टेस्ला आणि इलॉन मस्क - भाग 1.

1981 साली मी आमच्या एका उच्चहून थोड्याशा उच्च मध्यमवर्गीय नातेवाइकांकडे गेलो होतो. त्यांच्या विशीतल्या मुलांनी मला एक त्यांचं नवीन खेळणं दाखवलं. वॉकमन. त्यात एक कॅसेट घालून माझ्या कानांवरती इअरफोन लावले आणि मला आत चाललेलं गाणं आपल्या कानांत ढाणढाण आवाजात ऐकू आलं. इअरफोन काढून टाकले की शांतता. म्हणजे हे गाणं केवळ माझ्यासाठीच चालू आहे, माझं आहे. मी काय ऐकतो आहे यावर माझा हक्क आहे, जगाचा त्याच्याशी काही संबंध नाही. आणि मुख्य म्हणजे दोनचार कॅसेट बाळगल्या तर पंचवीस तीस मला आवडणारी गाणी मी कुठेही घेऊन जाऊ शकतो, चालता चालता ऐकू शकतो. ट्रॅफिकचे आवाज, आसपासच्या लोकांची निरर्थक बडबड यांनी भरलेल्या जगाच्या कोलाहलात स्वतःचं एक छोटंसं भोक पाडून त्यात मला माझ्या आवडत्या आवाजांचं विश्व तयार करता येतं. हे मला अगदी लहान असतानाही कळलं.

वॉकमन नावाचा लेख सचिन कुंडलकरांनी ऐसीवर लिहिलेला आहे
, त्यात याच स्वातंत्र्याचं वर्णन केलेलं आहे. मला अर्थातच तीन मिनिटं गाणं ऐकून एवढं काही भिडणं शक्य नव्हतं. मी फक्त त्याची किंमत विचारली. अडीच हजार रुपये हा आकडा ऐकून छाती दडपून जाण्याइतकी जाण मला होती.

'वॉकमन' ही संकल्पना संगीत-अनुभवाच्या क्षेत्रात क्रांती करणारी होती. संगीत हे गायकांपासून विभक्त होऊन बरीच दशकं लोटली होती. रेकॉर्ड्स, एलपी, रेडियो, ट्रांझिस्टर रेडियो, कॅसेट प्लेयर असा बराच मोठा प्रवासही झालेला होता. तुम्हाला काहीतरी छान टुईटुई ऐकायचं असेल तर रेडियो लावणं शक्य होतं. नंतर तेच संगीत तुम्हाला हवं तिथे घेऊन जाण्यासाठी ट्रांझिस्टर रेडियो आले. बैलाच्या शिंगाला ट्रांझिस्टर रेडियो अडकवून शेत नांगरणाऱ्या शेतकऱ्याचा फोटो अजून माझ्या मनात अजून घर करून आहे. पण रेडियोवर जे वाजवतील तेच तुम्हाला ऐकायला लागायचं ही त्यात अडचण होती. 'ही माझी गाणी, हीच मला हवी तेव्हा ऐकायची आहेत' असं म्हणणारांसाठी किंचित महागाच्या सोयी होत्या. रेकॉर्ड प्लेयर विकत घेऊन त्याबरोबर आपल्याला हवी ती गाणी असलेल्या रेकॉर्ड्स विकत घ्यायच्या. एक काळपर्यंत काही उच्चवर्गीयांना परवडणाराच हा शौक होता, पण घरच्या घरी जलसे भरवणंच परवडतं अशा अर्धा-पाव टक्के लोकांच्या मानाने हे खूपच लोकशाहीकरण होतं. त्यात सुधारणा होत आठदहा गाण्यांच्या नाजूक रेकॉर्ड्सऐवजी त्याहून कितीतरी स्वस्तात मिळणाऱ्या, दुप्पट गाणी मावणाऱ्या कॅसेट्स आणि त्या वाजवणारे कॅसेटप्लेअर्स आले. या लोकशाहीकरणामुळे सर्वोच्च दोनतीन टक्क्यांऐवजी पाचसात टक्क्यांना हवी ती गाणी हवी तेव्हा घरी वाजवता यायला लागली.

'टेस्ला आणि इलॉन मस्क' या नावाने सुरू झालेल्या लेखमालेचा संगीताच्या जगात घडणाऱ्या स्थित्यंतराशी काय संबंध? असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे. हळूहळू तो संबंध स्पष्ट होईलच, पण आत्ता थोडक्यात सांगायचं तर टेस्लाने केलेले स्थित्यंतराचे प्रयत्न समजून घेण्यासाठी आधी 'स्थित्यंतरं कशी होतात' हे समजून घ्यावं लागतं. त्यासाठी आपल्याला माहीत असलेली पूर्वीची उदाहरणं पाहिली की त्यातून आपल्याला काही समांतर सूत्रं सापडतात. आणि अजून पूर्ण न झालेलं स्थित्यंतर समजून घ्यायला मदत होते. तेव्हा थोडा धीर धरा.

