नवीन देश कसा बनवायचा?

नुकतंच मी गब्बर सिंगना विचारलं होतं, 'इतर सर्व देशांच्या राज्यघटनांबद्दल तुम्हाला तक्रार असेल तर तुम्ही एक नवीन देश का नाही स्थापन करत?' असं म्हणण्यात किंचित खवचटपणा असला तरी मी थोडं संशोधन केलं तेव्हा अनेक गमतीदार गोष्टी लक्षात आल्या. मुख्य म्हणजे खूप लोकांनी या प्रश्नाचा मनापासून विचार केलेला आहे. मी जी काही सोपी आकडेमोड केली, त्यावरून हे बिलकुल महाग नाही असं लक्षात आलेलं आहे. त्यामुळे मला 'अजून कोणी हे का केलेलं नाही?' असा प्रश्न पडलेला आहे.

उदाहरणार्थ, या साइटवर एखादं बेट विकत घेऊन त्यावर स्वतःचा देश स्थापन करण्यासाठी काय करावं लागेल आणि त्यात काय अडचणी आहेत याचा विचार केलेला आहे. मुख्य अडचणी अशा -

बेटं उपलब्ध नाहीत. जी आहेत ती वेगवेगळ्या देशांनी आपली म्हणून घेतलेली आहेत. ती तुम्हाला प्रॉपर्टी म्हणून विकत घेता येते पण तुम्ही मूळ देशापासून फुटून निघू शकत नाही. मग काय उपयोग? असलेली काही बेटं सैन्य वापरून ताब्यात घ्यायची, पण तिथेही हे मोठे देशलोक आड येतात. आपल्या प्रदेशावर आक्रमण करणारांना हाकलून लावतात. तुमच्याकडे त्या देशाच्या सैन्याला तोंड देण्याइतकं सैन्यबळ असेल तर हे करता येईल. पण हा कमालीचा खर्चिक, वेळखाऊ आणि धोकादायक पर्याय आहे. 'आम्ही हे करणार आहोत' असं सांगून बाजारातून त्यासाठी फंडिंग मिळणं शक्य नाही.

यावर एक उपाय असा की स्वतःचं बेट बनवायचं. पण दुर्दैवाने ते सर्व देशांच्या किनाऱ्यापासून 200 मैल दूर असावं लागेल. आणि अशा ठिकाणी बेट बांधणं खार्चिक पडेल. कारण पुरेसा उथळ समुद्र तरच हे शक्य आहे. लेखामध्ये इतरही गोष्टी मांडलेल्या आहेत. त्या मुळातूनच वाचा. लेखात एक कल्पना ओझरती मांडलेली आहे, ती मला खूप आवडली. ती म्हणजे, बेट वगैरे कशाला बांधा? त्याऐवजी एक मोठ्ठी बोट घेतली तर? आपलं 'बेट' तरंगेल, इकडून तिकडेही जाऊ शकेल. पण इतर देशांपासून पुरेसं लांब राहिलं तर कुठल्याही जमीनवाल्या बेटाप्रमाणेच तिथे देश स्थापन करता येईल. माझ्या अंदाजाप्रमाणे सुमारे पाचशे मिलियन डॉलरच्या आत चार हजार लोकांसाठीचा देश तयार करता येईल. माझा हिशोब खालीलप्रमाणे.

सध्या ज्या नव्याकोऱ्या क्रूझ शिप्स मिळतात त्यांचा खर्च सुमारे सव्वा बिलियन डॉलर पडतो. त्यात एका वेळी सुमारे 6000 प्रवासी राहू शकतात. पण खरं तर इतकी महागाची, नवी बोट घेण्याची काहीच गरज नाही. जुनी खटारा बोट घेतली तर कदाचित एक चतुर्थांश किमतीत पडू शकेल. त्या बोटीत 4000 लोक दाटीवाटीने राहाण्याऐवजी, 1000 लोक भरपूर जागेत राहू शकतील. तिथे स्वीमिंग पूल, रेस्टॉरंट्स, मनोरंजनाच्या जागा वगैरे तयार असतंच. या सगळ्यासाठी दरडोई 250,000 डॉलर द्यायला अनेकांना काहीच वाटणार नाही.

