भेटी लागी जीवा: आत्तापर्यंत काय घडले?

भेटी लागी जीवा: आत्तापर्यंत काय घडले? लेखक: निमिष सोनार, पुणे

सोनी मराठी या वाहिनीवरची "भेटी लागी जीवा" ही खूप चांगली सिरीयल आहे. स्टार प्लस महाभारतातील शंतनू, कलर्स वरच्या सम्राट अशोक मधला बिंदुसार आणि सोनीवरच्या बाजीराव पेशवा मधला शाहू महाराज या दमदार भूमिकेनंतर बऱ्याच काळानंतर समीर धर्माधिकारी मराठीत आलेला आहे! आतापर्यंत "भेटी लागी जीवा" मध्ये काय घडले हे येथे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे यापुढचे एपिसोड जरी तुम्ही बघितले तरी ते समजतील!

समीर धर्माधिकारी यात "पत्नी आणि दोन मुले (एक मुलगा, एक मुलगी) असलेल्या" एका कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेत ज्याचा भूतकाळ काहीसा चांगला नव्हता, पण तो सध्या एक वकील आहे आणि अधून मधून त्याला त्याच्या लहानपणीचे म्हणजे अनाथाश्रमात राहत असतानाचे अप्रिय प्रसंग आठवत राहतात. त्याला त्याचा भूतकाळ त्याच्या वर्तमानकाळात डोकावलेला नको असतो आणि तो आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा असतो. विकास आणि त्याच्या पत्नीचे (रेवती) लव्ह मॅरेज असते आणि ती घरदार कायमचे सोडून त्याचेकडे आलेली असते.

आपले भारुड गायक वडील तात्या (अरुण नलावडे) यांचे भारुड गायन त्याला आवडत नाही आणि संघर्ष होऊन तो लहानपणी घर सोडतो. (मी सुरुवातीचे एपिसोड नीट पूर्ण पहिले नाहीत, तेव्हा हा भाग नीट तपासून बघावा!)

अशातच त्याचा मुलगा विहंग ऐशी हजारांचा काहीतरी अपहार करतो पण आपल्या पत्नीला न सांगता विकास परळीकर (समीर धर्माधिकारी) त्याच्या मुलाला सोडवतात हे त्याच्या बायकोला आवडत नाही.

कॉलेजमध्ये विहंगला काढून टाकणार असतात पण राजकीय दबाव टाकून विकास ते प्रकरण मिटवतात. पैशांनी काहीही करता येतं असे चुकीचे संस्कार विहंगवर होऊ नये म्हणून विहंगची आई (विकासची पत्नी - रेवती) त्याला रोज थोडे वडिलांबरोबर ऑफिसमध्ये जात जा असे सांगते, जेणेकरून पैसे मिळवण्यासाठी काय मेहनत करावी लागते असे त्याला कळेल!! मग विहंग अधूनमधून वडिलांच्या ऑफिसमध्ये जाणे सुरु करतो. आणि मागील घटनांवरून बोध घेऊन सिरियसली अभ्यास करायला लागतो.

दरम्यान रेवतीला एक निनावी व्यक्ती फोन करून विकासबद्दल, त्याच्या सध्या चाललेल्या काही कामांबद्दल, त्याच्या भूतकाळाबद्दल उलटसुलट सांगत असते आणि ते खरे होतांना तिला दिसते. हे सर्व का विकासने तिच्यापासून का लपवले म्हणून ती त्याला धारेवर धरते आणि गणपती बसतात त्या दरम्यान ती त्याचेशी अबोला धरते आणि त्यांचे वैवाहिक जीवन खूप बिघडते. विकासला योगायोगाने त्याबद्दल (तिला येणाऱ्या फोन कॉल्सबद्दल) कळतं आणि तो तिच्याकडून फोन हिसकावून फेकून देतो आणि पायाखाली चिरडून टाकतो. नंतर तो पुन्हा नवीन फोन आणतो पण रेवती स्वीकारत नाही! पण फोन करणारी व्यक्ती कोण आहे हे विकास, रेवती किंवा आपण प्रेक्षक यांना अजून कळलेले नाही कारण त्याची फक्त अंधारात बोलतांना सावली दाखवतात आणि त्याच्या रूममध्ये विकासचे अनेक फोटो चिकटवलेले असतात (शाहरुखच्या डर, आमिरच्या गजनी आणि पुन्हा शाहरुखच्या फॅन चित्रपटासारखे).

विकास भूतकाळाला विसरण्यासाठी आणि एक चांगला कुटुंबप्रमुख होण्यासाठी एका महिला सायकोलोजीस्टची मदत घेत असतो. त्यासाठी तो तिच्याकडे केव्हाही जात येत असतो. रात्री सुद्धा! तिचे लग्न झालेले असते की नाही याचा उलगडा झालेला नाही कारण तिला घरात एकटीच राहातांना दाखवलंय! विकास आणि तिच्यात प्लेटोनीक रिलेशन दाखवले आहे. (शारीरिक पातळीपलीकडे फक्त निखळ मैत्री!)