एके काळी केवळ अतिश्रीमंतांनाच परवडणारं उच्च दर्जाचं संगीत आता अनेक लोकांना परवडायला लागलं असलं तरीही तो अनुभव मर्यादित होता. ट्रांझिस्टर रेडियोमुळे तुम्ही कुठेही गाणी ऐकू शकत असलात तरी ती तुमची गाणी नव्हती. तुम्हाला हवी तीच गाणी हवी तेव्हा ऐकायची असतील तर पैसे खर्च करूनही तुम्हाला तुमच्या दिवाणखान्यातच बंदिस्त असावं लागत असे. सत्तरीच्या दशकात सोनी कंपनी ही कॅसेट्स, कॅसेट प्लेयर्स या क्षेत्रात अग्रणी होती. तिचा कोफाउंडरदेखील प्रवासात गाणी ऐकण्यासाठी भलामोठा कॅसेट रेकॉर्डर-प्लेयर वापरे. त्याने लहानशा, निव्वळ प्लेयरचं डिझाइन तयार करायची मागणी केली. लवकरच ती प्रत्यक्षात आली आणि 1980 साली सोनीने आपला पहिला वॉकमन विकायला सुरुवात केली. किंमत फक्त 150 डॉलर्स. त्याकाळी ही किंमत लहान नव्हती. साधारण अमेरिकन कुटुंबाचा तो महिन्याचा ग्रोसरीचा खर्च होता. साधारण भारतीय मध्यमवर्गीय ते उच्च मध्यमवर्गीय लोकांचं ते मासिक उत्पन्न होतं. या 'वधारित' किमतीला सुमारे दरमहा 5000 वॉकमन विकले जातील असा सोनी कंपनीचा अंदाज होता. पण मागणी इतकी प्रचंड होती की पहिल्या दोन महिन्यांतच पाचपट विक्री झाली. पहिल्या दोन महिन्यांत 50000 विकण्याऐवजी तिप्पट किमतीला 15000 विकले असते तरी सोनी कंपनीचा साधारण तितकाच किंवा अधिक फायदा झाला असता. उरलेले 35000 त्यांना मूळ किमतीला विकता आले असतेच. त्यानंतर आठदहा वर्षांतच किमती पडल्या. याचं कारण इतर कंपन्यांनीही त्यांचे 'वॉकमन' बाजारात आणले. आणि 150 ऐवजी 30 ते 40 डॉलर्सवर किमती स्थिरावल्या. मात्र सोनी कंपनीची पहिली काही वर्षं आघाडी असल्यामुळे तिला अमाप पैसा कमवता आला.

टेस्लाचीही गोष्ट अशीच आहे. मात्र सोनी कंपनीला केवळ फायदा हवा होता म्हणून तिने आपलं उत्पादन सुरुवातीला कमी लोकांना महाग, नंतर अनेक लोकांना कमी महाग, आणि त्यानंतर आख्ख्या जगाला बरंच कमी महाग/स्वस्त विकलं. त्यामागे काहीतरी क्रांती करण्याचं स्वप्न नसून आपल्या उत्पादनांना असलेल्या मागणीचा शक्य तितका फायदा करून घेऊन शक्य तितका जास्तीत जास्त नफा कमवायचा हे सामान्य व्यवसायाचं तत्त्व आहे. प्रश्न असा आहे की ज्या व्यक्तीला जगाच्या वागणुकीमध्येच क्रांती करायची आहे, तिला हे तत्त्व वापरून टप्प्याटप्प्याने, सतत फायदेशीर बदल करत; सुरुवातीला श्रीमंतांना मोजक्या प्रमाणात आपलं उत्पादन विकून त्यातून मिळालेल्या पैशांतून कमी श्रीमंतांना घेता येतील अशी उत्पादनं निर्माण करत, पुढे पुढे जाऊन सामान्य माणसापर्यंत पोचण्याचं स्वप्न बाळगता येतं का?

इलॉन मस्कने टेस्ला कंपनी निर्माण करून या मार्गावर प्रगती केलेली आहे. या प्रगतीची, त्यातल्या अडथळ्यांची, इलॉन मस्कच्या व्यक्तिमत्वाची, त्याच्या कर्तबगारीची, त्याच्यावर भक्तांप्रमाणे प्रेम करणाऱ्या लोकांची, त्याच्या चक्रमपणाची, त्यातून निर्माण होणाऱ्या फायद्यांची आणि तोट्यांची ही कथा आहे. पहिल्या भागात केवळ पार्श्वभूमी मांडलेली आहे. पुढच्या भागांत इलॉन मस्क - एक व्यक्ती, एक द्रष्टा, एक करिष्मा असलेलं व्यक्तिमत्व म्हणून काय आहे हे पाहू. तसंच टेस्ला आणि त्याच्या इतर कंपन्यांच्या स्वप्नांचा आणि कर्तृत्वांचा इतिहास-भूगोलही तपासून पाहू.