पण बोट घेणं हे फारच आळशी आणि महागाचं प्रकरण झालं. जर कोणी मन लावून डिझाइन केलं तर आख्खं शहर वसवणं खूपच स्वस्त पडेल. इंटरनेटवर आपल्याला अनेक ठिकाणी आपल्याला शिपिंग कंटेनर्सपासून तयार केलेली घरं दिसतात. ही अतिशय स्वस्त असतात. लहान घरं (सहाशे ते नउशे स्क्वेअरफूट) 15000 ते 35000 हजार डॉलरना मिळतात, आणि मोठी घरं (हजार ते तीन हजार स्क्वेअर फूट) 50000 ते 200000 पर्यंत जाऊ शकतात. पण ती एकावेळी एक घेतली तर. जर दोन हजार घरांचं आख्खं शहर तयार करायचं असेल तर तिथे चारहजार लोक राहू शकतील. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बांधणी करायची असेल तर किंमत खूपच कमी पडेल. आणि निव्वळ घराची किंमत 30000 डॉलर येऊ शकेल. म्हणजे फक्त 60 मिलियन डॉलरमध्ये घरं बांधून होतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे घर ठेवण्यासाठी जमीन विकत घेण्याची गरज नाही. ते पाण्यावर तरंगेल. आता तुम्ही म्हणाल की पाण्यावर ते हलणार नाही का? अर्थातच एक घर ठेवलं तर ते हलेल, पण ही हजार घरं एकमेकांना लोखंडी सळ्यांनी जोडली, तर आख्खं शहर फारच कमी हलेल. सळ्यांनी जोडलेल्या भागात जाड प्लास्टिक टाकून त्यावर फूटभर माती टाकली की छान जमीन तयार होईल, आणि ती जमीनही थोडे पैसे मोजून तुमच्या मालकीची करून घेता येईल. म्हणजे हजार स्क्वेअरफुटाचं अद्ययावत घर, आणि आसपासची दोनहजार स्क्वेअरफुटाची जमीन याचा साधारण खर्च होईल प्रत्येक घरटी 50000 डॉलर! दरडोई 25000. पाण्याचं आणि विजेचं काय? उत्तर सोपं आहे. प्रत्येक घरावर सोलार पॅनेल्स बसवता येतील, शहराच्या एका कोपऱ्यात काही लहान पवनचक्क्या बांधता येतील. जर पावसाच्या पाणी योग्य प्रकारे वापरलं तर काहीच गरज पडणार नाही. अगदीच काही प्रश्न आला तर समुद्राचं पाणी गोडं करून वापरायचं किंवा जवळच्या देशातून टॅंकर मागवायचे. मुख्य म्हणजे कोणीच शेती करणार नाही, त्यामुळे नद्या, कालवे, धरण वगैरे फुटकळ गोष्टींवर खर्च होणार नाही.

थोडक्यात हिशोब असा आहे की एक लाख डॉलरमध्ये तुम्हाला घर, जमीन, कायमची वीज, आणि पाणी मिळणार. महिना हजार डॉलरमध्ये ग्रोसरी होईल आणि अजून हजार ऐश करण्यासाठी वापरू शकाल. हे सगळं करण्याचा वर्षाचा दोघांचा खर्च 30000! ज्यांना काटकसरीने राहायचं असेल अशांसाठी त्याच्या दोनतृतियांश किमतीतही जगता येईल. शहरात शाळा, हॉस्पिटलं, ग्रोसरीची दुकानं, रेस्टॉरंटं, कपड्यांची दुकानं, सिनेमागृह वगैरे गोष्टी असतीलच. तिथे काम करून तुम्हाला पैसा मिळवण्याची सोय आहेच.