विकास आणि विहंग यांच्यात नेहमी चांगले संबंध असावे यासाठी विकास खूप प्रयत्नशील असतो आणि काही प्रमाणात त्यात यशस्वीही होतो.

पण अचानक एक घटना घडते. विकाससोबत अनाथाश्रमात राहिलेला (आणि विकासला मदत केलेला) एक मित्र अचानक त्याच्या ऑफिस मध्ये येतो आणि त्याच्यावर आलेल्या खोट्या खुनाच्या आरोपापासून त्याला सोडवण्यासाठी त्याची केस विकासने घ्यावी असा आग्रह करतो, पण विकासला त्याचा भूतकाळ त्याचेसमोर कोणत्याच स्वरूपात नको असतो. मग विकास एका बिल्डरकडून ब्लॅकमेल करून मिळवलेली रक्कम एका बॅगमध्ये भरून त्याच्या त्या मित्राला देतो आणि शहर सोडून जा आणि नवीन शहरात नावाने नवीन आयुष्य सुरू कर असे सांगतो आणि त्याची केस घ्यायचे नाही म्हणतो कारण केस घेतली असती तर कोर्टात त्याचा मित्र जे सांगेल त्यावरून त्याचा नको असलेला भूतकाळ समोर आला असता!

मात्र दुर्दैवाने तो मित्र शहर सोडून जात असतांनाच नेमके पोलीस त्याला पकडतात आणि विकास जे टाळण्याचा प्रयत्न करतो तेच नेमके त्याच्या आता अंगाशी येणार असते. नंतर निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीबद्दल तक्रार नोंदवायला पोलीस स्टेशनात गेलेली रेवतीसुद्धा योगायोगाने विकासच्या त्या अटक झालेल्या मित्राला कोठडीत भेटते कारण ती सामाजिक कार्यकर्ती असते. पण गुंडांकरवी विकास तुरुंगात त्याच्या मित्राला मार खाऊ घालतो आणि तो मित्र जखमी होऊन न बोलण्याच्या स्थितीत येतो.

एकदा विहंगचे मित्र त्याला बिझिनेस सुरु करायला वडिलांकडून पैसे मागायचा सल्ला देतात कारण गणपतीला जेव्हा ते त्याचेघरी गेलेले असतात तेव्हा विकास लाखोंचा चेक अनाथाश्रमाला दान करतांना त्याच्या मित्रांनी पाहिलेले असते. पण विहंग नाही म्हणतो. मग ते त्याला त्याच्या गर्लफ्रेंड कडून पैसे मागायला सुचवतात. त्यासाठी तिच्याशी प्रेमाचे खोटे नाटक त्याला करायला सुचवतात.

विकासच्या कुटुंबाशी लहानपणापासून स्नेहसंबंध असलेले एक जोडपे असते ज्यांना मुलबाळ होत नसते आणि ते विकासच्या मुलांना स्वतःचे मुलं समजून आपला जीव लावत असतात. त्यातील पुरुष विकासच्या ऑफिसमध्ये काम करत असतो. पण एका घरगुती जेवणाच्या पार्टीत त्यांचेकडून विकासवर मुलांसमोर, रेवतीसमोर विकासच्या मनाला लागेल अशी जहरी टीका गमतीत होते म्हणून विकास त्याला म्हणतो की मुलांसमोर त्यांच्या वडिलांबद्दल काय बोलावे याची अक्कल तुला कशी असणार? कारण तुला मुलं नाहीत आणि कधी होणारही नाहीत. यामुळे ते जोडपे भयंकर दुखावले जाते आणि त्यातील स्त्रीकडून विकासला शाप मिळतो आणि ती नंतर मनात ठरवते की विकासला ज्या त्याच्या मुलांबद्दल गर्व आहे त्या मुलांना त्याच्यापासून ती तोडेल. अशातच तो निनावी फोनवला तिलाही कॉल करायला लागतो आणि तिला आयती संधी मिळते.

मग नंतर बिल्डरकडून आणलेली बॅग विकास हातात घेऊन जातांनाची व्हिडीओ शुटींग दाखवून विकासला ब्लॅकमेल केले जाते कारण आता त्या बॅगमधले पैसे (जे विकासच्या मित्राकडे सापडले) बिल्डरने विकासला दिलेले असतात आणि विकाससोबत आता तो बिल्डर सुद्धा फसणार असतो म्हणून तो त्याला उलटे ब्लॅकमेल करतो. विकासच्या ऑफिसवर मग एक हल्ला होतो...

#nimishtics
#filminimish

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वा क्या बात है ! एकदम बहारदार लेखन. विशेषत: हे

त्यासाठी तो तिच्याकडे केव्हाही जात येत असतो. रात्री सुद्धा! तिचे लग्न झालेले असते की नाही याचा उलगडा झालेला नाही कारण तिला घरात एकटीच राहातांना दाखवलंय! विकास आणि तिच्यात प्लेटोनीक रिलेशन दाखवले आहे. (शारीरिक पातळीपलीकडे फक्त निखळ मैत्री!)

वाचून डोले पानावले. आता त्या सायकोलोजीस्ट साठी तरी सिरियल बघायला पाहिजे.

- ओंकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0