सध्याच्या जगात कार्बन जाळणाऱ्या ऊर्जास्रोतांपासून दूर जात स्वच्छ ऊर्जास्रोत निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत, ही पार्श्वभूमी या लेखमालेला आहेच.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

उत्सुकता वाढतेय. वाचनाच्या बाबतीत सतत काही हवं असतं. दिवाळी आली की ( किंवा समारंभात ) फटाके वाजवू हे ठीक परंतू वेचक लेख वाचण्यासाठी वर्षभर थांबणे पटत नाही. मोठा धबधबाच पाहिजे तर अमुक ठिकाणी जावे लागेलपेक्षा भटकंतीत अर्ध्या वाटेत येणारा छोटासा झरा अधिक महत्त्वाचा.
सोनी आणि बोस यांचा दबदबा आहेच. दुसरी एक कंपनी कॅनन कॅम्रा कंपनी. आहे ते खूप झालं अशा विचाराने ते उत्पादन करत नाहीत. सतत नवीन जोड देतात त्यामुळे लाडक्या कंपन्या आहेत.
कॅननने युएसएम मोटरवाले ( आणि बरेचसे साइलंट) लेन्झ, फोकसिंगची इओएस पद्धत आणली. सिसीडी सेन्सर'सोडून सीमॅास वापरायला सुरुवात केली.
हे जे शोध लागत आहेत त्यात इतर इलेक्ट्रानिक्स शाखेतल्या प्रगतीचाही मोलाचा वाटा असतो. जसे बॅट्री आणि मेमरी कार्ड तंत्रज्ञान.
इलॅानच्या स्पेसेएक्सने नवा धडा सुरु केला. खासगीकरणातून स्पेस ट्रावल. इतर उद्योगांपेक्षा इथे सुरक्षितता आणि खात्रीशिर यंत्र चालणे शंभर टक्के अपेक्षित असते.
भारतात एकदा स्वस्त टॅब्ज (आकाश) शाळेत मुलांना वाटण्यात आले परंतू जिथे गावागावांत विजेचाच पत्ता नाही तर इंटरनेट कुठून असणार? सर्व पायाभूत सोयी एकाचवेळी प्रगत होण्याची गरज आहे.
रिचार्जेबल बॅट्रीसाठीचे रेअर अर्थस चीन,रशियाकडे आहेत.
टेस्ला आणि त्यामागचा सूत्रधार इलानबद्दल वाचण्याची उत्सुकता वाढते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही छान लिहिता. नेहमीच्या पोटापाण्याच्या उद्योगातून वेळ काढून जरा लिहिते व्हा ! नुसत्या प्रतिक्रिया वाचण्यापेक़शा असलं काही वाचणे आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पु भा प्र

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्सुकतेने वाट बघतोय पुढील भागाची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा भाग आवडला. पार्श्वभूमी उठावदार आहे, मूळ चित्रामध्ये गडद, गहीरे, फिके- रंग कसे भरले जातात ते पहाण्याची उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या कंपनीच्या सीइओ बाई नेहमी सांगत असतात. आपण कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर बनवत नाही; जग ज्या पद्धतीने काम करते ती पद्धत बदलतो.
We change the way world works.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उत्सुकता आहे तुम्ही काय लिहिता ते वाचण्याची. या विषयाचा अभ्यास नाही, तस्मात काही प्रश्न आहेत. तुम्ही त्यांचा कदाचित यथावकाश परामर्श घ्यालही, पण तरी तूर्त नोंदवून ठेवतो.

पेट्रोल वगैरे जीवाश्म इंधनाऐवजी विजेवर चालणारी कार हा कन्सेप्ट उत्तम आहे यात शंकाच नाही. परंतु ही जी वीज तयार होते तिचा स्रोत काय? तिचा स्रोतही जर पुरेसा स्वच्छ नसेल (उदा. औष्णिक इ.) तर ते गणित गंडणार नाही का? की तुमचं असं म्हणणं आहे-

१. नेहमीची जीवाश्म इंधनवाली कार
२. अस्वच्छ स्रोतांपासून तयार केलेली वीज वापरणारी टेस्ला

यांमध्ये, अस्वच्छ स्रोताची कार्बन फूटप्रिंट लक्षात घेऊनही टेस्ला ही त्या बाबतीत नेहमीच्या जीवाश्म इंधनवाल्या कारपेक्षा भारी आहे?

तुमचं असं म्हणणं असेल तर - हा जो दोहोंमधील फरक आहे तो अतिशय ढोबळमानाने किती टक्के इ. असेल?

