अध्यात्माला विनोदाचे वावडे नाही :)

अध्यात्मिक स्तोत्रे, मंत्र, पोथी, पुराणे वाचत असतेवेळीच लक्षात आले होते की स्तोत्रांतही बरेच प्रकार आहेत, स्तुती, कवच, भुजंगस्तोत्रे, अष्टके,नामावली, अभंग आणि अन्य काही. स्तुती, अष्टके आणि भुजंगस्तोत्रे. या प्रकारांत देवांचे स्तुतिपर वर्णन असते, अनेक सुंदर उपमा, रुपकांच्या लडी उलगडतात ज्या की मंत्रमुग्ध करुन सोडणाऱ्या असतात, उत्कृष्ट असे काव्याचे नमुने असतात. याउलट कवचांमध्ये काहितरी मागितलेले असते. उदाहरणार्थ त्या देवतेची विविध नावे गुंफुन माझे पूर्वेकडुन शंकर, पश्चिमेकडुन वामदेव, दक्षिणेकडुन त्र्यंबक, प्रवासात स्थाणु .... वगैरे रक्षण करो. म्हणजे यात देवांना कामाला लावलेले असते.उदा.-\

गौरी पति: पातु निशावसाने मृत्युंजयो रक्षतु सर्वकालम् ॥
अन्त:स्थितं रक्षतु शंकरो मां स्थाणु: सदापातु बहि: स्थित माम् ।

अर्थात रात्रीच्या समयी गौरीपती माझे रक्षण करो, स्रदा सर्व काळ मृत्युंजय माझे रक्षण करो...... वगैरे जंत्री.
.
वेंकटेश स्तोत्राबद्दल तर इतकी स्तुती ऐकून होते, ते किती प्रभावी स्तोत्र आहे आणि भक्तांना, नित्यनियमाने ते स्तोत्र म्हणणाऱ्या भाविकांना कशा अनुभूती येतात. पण प्रत्यक्षात वाचल्यानंतर लक्षात आले की आपल्याला सर्वात कमी आवडणारे स्तोत्र आहे का तर यात देवाला चक्क इमोशनल ब्लॅकमेल केलेले आहे. उदा. -

लक्ष्मी तुझे पायांतळी । आम्ही भिक्षेसी घालोनि झोळी ।
येणे तुझी ब्रीदावळी । कैसी राहील गोविंदा ॥
कुबेर तुझा भांडारी । आम्हां फिरविसी दारोदारीं ।
यांत पुरुषार्थ मुरारी । काय तुजला पैं आला ॥

साक्षात् कुबेर तुझा कॅशिअर आहे, खजिनदार आहे आणि आम्ही मात्र भिक्षान्न मागत दारोदारी फिरायचे. अरारारारा काय हे मुकुंदा, तुला तरी शोभा देतं का?
म्हणजे देव खजील हमखास, झालाच पाहीजे.
.
तसच ते बजरंग बाण स्तोत्र

उठु उठु चलु तोहि राम दुहाई। पांय परों कर ज़ोरि मनाई।।
ॐ चं चं चं चं चपत चलंता। ऊँ हनु हनु हनु हनु हनुमन्ता।।
ऊँ हँ हँ हांक देत कपि चंचल। ऊँ सं सं सहमि पराने खल दल।।
अपने जन को तुरत उबारो। सुमिरत होय आनन्द हमारो।।

यातही हनुमानला रामाची शपथ वगैरे घालुन एकदम आपल्या मदतीला धाउन येण्यास भागच पाडण्याचा नॉट सो क्षीण प्रयत्न केला गेलेला आहे.

पोथी वाचताना एक तर ती संपविण्याचा धीर (पेशन्स) रहात नाही किंवा आज २ अध्याय वाचून चार दिवसांनी परत सुरु केली की आधीच्या अध्यायांचे किंचित विस्मरण होते. पण तरी 'रामविजय' ही (जुने) श्रीधरस्वामी लिखित पोथी इतकी रसाळ आहे. विशेषत: त्यातील हनुमंतजन्म कथन प्रचंड 'ॲक्शन ओरिअंटेड' आहे, अक्षरक्ष: थरारक, रोमांचक अत्यंत चित्रमय आहे.

