अजून एक नकार मोहोरला

अजून एक नकार मोहोरला

तुझ्या वदनातून

रणशिंग फुंकिले परत

बाशिंग बांधिले गुढग्यावरी

राबल्या मोहिमा अनेक

शोधण्या पौर्णिमेस

चंद्रमुख दुरापास्त ते

ओसाड गल्ली अन सारे रस्ते

झिजली पाऊले झिजले मन जरी

तसूभरही प्रेम ढळले नाही

त्यांच्या हर एक नकारात

उदय नव्या प्रेमाचा

मी प्रेम शोधिता

नकार मोहरतो

हृदयात साठवून त्यास

पुन्हा प्रेम शोधितो

सिद्धेश्वर विलास पाटणकर

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

खिल्जीसर, आपणाला ऐसी सापडल्याबद्दल अभिनंदन!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

धन्यवाद मित्रा , आणि एक नम्र विनंती , मला " सर " हि पदवी नकोय . माझी तेव्हढी लायकी नाही . मला तुझ्या जवळच्यापैकीच एक समज ... मला ऐसी हे मिपा वाचनातून गवसले . त्यामुळे मी मिपाचा सदैव ऋणी राहीन .

हे " खवचट " नामांकन म्हणजे काय असते .. मी नवीन आहे म्हणून विचारतोय ... ते कसे देतात ? जरा प्रकाश टाकावा ..

सिद्धेश्वर विलास पाटणकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला ऐसी हे मिपा वाचनातून गवसले
तुमचं नाव वेगळं आहे, पण ~तीन वर्षाआधी, जेव्हढं मला आठवतंय, एक विजय पुरोहित होते. तुमचा प्रतिसादाची स्टाईल जरा त्यांच्यासारखी वाटली. तुम्ही एकंच प्रतिसाद दिलाय, त्यावरून बरोबर अंदाज येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी सिद्धेश्वर विलास पाटणकर .. माझे नाव मला अत्यंत प्रिय आहे आणि मी ते कधीही बदलत नाही . येथे या मंचावर मी सध्या नवीन आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0