पण देश तयार केला की आणखीन गमती करता येतात. म्हणजे शहराचं बांधकाम चालू असताना जे मजूर इथे आलेले असतील, त्यांना शहर पूर्ण झाल्यावर बंदी करून गुलाम म्हणून ठेवता येईल. कारण तुमचा देश आहे, तुम्ही काय हवं ते करू शकता. हजारेक गुलाम ठेवले तर त्यांच्या अतिस्वस्त मजुरीतून इथल्या लोकांचं आयुष्य ऐशोआरामाचं होऊ शकतं. कोणावर किती टॅक्स लावायचा हे तुम्ही ठरवू शकता. त्यासाठी त्या शहरातल्या लोकांपैकी शंभरेक लोकांना सिक्युरिटी गार्ड्सची नोकरी देता येईल. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारातल्या दहा मुख्य अधिकाऱ्यांकडे मशीनगन्स दिल्या की झालं. म्युटिनी वगैरे होण्याची बिलकुल शक्यता नाही.

थोडक्यात, चार हजार लोकांचं जीवन अगदी कमी पैशात सुखी करण्यासाठी सुमारे 400 मिलियनचा फारतर बांधकामाचा खर्च येईल - दरडोई सुमारे एक लाख डॉलर. (मी घराची किंमत 50000 म्हटलं होतं, पण जमीन, पाणी, वीज, रस्ते, शाळा, हॉस्पिटलं, हेलिपॅड्स, इतर देशात जायच्या बोटी वगैरे वगैरे... सगळं धरून ही रक्कम दरडोई रक्कम चौपट केलेली आहे) ही रक्कम तुम्हीच त्यांना फायनान्स करायची आणि ते लोक ते कर्ज फेडतील. म्हणजे पुरेसे कस्टमर तयार असतील तर तुम्हाला काहीच तोशीस नाही. सरकारी काम करण्यासाठी सुमारे दरडोई पाच हजार डॉलर्सची गरज पडेल, ती त्यांच्यावर लावलेल्या टॅक्समधूनच भागवता येईल. या सगळ्यावर थोडा प्रीमियम लावला तर वर्षाला 40-50 मिलियनचा फायदाही तुमच्या इन्व्हेस्टरांना दाखवता येईल.

थोडक्यात, महिना दोनेक हजार दरडोई कबूल केले तर आख्खा देश तयार करता येईल. इतकंच नव्हे तर तिथे चैनीत राहाण्याचा खर्चही त्यातून भागेल, आणि वर तिथल्या प्रॉपर्टीची मालकी मिळेल. ही सोय पुरवणाऱ्या कंपनीला आपल्या शेअरहोल्डर्सना वर्षाला दहा टक्के फायदा दाखवता येईल. असं असूनही कोणीच का हे करत नाही? टेस्लाच्या गाडीसाठी हजार डॉलर डिपॉझिट देणारे चार लाख लोक सापडले, पण या कल्पनेसाठी दहा हजार डिपॉझिट देऊ शकणारे 5000 लोक सापडणार नाहीत? मार्केट झोपलेलं आहे, कोणाला या संकल्पनेत रस नाही, की माझी गणितं चुकलेली आहेत?

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

बाकी सगळं स्वप्नरंजन चांगलं आहे, पण दुसऱ्यांना गुलाम करावं ही वृत्ती ?? तुम्हाला लोक गुर्जी का म्हणतात !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा... गब्बर सिंग यांची मतं तुम्ही वाचलेली दिसत नाहीत. त्यांना असल्या गोष्टी करण्यात फार रस आहे म्हणून मी तो मुद्दा त्यांच्यासाठी 'बघा बघा, तुम्ही जर देश स्थापन केलात तर असंही करता येईल' असं म्हणून दिलेली एक कोपरखळी आहे.

