माळढोक पर्वाचा अंत झाला

माळढोक पर्वाचा अंत झाला

आता हळूहळू माळरानही संपेल

अशीच भूक वाढत राहिली

तर उद्या फक्त माणूसच उरेल

तो डौलदार असेल ,

रुबाबदार असेल

तो कसा होता ?

ते मात्र आता पुस्तकात दिसेल

त्याचाही पुतळा बनेल

निर्लज्जासारखे रोवत सुटतील त्याला

प्रत्येक बागेत

किंवा करतील त्याची पेंग्विनसारखी थुकदाणी

आणि लीहितील त्यावर " माझा खाऊ मला द्या "

मी फक्त ऐकलं होतं त्याच्याबद्दल

भरभरून मिळणाऱ्या अनुदानाबद्दल

निसर्गप्रेमींच्या त्यागाबद्दल

अन गहाणवट पडलेली सरकारी अक्कल

अखेर बघायचं राहूनच गेलं त्याला

माळरानाच्या माळेतला कोहिनूर निखळला

तो जाताच क्षणी , लांडग्याने नंबर लावला

एकदा का त्याला कायमचा गिळला

मग प्रगतीचा मार्ग मोकळा झाला

): प्रगतीचा मार्ग मोकळा झाला ):

सिद्धेश्वर विलास पाटणकर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Sad
कविता आवडली म्हणवत नाही. कवितेमागील भावना आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

छानच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेतून माळढोक पर्व छान व्यक्त झालं.
१)तुमचे कवितेचे विषय विविध असतात.
२) कचरापेटीचा पेन्ग्विनपेक्षा माळढोक - नेमकं!
३) अस्ताव्यस्त लेखापेक्षा कविता उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असाच एक तणमोर पक्षी जवळपास लुप्त झाला आहे त्याच्या आवाजाचा ओडिओ _व्हिडिओ वाटसपवर मिळालाच असेल.

या कोंबडीवर्गातील पक्षांचं दु:ख म्हणजे ते चविष्ट लागतात. बगळे वाचले यातून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद फार आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसा धन्यवाद देऊ , या सांत्वनाला

माळढोक महाराष्ट्रातून निघून गेला

आज महाराष्ट्रातलं माळरान पोरकं झालं

चला दोन अश्रू गाळूया

दोन मिनिट श्रद्धांजली फक्त

पुढं अजून कोण संपतंय ते पाहूया ( आता लांडगा असेल बरं का )

पुन्हा तेच नवीन मुखवटा घातलेले ( अ डा ण * ट सरकार )

पुन्हा दोन अश्रू

पुन्हा दोन मिनिट श्रद्धांजली

पुन्हा पुढं जायचं

असंच पुढं पुढं करत करत

एकमेकांचं थोबडे बघायचं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.livemint.com/rf/Image-621x414/LiveMint/Period1/2015/09/11/Photos/GIB-kHMB--621x414@LiveMint.jpg
______________________
नक्की काय झालय? माळढोक हा पक्षीच आता 'एन्डेन्जरड' झाला आहे की 'एक्स्टिन्क्ट' झाला आहे? Sad
असं काही ऐकलं अक्षरक्ष: ना .... Sad Sad
_____________
अवांतर - ऐसीवरही विविध प्रकृतीचे, स्वभावाचे लोक सापडतात. पैकी काही कॉमनर्स तर काही दुर्मिळ असतात. होपफुली एकमेकांना धरुन राहतील. आणि इथे अशीच विविधता नांदेल/वाढेल्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं , महाराष्ट्रातून तरी हद्दपार झाला आहे आणि आता तो फक्त राजस्थानात आढळतो . तेही २०१७ च्या आकडेवारीनुसार अवघे १५० राहिले असतील . फारच खॆदजनक आहे हि बाब . मला वाटतं सरकारी यंत्रणेत , बरीच माणसे अशी आहेत ज्यांना या गोष्टींशी सोयरसुतक देखील नाही . त्यांना जैवसाखळीचं महत्व कळलेलं नाही अथवा त्याचे पुढे होणारे दुष्परिणाम माहित नाहीत . इथे ज्या ज्या समित्या बनतात , त्यांचे अहवाल नाममात्र संकलित केले जातात .त्यातून सकारात्मक काहीच घडत नाही .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता फार आवडली. खरच निराशाजनक परिस्थिती असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाराष्ट्रातला शेवटचा नर माळ्ढोक गतसाली निवर्तला. आता महाराष्ट्रात माळ्ढोक नाहीत. नान्नज अभयारण्यातील जमिनी डीनोटिफाय करण्याचं काम बहुधा सुरु झालेलं आहे. आता काही माळढोक कर्नाटकात आहेत असं ऐकून आहे आणि बहुसंख्य राजस्थानात आहेत.

माळढोक विचित्र पक्षी आहे. त्याला अधिवासाकरता गवताळ/मैदानी प्रदेश लागतात. अशा प्रदेशात साहजिकच गुरे वगैरे चरायला येतात. त्यात मादी बोंबलायला एकच अंडं घालते. तेही जमिनीवर, घरटं वगैरे न बनवता. त्यामुळे गुरांच्या पायाखाली वगैरे येऊन त्यांची अंडी नष्ट होतात. लोकांना नान्नजमध्ये रस्त्याकडेला माळढोकाची अंडी दिसलेली आहेत. त्यामुळे त्यांचा मल्टिप्लिकेशन रेट खूप कमी झाला आहे. कॅप्टिव्ह ब्रीडिङ्गचे प्रयत्न कोणी केले आहेत की नाही ठाऊक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मादी कंटाळा करते घरटं बांधायचा तर मेल्या नराला काय होतं कामाचा तेवढा भार उचलायला? पुरुष जातच आळशी Wink
पहा आता नष्ट व्हायची वेळ आली तरी ..... MCP पणा काही जात नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

??मेल्या नराला काय होतं कामाचा तेवढा भार उचलायला? पुरुष जातच आळशी

तो फक्त शेंगा खाऊन टरफले टाकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो फक्त शेंगा खाऊन टरफले टाकतो.

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Bustard कॅटॅगरीतील सगळ्याच पक्षांना हा प्रॉब्लेम असतो. भरपूर माळरान गरजेचे. कायम वाढत जाणाऱ्या शेतीमुळे मोकळे माळरान आता दुर्मिळ. दुसरे म्हणजे हा पक्षी सहज पटकन उडून जाऊ शकत नाही. (विमानांप्रमाणे) आधी स्टार्ट घेऊन थोडे पळत जाऊन मग उडतो. त्यामुळे सहज शिकार करता येते.
माळढोक पक्षाप्रमाणे आता पुढे तणमोर म्हणजे Lesser Florican याचेही अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण4
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याला वनखात्याचा माठपणाही जबाबदार आहे. एकेकाळी आख्खं सोलापूर शहर नान्नज पक्षी अभयारण्याच्या हद्दीत समाविष्ट केलं होतं. भर शहरात साधी घराची भिंत बांधायची तरी वनखात्याच्या लोकांची परवानगी लागायची. मग लोकांना कसं प्रेम राहील माळढोकाबद्दल?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वनखात्याची जमीन,ते त्याचे मालक. ते काहीही करणार. आपण नुस्ता टाहो फोडायचा.
काय काय कल्पना लढवल्यात आतापर्यंत!
आता जिम कॅार्बेटमधून रस्ता जाणार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या सर्वांच्या प्रतिसादातून फार मौलिक माहिती मिळाली .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0