गंमत म्हणजे अध्यात्माला विनोदाचे वावडे नाही हा साक्षात्कार मला रामविजय पोथी वाचतेवेळी झाला. क्वचित जर किंचित विनोदबुद्धीची चुणूक मी पाहीली असेन तर ती रामविजय ग्रंथातच. दोनचार विनोदी उल्लेख सांगायचे झाले तर -
शृंगी नावाचा एक ऋषीपुत्र आहे. ज्याला त्याच्या वडिलांनी अर्थात एका ऋषिंनी स्त्रियांपासुन/समाजापासुन दुर ठेवलेले आहे जेणेयोगे पुत्राच्या तपात काही विघ्न येऊ नये. एकदा ऋषी अन्यत्र गेलेले असताना, काही अप्सरा त्याला रसाळ फळे देतात, कामभावे मोहीत करु पहातात. आत्ता श्रुंगीने पहिल्यांदाच स्त्रिया पाहिलेल्या असल्याने, तो त्यांच्या वक्षस्थळांकडे पाहुन विचारतो की तुम्ही कोण ऋषीमुनी आहात आणि तुम्हाला ही गलंडे कशामुळे आली? तो प्रसंग पुढिलप्रमाणे-

तो अकस्मात त्या समयासी रंभाऊर्वशी पातल्या|
उत्तम स्वरुपे मंजुळ गायन| सुंदर मुख आकर्ण नयन
शृंगिलागी खुणावुन|कामभाव दाविती||
नानापक्वान्ने अमृतफळे| श्रूगिसी देती बहुत रसाळे|
मग तो उतरोनि खाले|जवळ येउनी बैसला|
तयांसी पुसे आवडिकरुन| सांगा तुमची नामखूण|
ही गलंडे (गोळे,उंचवटे) काय म्हणुन|वक्षस्थळी तुमच्या पै||
येरी गदगदा हसिती|तुझिया माथा शृंग निश्चिती|
म्हणुनी तुजला शृंग म्हणविती| तुजलागी ऋषिपुत्रा||
आमचे नाव गलंडऋषी|बहुसुख असे आम्हापाशी ...

आणि मग शृंगऋषी रोज आवडीने त्यांची वाट पाहू लागले व अप्सरा त्यांना कामासने शिकवु लागल्या ..... त्यातच एकदा त्याचे वडिल परत आले आणि पहातात तो काय .... असो!!
.
रामविजय पोथीतील,अजुन् एक असेच नर्मविनोदी वर्णन म्हणजे - हनुमंत जन्मकथनाचे. हनुमान जन्मताक्षणी क्षुधित होता, त्याने सुर्याला पाहीले व मोसंब्यासारखे फळ निश्चित समजुन तो खावयास धावला तो दिवस होता ग्रहणाचा आणि नेमका राहू सुर्यास गिळावयास आलेला होता. हनुमानास वाटले हा कोण माझ्या व फळाच्या मध्ये विघ्नरुपाने प्रकटला, व हनुमानाने राहूचे साग्रसंगीत ताडन केले. मग राहूस वाचवायला केतु लगबगा आला तो हनुमानापुढे केतुचेही काही चालेना. केतुलाही, हनुमानाने यथेच्छ बडवुन काढले. याचे वर्णन करताना श्रीधरस्वामी अर्थात (टंग इन चीक) म्हणतात - हनुमानाने तिथेच आकाशमंडळात यथासांग ग्रहपूजा मांडली.

ऐसे बोलत वायुनंदन| राहूवर लोटला येऊन|
इंद्रादेखत ताडण| राहूसी केले बहुसाल||
जैसा पर्वत पडे अकस्मात| तैसा राहूसी दे मुष्टिघात|
ग्रहपूजा यथासांग तेथ| वायुसुते मांडली||

.
अजुन एक असाच विनोदी उल्लेख म्हणजे नकट्या नाकाचा. आधीच कैकयीला स्वत:च्या सौंदर्याचा अभिमान त्यात तिला डोहाळे लागले त्यात स्वत: दशरथ राजा तिचे कुशल विचारण्याकरता अंत:पुरात आला, काय विचारता. नकट्याला सौंदर्याचा अभिमान व्हावा, अल्पविद्या येणाऱ्याला गर्वाचा फुगारा चढावा तसे कैकयिचे झाले.

सुंदरपणाचा अभिमान्|त्यावरीही कैकयी गर्भिण्|
जैसी अल्पविद्या गर्व पूर्ण|तैसे येथे जाहले||
जैसी गारुडियांची विद्या किंचित्|परंतु ब्रीद (प्रतिके) बांधती बहुत
की निर्नासिक (नकटा) वहात|रुपाभिमान विशेष पै||
बिंदूमात्र वीष वृश्चिका|परी पुच्छाग्रे वरुते देखा
किंचित द्न्यान होता महमूर्ख|मग तो न गणे बृहस्पतीते||
खडाणे धेनुस दुग्ध किंचित|परी लत्ताप्रहार दे बहुत|
अल्पोदके घट उचंबळत|अंग भिजे वाहकाचे||

तर सांगायचा मुद्दा हा की अध्यात्मिक वाचन अगदीच 'पंतोजी' नसते. भरपूर रसाळ, विनोदीही असते.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

