवानगी होती. तो दिवसचं दिनूकरता जादूमय होता. का कुणास ठाऊक आज सरोज अधिकच सुंदर व अधिकच कुरंगनयना भासत होती एवढेच काय दिनूला ती आपल्याकडे प्रेमळ पण सूचक कटाक्ष टाकत असल्याचाही मधे मधे भास होत होता. संध्याकाळी दिनू जामानिमा करून पार्टीला पोचला. अजून तर काही सरोज आली नव्हती. दिनू उगाच हाय-हॅलो करत वेळ घालवत होता खरा पण त्याचे संपूर्ण लक्ष दाराकडे लागलेले होते. इतक्यात सरोजाची एंट्री झाली खरी पण तिच्या समवेत एक तरुण होता. त्याला पहाताच दिनूच्या छातीत धस्स झालं. सरोज आणि तो तरुण वाटेत भेटणाऱ्या लोकांना हाय म्हणत येत येत दिनूपाशी येऊन ठाकले. दिनूचे खरं तर प्राण कंठाशी आलेले होते पण त्याने उसने अवसान आणून उगाचच हसून अभिवादन केले. आणि ...... सरोजाने ओळख करून दिली - हा माझा फियॉन्से, निखिल "टोळ." आणि दिनूचा चेहरा पडला. कारण आता सरोजने शोधून काढ्लेला, हा एवढा मोठ्ठा "बग" फिक्स करायला मात्र दिनूचे साऱ्याआयुष्यभराचे प्रोग्रामिंग चे कौशल्य अपुरे पडेलसे दिसत होते.
___________________________________________________________________