तो मुद्दा सोडून मला खरोखरच प्रश्न पडलेला आहे की लोक असं का करत नाहीत. गुलामगिरी वगैरे फालतू गोष्टी न करताही नवीन देश तयार करणं हे फार महाग नाही एवढंच मला दाखवायचं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉरी. कालपरवापासूनचे संदर्भ लक्षात घ्यायला हवे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुर्जींचे संदर्भ आणखी जुने आहेत. लॅपटाॅपवरून कवितकाचे दुवे डकवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता गुर्जींचेच दुवे डकविताय, म्हटले तर गुर्जींच्याच 'पूजेची पथ्ये', झालेच तर 'सैपाक' वगैरे अजरामर धाग्यांचेही दुवे डकवा की!

प्रस्तुत ताईंना ते रोचक वाटतील, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कल्पना आवडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आकाशानंद!

माझ्या माहितीनुसार प्रत्येक शिप ची नोंदणी ज्या देशात होते. त्या देशाचे नागरिकत्व त्या शिप ला मिळते. त्या देशाला flag state म्हणतात व त्या शिप वर त्या देशाचे कायदे कानून चालतात( आंतरराष्ट्रीय पाण्यात असताना सुद्धा).म्हणजे तुमची होडी भारतात रजिस्टर असेल आणि तुम्ही त्याचा तथाकथित देश बनवला तर त्याला भारतीय नौसेना ताब्यात घेऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणूनच मी शिप खरेदी करण्यापेक्षा समुद्रात प्रत्यक्ष घरं बांधण्याविषयी लिहिलेलं आहे. शिपिंग कंटेनर्सवर देशांची मालकी नसावी असा माझा अंदाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणूनच मी होडी म्हणालो. तरंगणार वाहन, जे आंतरराष्ट्रीय पाण्यात असते त्यांची नोंदणी करावी लागते. जर नोंदणी नसेल ती होडी शिप कंटेनर जे काही असेल ते समुद्री चाच्यांची समजण्यात येईल, आणि कोणीही तिला जप्त करू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नोंदणी कोणाकडे करावी लागते? माझी कंपनी जर भर पॅसिफिकच्या मध्ये ऑइल रिग तयार करत असेल, त्या कंपनीसाठी कुठच्या देशाचे कायदे पाळणं बंधनकारक असतं?

आणि मी जे मांडतो आहे ते वाहन नाहीच्चे. कुठूनही कुठेही जात नाही. मग कुठचा देश त्याबद्दल अटकाव करेल? आंतरराष्ट्रीय पाण्यात कोणाला ज्युरिस्डिक्शन असेल?

आणि समजा, मी अमेरिकेत असलं काहीतरी करणारी कंपनी रजिस्टर केली, आणि तोंड भरून सांगितलं, 'हो हो आम्ही सगळे अमेरिकन कायदे पाळू', आणि दोन वर्षांनी तिथल्या लोकांनी स्वतःला 'नवीन देश' म्हणून जाहीर केलं तर? अमेरिका कदाचित हल्ला करू शकेल. अमेरिका शक्तिवान आहे म्हणून आत्ताही कोणावरही हल्ला करू शकते. पण मुद्दा असा आहे की करेल का? ही कंपनी मुळात अगदी पिटकुश्या देशात रजिस्टर करून नंतर स्वतंत्र देश म्हणून जाहीर केलं, तर अमेरिका किंवा इतर जगाला यात काही लोकस स्टॅंडी असेल का?

कोणीही काबीज करू शकतं वगैरेला काही फारसा अर्थ नाही. पुरेशी शक्ती वापरली तर कोणीही काहीही करू शकतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लायबेरिया किंवा सायप्रस किंवा पनामात रजिस्ट्रेशन (फ्लॅग ऑफ कन्व्हीनियन्स) केल्यास काहीच प्रॉब्लेम नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नवीन देश बनवण्यासाठी/पूर्वी टीपार्टी किंवा कसलीशी पार्टी करायची असते ना? देश बनल्यानंतर जंगी पार्टी होईलच. पण तत्पूर्वी?
ही 'देशात' होईल की कुठे?
समुद्रात जर 'देश' झाला तर मग देशप्रेमाने प्रेरित होऊन 'मेरे देश की धरती' हे गीत कसे गाणार? की मग 'मेरे देश का दर्या' असे नवे देशप्रेमगीत रचावे लागेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मार्केट झोपलेलं आहे

