"तू " अधिक " मी " किती ?

सोपा प्रश्न होता माझा

"तू " अधिक " मी " किती ?

तू दिलेस उत्तर "दोन"

अंतर्मुख होऊनि शोधू लागलो

आपण आहोत तरी कोण ?

मला अपेक्षीत “एक " होते

आपल्यात मुळी अंतरच नव्हते

दोन देण्यामागे कारण काय होते

जर तू माझ्यात होतीस

मग मी तुझ्यात का नव्हतो

आणि मी तुझ्यात नव्हतो

तर मी कुठे होतो ?

गणित सोपे जरी वाटले दुरून

अवघड झाले उत्तरावरून

का दिले तू विचित्र उत्तर ?

कुढत चाललो पुढे निरंतर

जवळ घेतला मद्याचा प्याला

शोधत गेलो मला स्वतःला

सिद्धेश्वर विलास पाटणकर

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

लिहायला सुचेनासं झालं की माझं तुझ्याभोवती घुटमळण
असंच असतं काही,
"तू" एक अन् "मी" एक मिळून एकच
सांग बरोबर की नाही!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

यमकांना जेरीस आणिले

अलन्कार आले नि गेले

वृत्त वृतांत राहिले

छंद मात्रा वेलांटी नि काना

चाराण्याचा गेला जमाना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0