दिनूचा जिवलग, अगदी जिवश्च-कंठश्च मित्र ,म्हणजे बिट्ट्या' प्रधान. अशा आणीबाणीच्या प्रसंगात, जर दिनूने पहिली धाव बिट्ट्याकडे घेतली नसती तरच नवल होते. बिट्ट्या म्हणजे साक्षात
गुरू उदार माऊली प्रशांतसौख्य साऊली|
जया नरास फावली तयास सिद्धी गावली|
असा दिनूचा गुरुतुल्य लंगोटीयार होता. त्यांची जानी दोस्ती आता आता गद्धेपंचविशीतली नसून, बालपणापासून होती. बिट्ट्याने अनेकदा, दिनुकरता, आपल्या ताटातील घास काढून ठेवलेला होता. लहानपणी शोले-शोले खेळताना, कोणासही 'ठाकूर' व्हायचे नसे कारण ठाकूर हात नसल्याने फक्त मार खाणार. असे असतानाही, बिट्ट्याने, दिनूवरती आलेलं 'ठाकूरचे राज्य' स्वतः:वर घेतलेले होते.
जेव्हा दिनू मटार घातलेल्या बटाटा पोह्यांना व चहाला हात लावेना तेव्हा बिट्ट्या प्रसंगाचे गांभीर्य कळून चुकला. तशाही प्रसंगात त्याचे डोके चाललेच. त्या भेटीतच बिट्ट्याने एक बेत आखला व दिनूस सांगितला. त्या बेताचा हायलाईट हा होता कि टोळ व सरोजच्या मधील कुरबुरींवर बिट्ट्या पाळत ठेवणार व त्याचा यथासांग वृत्तांत दिनूस देणार. पुढची खेळी दिनूने खेळायची. आणि या मोहिमेवरती बिट्ट्याची बहीण लतिका प्रधानही सामील होणार व तिच्या अफाट फेसबुक लिस्टमधून व जनसंपर्कांतून ती टोळाचे जर काही affair पूर्वी झाले असेल ते हुडकून काढणार.
हा बेत खरं तर अपेक्षेपेक्षा यशस्वी झाला. टोळाचे एक अफेअर शोधून काढण्यात लतिकेला यश प्राप्त झालेच पण बिट्ट्याला देखील सरोज - टोळच्या अनेक लहान सहान कुरबुरींमधून एक महत्वाचा मतभेद मिळाला, तो म्हणजे टोळाला नोकरी न करणारी बायको हवी होती तर सरोज तिच्या क्षेत्रात पार मश्गुल झालेली होती आणि तिला तिचे क्षेत्र अज्जीबात सोडायचे नव्हते.
दिनू हळूहळू jabber वरती सरोजाला हे ठसवून देण्यात यशस्वी झाला की तो स्त्रीस्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता असून वेळ पडली तर हाऊस-हजबंड होण्यासही मागेपुढे पहाणार नाही पण पत्नीस मतस्वातंत्र्य, आचार-विचार स्वातंत्र्य देईलच. पुरोगामीपणाचे , प्रोग्रेससिव्ह विचारांचे बाळकडू प्यालेल्या सरोजाला , दिनूचे विचार इम्प्रेससिव्ह वाटले नसते तरच नवल होते.
टोळ आणि सरोज चौपाटीवरती फिरत असताना, ठरल्या बेताप्रमाणे, लतिका अचानक समोर आली आणि टोळास पाहून डोळे विस्फारून उदगारली "निखिल ना तुम्ही. उषाचे मित्र. बरं झालं बाई भेटलात, उषा अजूनही तुमची वाट पाहते आहे, बिचारी वाळून वाळून अगदी काडी झालीये. whatsapp वरती तिला जरूर कॉन्टॅक्ट करा."
यानंतर ती संध्याकाळ टोळास (वाईट दृष्ट्या) अविस्मरणीय गेली, भूतकाळाबद्दल, सरोजाला अंधारात ठेवण्याबद्दल टोळाची चांगली खरडपट्टी निघाली. सरोजने सुतावरून स्वर्ग गाठला की पुरुषांना हे असे पालथे धंदे करायचे असतात म्हणून स्त्रियांना घरात कोंडून ठेवले जाते. बरे झाले लवकर सर्व बिंग फुटले अन्यथा ...
आणि कालांतराने दिनूचे प्रोमोशन 'प्रोग्रॅमरवरून' 'प्रोग्रामिंग लीड' वरती झाले. म्हणजे बाहेरही आणि घरातही. डिसेंबर ते जुलै , जेमतेम हिवाळा संपून उन्हाळा सुरु झाला.ऑफिसात दोघांच्या प्रेमाचा गौप्यस्फोट लवकरच एका समर पॉटलकमध्ये केला गेला. बिट्ट्या आणि लतिकाला लग्नात जोरदार आहेर मिळाले. व अशा रीतीने another bug bit the dust

Wink

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पुढच्या भागात वाचा - या टोळाला देशोधडीला लावण्यात दिनुला किशोर प्रधानची मदत कशी होते.
---
शॅाल्लेट !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात है!!! तुम्हाला टिपणीस-कारखानिस थीम एकदम कळली च्रट्जी Smile
हाहाहा 'टोळाला देशोधडीला' ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही टोळधाड कशी परतून लावली यावर दुसरा भाग लिहाच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile प्रयत्न करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरा प्रयत्न
पुलेशु

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

दिनूनं फ्र्यांडशिप नाही मागितली का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

तो टोळ फुडं किती फुड खातो हिकडंच लक्श ठेवलं दिनुनं. शेवटचा गुडबाइकिस फारच किलिंग झाला असता म्हणून अगोदरच सटकला असेल.
मग घरी जाऊन फेसबुकातल्या बरेच दिवस दुर्लक्श केलेल्या मीरा आजगावकरला काही बाकिबाब, पाडगावकरांच्या कविता शेअर केल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या फोनला आर्टिफिसल इंटेलिजन्सने झपाटले आहे. कुठेही काही बरं, बरा, बरी दिसलं की तेवढा उतारा नोटमध्ये सेव करून टाकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लै भारी ! पुढचा भाग लवकर टाका.. ते क्रमश: लिहायचे राहिले काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढचा भाग लिहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जमला तर लिहीनच ग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढचा भाग लिहा स्पर्धा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय Smile प्लीज सर्वांनीच ट्राय करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

A tester has the heart of a developer......in a jar on the desk.