.
गुर्जी, अजून तुम्ही मार्केट च्या प्रेमात पडलेले नाही आहात. लवकरच पडाल अशी अपेक्षा करतो.
.
The Seasteading Institute नावाची संस्था आहे - ही लिबर्टेरियन लोकांनी स्थापिलेली संस्था आहे - (त्यांना गरीबांचा अतिच पुळका आलेला असल्यामुळे मला ऑफपुटींग वाटते - ते सोडा.)
त्यांचं ब्रीदवाक्य पहा - Re-imagining Civilization with Floating Cities.
आता लगेच - नुस्ती स्लोगन्स असून काय उपयोग ? ती प्रत्यक्षात आणायला हवीत -- असा टिप्पीकल फुर्रोगामी डायलॉग मारू नका.
सत्यमेव जयते हे भारताचं स्लोगन आहे. ते प्रत्यक्षात आलेलं आहे काय ?
सोव्हिएत युनियन चं स्लोगन काय होतं ? ते प्रत्यक्षात आलं होतं का ?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्लोगन असून उपयोग काय? हे जस्टिफाय करण्यासाठी तुम्ही भारत सरकारचं उदाहरण वापरताय? बार लो ठेवावा म्हणजे किती लो... फारच दयनीय परिस्थिती आहे तर.

मला या लेखाबद्दल विचार करून तो लिहायला दोन तास लागले. तुमच्या त्या संस्थेने नक्की काय केलेलं आहे? आउटरीच? भांडवल गोळा करणं? नुसती नावं लिहू नका, स्लोगनपलिकडे काहीतरी नवी माहिती द्या की राव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारत निदान अस्तित्वात आहे. कधी काळीच लयाला गेलेल्या सोव्हियत युनियनची लिबर्टेरियन संघटनांची तुलना! कुठे नेऊन ठेवला लिबर्टेरियनवाद स्वतःचाच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुलना

.
बास बास बास.
.
स्त्रीवादाला नोबेल मिळालेच पायजे.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्ताच तुमच्या त्या संस्थेची वेबसाइट बघितली. तिथला व्हीडियो बघितला आणि,

'ईssssssssss हे तुमचे लिबर्टेरियन? 'वाघ बघा, वाघ बघा' म्हणून मरतुकडी मांजर दाखवताय तुम्ही!' असं झालं. गब्बर, एंडॉर्स करण्याआधी तुम्ही त्यांचा व्हीडियो तरी बघा हो, तुमचं असं हसं होणार नाही.

डाव्यातल्या डाव्या माणसाने हा व्हीडियो बनवला असावा. 'पर्यावरणाचं कित्ती कित्ती भलं होईल' असं किमान दहा वेळा तरी सांगितलंय. 'तुमच्या डोळ्यांना त्रास होणार नाही' असंही केविलवाणेपणे सांगितलंय. त्यांच्या व्हीजन स्टेटमेंटमध्ये 'मनुष्यजातीचं भलं' वगैरे पुचाट शब्दप्रयोग आहेत. एवढ्याशा पैशांसाठी एवढ्याश्या सरकारची क्यवढी चाटलेली आहे! लिबर्टेरियनांना ताठ होता येत नसेल तर सृजन कसं करणार?

प्रश्न साधा आहे. जगाचं वार्षिक उत्पन्न 100,000 बिलियन डॉलर आहे. मालमत्ता तर किमान त्याच्या दहापट असावी. एक मिलियन बिलियन डॉलरमधून तुम्हाला अर्धा बिलियन उभे करता येत नाहीत? त्याच्या कितीतरीपट कर्जमाफी शेतकरी लोक एकत्र येऊन एकट्या गरीब भारताकडूनच अधूनमधून मिळवतात. आणि तुम्ही इतरांना फडतूस म्हणून बोल लावता? थूत तुमच्या जिनगानीवर आणि विचारसरणीवर. शष्पाच्या लांबीइतकं काही करता येत नाही आणि बोलणं मोठ्ठी दाढीभरून.