दिवाळी अंकात दिला असता ना लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओह शूट!!! लक्षातच आलं नाही SadSadSad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हळुहळू दिवाळीचे सुतळी बॉम्ब, भुईचक्रे, सापसुरळी, लवंगीच्या लडी सुरु होतिलच तोवर आमच्या टिकल्या व वायरी गोड मानुन घ्याव्या Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वावडे नव्हते तर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

नाही वावडे नव्हते. काही संतांची दुसरी (जगापुढे सहसा ना येणारी) बाजू टवाळ असू शकते Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळ्यांनीच अध्यात्म अवलंबलं तर पुढचे ऋषी कसे जन्माला येणार हेच सत्य सांगायला रंभामावशी भाच्यांना घेऊन आली होती.
गोंदवलेचे स्वामीनी संसार करत अध्यात्माचा शिरा वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आंटी मत कहो ना Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रृंगीला भुलवण्यासाठी त्याच्याच वयाच्या अप्सरा आणेल ना रंभाआंटी?
स्वर्गात अमर्त्य असले तरी वय दिसतच असणार/ अगोदरची नंतरची पिढी असणारच/ आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्यंकटेश स्तोत्र आवडतं. 'पोटासाठी दाहि दिशा' वगैरे वापरून गुळगुळीत झालेल्या वाक्प्रचारांबरोबर

 • 'गावीचे लेंडओहोळ, गंगेसि मिळता गंगाजळ'
 • 'नीच रतली रायासि, तिजला कोण म्हणेल दासी?'

वगैरे थोर निरीक्षणंही आहेत.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

अगदी खरे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आबा, तुम्ही आचवलांचा व्यंकटेशस्तोत्रावरचा लेख वाचलायंत का? बहुतेक 'पत्र' मध्ये आहे.

उडदामाजी काळे-गोरे, काय निवडावे निवडणारे
कुचलिया वृक्षाची फळे, मधूर कोठोनी असतील
अराटीलागी मृदुता, कोठोनी असेल कृपावन्ता
पाषाणांसी गुल्मलता, कैशियापरी फुटतील.

सॉलिड. यात अराटी म्हणजे कसले फळ काय माहित!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अराटी म्हणजे बाभळीसारखं काटेरी झुडूप.

'कुचलिया वृक्षाची फळे' मधलं कुचलिया हे मला वृक्षाचं नाव वाटत होतं. पण मध्यंतरी एका अभ्यासकाने कुचलिया --> कुजलिया --> कुजलेल्या ही व्युत्त्पत्ती सांगितल्यावर 'अर्रे, इतकं साधं कसं लक्षात नाही आलं' म्हणून कपाळावर हात मारून घेतला.

प्रतिसाद वाचून आचवलांच्या लेखाची आठवण काढणारे तुम्ही तिसरे. (बाकी दोन गुप्तवाचक / वाचनमात्र लोक आहेत.) पुस्तकही घरी आहे, पण वाचायचा मुहूर्त लागेना अजून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

अराटी म्हणजे बाभळीसारखं काटेरी झुडूप.

अरेच्चा! का कुणास ठाऊक अराटी म्हणजे फळ वाटत होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अरेच्चा! का कुणास ठाऊक अराटी म्हणजे फळ वाटत होते.

डिट्टो!!! अगदी हेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> कैशियापरी
हे कॅशियाचे फळ आहे का?
( आध्यात्मिक टवाळी )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अध्यात्मिक,भाविक लोकांसमोर वात्रट विनोद करता येत नाहीत, भडकतात. पण शुचिने त्यातून आनंद ,विरंगुळा मिळवलाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा टवाळगिरी फार फार आवडते त्याचा परिणाम आहे च्रट्जी Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शृंगीची कथा आणि हनुमंताने बांधलेली ग्रहपूजा मस्तच!

तसेच महाभारतात एका आंधळ्या ऋषीची कथा आहे ज्याची बायकामुले त्याला घरातुन हाकलतात कारण हा गायीसोबत गोधर्माने रमत असतो आणि संसाराकडे दुर्लक्ष करतो म्हणून. ते काय प्रकरण आहे कळायला कल्पनाशक्ती हवी आणि व्यासांच्या 'जय' काव्यात असले भारूड घुसडणाऱ्याची बुद्धीही विनोद/व्यंग शोधणारी-पेरणारी असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे बापरे : D

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारी लेख. नवनाथाच्या कथेतदेखिल टवाळपणा बऱ्याच ठिकाणी आहे.(मलातरी जाणवला). आणखी म्हणजे श्रावणातल्या कहाण्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

ओह मग वाचल्याचे पाहीजेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शाळेतल्या, माझ्या वात्रट मित्राने, त्याच्या पुस्तकांत, लक्ष्मीकांतं कमलनयनं च्या मध्ये ॲरो दाखवून प्यारेलालं, असं लिहिलं होतं. पहिल्याच बाकावर बसणारा असल्याने, एक दिवशी शिक्षकांच्या लक्षांत आलं. अख्ख्या वर्गाला एक बौद्धिक ऐकून घ्यावं लागलं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

