अपेक्षित...

तिथे निरव शांतता आहे;
पण केविलवाणा गोंधळ आहे
तिथे वाऱ्याची सौम्य झुळूक आणि
तिथेच एक वादळ आहे

तिथे मृदगंध आहे
आणि असह्य दर्पही आहे,
तिथे अवखळ वाहणारा झरा आणि
तिथेच खवळलेला सागर आहे.

तिथे आहे एक निश्चय
पण तेथे चंचलताही आहे.
तिथे आहेत अचल शिळा
आणि वाहणारा शिलारसही आहे.

तिथे भावनांचा पाऊस आहे
आणि तिथेच कोरडा डोंगर आहे.
तिथे आहे गहिरा विश्वास
आणि तिथेच संशयाचा डंख आहे.

तिथे लख्ख प्रकाश
पण भयाण काळोखही आहे,
तिथे एक सूर्य आहे
आणि तिथेच ग्रहणही आहे.

तिथे जन्माचा सोहळा आणि
तिथे मृत्यूचा तांडव आहे,
तिथे आहे एक सुरुवात
आणि तिथेच अंतही आहे.

तिथं प्रश्न आहेत;
तिथं उत्तरंही आहेत,
तिथे एक विश्व आणि
निर्वात पोकळीही आहे.

तिथे वाकडी वाट आहे,
पण तिथे मृगजळ आहे
आणि
सारं विलक्षण, विचित्र आहे पण
कदाचित अपेक्षित आहे.

©akash hogade
Thursday | June 7th , 2018

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मन?
मन मनास उमगत नाही ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेत मनातल्या गोष्टींचा विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0