पुढच्या वेळी तुम्ही फडतूस शब्द वापरला की मी हे उदाहरण तुम्हाला देणार आहे. कुठच्याही सरकारच्या धोरणांबद्दल तक्रार केली की 'देश का नाही तयार करत?' असं विचारणार आहे.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(त्यांना गरीबांचा अतिच पुळका आलेला असल्यामुळे मला ऑफपुटींग वाटते - ते सोडा.) - हा ढिश्क्लेमर मी आधीच लावलेला होता.
.
.

लिबर्टेरियनांना ताठ होता येत नसेल तर सृजन कसं करणार?

.
हे वाक्य लय आवडलं.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण हे 'तुम्हाला फडतूस का म्हणू नये - कारणे दाखवा' नोटिसीचं उत्तर नाहीये.

लिबर्टेरियनांना नवीन देश स्थापन का करता येत नाही, किंवा का करावासा वाटत नाही याबद्दल काहीतरी बोला की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण हे 'तुम्हाला फडतूस का म्हणू नये - कारणे दाखवा' नोटिसीचं उत्तर नाहीये.

.
तुम्ही ...... आता इंटिलेक्च्युअल बँक्रप्ट्सी साठी अर्ज करा.
.
.
एक तर आमच्याकडेच भीक मागून किंवा आमची संपत्ती चोरून त्यातून मिळणाऱ्या निधीवर जगणाऱ्यांचे प्रतिनीधीत्व करणारे तुम्ही.
आम्हाला कादानो बजावण्यासाठी तुम्हाला लोकस स्टँडी आहेच कशावरून ? कुठुन आली ?
.
.
मी सीस्टेडिंग चा दुवा फक्त तुमच्या वाग्यज्ञामधे माझ्या (आमच्या नव्हे) तर्फे एक समिधा अर्पण केली होती. पटली तर गोड मानून घ्या. नैतर सोडून द्या.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दे संपले की गुद्दे उरतात याचं स्पष्ट उदाहरण. मी कोणाचंच प्रतिनिधित्व करत नाही. या लेखाच्या संदर्भात अजूनही प्रश्न स्पष्ट आहे

1. एक लाख बिलियनमधून फुटकळ अर्धा बिलियन उभे करता येत नाहीत, अशांना फडतूस का म्हणू नये?

उत्तर द्यायचं की काहीतरी भरकटणारे युक्तिवाद करायचे हे तुमच्याच हातात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दे संपले की गुद्दे उरतात याचं स्पष्ट उदाहरण.

.
तुम्ही चक्क थापा मारताय.
मी काहीही गुद्दा वगैरे मारला नव्हता.
.
.

एक लाख बिलियनमधून फुटकळ अर्धा बिलियन उभे करता येत नाहीत, अशांना फडतूस का म्हणू नये?

.
हास्यास्पद मुद्दा आहे.
.
फडतूस ची व्याख्या मी मागे केलेली होती ती तपासून पहा. इथेच. ऐसीवर केली होती.
.
मेडल पाने की भूक मे आप कुछ भी कर डालेंगे ? .....तीन हवालदार और एक रिव्हॉल्व्हर लेकर आप राजन और सुलतान को पकडने चल दिये ?? क्या जरूरत थी इस तरहा भीड जाने की ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे काय आहे नक्की? स्पष्ट प्रश्नाला स्पष्ट उत्तर द्या कृपया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-कातिल में है?
वक्त आने दे बता देंगे तुझे ऐ आस्माँ!हम अभी से क्या बतायें क्या हमारे दिल में है?