तुमचं असं म्हणणं नसेल तर - वीजनिर्मितीतील अस्वच्छतेचे काय? एवीतेवी प्रदूषण होत राहीलच ना बऱ्यापैकी?

आणि माझा प्रश्न कितपत अज्ञानमूलक आहे? अमेरिकेत आजमितीस जी वीज तयार होते तीत अस्वच्छ स्रोतांचे प्रमाण किती आहे?

आगाऊ धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

परंतु ही जी वीज तयार होते तिचा स्रोत काय? तिचा स्रोतही जर पुरेसा स्वच्छ नसेल (उदा. औष्णिक इ.) तर ते गणित गंडणार नाही का?

हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तुम्ही गाडीच्या इंजिनात तेल जाळलं काय आणि कुठेतरी इतरत्र जाळून त्याची इलेक्ट्रिसिटी करून त्यावर गाडी चालवली काय, कार्बनचा हिशोब तोच पडणार. वरकरणी हे खरं आहे, मात्र बॅटरीच्या एफिशियन्सीची आणि इंटर्नल कंबशन इंजिनच्या एफिशियन्सीची तुलना केली तर हा पंचवीस ते पन्नास टक्क्यांचा फायद्याचा हिशोब ठरतो. हे गणित इलॉन मस्कनेच मांडून दाखवलेलं आहे. ते लेखमालेत येईलच. आत्ता हे तात्पुरतं लहान उत्तर.

उत्तराचा दुसरा भाग असा आहे की विजेचे स्रोत जसजसे स्वच्छ होत जातील तसतसं हे गणित जास्त जास्त फायद्याचं ठरेल. अस्वच्छ ते स्वच्छ हा प्रवास एका क्षणात होणार नाही. त्याला काही दशकं लागतील. पण त्या काळात तुम्ही प्रवासासाठी वापरणारी ऊर्जा अधिकाधक स्वच्छ होईल. बॅटरी-कारसाठी तो पर्याय उपलब्ध तरी आहे. आइस (ICE = Internal Combustion Engine) गाड्यांमध्ये कार्बन खर्च फिक्स्ड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद, म्हणजे हळू हळू दोन्ही टप्पे अधिकाधिक स्वच्छ होतील असं दिसतंय. गुड!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

घासकडवींचं म्हणणं योग्य आहे. इथे फक्त स्रोताचा विचार करुन चालत नाही. ओव्हरऑल सिस्टिमच्या एफिशियन्सीचाही विचार करावा लागतो. जगभरातल्या अनेक इंजिनियरांनी आणि शास्त्रज्ञांनी गेली शंभरेक वर्षं स्वत:चे नितंब आपटूनही पेट्रोल इंजिनाची एफिशियन्सी २५-३०% पुढे गेलेली नाही (अगदी लेटेस्ट जीडीआय वगैरे तंत्रज्ञानानेसुद्धा). शिवाय इंजिन सर्व स्पीडला सारखी एफिशियन्सी देत नाही ही गोष्ट निराळीच. याउलट मोटर + कंट्रोलर हे प्रकरण किमान ७५ ते ८०% एफिशियन्सी देतं (over a large speed range). तुम्ही पर्मनंट मॅग्नेट मोटर्स वगैरे वापरत असाल तर त्याहूनही जास्त. तीच गोष्ट बॅटरीची. लिथियम बॅटरीज चार्जिंग-स्टोरेज-डिस्चार्ज सायकलमध्ये कमालीच्या एफिशियंट असतात (त्यात केमिस्ट्रीप्रमाणे १९-२०चा फरक येतो). राहता राहिला प्रश्न चार्जिंग यंत्रणेचा. आधुनिक इलेक्ट्रॉनिक्समुळे चार्जर्सही ९०%+ एफिशियन्सी देतात. त्यामुळे स्रोत जरी अस्वच्छ असला तरी तो जास्त परिणामकारकरीत्या वापरला जातो.

दुसरा एक लहानसा पण कदाचित सर्वसामान्यांच्या लक्षात न येणारा मुद्दा म्हणजे गाडीमधील ऑक्झिलियरी सिस्टिम्स, उदा. एसी, सीट हीटर्स, इलेक्ट्रॉनिक पावर स्टियरिंग वगैरे. गाडी जितकी भारी तितकी या सिस्टिम्सची संख्या वाढते. या सर्व गोष्टी चालवायला बॅटरी आणि बॅटरी चार्ज करायला वीज लागते. वाईट गोष्ट ही की ही वीज आपण इंधन जाळून मिळवतो. साधं गणित करायला गेलो तर, सामान्य मध्यमवर्गीय वापरणाऱ्या गाडीचा अल्टरनेटर सर्वसाधारणपणे १४ व्होल्टला जर ५० अँपियर करंट देत असेल तर ही ७०० वॉट इलेक्ट्रिकल पावर निर्माण करायला (अल्टरनेटरची एफिशियन्सी साधारण ६०% असते, तर इंजिनची आपटून आपटूनही २५% धरली तर) साधारण ४६०० वॉट (साधारण सव्वासहा हॉर्सपावर) पावर लागते जी आपण इंधनापासून घेतो.