.
हे लई म्हंजे लई आवडले ओ.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा. पूर्वी मी ति सिगनेचर ठेवलेली होती. पण ... मग काढुन टाकली. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शीकेप्याख्यान वाचतोय, पुढला भाग आणा लवकर.

आज सरोज अधिकच सुंदर व अधिकच कुरंगनयना भासत होती

कुरंगनयना ह्या शब्दाचा इथे तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ काय आहे?
नाही म्हणजे माणसं अशी दर दिवशी कमी अधिक कुरंगनयना दिसू शकतात? Smile

आणि तुमचे वाचक हे आयटीवाले नसूही शकतात ही शक्यता जरा गृहित धरा हो!

जिथे दिनू फक्त सरोजला jabber करत असे, तिथे, सरोज मात्र एकाचवेळी मल्टायटास्किंग करण्यात वाकबगार होती.

हे वाक्य मला अतिशय अश्लील वाट्लं!!!! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile पिडां इज बॅक. पहा सीकेप्यांचं नाव काढलं की आमचे पिडां हजर.
कुरंग म्हणजे हरीण. सरोज हरीणाक्षी आहे आमची Smile मृगनयना रसिकमोहीनी
.
ओह ओके कमी-अधिक कुरंगनयना Smile आलं लक्षात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुरंग म्हणजे हरीण.
......कुरंग नव्हे, कुरङ्ग.
कुरंगनयना म्हणजे वाईट रंगाच्या डोळ्यांची (कु+रंग+नयना) असा अनपेक्षित अर्थ होईल. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही नवीन माहीती मिळाली. बरे झाले सांगीतलेत. धन्यवाद. चूक दुरुस्त केलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुरङ्ग.नयना, या शब्दाचा , विशेषत: त्यातल्या र चा उच्चार, ते, 'जय जय डबाडबड श्रीरंग', गाणाऱ्या , भालचंद्र पेंढारकरांकडूनच ऐकावा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी. रमारमण मध्ये हिंदी नुक्तावाला ड. आणि जोडीला सर्दट आवाज.
दुसरे उदाहरण म्हणजे ' चांद माझा घा घा घासरा'
पण हे लोक अनुस्वार खूप लांबवून लांबवून छान उच्चारतात आणि अनुनासिकांच्या वेळी मात्र यांना पडसे होते. उदा- चउउनद्रिका ही जणू

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वाक्य मला अतिशय अश्लील वाट्लं!!!!

.
बव्हर्थसूचक हा शब्द अधिक बरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिडांकाका इज बॅक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शुचिमामी पुनरागमनाचे स्वागत.
(तुमच्या क्षेत्रात अजूनही दिनू आणि सरोज ही तरुण तरुणींची नावं असतात हे रोचक वाटलं)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हात्तेच्या! बरोब्बर पकडलत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उर्वरीत भाग अपडेट केलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगळा भाग काढायचा असता. बहुतेक जण नाही वाचत प्रतिक्रिया अपडेट. नवीन भाग हायलाईट होते.
विनंती- बग फिक्स: अंतिम भाग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

नवीन भाग काढण्याऐवजी हे असच बरं वाटतं मला. ज्यांना खरच रस असतो ते वाचतातच की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. सीक्वेल लिहू नयेत. सीक्वेल्स आर एसेन्शियली आफ्टरथॉट्स; त्यांना मूळ कथेची सर कधीच येत नाही, आणि मग मूळ कथेचा पचका करून जातात. उगाच केकता क्कपूरच्या सीर्यलीला एक्स्टेंशन देऊन पाणी घालून वाढवल्यासारखे. (केकता क्कपूरची मूळ सीर्यलसुद्धा भिकार असते, हा सूक्ष्म फरक अलाहिदा. इथे ही मूळ कथा त्या मानाने बरी होती.)