एक से करता नहीं क्यों दूसरा कुछ बातचीत,देखता हूँ मैं जिसे वो चुप तेरी महफ़िल में है।
रहबरे-राहे-मुहब्बत! रह न जाना राह में, लज्जते-सेहरा-नवर्दी दूरि-ए-मंजिल में है।

अब न अगले वल्वले हैं और न अरमानों की भीड़,एक मिट जाने की हसरत अब दिले-'बिस्मिल' में है ।
ए शहीद-ए-मुल्को-मिल्लत मैं तेरे ऊपर निसार, अब तेरी हिम्मत का चर्चा गैर की महफ़िल में है।

खींच कर लायी है सब को कत्ल होने की उम्मीद, आशिकों का आज जमघट कूच-ए-कातिल में है।
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-कातिल में है?

है लिये हथियार दुश्मन ताक में बैठा उधर, और हम तैय्यार हैं सीना लिये अपना इधर।
खून से खेलेंगे होली गर वतन मुश्किल में है, सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है।

हाथ जिनमें हो जुनूँ , कटते नही तलवार से, सर जो उठ जाते हैं वो झुकते नहीं ललकार से,
और भड़केगा जो शोला-सा हमारे दिल में है , सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है।

हम तो निकले ही थे घर से बाँधकर सर पे कफ़न,जाँ हथेली पर लिये लो बढ चले हैं ये कदम।
जिन्दगी तो अपनी महमाँ मौत की महफ़िल में है, सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है।

यूँ खड़ा मकतल में कातिल कह रहा है बार-बार, "क्या तमन्ना-ए-शहादत भी किसी के दिल में है?"
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-कातिल में है?

दिल में तूफ़ानों की टोली और नसों में इन्कलाब, होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको न आज।
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है ! सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है ।

जिस्म वो क्या जिस्म है जिसमें न हो खूने-जुनूँ, क्या वो तूफाँ से लड़े जो कश्ती-ए-साहिल में है।
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है । देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-कातिल में है ??
.
_____________ रामप्रसाद बिस्मिल
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sad
तुला काय म्हणायचय ते मला कळलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला घासूगुर्जी हे केविनकाका च्या वॉटर वर्ल्ड मधले फुटक्या डोळ्याच्या व्हीलनसारखे दिसले. सिगारेटी वाटत हिंडणार्या चेल्यासह.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला एखाद्या विषयाला भिडणारे लोक आवडतात. कल्पनेचे पतंग उडवावे लागतात,काटाकाटी,कधी ढील. वारा पडला की म्हणजे अगोदरच पडणार हे ओळखून पतंग उतरवून ठेवायचा. परत नंतर चढवायचा.
समुद्र आणि बेटाचा विचार झाला. आकाशात कित उंचीपर्यंत देशांचा हद्द असते? बलूनमध्ये विहरल्यास मिनी ब्लॅकहोलसारखी मिनी शहरं शक्य आहेत का? थकल्यावर पाण्यात उतरायचं. सोलरने हाइड्रोजन , ओक्सिजन बनवायचा. इंधन अधिक इक्स्पोर्ट.
टेस्लाचा उल्लेख आला म्हणून लगेच विचारून घेतो - कशाबद्दल पद सोडावे लागले आणि दंड झाला?
बाकी एक ट्विस्ट - डॅान बनून देशाचा छोटा भाग आपलाच असल्यासारखा चालवत आहेत ती कल्पनाही चांगली वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द्विमितीय शहराचा तोटा असा की एकीकडून दुसरीकडे जाणं हे जिकरीचं असतं. त्यापेक्षा त्रिमितीय शहर तयार केलं तर सगळीच अंतरं लहान होतात. पिरॆमिड सिटी ही अशीच एक संकल्पना आहे. ती प्रत्यक्षात येईल की नाही, किंवा कधी येईल हे सांगता येत नाही. मात्र ती आली तर तेवढ्याच जमिनीवर दहापट बिल्डिंगी बांधता येतील आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचा सरासरी वेळ पंचवीस पट कमी होईल.
https://youtu.be/wRsp6DhxLDU