त्यापेक्षा सगळं बॅटरीवर चालवलेलं परवडतं. धूर निघत नाही तो वेगळा आणि जरी निघाला तरी ठराविक ठिकाणी निघेल. शिवाय निघालेल्या धुराच्या प्रमाणात जास्त गाड्या जास्त अंतर धावतील ते वेगळंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर अंतर्ज्वलन इंजिनची कार्यक्षमता अाणि बॅटरीची कार्यक्षमता यांची तुलना करून बॅटरी वरील कार कशी जास्त उर्जा कार्यक्षम अाहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला अाहे. पण तरीही बॅटमन यांचा प्रश्न उरतोच - जर वीज अौष्णिक स्रोतापासून मिळाली असेल, तर तिथे तुंम्ही कार्यक्षमता अाधीच कमी केली अाहे अाणि केवळ कारमध्ये वीज पोहोचल्यावर कार्यक्षमता मोजत अाहात. दुसरे असे, की पेट्रोल हे अत्यंत सघन इंधन अाहे. म्हणजे ते वाहून अाणायला त्याच्या वजनापेक्षा खूपच कमी तेल खर्च होते, पण वीजेची वहन कार्यक्षमता किती? महाराष्ट्रात तर ३०% गळती मंडळच दाखवायचे पूर्वी पण कितीही चांगले ग्रीड असेल तरी १५% वीज ही वहन रोधातच नष्ट होते. त्याचे काय? कार्यक्षमता ही संपूर्ण सिस्टीमची मोजली पाहिजे अाणि मग वीजेवरील कार अाधिक इंधन-कार्यक्षम अाहे का अाणि कमी प्रदूषणकारी अाहे का, ते मोजले पाहिजे. कोणत्याही गोष्टीला जी सिस्टीम बाउंड्री टाकतो, ती खूप महत्वाची अाहे.
अाता हेही बघा:
बॅटरीची विल्हेवाट कशी लावतात? त्यात हेवी मेटल्स वापरतात का? ती कितपत प्रदूषणकारी अाणि घातक अाहेत? डंप केल्यानंतर लिचींग ने भूजल विषारी होते का?
बॅटरी निर्माण करण्यासाठी लागलेली व इंजिन निर्माण करण्यासाठी लागलेली उर्जा यांची तुलना
बॅटरीचे अायुष्य व इंजिनचे अायुष्य यांची तुलना (म्हणजे अॉपरेटींग उर्जा कार्यक्षमता नुसती जास्त असून चालणार नाही, तर मोटारीच्या एकूण अायुष्यात मोटार किती बॅटर्या वापरते, त्या सगळ्या ‘उर्जा बॅलन्स शीट’ मध्ये धरल्या पाहिजेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढच्या भागात मी मस्कने दिलेलं एफिशियन्सीचं गणित अगदी थोडक्यात मांडलेलं आहे. त्यात मुद्दामच तांत्रिक बारकाव्यांचा विचार न करता साधारण ढोबळपणे गोष्टी सांगितल्या आहेत. याचं एक कारण म्हणजे मला पुरेसे बारकावे माहीत नाहीत. आणि दुसरं म्हणजे या प्रकारच्या लेखमालेसाठी सुरुवातीच्या भागांत सर्वसाधारण चित्र मला जास्त महत्त्वाचं वाटलं.

घाटावरचे भट यांनी ती कमतरता पूर्ण करून अनेक तांत्रिक बाबींचा ऊहापोह केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. स्वधर्म, तुम्ही मांडलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यांची जमेल तितकी उत्तरं लेखमालेत किंवा इथे देण्याचा प्रयत्न करेन. तूर्तास ही फक्त पोच समजा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>कोणत्याही गोष्टीला जी सिस्टीम बाउंड्री टाकतो, ती खूप महत्वाची अाहे.
सहमत आहे. पण मी प्रामुख्याने ईलेक्ट्रिक वि. पेट्रोल वाहन एवढ्याच दृष्टिकोनातून बोलत होतो. त्या दृष्टिकोनातून माझा मुद्दा बरोबर आहे.

मला या विषयावर शोधता शोधता एक लिंक सापडली
https://www.theguardian.com/football/ng-interactive/2017/dec/25/how-gree...
त्यातील ग्रफिक्स पहा. इलेक्ट्रिक कार जरी पूर्णपणे कन्वेन्शनल इलेक्ट्रिसिटीवर चालवली तरी पेट्रोल वाहनापेक्षा लाईफटाईम एमिशन्स कमी करते. त्यातील संदर्भही वाचण्यासारखे आहेत.