२. लाल रंग डोळ्यांत (आणि डोक्यात) जातो. आणि डिस्ट्रॅक्ट करतो.

३.

बिट्ट्याने अनेकदा, दिनुकरता, आपल्या ताटातील घास काढून ठेवलेला होता.

ईईईईईईईईईई!!!

४.

दिनूवरती आलेलं 'ठाकूरचे राज्य' स्वतः:वर घेतलेले होते.

'ठाकूरचे राज्य' संकल्पना मोहक आहे.

५.

जेव्हा दिनू मटार घातलेल्या बटाटा पोह्यांना व चहाला हात लावेना तेव्हा

हे आम्ही म्हटले असते, तर आमची 'कारण शेवटी आम्ही भटेच'मध्ये संभावना झाली असती. पण इथे... असो चालायचेच.

६.

तेव्हा बिट्ट्या प्रसंगाचे गांभीर्य कळून चुकला. तशाही प्रसंगात त्याचे डोके चाललेच.

'तशाही प्रसंगात' बोले तो? बिट्ट्यावर कोणता प्रसंग गुदरला होता?

७.

टोळाचे एक अफेअर शोधून काढण्यात लतिकेला यश प्राप्त झालेच

टोळाचे अफेअर? एक वेळ सरोजचे अफेअर म्हटले असतेत, तर काहीसे विश्वसनीय वाटू शकले असते. पण... टोळाचे अफेअर??????

('टोळ' बोलेतोसुद्धा सीकेपीच ना?)

टोळ कसला अफेअर करतोय? ती कोण ती उषाच त्याच्या मानगुटीवर बसली असेल! आणि वाळून काडी कसली होतेय? चांगली खाऊन पिऊन धिप्पाड असणार! (आणि आता तिच्यापासून छुटकारा मिळाला तर ही दुसरी - सरोज - मानगुटीवर येऊन बसली! नशिबाचे भोग असतात एकेकाचे.)

८.

टोळ आणि सरोज चौपाटीवरती फिरत असताना

काय??? टोळ-मंडळी नि सरोज-मंडळीसुद्धा फिरण्याकरिता (ऑफ-ऑल-द-प्लेसेस) चौपाटीवरच जातात? पण... पण... पण... आय ऑलवेज़ थॉट की चौपाटी हा आमच्या गिरगावातल्या लोअरममव भटांचा हाँट होता म्हणून. आम्ही लहानपणी नेहमी जायचो तिथे - घोळक्याने! आणि चौपाटीवर जाऊन खाल्लेनीत् काय म्हणे त्यांनी? भेळ नि खारे दाणे? रद्दी कागदाच्या पुडीतले? श्याः! अरे निदान बाकी कुठे नाही तरी गेला बाजार जुहू बीचवर नाहीतर मलबार हिलवर नाहीतर कुठेतरी पॉश रेष्टॉरण्टात सँडविचे खायला तरी पाठवायचेत! पण असो.

९.

दिनू हळूहळू jabber वरती सरोजाला हे ठसवून देण्यात यशस्वी झाला की तो स्त्रीस्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता असून वेळ पडली तर हाऊस-हजबंड होण्यासही मागेपुढे पहाणार नाही

चुत्त्या साला! (नाही मी खाडाखोड करणार नाही. 'चुत्त्या साला' हाच इथे समर्पक शब्द आहे. कोठलाही सभ्य शब्द प्रस्तुत इसमाचे वर्णन समर्पकपणे करण्यास समर्थ नाही. अगदी 'सीकेपी'सुद्धा डझण्ट क्वाइट मेक द कट.)