हे आवडलं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुचला हे आयुर्वेदातले मह्त्त्वाचे औषध - ( होमिओपथीमध्येही आहे ( Nux Vomica )
"It is a major source of the highly poisonous, intensely bitter alkaloids strychnine and brucine derived from the seeds"- wiki.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुच शब्दाचा अर्थ स्तन असाही आहे ते वायलं पण आत्ता जस्ट आठवलं. जर तो श्लोक सापडला तर लिहीन.
___________
खापरेवर स्त्रियांचे प्रकार सांगीतले आहेत त्यात आता हा श्लोक सापडला -
आता स्वभावलक्षणे हस्तिनी|सान्गो तुजप्रति||
तरी स्थूळ तियेचे करचरण| विशाल मस्तक दीर्घ दशन|
जिव्हा स्थूळ लंब श्रवळ" कंठी धैवत स्वर||
दीर्घ कुचभार| मस्तक विशाळ| सूक्ष्म लोचन लंबोष्ठिका स्थूळ .....

वगैरे वगैरे!!!
________
पण मला जो श्लोक माहीत होता/आहे तो वेगळा आहे.
_________
हां सापडला -
श्रेयाव्हेर - https://maitri2012.wordpress.com/2012/04/07/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%...

” मकरंद धुंद लव उन्मिलीत सारंगे
त्या परी नयन जड प्रणयमदाच्या संगे
विमनस्क उसासत स्मरसुंदर स्मरणाने
ताणले चाप जणु लावून बाण अनंगे //
त्या मदनशरांनी विद्ध जाहली राधा
तापली तनुलता होऊन मोहन बाधा
कुच अधिकच उन्नत तंग कंचुकी-बंध
हा विरहव्यथेचा प्रकार नाही साधा //
आठवले कालच पूर्णचंद्र उदयाला
हिंदोळत होता तरुशाखेवर झूला
त्या हिंदोळ्यावर कृष्ण आणखी राधा
त्यासवे गळ्यातील शुभ्र फुलांच्या माळा //
वेढले हरीने राधेला करपाशी
ओढिले आणखी निकट तिला हृदयाशी
देखिली मेखला कटिवरुनी ढळताना
मी उभीच होत्ये तेथून दूर जराशी

______________________
नावा स्मर: की हरभीतीगुप्ते पयोधरे खेलति किंभ एव|
इत्यर्थचंद्राभनखाड्क्चुम्बिकुचा सखी यत्र सखीभिरुचे .....

अनुवाद - शंकरांच्या भीतीमुळे, गुप्त राहू इच्छिणारा, मदन, तुझ्या दुधाने भरलेल्या घटांवरती, नौकाविहार करत आहे काय? (इथे नौका म्हणजे स्तनांवरती उमटलेले नखांचे अर्धचंद्रकार व्रण असा आहे)
__________
अर्थात मला माहीत असलेला श्लोक सापडत नाहीये पण ही इतकी सुरेख उपमा सापडली हेही नसे थोडके.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी खालच्या प्रतिसादात तेच लिहिलेलं आहे.

वसंतराव देशपांड्यांनी गायलेलं एक भन्नाट गाणं आहे. लहानपणी ऐकलं होतं तेव्हा अर्थ कळला नव्हता.

'लाविलि थंड उटी, वाळ्याची,
सखिच्या कुचकलशासी...'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह!!! रसिक कल्पना आहे. अशीच एक अतिशय रसिक कल्पना अन्यकोणी नव्हे तर आपल्या/आमच्या आदि शंकराचार्यांनी 'श्रीसुब्रह्मण्य भुजङ्गम् ' या स्तोत्रात लिहीली आहे. कार्तिकेयाच्या प्रत्येक अंगप्रत्यंगाचे वर्णन करताना शंकराचार्य त्याच्या छातीचे वर्णन करताना म्हणतात -

पुलिन्देशकन्याघनाभोगतुङ्ग-
स्तनालिङ्गनासक्तकाश्मीररागम् ।
नमस्यामहं तारकारे तवोरः
स्वभक्तावने सर्वदा सानुरागम् ॥ ११॥

साधारण अनुवाद - तारकासुराचा वध करणाऱ्या (कार्तिकेया) वल्लीचे पुष्ट आणि केशराने माखलेले स्तन मीठीत घेतल्याने तुझी छाती केशरी रंगाने झळकत आहे. त्या छातीस माझा नमस्कार असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयला, मी कुचला या शब्दाची 'कुच ला - कुच घेऊन येणारी अशी ती' अशी फोड केली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे श्रृंगाररसातले विनोद या दिवाळी अंकात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इन जनरलच वावडे नाही च्र्ट्जी Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0