थोड्या वेगळ्या दृष्टीने बघणारा इलेक्ट्रिक वाहनांबद्दल हामेरिकेच्या एनर्जी लॅबोरेटरीचा 'वेल-टू-व्हील' एमिशन्स रिपोर्ट पहा
https://www.afdc.energy.gov/uploads/publication/ev_emissions_impact.pdf
https://www.afdc.energy.gov/vehicles/electric_emissions.php

>>बॅटरीची विल्हेवाट कशी लावतात? त्यात हेवी मेटल्स वापरतात का? ती कितपत प्रदूषणकारी अाणि घातक अाहेत? डंप केल्यानंतर लिचींग ने भूजल विषारी होते का?
असंही वाहनं रिसायकल करणे हा एक मोठा उद्योग आहे. त्यातही बॅटरी रिसायकलिंग हा एक मोठा उद्योग म्हणून पुढे येत आहे. त्याची मानकंसुद्धा बनत आहेत (भारतात वापरात असलेली वाहन उद्योगासंबंधी सगळी मानकं युरोपात/काही प्रमाणात अमेरिकेत बनतात मग ती आपण उचलतो). शिवाय त्यात वापरलेल्या आणि रिसायकल होऊ शकणाऱ्या घटकांची किंमत बरीच जास्त असते (त्यात हेवी मेटल्सही आली, उदा. लोखंड, कोबाल्ट वगैरे). त्यामुळे बॅटऱ्या रिसायकल होणार हे नक्की. आणि तसं पाहिलं तर इंजिनं बनवण्यासाठी लागणारे पोलाद/ॲल्युमिनियम बनवणे तसे प्रदूषणकारकच आहे.

>>बॅटरी निर्माण करण्यासाठी लागलेली व इंजिन निर्माण करण्यासाठी लागलेली उर्जा यांची तुलना
याबद्दल अभ्यास नाही. काही माहिती मिळाली तर बघून सांगतो.

>>बॅटरीचे अायुष्य व इंजिनचे अायुष्य यांची तुलना (म्हणजे अॉपरेटींग उर्जा कार्यक्षमता नुसती जास्त असून चालणार नाही, तर मोटारीच्या एकूण अायुष्यात मोटार किती बॅटर्या वापरते, त्या सगळ्या ‘उर्जा बॅलन्स शीट’ मध्ये धरल्या पाहिजेत.)

सर्वसाधारण गाड्यांचे आयुष्य बाय डिझाईन १५ वर्षे असते. सध्या बॅटरी तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे इलेक्ट्रिक गाडीच्या १५ वर्षांच्या आयुष्यात बॅटरी फार फार तर एकदा बदलावी लागते, तीसुद्धा १०व्या ते १५व्या वर्षांच्या दरम्यान, म्हणजे अगदी शेवटी आणि ते ही वापर फारच एक्स्ट्रीम असेल तर. हा त्रास पूर्वी होता. प्रियस सारख्या गाडीच्या बॅटऱ्या दर ३-५ वर्षांनी बदलाव्या लागायच्या. दुसरी गोष्ट म्हणजे इंजिनाच्या वेअर अँड टेअरमुळे नाही म्हटलं तरी इंजिनाच्या एफिशियन्सीवर परिणाम होतो. जुनी इंजिने कितीही चांगली असली तरी नवीन इंजिनाइतकी एफिशियंट असू शकत नाहीत. हा प्रश्न इलेक्ट्रिक मोटरला येत नाही.

शिवाय याचा एक लाँग टर्म फायदाही आहे. इलेक्ट्रिक कारमध्ये इंजिनाइतके (आणि त्याच्याशी जोडलेल्या ट्रान्समिशन इतके) हलणारे भाग नसतात. त्यामुळे गाडीच्या मेकॅनिकल्सचं लाईफ नक्कीच जास्त असतं. बॅटरी तंत्रज्ञान बदलत जाणार आहे. उद्या इतर कोणतीही कंपनी जुन्या इलेक्ट्रिक गाड्या फक्त नवीन तंत्रज्ञानावर आधारित बॅटरीपॅक बसवून सर्क्युलेशनमध्ये ठेवू शकते. म्हणजे जी गाडी १५ वर्षांत पूर्वी बाद होत असे, तीच गाडी कदाचित २०-२५ वर्षेही पळत राहू शकेल. म्हणजे कोणास ठाऊक नवीन तयार होणाऱ्या गाड्यांची संख्याच कदाचित कमी होईल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुवे वाचून प्रतिक्रिया देईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इलेक्ट्रिक कारमध्ये इंजिनाइतके (आणि त्याच्याशी जोडलेल्या ट्रान्समिशन इतके) हलणारे भाग नसतात.