आय मीन, स्त्रीस्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता वगैरे सगळे उत्तम आहे. परंतु हाउस-हज़बंड? बायकोच्या पैशावर बायकोच्या ताटाखालचे मांजर बनून राहण्याची एवढी हौस? अरे काही सेल्फ-रिस्पेक्ट आहे की नाही साल्याला? बायको डोक्यावर मिऱ्या वाटेल अशाने! (तेच हवे असेल म्हणा त्यालासुद्धा! होपलेस साला.) अरे गेला बाजार काही माफक फायनॅन्शियल इंडिपेंडन्स नको?

(आणि तीसुद्धा, मिळवणार नाही, घरी बसेन म्हणणाऱ्या चम्यावर चक्क इंप्रेस होते? यह बात कुछ हज़म नहीं होती|)

बरे, एवढे सगळे कारस्थान करून त्या टोळाचे लग्न मोडले, इथवर एक वेळ ठीक आहे. आयडियली, दिनू शुड हॅव माइंडेड हिज़ ओन बिझनेस, केप्ट क्वाएट अँड वॉच्ड द फन. सूनर टोळ दॅन हिम. पण परोपकाराची उबळ माणसात कधीकधी तीव्र होते, नि अशाच एका झटक्यात त्याने टोळाला सोडवलेनीत्. पण टोळाला सोडवल्यावर ती धोंड आपल्या गळ्यात बांधण्यासाठी ओढवून घेण्याची इतकी अगतिकता का, म्हणतो मी.

(बिट्ट्याचे नि लतिकाचे काय जाते? त्यांना नाहीत उद्योग, त्यांना दुसऱ्यांच्या भानगडीत नाके खुपसायला बरी संधी मिळाली. लोकांना असे हवेच असते. पण, टू बी फेअर, बिट्ट्या-लतिकाचाही तितकासा दोष नाही म्हणा. त्यांनी दिनूला टोळ-रेस्क्यू-परोपकार-मिशनमध्ये मदत केली; नंतर तू स्वतः तिच्या मागे लाग नि तिच्याशी तूच लग्न कर म्हणून नाही सांगितलेनीत्. ती याचीच हौस. तेव्हा त्यांनी आपला बिज़नेस माइंडून फन का वॉचू नये? वर त्यावर अहेरसुद्धा मिळतोय - विन-विन सिच्युएशन!)

१०.

व अशा रीतीने another bug bit the dust

कोण दिनू ना? हो हो चांगलाच चिरडला गेला. बरा की हो होता. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो.

..........

असो. तर आहे हे असे आहे. आणि हे असेच चालत राहायचे. ईश्वरेच्छा बलीयसी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाल रंग खरच उगाच टाकला.
सिक्वेल लिहू नये हे इतकं पटलं ना. खरे आहे नबा.

कोठलाही सभ्य शब्द प्रस्तुत इसमाचे वर्णन समर्पकपणे करण्यास समर्थ नाही. अगदी 'सीकेपी'सुद्धा डझण्ट क्वाइट मेक द कट.)

न ssssssबा, व्हॉट डु यु मीन बाय - कोठलाही सभ्य शब्द प्रस्तुत इसमाचे वर्णन समर्पकपणे करण्यास समर्थ नाही. अगदी 'सीकेपी'सुद्धा डझण्ट क्वाइट मेक द कट.)
खवचट कमेंट आहे हां.

टोळ सीकेपींमध्ये आडवनाव असतं का ते माहीत नाही मला नबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाल रंगामुळेच नबा एवढे क्रिप्टिक झाले की काय, अशी संशयाला जागा आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नबा म्हणजे काय बैल वाटलेका ओ? हाहाहहा नाही म्हणजे तुम्ही भेटला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इन दॅट केस ... तुमचा उपरोध बरोबरही असू शकतो. हाहाहा
<पळा>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बैलांची बदनामी थांबवा!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न'बा' तुमचा पेटंटेड कल्र है ना ओ लालका. बिना लाल रंगात बैलाची बदनामी पाहावेना.

लाल रंगाची बदनामी थांबवा!!!