टेस्लाबाबत तर एक मोठ्ठी लेखमाला लिहायची आहे. सुंदर स्वप्न, गेली दहा वर्षं ठीकठाक एक्झेक्यूशन. प्रचंड मोठे शत्रू. प्रचंड प्रमाणावर चाहते. पुरेसा सणकी सीइओ... सगळंच नाट्यमय आहे. गेल्या तीनचार महिन्यांत मात्र मस्कची जादू जाऊन यडपटपणा शिल्लक राहिलेला आहे. काही आठवड्यांपूर्वी आली लहर केला कहर म्हणून त्याने ट्विटरवर लिहून टाकलं 'टेस्ला प्रायव्हेट होणार, शेअर्स 420 डॊलरला विकत घेण्यासाठी फंडिंग मिळालंय' असं लिहून टाकलं. मग शेअर्स 300 वरून भस्सकन 365 पर्यंत गेले. पण नंतर ते काही झालं नाही म्हणून परत 300 वर येऊन आपटले. मार्केटला चुकीची माहिती दिल्याबद्दल SEC ने त्याला धरल्यावर शेअर परत 260 ला गेले. मग SEC बरोबर सेटलमेंट झाल्यावर पुन्हा 310 पर्यंत एका दिवसात चढले. गेले दोन दिवस ट्विटरवर शिव्या दिल्यावर पुन्हा आता ते 260 ला आलेले आहेत. मी या रोलरकोस्टरमध्ये शेअर धरून सहभागी आहे. आणखीन काय बोलू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टेस्लाबाबत तर एक मोठ्ठी लेखमाला लिहायची आहे.
..... तुमच्या शैलीत वाचायला अतिशय आवडेल. अवश्य अवश्य लिहावे ही मनापासून विनंती. 'लेन्स्की-श्लाफ्ली' मालिकेनंतर तसं काही आलेलं नाही तुमचं.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"देशी"ची पण व्यवस्था करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याकरिता देशबांधणीची काय आवश्यकता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमच्या इथे भाजीवाल्या " घ्या घ्या,पडवळ दुधी कोबी फुलवर वांगी घ्या, गावठी हाय."
गावठी म्हणजे साताठ किमीटरातल्या स्थानिक भाज्या॥ जुन्नर/नगरच्या नाहीत असा अर्थ.
देशी म्हणजे इडिया मेड फारन लिकर. पण हे लोक नवीन देश बनवाया निघालेत तर कोणतातरी एक पदार्थ/गोष्ट तिथून निर्यात व्हायला हवी. म्हणजे जिडिपी वगैरेवर चर्चा होईल. इकनॅामी पौंडाइतकी स्ट्रांग होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोले तो, गब्बरचा काटा काढण्यासाठी हे लोक त्याला नवीन देश काढून द्यायला निघालेत खरे, परंतु तिथे बसून तो गब्बेरिझ्म निर्यात करेल, ही बात या लोकांनी जमेस धरली आहे काय?

त्याकरिता त्याला (पारंपरिक पद्धतीने) क्लँडेस्टाइन/पायरेट रेडियोस्टेशन काढण्याचीसुद्धा आवश्यकता नाही. तिथे बसून 'ऐसी'वर प्रतिसाद लिहिणेसुद्धा पुरेसे आहे. किंबहुना, तिथे त्याला (दिवसभर 'ऐसी'वर प्रतिसाद लिहिण्याव्यतिरिक्त) दुसरे उद्योग न राहिल्याकारणाने त्याची प्रतिसादवारंवारिता कित्येक पटींनी वाढेल.

याचिसाठी का केला होता अट्टाहास? (मग त्यापेक्षा तो इथेच राहिलेला काय वाईट आहे?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे ऐनवेळी बूच काढले का हवा जाऊन... हॅ हॅ हॅ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आता एकाच बेटाची /देशाची गरज आहे. अनुराव यांनी माघार घेतली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवीन देश बनवायला एवढा अभ्यास करायची खर तर काहीच गरज नव्हती. तुम्ही नित्यनेमाने साऊथमधून हिंदीमधे डब(ड) केलेले चित्रपट एखाद महिना सतत बघा, आयडिया येऊन जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0