मेकॅनिक/गॅरेजवाल्यांचं काय एलेक्ट्रिक गाड्या आल्यावर ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बॅटमन, १)यामध्ये बॅट्री क्षमता महत्त्वाची. पण सध्या किती किमी जाता येईल नंतर काय म्हणून हाईब्रिड कार. मग पेट्रोलवर चालवत हॅाटेल गाठून चार्जिंग करायचे. २) बॅट्री बनवताना किती इतर प्रदुषणवाले स्रोत लागतील ते पाहावे लागेल.
३)वाऱ्यावरची वीज बरीच स्वच्छ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या लाडक्या दैनिक पुढारीने पवनचक्क्यांमुळे पावसाचे ढग फिरून समुद्रात कसे परत जातात यावर महिनाभर पहिल्या पानावर दणदणीत लेखमाला चालविली होती.
(दि ग्रेटेस्ट रिकॉन्सिलर प्रतापसिंहजी जाधव (महेश कोठारे छाप ज) यांची फार आठवण झाली)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

काही जर्मन फॅम्लींनी (आजोबाआजी) हौसेने आल्पसमध्ये घरे बांधली. काहींच्या घराजवळून सुपरवे गेल्याने शांती सोडून गेली. काहींच्या घराजवळ पवनचक्क्या फिरू लागल्या. नाती म्हणतात आजी वाशिंगमशिन उगाचच चालू ठेवते ( चक्कीचा सतत सूँ~~ आवाज येत राहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोलर पण स्वच्छ असते,आणि बिनआवाजी पण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोलरसाठी जे मायनिंग लागतं त्या प्रक्रियेत होणारं प्रदुषण देखील पकडायला लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हो ना! सोलर टोपी आहे त्यावरचा एक पंखा कप्पाळ गार ठेवतो. टक्कलही झाकले जाईल आणि मोबाइल रिचार्जही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्कीच . पण ते वन टाइम. तयार होणारी ऊर्जा वन टाइम नाही. प्रॉफिट मध्ये असतंय बहुधा एकंदरीत गणित. जास्त माहिती करता गुर्जीना भेटा अथवा लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मालिका सुरू केल्याबद्दल धन्यवाद!

ज्या व्यक्तीला जगाच्या वागणुकीमध्येच क्रांती करायची आहे, तिला हे तत्त्व वापरून टप्प्याटप्प्याने, सतत फायदेशीर बदल करत; सुरुवातीला श्रीमंतांना मोजक्या प्रमाणात आपलं उत्पादन विकून त्यातून मिळालेल्या पैशांतून कमी श्रीमंतांना घेता येतील अशी उत्पादनं निर्माण करत, पुढे पुढे जाऊन सामान्य माणसापर्यंत पोचण्याचं स्वप्न बाळगता येतं का?
......असे सवयबदल घडवून आणण्याऱ्या (किंवा एखादा उदात्त हेतू बाळगून निर्मिलेल्या) प्रकल्पांसाठी भांडवल गोळा करण्यासाठी ह्या प्रारूपाव्यतिरिक्त आणखी कुठली परिणामकारक प्रारूपं उपलब्ध आहेत ? म्हणजे उदा. प्रकाशनसंस्था एखाद्या पुस्तकप्रकल्पाची लेखी-तोंडी जाहिरात करून पुस्तकं छापण्यासाठी वाचकांना आगाऊ नोंदणी करायला आवाहन करतात, आणि त्यातून साठलेल्या भांडवलातून पुस्तकछपाई करतात. त्यात आर्थिक स्तरांना तितके महत्त्व नसून सामान्य वाचकाला प्रकल्पाची योग्यता किती प्रमाणात पटते, नि त्यानुसार आर्थिक गुंतवणूक करावीशी वाटते की नाही, ह्यावर भांडवल गोळा होतं, नि ठरावीक प्रती छापल्या जातात. ह्यात वाचकांत लाभासाठी प्रथम श्रीमंत, मग उच्च मध्यमवर्गीय, मग कनिष्ठ मध्यमवर्गीय वगैरे उतरंड नसते.

टेस्लाच्या कथेत मस्कने त्याचा उदात्त हेतू आणि तो तडीस नेण्यासाठी उभं करावं लागणारं भांडवल ह्याचं व्यावसायिक गणित करताना त्याचं प्रारूप कसं निवडलं ते मालिकेत बहुधा पुढे येईलच, पण हा एक उपमुद्दा म्हणून नोंदवून ठेवतो. उत्तर आत्ताच हवे असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बऱ्याच वेळा कोणीतरी खास प्रयत्न केले नाहीत तरी सवयबदल होतात. उदाहरण द्यायचं झालं तर घोडागाड्या जाऊन कार्स येण्याचा बदल. तसंच कधी ना कधी पेट्रोलची इंजिनं जाऊन बॅटऱ्या येणार आहेत. आज नाही तर दहा वर्षांनी. पण हे निश्चित होणार आहे हे जाणून घेऊन त्या बदलाच्या सर्व अंगांचा विचार करून त्यासाठी नियोजन करणं महत्त्वाचं. म्हणजे घोडागाड्या जाणार आणि कार्स येणार, तेव्हा तबेले काढून टाकून त्याजागी पेट्रोल पंप तयार करण्याची दूरदृष्टी फायद्याची ठरते. नाहीतर बदलांच्या मागे फरपटत जायला होतं.