हान महाद्या गुळवणी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

नबा मला प्रत्यक्ष भेटले नसले म्हणून काय झालं ? मला आदर आहे त्यांच्या प्रत्येक बाजू बद्दल !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिनू हळूहळू jabber वरती सरोजाला हे ठसवून देण्यात यशस्वी झाला की तो स्त्रीस्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता असून वेळ पडली तर हाऊस-हजबंड होण्यासही मागेपुढे पहाणार नाही पण पत्नीस मतस्वातंत्र्य, आचार-विचार स्वातंत्र्य देईलच.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

jabber म्हणजे काय? तुम्हाला जबरीने असे म्हणायचे आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑफिसमध्ये एक प्रकारची मेसेजिंग ॲप्स वापरतात. काही ठिकाणी जॅबर वापरतात. एक दुसऱ्याशी, फोन न करता टेक्स्ट मधुन कामाच्या गोष्टी करायला. त्यात ऑफशोअर, ऑन्साईट नबोलणेही होउ शकते.
ऑफिशिअल व्हॉट्सॅप म्हणा ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखिकेची मुलाखतही आवडली. वाचकांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली.
-------
आताच हाती आलेल्या बातमीनुसार हौसेने होऊ घातलेल्या हजबंडने सर्व अटी मान्य केल्या आहेत. फार डिटेल्स देऊ शकत नाही. इकडेही लतिका आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्या मराठी कथांमधे हॉट बाईचं नाव जनरली सरोज का असतं?
(Maybe because it sounds like उरोज?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Liberalism is a mental disorder

पुढच्या गोष्टीत मंदा, शांता, गार्गी ,सुधा यांना घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढच्या गोष्टीत मंदा, शांता, गार्गी ,सुधा यांना घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुष प्रोग्रामर आणि स्त्री टेस्टर यांची प्रेमकथा? तुमचंच जुनं लघुकाव्य आठवलं.
कविता -
तू हापीसात येता, मी आय एम करते
तू रिप्लाय करता, मी मज हरवून बसते||१||

तुझ्या कोडींग मधला, बग बघ हा मी शोधीला,
करत फिक्स तू त्याला, मीही रिटेस्ट तो केला||२||

तू ही हार ना मानी, मी ही ना हारे रे,
मॅनेजरचे मग फावे, आपुली जोडी तो जमवे||३||

प्रकल्प भरास मग येइ, प्रीतीला पूरही येई,
मॅनेजर बढती देई, विन्-विन स्थिती ही होई||४||

जाता जाता भोचक प्रश्न - तुम्ही टेस्टिंगचं काम करता का हो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राघा हे माझं काव्य आहे???? Sad
_____
अरे खरच की मिपावरच्या तुमच्या धाग्यावर मी असलं काव्यही प्रस... आहे Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्लॅकमेल करु नक्का राघा Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचि ... मस्त लिहिलंय ..

hard core टेस्टर असल्याने गोष्टी मनाला भिडल्या ..

फक्त इकडे आम्ही im वर शिव्या घालतो आणि डेव्हलपर लीडचा गळा दाबायचा बाकी आहे ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सखी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बैल काळ्या वस्तुला बुजतो. वळू ( स्पेनकडचा) लाल रंगाला.
_____________
दुसरा भाग येणार होता पण राघांनी ओतलं पाणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरीच काळी अक्षरे पाहून काही पुरोगामी बिथरतात्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिनू हळूहळू jabber वरती सरोजाला हे ठसवून देण्यात यशस्वी झाला की तो स्त्रीस्वातंत्र्याचा कट्टर पुरस्कर्ता असून वेळ पडली तर हाऊस-हजबंड होण्यासही मागेपुढे पहाणार नाही पण पत्नीस मतस्वातंत्र्य, आचार-विचार स्वातंत्र्य देईलच

हाहा! हे फक्त बोलण्यापुरतं का दिनू खरोखर तशा विचारांचा आहे. ही खेळी उलट सुद्धा पडू शकली असती मग बोंबलत बसला असता दिनू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद प्रणव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0