नोंदणी प्रारूप अर्थातच मस्कने वापरलं. त्याविषयी लिहीनच, पण टेस्ला/मस्कने एकंदरीत बदलासाठी काय टप्पे घ्यायचे, त्याबद्दलची दूरगामी योजना काय आखली आणि त्यानुसार पावलं कशी टाकली याविषयी पुढच्या भागात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्यामते सोलर ही इतर उर्जेपेक्षा अधिक स्वच्छ आणि स्वस्त असावी. २ किलोवॅट चे पॅनल दिवसा अंदाजे ८-१० युनिट वीज निर्माण करतात, ह्यात एक छोटी इलेक्ट्रिक कार चार्ज होऊ शकते व ७०-८० किमी. चालते. म्हणजे १ लाखात वीसएक वर्ष गाडीला ऊर्जा मिळू शकते, स्वतःचा पेट्रोल पंप म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१० युनिटमध्ये ७० किमी? माझी मागणी ताबडतोब नोंदवा !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

२ किलोवॉटचं प्यानेल लावयला १०० स्क्वेअर फुट जागा लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सोलर पॅनल च्या साइज नुसार 2kw चे सोलर पॅनल लावायला अंदाजे 150-175 स्क्वेअर फूट जागा लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग महिंद्रा e2o घ्या, किंमत बरीच जास्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचायला उत्सुक...
माझ्या पहाण्यात आलेला ही माहीती...
सोलार आणि विंड एनर्जीपेक्षा भविष्यात न्यूक्लिअर एनर्जीला अच्छे दिन येतील बहुदा...
फोर्ब्सचा हा तक्ता..
http://www.visualcapitalist.com/worlds-safest-source-energy/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुरुजी , ही लेखमाला चालू केल्याबद्दल धन्यवाद . नवीन माहिती मिळत आहे. ( पर्स्पेक्टिव्ह , पर्स्पेक्टिव्ह महत्वाचा , मर्यादित का असेना )
कुठल्याही विषयावर शूटिंग फ्रॉम द हिप छाप बातम्या व त्यावरच्या कमेंट्स वाचण्याचा अतीव कंटाळा आला होता . या पार्श्वभूमीवर आपण हे लेखमाला चालू करून ( आमच्या सारख्या ) अज्ञानी फडतुसांच्या ज्ञानप्रकाशात भर घालत आहात त्याबद्दल धन्यवाद .
गुर्जी उगाच नाही म्हणत तुम्हाला !!!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विजेची मागणी वाढली आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राघा, जेव्हा जमेल तेव्हा, अन्य लेखांचे दुवे प्रत्येक धाग्यावरती टाकत चला, ही विनंती. खूप रोचक लेखमाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरेचदा लोक लेख वाचताना खालचे प्रतिसाद वाचत नाहीत. त्यामुळे लेखांवर आलेली प्रश्नोत्तरंही लेखांमध्ये समाविष्ट करता येतील का, संदर्भ देऊन, संबंधितांना श्रेय देऊन वगैरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखमाला असल्यामुळे काही प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागांत देण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळ्याच गोष्टी पुरेशा बारकाव्यानिशी समाविष्ट करणं कठीण जाईल. उदाहरणार्थ, घाटावरचे भट यांनी अनेक तांत्रिक बारकावे सांगितलेले आहेत. ते सगळेच लेखमालेत घेता येणार नाहीत. त्यामुळे नुसती लेखमाला वाचली तर वाचकाचं पुरेसं समाधान होईल, पण लेख आणि प्रतिसाद वाचले तर हाती जास्त गवसेल, याला माझी फार हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेडीओपासून सुरु झालेली संगीतयात्रा मोबाईलपर्यंत जाण्याचा रोचक प्रवास याची डोळा बघणारी आपली ही पिढी युनिक आहे खरंच !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवळ संगीतच नव्हे, तर आपण अनेक बाबींत क्रांतिपर्वांतून गेलो आहोत आणि जातही आहोत. डिजिटल क्रांती तर झाली, आणि अजून चालू आहे. हरितक्रांती, धवलक्रांती झाली. त्याशिवाय आता ऊर्जाक्रांतीलाही सुरुवात झालेली आहे. तिचे परिणाम स्पष्ट दिसायला दोनेक दशकं लागतील.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0